प्रामाणिक पणाचे फळ
एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याकडे खूप शेती होती. त्यासाठी बैलांची आवश्यकता होती. म्हणून त्यानं वेगवेगळ्या बाजारातून चार बैलं विकत घेतली. पण त्यातील दोन बैल कामचुकार होते. उरलेले दोन खूप कष्टाचे काम करणारे होते. व प्रामाणिक होते. तो शेतकरी मात्र सर्वांना समान चारापाणी देत असे. त्याचे लग्न झाले. त्याची बायको सुंदर व हुशार होती. हळू हळू ती घरातील व्यवहार पाहू लागली. तिला गोठ्यातील बैलात दोन बैल थकलेले व त्यांच्या अंगावर जखमा दिसल्या ज्या शेतात काम करताना झाल्या होत्या. व दुसरे दोन गुबगुबीत दिसले. ती विचार करू लागली. असे का? तेव्हा तिने नोकरास विचारले.
“ सदा ही बैल थकिव का?”
“ बाईसाहेब थकत्तील नाहीतर काय होईल. सगळ शेत हेच कसतात. ते उरलेले दोघे कामाला जुंपले की वळीव टाकतात. कामाला वटतच नाहीत. हे दोघे एकदिवस जे काम करतात. ते यांना अर्ध्या दिवसात पण होत नाही. म्हणून आम्ही यांनाच झुंपतो.”
“ तसं कसं, यांना पण जुंपा उदयाला.”
दुसऱ्या दिवशी गडी त्या बैलांना कामावर नेतो.तेव्हा त्यातील एक बैल थोडा काम केल्यावर लंगडायला लागतो. गडी त्याला गोठ्यात आणून बांधतो. बैल लंगडतोय म्हंटल्यावर मालक गड्यांवरच ओरडतो त्यावरती उपचार सुरू होतात. मालक बैलाला उपचार पद्धती सुरू करतात तेव्हा ते बैल का जुंपले. आता दवाखाना केला पाहिजे असे बोलून गडी माणसावर रागावतो. व बायकोलाही बोलतो.बैलावर उपचार सुरू होतात. बैल मात्र खुश असतो. की त्याचे काम कमी झाले. तो माणसे दिसली की लंगडायचे नाटक करी.पण हे मालकिणीला लक्षात आले. याची मस्ती जिरवायची असे तिने ठरवले. त्याला त्रास होऊ नये. म्हणून मालक हिरव्या कुरणात चरायला नेई.तिथले हिरवे गवत खाऊन तो खूप माजला. व आपल्या दुसऱ्या मित्राला पण तसेच करायला सांगितले. त्याने पण तसेच नाटक केले. व दोघे कुरणात चरून चरून माजले..
एके दिवशी गोठ्यात ते दोघे इतर बैलांना
“ काय एकेकाच नशीब असते. फक्त राबून मरायचे. मी बघ कसा, राजावानी आहे माझी बडदास्त.”
त्या काम करणाऱ्या बैलांना वाईट वाटले. ते म्हणाले एक दिवस तुम्हाला कळेल आमचं महत्त्व व तुमचा आळसच तुमचा घात करेल.
दुसऱ्या दिवशी मालकीण स्वतः भरडा तयार करुन राबणाऱ्या बैलांना वेगळा भरडा व आळशी बैलांन वेगळा. पण घालताना ती राबणाऱ्या बैलांना गहू भरडून गुळ घालून द्यायची. व आळशी बैलांना गव्हाची काडसर कुटून घालायची. आळशी बैलांना मोठी बुट्टी बघून आनंद व्हायचा.आळशी बैलांना वाटायचे की आपल्याला भरपूर देतात. व यांना कमी.
उन्हाळा सुरू झाला. कुरणातील हिरवा चारा संपला.तेव्हा ते दोघे बैल रानात गेल्यावर भांडू लागले.
पहिला बैल, “ तू खुप खातोस तुझ्यामुळे सर्व गवत संपले. मी तुला युक्ती सुचवली व आज हिरवा चारा संपला.”
दुसरा बैल, “ युक्ती सुचवली म्हणजे काय उपकार केलास काय. जा मला चरू दे. नाहीतर घेईन शिंगावर”
त्या दोघात भांडण जुंपले. दोघे जखमी झाले .मालकाने त्यांना गोठ्यात नेऊन बांधले. व हळद मीठ लावले. संध्याकाळी खुराक देताना गड्याकडून छोटी गहुभरड्याची बुटी चूकुन कामचुकार बैलाला गेली. त्याच्या लक्षात आले की काम करणाऱ्या बैलांना रुचकर भरडा देतात. व आपल्याला काडसर इतक्यात मालकीण आली. व तीनं बुट्टी बदलली. व कामकरी बैलाला गहू भरडा घातला. दुसऱ्या दिवशी भरडा घालताना गड्याने काडसर ठेवताच त्या बैलाने लाथेने बुट्टी उडवली.हे मालकिणीस कळले. तिने दोन काठया लगावल्या. व ‘कामाचं ना धामाच फुकट खायचं .’म्हणून ती निघून गेली.
दुसऱ्या दिवशी शेण काढताना त्या बैलाने मालकिणीस शेपट्या व लाथ मारली. तिने देखील चिडून त्याला दोन काठ्या हाणल्या. व नवरा आल्यावर.
“ मला त्या बैलानी मारल हे बैल कसे खूप माजलेत नुसते. यांना आजच्या आज बाजार दाखवा. नाहीतर मी निघाले माहेरी.”
असे म्हणताच शेतकऱ्याने त्या बैलांना चोपले. व बाजारात विकले. आता ती बैल दुसऱ्या मालकाकडे सुद्धा तसेच करू लागली त्यांना काम जमेना शेवटी त्या मालकाने त्यांना बाजारात पुन्हा विकले. आता ती बैले एका खाटक्यान घेतली. धस्टपुस्ट मास असणारी. व त्यांची रवानगी कुंटणखान्यात झाली कापायला. जाताना
दुसरा बैल : तुझ ऐकलं व शाण खाल्ल जन्माची माती झाली.
पहिला बैल : होय रे रांबनाऱ्यालाच किंमत असते जगात.
तात्पर्य : कामचुकार माणसास शेवटी निसर्गच शिक्षा देतो.त्या बैलांचा मालक परमेश्वर रुपी होता जो समान वागणूक द्यायचा. त्याची मालकीण न्यायी होती जी कष्टाचे योग्य माप देई. कामचुकार बैल कृतज्ञ नव्हता त्याने मालकीणीस मारले. जी काम न करता ही वैरण देई. शेवटी कुंटणखान्यात जावे लागले. कारण कसणाऱ्या बैलांना चुकीचे बोलणे. म्हणून मानवाने कष्टाचे खावे. व अवलंबून असेल तर कृतज्ञ राहावे.
लेखक - निशिकांत हारुगले
No comments:
Post a Comment