Thursday, June 2, 2022

देवाला वशिला विनोदी लेखन

 हास्य कट्टा

देवाला वशिला

एकदा एक जोडपे आपल्या मुलीला घेऊन देवाला गेले होते. दर्शन घेतल्यावर नवरा जरा बाजूला कठड्यावर बसला.

बायको देवळाला फेऱ्या मारू लागली. मुलीने आईच्या मागोमाग फेऱ्या मारताना विचारले,

“आई फेऱ्या का मारतेस.”

आई : “तुझे बाबा माझ्या मुठीत राहावेत म्हणून फेऱ्या मारतेय.”

एक फेरी मारल्यावर मुलगी बाबा जवळ जाऊन बसते.

बाबा विचारतात : “बाळ आई काय करतेय.”

मुलगी, “तुम्ही तिच्या मुठीत रहावं म्हणून देवाला वशिला लावतेय.”

बाबा लगेच देवळाला उलट्या फेऱ्या मारू लागतात.

तेव्हा मुलगी म्हणते, “ बाबा तुम्ही उलट्या का फेऱ्या मारताय.”

बाबा : “काय नाही बाळ देव तुझ्या आईची इच्छा पूर्ण करू नये म्हणून मी पण वशिला लावतोय.”

मुलगी : “ अरेरे बिचाऱ्या देवाचे हालच की कुणाचं ऐकायचं तेनं.”

- निशिकांत हारुगले.


Saturday, April 23, 2022

निसर्गाची किमया ढोल

निसर्गाची किमया  ढोल

लेखक : निशिकांत हारुगले


एकदा एक सुतार जो लाकडाच्या वस्तू बनवतो. तो चांगल्या लाकडाच्या शोधात जंगलात फिरत होता.

तो फिरत जंगलाच्या मध्यभागी गेला. तिथे एक विशाल वृक्ष होता. त्याने पाहिले. त्या वृक्षास अनेक जागोजागी ढोली होत्या. त्या वृक्षास त्याने निरखून पाहिले.त्यावर मारून पाहिले.

त्याला तो एक पोकळ व निरुपयोगी वाटला.

तो मोठ्याने म्हणाला, “की देवाने असले वृक्ष कशासाठी तयार केले.जे काही उपयोगाचे नाहीत.”

व तो तिथून निघून गेला. त्याचे हे बोलणे ढोलीत असणारी पक्षाची पिल्ले यांनी त्याचे हे बोलणे ऐकले व त्या वृक्षानेही ऐकलं.

थोड्या वेळाने तिथे एक लाकूडतोड्या आला. तो त्या झाडाला पाहून निरखून. ते खूप उंच असते व त्याच्या फांद्या खूप मोठ्या व पोकळ असल्याने

 तो म्हणतो, “हा सरपण पण द्यायच्या लायकीचा नाही. किती पोकळ आहे हा?”

त्याचे हे बोलणे ती पक्षाची पिल्ले व ते झाड एकते.

झाडाला दुःख होते. पक्षाच्या पिल्लातील एक पिल्लू म्हणते, “ खरंच हा वृक्ष निरुपयोगी आहे का?”

दुसरे पिल्लू म्हणते, “ संध्याकाळी आई आली की आपण विचारू.”

संध्याकाळी त्या पिलांची आई येते.तसेच त्या ठिकाणी अनेक पक्षांची घरटी असतात.

ती पिल्ले आपल्या आईला सर्व हकीकत सांगतात व विचारतात. “की हे झाड निरुपयोगी आहे का?”



तेव्हा पिल्लांची आई म्हणते, “या जंगलात हे झाड अत्यंत उपयुक्त आहे. कारण याच्या पोकळ ढोल्यांमधे अनेक जीवांची घरटी आहेत. जेव्हा खूप पाऊस पडू लागतो. तेव्हा अनेक खारुताई आपल्या अन्नांचा साठा इथल्या ढोलीत करतात. तसेच इतर लहान प्राणी येथे राहून याची फळे व साली कुरतडून खातात. व हा पोकळ असल्याने अनेक प्राणी याच्या पोकळीत विसावतात. याच्या दाट सावलीमध्ये कडक उन्हात अनेक प्राण्यांना निवारा भेटतो. मग आता तुम्हीच सांगा. की हे किती उपयुक्त आहे ते.”

