Showing posts with label Kalat n kalat julale he bandh script bhag 12and 13. Show all posts
Showing posts with label Kalat n kalat julale he bandh script bhag 12and 13. Show all posts

Thursday, March 13, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag 12and 13

 Kalat n kalat julale he bandh script bhag 12and 13

कळत नकळत जुळले हे बंध भाग १२

क्रमशः पुढे चालू.......

Next day / Morning / 8.30, o’ clock / inter

       Action :

प्रत्येकजण त्यांच्या कामात व्यस्त आहे. रेवती घर साफ करीत आहे. स्वॅप्निल देखील तिला मदत करीत आहे. अन्विका तिच्या काकूला जेवणाच्या खोलीत मदत करीत आहे. काका बाहेरून येतात. स्वॅप्निल आणि रेवती काम पहात ,

       Dialog

       काका :

       (आश्चर्य व्यक्त करत)

अग सुधा , ..बघ जरा बाहेर,.. सुर्य आज पश्चिमेला उगवला वाटत.

         रेवती :

 बाबा सूर्य पूर्वेलाच उगवतो हा. व आजही तसाच उगवला आहे.

         काका :

तस नाही, आज चक्क झाडू तुझ्या हातात. व स्वप्नील पण मदतीला आहे. म्हंटल्यावर

        रेवती :

अनुताईचा मित्र जेवायला येणार आहे ना, मग पसारा नको घरभर.

म्हणून समध चाललय.

        काका :

जेवायला येणार आहे . की बघायला!

      स्वप्नील :

जेवयलाच येणार आहे… उगाच तुमचे पतंग उडवू नका. येणाऱ्या माणसाला घर चांगल दिसावं म्हणून चाललय.

         काका :

 अस आहे होय. मग चालू राहू दे तुमचं काम,

(काका आत येतात.)

       मावशी :

 काय हे, किती वेळ जेवण करायचं खोळंबलेय. बर, कोथिंबीर आणली आहे ना.

        काका :

 हो मॅडम,.. सगळ आणलय. तुम्ही जे जे सांगितलं होते ते.

        काका :

 काय अनु …जेवण मस्त बनव,.. कोल्हापूर स्टाईलन .

     आण्विका :

        (हसते)

 तुमच्या मनासारखं होईल.

                Cut to…….

…. ….. ….. ….. …..

Morning /10 o’ clock / Outer - inter.

      Action :

स्वॅप्निल आपल्या दुचाकी घेऊन  जातो.आणि ईशानला सोबत आणतो. ईशान आणि स्वॅप्निल घरात येतात आणि अनु त्यांच्यासाठी पाणी आणते.  ईशान पाणी घेतो आणि सोफा सेटवर बसतो, स्वॅप्निल ही बसतो.

         Dialog :

        काका :

या साहेब बसा. कसं काय चाललय ट्रेनिंग.

      ईशान :

       छान.

        काका :

         ( मागे वळून हाक देत)

अहो झालंय का? वेळ झालाय. पाहुणे भुकावले असतील.

           मावशी :

 हो झालेय, लगेच पाने वाढते.

( अन्विका प्लेट्सची सर्व करते. प्रत्येकजण जेवायला बसले आहेत. काकू आणि अनु जेवण  वाढण्यास सुरुवात करतात.)

        मावशी :

 बघ जेवण कसं झालंय. तिखट मिठ कसं आहे ते.

      स्वप्नील :

  मस्त झालय. अगदी

     झनझनित

       मावशी :

 पाहुण्यांना विचार कसं झालय.

          ईशान :

 अप्रतिम, मस्तच, झालंय जेवण.

        मावशी :

    अनूने केलय आमच्या.

 ईशान :

 काय खरंच, डॉक्टर मॅडम ना जेवण पण बनवता येत.

      स्वप्नील :

मस्त करते जेवण. आमची दीदी.

       ईशान :

    मला माहित नव्हतं.

        रेवती :

 सुगरण आहे. सुगरण.

        आण्विका :

 गप, पूरे ह…उगाच हरभर्याच्या झाडावर चढवू नको.

(प्रत्येकजण हसतो आणि आनंदात आहे .)

               Cut to……..

….. ….. ……. ….

Internet / baheril holl / night

    Action :

जेवणानंतर, काका आणि ईशान सोफा सेटवर गप्पा मारत बसतात.

     काका :

काय अनु मित्राची ओळख तरी करून दे.

      आण्विका :

तुम्हीच घ्या की करून.

       काका :

        बर.

       ईशान :

मी ईशान …ईशान पाटील. मूळचा मी राधानगरीकडील एका खेड्यातील. पण लहानपणा पासून कोल्हापूर मध्ये आहे. तिथंच शिक्षण झालं. पुढे स्पर्धापरीक्षा दिली. व आज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून जॉईन होऊन मला दीड वर्ष झालेत.

        काका :

हा, मग छान आहे की. बर घरी कोण कोण असत.

      ईशान :

 आई बाबा, व एक बहिण आहे.

         काका :

 आम्ही पण तिकडलेच आहोत. गडहिंग्लजकडील. नोकरीमुळे इकडे अलिबागला आहोत. आणखी आहे पाच सहा वर्ष सर्व्हिस नंतर आपल्या गावी जायचं.

बर अनुशी ओळख कशी?

. ईशान :

 मी व अणू दोघे क्लासमेंट आहोत.

      काका :

        हा.

      स्वप्नील :

   ट्रेनिंग झालं पूर्ण.

        ईशान :

आहे थोड. दोन दिवस विश्रांती नंतर दोन दिवस आहे.

     स्वप्नील :

 मग त्यांनतर काय.

        ईशान :

जायचं कोल्हापूरला आपल्या ड्युटी वर.

       काका :

   तुला बुद्धिबळ येत.

        ईशान :

माझा आवडता खेळ आहे.

        काका :

     मग चल खेळूया.होऊन जाऊ दे एक एक डाव.

(ते बुद्धिबळ खेळण्यास सुरवात करतात. खेळ रंगात येऊ लागतो. शेवटी, खेळ निर्विवाद राहतो.)

     काका :

. मस्त वाटल खेळून

     ईशान :

     हो मला ही.

(अन्विका ईशान जवळ बसते. पण ईशान गेममध्ये गुंतलेला आहे. तो तिच्याशी जास्त बोलणे टाळतो. संध्याकाळ होत आहे. )

        ईशान :

बराच वेळ झाला जायला हवं.

      काका :

 काही काम आहे का?

      ईशान :

नाही आज उद्या सुट्टी आहे.

       काका :

 मग थांब इथच खूप दिवसांनी असा खेळकर जोडीदार भेटला. रात्रीच जेवण पण इथच कर.

    आण्विका मधून मधून त्याच्याशी बोलायची. तेव्हा तो खाली पाहूनच उत्तर देत असे.

               Cut to…….

…… ……..

Night / Anvika mavshi home /Inter

( रात्रीच्या जेवणानंतर. ईशान निघताना.)

      काका :

 मस्त वाटल. आणखी किती दिवस आहेस. येत जा.

      ईशान :

आहे अजून चार दिवस मग निघणार.

बरं स्वप्नील उद्या काय करतोस तु.

      स्वप्नील :

 का रे काही काम होत.

       ईशान :

काही नाही. उद्या जरा फ्री असशील तर कारल्याला जाऊन येवू.

       स्वप्नील :

       चालेल की.

(  इशान अन्विका  प्रेमाने  एकमेकास पाहत.)

           ईशान :

      बर, येतो मी

     आण्विका :

     काळजी घे.

      ईशान :

     ठीक आहे.

      आण्विका :

आणखी किती दिवस आहेस.

     ईशान :

आहे चार दिवस. मग निघणार .

      ईशान :

      बाय

( स्वॅप्निल त्याला सोडण्यासाठी जातो.)

Cut to……

……. ……. ……. ……

Night / Alibaug Anvika mavshi home/ inter

     Action :

ईशानला सोडल्यानंतर स्वप्निल येतो. अन्विका आणि रेवती प्रतीक्षा करीत आहेत. घरी दुचाकी पार्किंग केल्यानंतर स्वॅप्निलला आढळले की काका रात्रीच्या जेवणाच्या नंतर फिरायला निघून गेले आहेत. मावशी जेवणाच्या खोलीत आटपात आहे. स्वप्निल येताच, रेवती इशारा देते.

          Dialog :

      आण्विका :

 काय सोडलस ना नीट.

       स्वप्नील :

   हो. झोपलाही असेल.

       आण्विका :

 बर काय म्हणाला, काही बोलला का.

       स्वप्नील :

      कशाबद्दल.