पिल्लू म्हणाले, “ मग ते दोघे असे का म्हणाले.”

त्या पिल्लांची आई म्हणाली, “ या जगात सर्वात जास्त स्वार्थी माणूस आहे. तो फक्त निसर्गातील प्रत्येक वस्तू व घटक आपल्या मालकीचा समजतो. पण त्याच इथे काही नाही. जे आहे ते प्रकृती म्हणजेच निसर्गाचे आहे. तो उगाच खुळ्यासारख आपलं आपलं म्हणतो.

 त्या सुताराला व लाकूडतोड्या फक्त या झाडातील पोकळ लाकुडच दिसले. त्याचा इतरांना उपयोग दिसलाच नाही.

म्हणून निसर्ग त्याला वेळोवेळी अनेक निरनिराळे रोग निर्मुण शिक्षा देतो.

त्या पक्षाचे हे बोल ऐकून दुःखी झालेलं ते झाड आनंदी झाले.

तात्पर्य : निसर्गातील प्रत्येक वस्तू व घटक जिथे तिथे उपयुक्त आहे. मानवाने स्वार्थ सोडून निसर्ग चक्र बिघडवू नये. तसेच त्याच्या बुध्दीचा सर्व सजीव व निर्जीव संसाधने यांच्या संव्रधनासाठी वापर करावा.

लेखक : निशिकांत हारुगले


Monday, April 18, 2022

परमेश्वराचे अस्तित्व व आपले विचार

 परमेश्वराचे अस्तित्व व आपले विचार  


llश्री गुरुदेव दत्तll


आपण परमेश्वर ही संकल्पना फक्त देवळातील देव अशी संकल्पना न मानता त्याचे अस्तित्व चराचरात आहे आहे असे  आपल्या भगवतगीतेत मानले आहे.

आपल्या जवळील सर्व वस्तूत परमेश्वर आहे,

झाड, दगड, माती, मानव, संसाधन, सर्वत्र त्याचा वास आहे.

उदा :

१) तुम्ही रस्त्याने निघालात व वाटेत एखादे पिसाळलेले कुत्रे तुमच्या अंगावर आले. तेव्हा तुम्ही तेथे आसपास पाहता. तिथे एखादी काठी अथवा एखादा दगड आपल्या हाती लागतो. तो तुम्ही त्या कुत्र्यावर उगारता व कुत्रा तिथे जाग्याला थांबतो. वा पळून जातो. तेव्हा ती काठी व दगड तुमच्यासाठी देव असते. व आक्रमक कुत्रा राक्षस असतो.

२) तुम्ही घरात एकटे आहात. दुपारी तुमच्याकडे पाहूणे आलेत. घरी कोणीही नाही. तेव्हा त्या पाहुण्यांना सरबत करायचा आहे. व घरात फक्त लिंबू व मिठ आहे. तुम्हाला बाहेर जाता येत नाही तेव्हा तुमच्या शेजारी अंगणात एक लहान मूल खेळत आहे. त्याला तुम्ही बोलवता व दुकानातून साखर आणावयास सांगता. ते मूल जाऊन तुम्हाला साखर आणून देते. तेव्हा ते तुमच्यासाठी देवस्वरुप असते. कारण ते अडचणीच्या वेळी मदतीस धावून आले होते.

३) आपण एखादे चुकीचे काम वा वर्तन केले. तेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती आपली चूक सांगते. वा एखाद्यावेळी शिक्षा पण देते. मग ते आईबाबा असोत वा गुरुजी अथवा एखादा मित्र. ते आपल्यासाठी परमेश्वर असतात.

तात्पर्य :    प्रत्येकाने असे समजून वागले, अथवा आचरण केले तर तुम्हाला मानव व सजीव निर्जीववस्तू मधिल देव सापडेल.

या साठी मानवतावादी दृष्टी व भूतदया हवी.