      आण्विका :

हेच जेवण कसं झालं. घर वगैरे.

       स्वप्नील :

 मस्त होते म्हणाला. बर आईला सांग. उद्या सकाळी लवकर नाष्टा कर . मी व ईशान जरा जाऊन येणार आहे. बाहेर कारल्याच्या एकविरेला.

        रेवती :

 आम्ही पण आलो असतो ना.

       स्वप्नील :

 तुम्ही नंतर जावा. फॅमिलीसोबत परवा बाबा आईला घेऊन.

        रेवती :

 अनुला तरी सोबत घेऊन जा.

         स्वप्नील :

 आम्ही टू व्हीलर वरून जाणार आहोत.

तिब्बल सीट कसे जाणार. प्रॉब्लेम येईल की.

       रेवती :

    मग रद्द कर जाणे.

        स्वप्नील :

ते काही नाही. तो दोन दिवस आहे. माझ्याकडे त्याने एकच इच्छा मागितली आहे. परवा ट्रिपच्या वेळी एक रुपयाही मला खर्च करु दिला नाही. व माझा आता तो बेस्ट फ्रेंड झालाय त्याची एवढी इच्छा पूर्ण करायला नको मला. ते काही नाही. मी जाणार.

        रेवती :

 अनुला न्यायचं नसेल तर उद्या नाष्टा विसर. जा बाहेर काहीतरी खा जा. खरच जरा तुझे पैसे.

      स्वप्नील :

 खर्चेन, खाऊ काहीतरी बाहेर.

      आण्विका :

      रेवा गप्प,

      आण्विका :

     (स्वप्नीलला)

हे बघ तू जा उद्या मी करेन नाष्टा तयार. उगाच मावशीला त्रास नको.

( स्वप्नील आपला खोलीत प्रवेश करतो, ज्यावेळी अनु तिच्या मावशी कडे जाते..)

      आण्विका :

 मावशी तांदळाचे पिठ आहे.

       मावशी :

 आहे की कट्यावर कडेच्या पितळी डब्यात.

       मावशी :

 का ग, कशाला पाहिजे?

     आण्विका :

 काही नाही. स्वप्नील व ईशान उद्या बाहेर जात आहेत. त्यांना नाष्टा द्यायला.

     मावशी :

    करते की मी.

      आण्विका :

     नको, करते. मी.

( अन्विका स्वयंपाकघरात जाते आणि अंबोली पीठ भिजवते. )

             Cut to ……

…… ……. …….. ……

Night / Revati room / 10.30 o’clock / Inter.

       Action :

अन्विका पाण्याची बाटली ठेवते आणि पलंगावर बसते.

     Dialog :

       रेवती :

 तू अस का केलंस गेलो असतो ना आपण दोघी स्कूटीने.

        आण्विका :

 अग त्यांनी आपल्याला या अस देखील म्हंटल नाही. व येणार का अस देखील विचारलं नाही. मग कसं जायचं बोलवायच्या आधी.

         रेवा :

 मी बोलू का स्वप्नीलला.

     आण्विका :

 नको, आधीच आपण माझ्या लग्नाच्या वावड्या उठवल्या. त्यामुळे तो नाराज झाला. म्हणूनच तो आज माझ्याशी फ्रि बोलला नाही.

       रेवती :

     सॉरी दीदी.

      आण्विका :

त्यात स्वारी काय म्हणायचं. तू एक प्रयत्न केला होतास ना. व आपल्याला कळलय. की त्याला मी आवडते. आणखी काय हवंय.

          रेवती :

पण मला वाटत तू जावस तिकडे.

        आण्विका :

 नको, आपण परवा जाऊ काका मावशी सोबत.

        रेवती :

 काय काका मावशी करतेस. तुझं वय नाहीये हे, काका मावशी सोबत फिरायचे.

      आण्विका :

 गप बस, बघू हा गुंता कसा सोडवायचा ते. अन् बरेच दिवस झाले. आता जायचं म्हणते. एन्ट्रानशीप साठी मला सरकारी दवाखाना निवडायचा आहे.

 काल वेदुचा फोन आला होता. की तो मुलगा बघून गेलाय म्हणून. तिचे पालक येणार आहेत. बाकीचं ठरवायला. तेव्हा मी म्हणते जाते त्यांच्या बरोबर.

         रेवती :

 वेदु ताईला पसंत आहे ना स्थळ.

       आण्विका :

 हो, तस त्याचे पाहुणे संबंधच पाहायचे होते. तसा तो पुण्यात असतो. त्याची माहिती स्वप्नीलने काढलीय. मी सेंड केली होती. चांगल स्थळ आहे. त्याचे आईवडील असतात जुन्नरला तिथे त्यांची थोडी शेतीवाडी आहे म्हणे. त्यांचे काका ती पाहतात. उगाच हातचं चांगल स्थळ कशाला सोडायचं , अस त्यांचं मत आहे.

व मलाही वाटत आता आणखी किती पालकांना त्रास द्यायचा. ते सांगतील तिथं लग्न केलेलं बर. वय पण झालंय लग्नाचं.

        रेवती :

 तीच जमल, तुझं काय?

       आण्विका :

 बघू काय महाभारत होतंय ते. माणूस जाम तापलाय ग. कसं व्हायचं माझं. दुसरीकडे कुठे बोहल्यावर चढायचा नाही ना.

     रेवती :

 हा….., बघते मी कसा चढतो ते. लग्ना आधी काडीमोड घ्यायला लावीन.

      आण्विका :

 ये बाई आणखी काही घोळ करू नकोस.

        रेवती :

घोळ नाही ग होणार, बघूच कसा सरकतो मोती कालवाच्या तावडीतून. प्रेमात पडलेला माणूस दुसरीकडे जात नाही.

     आण्विका :

बघ बाई, नाहीतर कोण तरी यायची अन् कालव फोडून घेऊन जायची मोती.

        रेवती :

 हे बघ ते कालव मोती सोड. पुन्हा कशी भेटणार. तो निघाला दोन दिवसांनी.

      आण्विका :

 आई अंबाबाईलाच ठावं.

      रेवती :

 मग आता काय करायचं.

      आण्विका :

 बघू, उद्या , उठून नाष्टा करायचा आहे.

 चल आता वेळ झालीय झोप .

       ( लाईट बंद)

                 Cut to……

…… …… …… …….

क्रमशः पुढे......


कळतं नकळत जुळले हे बंध भाग १३

क्रमशः पुढे चालू......

Night / 10.30 o’ clock. / Ishan Forest stay room / Inter

        Action :

ईशान पलंगावर पडून आहे. जेव्हा तो आपले डोळे बंद करतो, तेव्हा अन्विकाचा चेहरा त्याच्यासमोर दिसतो. त्याला त्याच्या आयुष्यातील प्रेम आठवते.

     ईशान : 

(मनात)

 काय करू. विचारू का तिला. कसे विचारू. ती काय म्हणेल? माझ्याबाबत तिला काय वाटत असेल. आज किती गोड दिसत होती. मला सारखं जेवताना फिरून फिरून वाढत होती. तिला पण मी आवडत असेल. एखाद्या बायको सारख वागण होत तिचं. फोन करू का तिला. नको आज दमली असेल बिचारी. सकाळपासून माझ्यासाठी सारा खटाटोप करत होती. काय करू. काही सुचत नाही.

( ईशान मोबाईलवरून तिच्या फोटोचा स्क्रीनशॉट घेतो आणि तो  पहात झोपी जातो.)

                Cut to…….

…… ….. ……..

Morning / Anvika mavshi home / 5.30 o’clock / inter.

          Action :

अन्विका सकाळी लवकर उठून जेवणाच्या खोलीत अंबोली बनवित आहे. ती नारळ चटणी आणि बटाटा भजी देखील तयार करीत आहे. मावशी उठल्यानंतर जेवणाच्या खोलीत येते.

        Dialog :

     मावशी :

   अग मी करते.

      आण्विका :

नको, करते मी. रोज किती करतेस. एक दिवस आराम कर.

     मावशी :

 खरंच अनु एवढी मोठी डॉक्टर झालीस खरं साधाभोळा स्वभाव आहे बघ तुझा. अन् रेवा बघ अजून झोपलीय.

        रेवती :

( तिच्या खोलीतून बेडवरून)

जागी आहे मी मॅडम सकाळी सकाळी लई कौतुक नको.

      मावशी :

 मांजरीन ऐकलं वाटत. अगदी सापाच्या कानाची आहे बघ.

  रेवती :

(आतील खोलीतून)

 वाघासारख्या नख्या पण आहेत. बघणार आहेस.

   मावशी :

झोप गप्प.