लेखक. : निशिकांत हारुगले 

Thursday, March 31, 2022

भावकीतील वाद व शेजारच्यांचे मनसुबे

 भावकीतील वाद व शेजारच्यांचे मनसुबे



एका गावात एक जमीनदार राहत होता. त्याची खूप जमीन होती.त्यात पीक चांगले येई. त्याच्या शेजारी काही दुसरे मध्यम वर्गातले लोक राहत ज्यांना त्याची काहीना काही गरज पडत असे. व तोही मोठ्या भावाप्रमाणे मदत करी.


पण त्या लोकांना त्याचे एकत्र कुटुंब खटकत असे. त्यांनी त्याच्या लहान भावंडाना काही बाही सांगून भांडणे लावून त्यांचे घर फोडले. व घराची वाटणी करावी लागली.


 मोठ्या भावाला वाईट वाटले. त्याची लहान भावंडे शेजाऱ्यांचे ऐकून आपल्याच मोठ्या भावा बरोबर भांडू लागली. मोठा भाऊ लहान म्हणून दुर्लक्ष करी.


त्या गावात दुसरा एक जमीनदार राहत होता. त्याला यांची जमीन हवी होती. म्हणून तो भावा भावात षडयंत्र करून भांडणे लावी. व आपला फायदा बघत असे. त्यासाठी त्याच्या शेजार्याना काही ना काही मदत करी व चाड्या सांगून झुंजवी.



एक दिवस रस्त्याच्या वाटेवरून  भावाभावात भांडणे झाली.शेजारी भांडणात आणखी भडकावू लागले. तेव्हा मोठ्या भावाने या शेजाऱ्यांच्या डाव ओळखला. व त्याने आपल्या भावासकट सर्वांची नाकेबंदी केली.


कुणाची वाट आडव कुणाच्यात जाणार्या पाण्याची वाट बदल असे उद्योग सुरू केले. काही उधार माल नेत.त्यांची उधारी बंद केली.यामुळे सगळ्यांची पंचाईत झाली.


सगळे दुसऱ्या जमिनदाराकडे गेले. त्याने फक्त सल्ला दिला की एकी करा व लढा. व इतर मदत द्यायचे टाळले.


त्यानी एकी करून थोरल्या जमीनदाराची नाकाबंदी सुरू केली. तेव्हा त्याने पर्यायी मार्ग शोधले.


त्याने एका मित्राला असेच हे शेजारी त्रास देत होते. तेव्हा मदत केली होती. व मोठ्या संकटातून वाचवले.


त्याकडे मदत मागितली व तो मदत करू लागला. जिथे शेजारी वाट अडवत. तो मित्र पर्यायी मार्ग देऊ लागला. त्यामुळे थोरल्या जमीनदाराचं काहीच अडेना.


शेजार्यांनी मग मदत करणाऱ्या मित्राला धमकावण्यास सुरू केले. तेव्हा त्याने यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. व मदत सुरू ठेवली.


तेंव्हा शेजाऱ्याने मित्राची आडवनुक सुरू केली. तेव्हा त्यांची पण अडवणूक होणार हे शेजाऱ्यांच्या बायकांनी ओळखले. कारण त्या सगळ्या शेणी थापायला मित्राच्या रानात जात. व त्याच्या वावरातून पर्यायी मार्ग असलेने त्यांची अडवणूक करण्याची धमकी त्याने आपल्या गड्याकरवी पसरवली. त्यामूळे ते  सर्व् गप्प  झाले.


 त्यामुळे त्याची अडवणूक करणे जमेना. व एक होऊन भांडणे लावणारा दुसरा जमीनदाराचंही काही चालेना.


शेवटी शेजार्यांना शरण यावे लागले. व जमीनदाराची माफी मागून त्यांच्या घरगुती भांडणात न पडण्याचे त्यांनी ठरवले..


पण जमीनदाराने पण यावर विश्वास न ठेवता आपले अस्तित्व वाढवायला सूरवात केली.

तात्पर्य : 

  • मोठा जमीनदार म्हणजे रशियन सोव्हिएत गणराज्य.
  • त्यातून विभक्त झालेली मुले म्हणजे रशिया व युक्रेन.
  • त्यात भांडणे लावणारे शेजारी म्हणजे नाटो देश.
  • दुसरा जमीनदार आहे अमेरिका
  • मदत करणारा व दबावाला न जुमानत स्वतंत्र अस्तित्व जपणारा देश भारत.