मावशी :

( निरीक्षण करत)

काय पण म्हण, धिरडी भारी बनवतेस अनु.

ज्या मुलीला हा स्वयंपाक जमला तिला सगळ आलं बघ.

(अचानक, स्वॅप्निल तयार झाल्यानंतर येतो. अनु त्याला चहा देते. दरम्यान, अन्विका डब्बा भरत आहे.)

      स्वप्नील :

रेवा काय डाराडुर पंढरपूर असेल.

      रेवती :

    (तिच्या बेडरूममधून)

ऐ बैला,.. तुझा नैवेद्य करायला आज काय बैलपोळा नाही. त्या अनुदीदीला कळतच नाही. जा कर जा बाहेर नाष्टा. तुला करून घालते. स्वप्न बघ. जा बायको करून आण जा, अन् करायला सांग तिला.

    स्वप्नील :

 माझी बायको आल्यावर तू असशील नव्हऱ्याची धूणी धूत.

( अन्विका डब्बा देत.)

आण्विका :

 नीट जा रे.

स्वप्नील :

थँक्स दिदी.. बरं निघतो मी, बाय.

( स्वॅप्निल ईशानला कॉल करतो. आणि  निघतो.)

Cut to….

…… …… …..

Morning / Karla road /on bike /ishan and swapnil /Outer

      Action :

स्वॅप्निल ईशानकडे जातो. तो त्याला मोटरसायकलवर घेऊन जातो आणि ते दोघे निघून जातात.

        Dialog :

      स्वप्नील :

 यार मला गाडी मारायचा कंटाळा आलाय.

ईशान :

चल मी घेतो.

ईशान त्याच्या हातात मोटारसायकल घेत. स्वतः चालवू लागतो

( त्याचे दुचाकी चालवणे पाहून)

      स्वप्नील :

 साहेब अत्यंत ट्रेण्ड आहात.

      ईशान :

अरे मी पहिलं रायडिंग करत होतो.

        स्वप्निल :

आजचं वातावरण किती मस्त वाटतंय. नाही.

ईशान :

हो .

( त्यानंतर लवकरच, ती कार्ला येथील पायथा मंदिरात येतात. )

   ईशान :

चल नाष्टा करूया. कुठेतरी.

स्वप्नील :

 आणलाय मी घरून. डिकीत आहे.

ईशान :

 एवढ्या लवकर.

स्वप्नील :

 हो. पण थोड्या वेळानं करू वरती जाऊन.

आता इथ थोडासा चहा घेऊ.

ईशान :

हा चल.

( ते दोघेही चहा घेत आहेत आणि पायऱ्या चढण्यास सुरवात करीत आहेत. थोड्या वेळातच ते मंदिरात जातात आणि देवीची एक झलक. )

     ईशान :

देवीसमोर, हे कारल्याचे देवी आई माझं अण्विकावर खूप प्रेम आहे. तिच्याही मनात माझ्याविषयी प्रेम निर्माण कर. व माझ्याशी तीचं लग्न होऊ दे.

(त्याने अभिवादन केले.

ईशान बाहेर येतो. ते तेथील लेणी पाहण्यास सुरवात करतात.  लेणी पाहिल्यानंतर ते दोघेही डब्बा खायला बसतात.

स्वॅप्निलने डब्बा उघडला .)

     ईशान :

एवढ्या सकाळी नाष्टा रेडी. कोणी केला?

 स्वप्नील :

तुझ्या फ्रेंडन.

ईशान :

कोणी.

स्वप्नील :

 अनुदिदीन.

ईशान :

कोणी अण्विकाने. काय दिलंय.

स्वप्नील :

मस्त आंबोळ्या व चटणी भाजी दिलीय.

ईशान :

एवढ्या लवकर केला तीन.

स्वप्नील :

ट्रेण्ड आहेत डॉक्टर मॅडम.

पण…मला वाईट वाटत मात्र.

ईशान :

का रे.

स्वप्नील :

 काल रेवा म्हणत होती. अनुदिदिला घेऊन जा. त्यांना पण यायचं होत. कारल्याला.

ईशान :

मग आणायचं होतास ना.

स्वप्नील :

 तू आपण जाऊन येवूया अस म्हणालास. व टू व्हीलर वरून दोघेच जाऊ शकतात ना.

ईशान :

अरे आणखी एखादी टू व्हीलर घेतली असती.