आपण यातून असे शिकावे की घरातील भांडणे घरात मिटवावित. व दुसऱ्याला गैर फायदा घेऊ देऊ नये.कारण संकटात आपले कोणी नसते. व तुमची गत युक्रेन सारखी होणार नाही मग.

लेखक -  निशिकांत हारुगले

Sunday, March 27, 2022

म्हातारीच्या पठाराची पाण्याची वाटणी

   म्हातारीच्या पठाराची पाण्याची वाटणी



भुदरगड तालुक्यातील किल्ल्यास लागून म्हातारीचे पठार आहे. त्याचा उतार जास्तीत जास्त पश्चिमेस आहे व पूर्वेस कमी त्यामुळे पावसाचे पाणी जास्त पश्चिमेस जाते. पूर्वेला कमी. सरकारी योजनेतून तिथे दोन्ही बाजूला धरण बांधले गेले. त्यामुळे पूर्वेकडे पाऊस कमी त्यामुळे धरणात पाणी कमी येत असे. त्यामुळे पश्चिमेच पाणी पूर्वेकडे वळवण्याचा प्रयत्न झाला. व दोन्ही भागातील लोकांमधे भांडण जुंपले.त्यामुळे एकमेकांच तोंड ही पाहिना झाले. पावसाळा सरला व गुरे चारण्यासाठी पठारावर जनावरे चारणीस दोन्हीं बाजूची माणसे येऊ लागली. एके दिवशी पश्चिमेचा सदा व पूर्वेकडच्या वाडीचा धोंडू जनावरे चारणीस आले एकमेकाची भाकरी वाटून खाणारे आता तोंड ही पाहीनात तिकडे  एक म्हातारी  आपली जनावरे घेऊन आली होती . सदाची म्हैस वरती चरायला आलेली बघून

धोंडू, “ ए म्हैस इकडे कुठे घालतोस माझी हाद हाई. माझी म्हैस इथे चरणार. तू घालिव तिकड खायल्या बाजूला.”

सदा, “ए जास्ती बोलायचं काम नाही.. पठार काय तूपल्या बापाचं नाही. तुझी हिरवा चारा खाऊ दे व माझी काय दातलुदे.ते काय नाही माझी पण चरणार. तुझी चार पाहिजे तर तिकडे.”

धोंडू, “ हे बघ झुंज लागलं, आवर म्हशीला तुझ्या.”

सदा, “ लागली तर लागलं, जा काय करणार आहेस.”

धोंडू, “ तुझा माज वाढलाय व्हय जिरविन.”

 सदा , “माझा माज कडतोस थांब दाखवतो तुला.”

सदा, “ तुमच्या पोरीबाळींना नांदवतच नाही.”

धोंडू, “ तुमच्या पण दिल्यात इकड, विसरू नकोस.”

 सदा, “ लई बोलतोस आमच्या नाही नांदवून भाकरी खा तूच थापून मग.”

धोंडू, " आमच्या नाही नांदवाय काय हात धरून नाही गेल्यात लगीन लाऊन दिल्यात."

सदा, " मग आमच्या काय पाटन नाही गेल्यात लगीन लावून जेवण घालून दिल्यात."

धोंडू, " कळशीभर पाणी द्यायला होईना व  फुशारक्या मारतोस व्हय सोड की  का बांध फोडत्यासा."

सदा, " तुम्हाला पाणी देऊन आमची रान वाळवाव काय."

धोंडू, " रान वाळाय पाऊस लई पडतो नव्ह, दानत नाही तुझी."

सदा, " कुणाची दानत काढतोस थांब दावतो."

त्या दोघात मारामारी लागते. दोघ एकमेकाचे वाभाडे काढत होते.शेजारील म्हातारी हसत असते. 

त्याला बघून   "ए तू काय हसतीस." ते दोघे बोलले.

तेव्हा ती त्यांना बोट दाखवत. ते त्या दिशेला बघतात. तर तिथे दोघांच्या म्हैसी एकमेकींबरोबर चरत असतात.ते आश्चर्याने बघतात.

“ अरे या तर भांडत नाहीत, अस कस. ” धोंडू

म्हातारी, “ त्या भांडतील कशा, एकाच गोठ्यातील त्या.  वरकड जमिनीत काय खायच्या इथ म्हातारीचे कात्याळ हाय व आता कूठल इथे हिरवाट.”

“ त्या कशा.” सदा

म्हातारी, “ सदा , तू म्हैस कुणाच्यातील. घेतलीस.”

सदा, “ शंकर अण्णाच्यातील.”

म्हातारी, “ तू र धोंडू.”

धोंडू काका, “ शंकर अण्णाच्यातील.” 

त्या दोघी एकाच घरातील त्या वाटून खातात. मग तुम्ही का भांडता.दोन्हीकडील पोरी इकड तिकड नांदतात.मग भांडताय कशाला. तुम्ही दोघं  पावण .मग भांडण कशाला. पाणी पण वाटून घ्या.”

तेंव्हा त्यांना पटले. व आपापल्या गावात जाऊन त्यांनी सलोखा घडविला व पठाराचे पाणी वाटून घेतले. व चारणीस गेल्यावर भाकरी पण वाटून खाऊ लागले.

सदा, “ कशा पाई भांडायचं त्यापेक्षा वाटूनच खायचं.”

धोंडू, “ आमचं पावण तुम्ही व तुमचं आम्ही. चला खोबर उधळा खोबर.”



तेव्हा सड्याची म्हातारीपण हासली. व शिवारबाचा डोंगर ही हिरवा झाला. पोर वाटून खात्याली बघून.

निष्कर्ष : सामोपचाराने घेतल की कोणताही प्रश्न सुटतो.

लेखक. : निशिकांत हारुगले.

Sunday, March 20, 2022

प्रामाणिक पणाचे फळ

 प्रामाणिक पणाचे फळ




एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याकडे खूप शेती होती. त्यासाठी बैलांची आवश्यकता होती. म्हणून त्यानं वेगवेगळ्या बाजारातून चार बैलं विकत घेतली. पण त्यातील दोन बैल कामचुकार होते. उरलेले दोन खूप कष्टाचे काम करणारे होते. व प्रामाणिक होते. तो शेतकरी मात्र सर्वांना समान चारापाणी देत असे. त्याचे लग्न झाले. त्याची बायको सुंदर व हुशार होती. हळू हळू ती घरातील व्यवहार पाहू लागली. तिला गोठ्यातील बैलात दोन बैल थकलेले व त्यांच्या अंगावर जखमा दिसल्या ज्या शेतात काम करताना झाल्या होत्या. व दुसरे दोन गुबगुबीत दिसले. ती विचार करू लागली. असे का? तेव्हा तिने नोकरास विचारले.

“ सदा ही बैल थकिव का?”

“ बाईसाहेब थकत्तील नाहीतर काय होईल. सगळ शेत हेच कसतात. ते उरलेले दोघे कामाला जुंपले की वळीव टाकतात. कामाला वटतच नाहीत. हे दोघे एकदिवस जे काम करतात. ते यांना अर्ध्या दिवसात पण होत नाही. म्हणून आम्ही यांनाच झुंपतो.”

“ तसं कसं, यांना पण जुंपा उदयाला.”

दुसऱ्या दिवशी गडी त्या बैलांना कामावर नेतो.तेव्हा त्यातील एक बैल थोडा काम केल्यावर लंगडायला लागतो. गडी त्याला गोठ्यात आणून बांधतो. बैल लंगडतोय म्हंटल्यावर मालक गड्यांवरच ओरडतो त्यावरती उपचार सुरू होतात. मालक  बैलाला उपचार पद्धती सुरू करतात तेव्हा ते बैल का जुंपले. आता दवाखाना केला पाहिजे असे बोलून गडी माणसावर रागावतो. व बायकोलाही बोलतो.बैलावर उपचार सुरू होतात. बैल मात्र खुश असतो. की त्याचे काम कमी झाले. तो माणसे दिसली की लंगडायचे नाटक करी.पण हे मालकिणीला लक्षात आले.  याची मस्ती जिरवायची असे तिने ठरवले. त्याला त्रास होऊ नये. म्हणून मालक हिरव्या कुरणात चरायला नेई.तिथले हिरवे गवत खाऊन तो खूप माजला. व आपल्या दुसऱ्या मित्राला पण तसेच करायला सांगितले. त्याने पण तसेच नाटक केले. व दोघे कुरणात चरून चरून माजले..