स्वप्नील :

 हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. मला वाटल तुला उगीच मुलींची लुडबुड वाटेल.

ईशान :

काय हे मग मी मिनी ट्रिप काढली असती का? तस त्या नाराज झाल्या असतील.

स्वप्नील :

 रेवाने तर खूप वाद घातला. व सकाळी नाष्टा देणार नाही इथपर्यंत म्हणाली.

ईशान :

 मग.

स्वप्नील :

 अनुदिदिनं नाष्टा करून दिला.

 ईशान :

खूप चांगली आहे. रे अनु.

स्वप्नील :

 हो ती सर्वांची काळजी घेते.

ईशान :

 आणायला पाहिजे होत त्यांना. आता मी काय दोन दिवसांनी जाणार. पुन्हा भेट होईल नाही होईल.

स्वप्नील :

अस काय म्हणतोस. कोल्हापुरात तर राहता ना दोघे.

ईशान :

 तस नाही रे.

स्वप्नील :

 मग लग्न कर जा तिच्याशी.

(स्वप्निलचे बोलणे ईशानच्या मनास टोचते. तो थोडा शांत राहतो .)

      ईशान :

मी आहे तयार, पण ती , तिच्या अपेक्षा जास्त आहेत. तिला डॉक्टर हवाय. तिला स्थळे येत आहेत. तशी ती मला दारात तरी उभा करून घेईल काय.

स्वप्नील :

 ये गप्प, तू काय वाईट आहेस. मी काल पारखलय. तुला व तिला. मला तू दाजी म्हणून आवडलास. आता बघ तुझं मत काय. व मला जाणून घ्यायचंय तुझ्या मनात काय आहे. आता तिच्या मनातील जाणून घेतो.

ईशान :

 तिला सांगू नकोस लगेच. ती रागवेल.

स्वप्नील :

 नाही सांगत.

ईशान :

 तुला दाजी म्हणून आवडून काय करायचे. तुझ्या बहिणीला आवडायला हवं.

स्वप्नील :

ये लई हवेत बाण सोडू नको. तू जर आवडत नसतास तर एवढं जेवणाचा उठारेटा केला नसता. व आता दिलेली ही शिदोरी पण सांगते. तू किती खास आहेस ते. ……बोलून तरी बघ.

ईशान :

 चालेल बघेन. कोल्हापूरला गेल्यावर. विचारेन तिला.

स्वप्नील :

झालं, ….अशान लग्न होईल तिचं,

मग ये लग्नात लाडू खायला तिच्या. ….त्यापेक्षा मी विचारू का?

ईशान :

 नको…… मी विचारेन योग्य वेळ आल्यावर.

खर सांगू तुला, मी तिच्याशी विवाह करून सुखी संसाराची स्वप्ने बघतोय.

स्वप्नील :

 तुझी स्वप्न स्वप्नच राहायचीत. जर प्रॅक्टिकल केलं नाहीस तर…

ईशान :

 अरे काही विचारायला गेलं. तिच्याशी की माझा काही ना काही घोळ होतोच. ती दूर जाऊ नये म्हणून भीती वाटते, रे …

स्वप्नील :

 भ्यायच काय त्यात. एक तर हो म्हणेल नाहितर नाही.

ईशान :

पाहतो कोल्हापूरला गेल्यावर.

स्वप्नील :

 काय करायचे ते लवकर कर. चल आता थोडी लेणी पाहूया.

( ते निघतात. ते दोघेही उर्वरित लेणी पाहतात आणि निघून जातात)

               Cut to……

….. …… …… ….. …..

Day /Anvika mavshi home Alibag / Inter

     Action :

रेवती आणि अन्विका घरी आहेत. रेवती खाली बसली आहे. अन्विका खोलीत फिरत आहे.

       Dialog :

रेवती :

इथ फेऱ्या मारून काय होणार आहे.

आण्विका :

 मग काय करू. फोन करू का. कुठे आहेत ते. जाणून घेण्यासाठी.

रेवती :

 काही नको, उगाच लहान मुलाची विचारपूस केल्यासारख.

आण्विका :

मग काय करू?

रेवती :

 पुस्तक वाच त्यापेक्षा.

आण्विका :

बस वाचत तूच.

( असे म्हणत ती पलंगावर पहुडली  आहे.)

Cut to……

….. …… ….. …… …..

क्रमशः पुढे......


Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...