एके दिवशी गोठ्यात ते दोघे इतर बैलांना

“ काय एकेकाच नशीब असते. फक्त राबून मरायचे. मी बघ कसा, राजावानी आहे माझी बडदास्त.”

त्या काम करणाऱ्या बैलांना वाईट वाटले. ते म्हणाले एक दिवस तुम्हाला कळेल आमचं महत्त्व व तुमचा आळसच तुमचा घात करेल.

दुसऱ्या दिवशी मालकीण स्वतः भरडा तयार करुन राबणाऱ्या बैलांना वेगळा भरडा व आळशी बैलांन वेगळा. पण घालताना ती राबणाऱ्या बैलांना गहू भरडून गुळ घालून द्यायची. व आळशी बैलांना गव्हाची काडसर कुटून घालायची.  आळशी बैलांना मोठी बुट्टी बघून आनंद व्हायचा.आळशी बैलांना वाटायचे की आपल्याला भरपूर देतात. व यांना कमी.

उन्हाळा सुरू झाला. कुरणातील हिरवा चारा संपला.तेव्हा ते दोघे बैल रानात गेल्यावर भांडू लागले.

पहिला बैल, “ तू खुप खातोस तुझ्यामुळे सर्व गवत संपले. मी तुला युक्ती सुचवली व आज हिरवा चारा संपला.”

दुसरा बैल, “ युक्ती सुचवली म्हणजे काय उपकार केलास काय. जा मला चरू दे. नाहीतर घेईन शिंगावर” 

त्या दोघात भांडण जुंपले. दोघे जखमी झाले .मालकाने त्यांना गोठ्यात नेऊन बांधले. व हळद मीठ लावले. संध्याकाळी खुराक देताना गड्याकडून छोटी गहुभरड्याची बुटी  चूकुन कामचुकार  बैलाला गेली. त्याच्या लक्षात आले की काम करणाऱ्या बैलांना रुचकर भरडा देतात. व आपल्याला काडसर इतक्यात मालकीण आली. व तीनं बुट्टी बदलली. व कामकरी बैलाला गहू भरडा घातला. दुसऱ्या दिवशी भरडा घालताना गड्याने काडसर ठेवताच त्या बैलाने लाथेने बुट्टी उडवली.हे मालकिणीस कळले. तिने दोन काठया लगावल्या. व ‘कामाचं ना धामाच फुकट खायचं .’म्हणून ती निघून गेली.

दुसऱ्या दिवशी शेण काढताना त्या बैलाने मालकिणीस शेपट्या व लाथ मारली. तिने देखील चिडून त्याला दोन काठ्या हाणल्या. व नवरा आल्यावर.

“ मला त्या बैलानी मारल हे बैल कसे खूप माजलेत नुसते. यांना आजच्या आज बाजार दाखवा. नाहीतर मी निघाले माहेरी.”

असे म्हणताच शेतकऱ्याने त्या बैलांना चोपले. व बाजारात विकले. आता ती बैल दुसऱ्या मालकाकडे सुद्धा तसेच करू लागली त्यांना काम जमेना शेवटी त्या मालकाने त्यांना बाजारात पुन्हा विकले. आता ती बैले एका खाटक्यान घेतली. धस्टपुस्ट मास असणारी. व त्यांची रवानगी कुंटणखान्यात झाली कापायला. जाताना

दुसरा बैल : तुझ ऐकलं व शाण खाल्ल जन्माची माती झाली.

पहिला बैल : होय रे रांबनाऱ्यालाच  किंमत असते जगात. 


तात्पर्य : कामचुकार माणसास शेवटी निसर्गच शिक्षा देतो.त्या बैलांचा मालक परमेश्वर रुपी होता जो समान वागणूक द्यायचा. त्याची मालकीण न्यायी होती जी कष्टाचे योग्य माप देई. कामचुकार बैल कृतज्ञ नव्हता त्याने मालकीणीस मारले. जी काम न करता ही वैरण देई. शेवटी कुंटणखान्यात जावे लागले. कारण कसणाऱ्या बैलांना चुकीचे बोलणे. म्हणून मानवाने कष्टाचे खावे. व अवलंबून असेल तर कृतज्ञ राहावे.

 लेखक  - निशिकांत हारुगले

Friday, March 18, 2022

म्हातारीचे गाणे

 हास्यविनोद

म्हातारीचे गाणे



एका शहरात एक श्रीमंत गृहस्थ रहात असतो.त्याचा बंगला असतो त्याच्या शेजारी एक म्हातारी व तिचा नातू राहत असतात. एका रात्री म्हातारी जोराने गाणे म्हणू लागते.

“ ये ग गवराबाई सुख देऊन जाई”

त्यामुळे त्या श्रीमंतांची झोप उडते.तो खिडकीतून वाकून बघतो.तर म्हातारीच्या परसातील टॉयलेटमध्ये प्रकाश असतो. व तेथून आवाज येत असतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नातू टॉयलेटला गेल्यावर

“ बदका बदका नाच रे तुझी पिल्ली सात  रे…”

गाणे गाऊ लागतो. तिथून पुढे असेच चालू असते.एक दिवस म्हातारीकडे पंढरपूरची पाहुनी येते. तिला पण हे टॉयलेटमध्ये गाणे म्हणणे आवडत नसते. ती जेवून झोपी जाते.

रात्री तिच्या पोटात ढवळून टॉयलेटला होते. ती पाणी घेऊन टॉयलेटला जाते.

थोड्या वेळाने टॉयलेटमध्ये गाण्याचा आवाज सुरू होतो.

“ माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी.”

श्रीमंत गृहस्थाची झोपमोड होते. व तो तक्रार करतो पोलिस स्टेशनमध्ये जाऊन

“ साहेब एवढं गाण बंद कराहो वाटेल तेवढा पैसा देईन. रातभर कधीपण हे सुरू होते टॉयलेट काय गाणे म्हणण्याची जागा आहे का?”

पोलिस म्हातारीकडे येतो. व दमदाटी करतो. की तू विनाकारण गाणे म्हणतेस व शेजाऱ्यांना त्रास देतेस.

म्हातारी गप ऐकते.थोड्या वेळाने त्या पोलिसाला लगविला होते व तो म्हातारीच्या टॉयलेटमध्ये जाऊन येतो.

बाहेर आल्यावर तो म्हातारीकडे एकदा पाहतो व हासतो व शेजारील त्या श्रीमंतांकडे जातो.

आताच्या आता मला पाच हजार द्या “मी गाणे बंद करतो.”

श्रीमंत, “ पाच का दहा हजार घ्या.पण गाणे बंद झाले पाहिजे.”

तो पोलीस एक काम म्हातारीच्या घरी करतो. त्यातील दोनशे रुपये खर्चून येतो. दुसऱ्या दिवसापासून गाणे ऐकु ऐत नाही.

श्रीमंताला बरे वाटते. तो दुसऱ्या दिवशी जाऊन त्या पोलिसाचे आभार मानतो व त्याला कोणता उपाय केलास विचारतो.

“ काही नाही टॉयलेटला आतून कडी नव्हती ती मी बसवली, एवढच.”

श्रीमंत डोक्यावर हात मारून

“ अरे बाबा हे तर मीपण केलं असत.यासाठी दहा हजार खर्च केला. यात तर टॉयलेट बांधून दिलं असत मी म्हातारीला.”

तात्पर्य: गर्व न करता शेजारील व्यक्तिशी  संवाद साधा प्रश्न आपोआप सुटतील. व कोणी शुल्लक कारणासाठी आपली आर्थिक फसवणूक करणार नाही.

 लेखक   -  निशिकांत हारुगले

Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...