Kalat n kalat julale he bandh script bhag 21,22,23
कळतं नकळत जुळले हे बंध भाग २१
After two days
Inter - outer / Anvika Home / Day
Action :
अण्विका आवरत आहे. आज वेदांगीचा साखरपुडा आहे. तो छोट्याशा स्वरूपात घ्यायचं ठरलेलं असत.वेदांगीचा फोन येतो.
Dialog :
वेदांगी :
काय ग कुठे आहेस. ये की लवकर. मला काही सूचत नाहीये.
आण्विका :
अग, होईल नीट, तू कशाला काळजी करतेस?
वेदांगी :
ती संयोगिता पण कधी येते कुणास ठावूक. मगापासून फोन करतेय. उचलतच नाही.
आण्विका :
मॅडमना घेऊन येते मी.
वेदांगी :
ये लवकर बाई.
आण्विका :
अग, फोन ठेवलास तर येईन ना. ठेव आधी.
वेदांगी :
बरं बाई ठेवते.
(ती फोन ठेवते.)
Cut to …..
…… …….
Outer / Day / on road Kolhapur
Action :
आण्विका निघते. तिने साडी नेसली आहे , छान मेकप केला आहे. स्कूटी घेऊन संयोगिताकडे निघते.
जाताना फोन करते. संयोगिताचा लहान मुलगा फोन उचलतो.
Dialog :
संयोगिताचा मुलगा :
हॅलो, कोण बोलतंय?
आण्विका :
कोण म्हणजे अनु मावशी.
जरा मम्मी कडे दे.
मुलगा :
ती साडी नेसतेय.
(संयोगिता पदर नीट करत असते. मुलगा फोन देत )
मुलगा :
अनु मावशीचा आहे.
संयोगिता :
(फोन कानाला लावत)
काय ग, निघालीस का?
आण्विका :
आवर लवकर. मी निघालेय.
संयोगिता :
आवरलय माझं, ये लवकर.
Cut to …..
…… …….
Day /outer/ sanyogita home
Action :
थोड्या वेळात ती संयोगिताच्या घरी पोहोचते.
संयोगिता आपली स्कूटी बाहेर काढत असते. इतक्यात तिथे आण्विका पोचते.
Dialog :
संयोगिता :
बबली मावशीच्या स्कुटीवर बस.
(आपल्या स्कुटीवर मुलग्याला व अण्विकाच्या स्कुटीवर मुलीला बसवून त्या निघतात.)
…… …… …….
Day / outer/ Bindu chuk
Action :
पुढे बिंदू चौकात गेल्यावर संयोगिता आपली स्कुटी थांबवत अण्विकाला हाक मारते
संयोगिता :
अनु जरा थांब.
आण्विका :
(थांबून)
का ग इथे काय काम आहे.
संयोगिता :
(गाडी जवळ आणत.)
चल तिकडे कोर्नरला मागून.
(त्या गाडी एका झाडाजवळ येतात. तिथे गाडी लावत.)
संयोगिता :
चल थोड नाष्टा पाणी करू.
आण्विका :
अग , तिकडे होईल की. सकाळपासून वेदिन पिडलय फोन करून करून.
संयोगिता :
चल गप, लगीन घरात कधी लवकर काय भेटतय.
वेळ लागतो जेवणावळीला.
(त्या दोघी जवळील हॉटेल मध्ये जातात.)
आण्विका :
( मागून जाताना)
तुझं आपल कायतरी असतय. वेळ होईल ना.
संयोगिता :
चल गप्प.
Cut to …......
…… …..
Inter / Day /Hotel
Action :
त्या होटेलात जातात. संयोगिता चार मिसळ पावची ऑर्डर देते.
Dialog :
संयोगिता :
( वेटर काकांना उद्देशून)
ओ काका, चार मिसळ द्या.
काका :
हा.
(मिसळ थोड्या वेळात एक जण आणून ठेवतो.)
संयोगिता :
हा करा सुरू.
(मिसळ खाताना,)
संयोगिता :
पिंटू, बबली यातलं एक अवाक्षर देखील घरी सांगायचं नाही काय?
ती दोघे :
( मान हलवून)
कळलं.
संयोगिता :
कळलं ना नाहीतर रवी दादाच्या लग्नासारखे कराल.
बबली :
नाही ग,… सांगत, माहित आहे आम्हाला.
आण्विका :
बबली ,…काय झालं ग,… रवी मामाच्या लग्नाच्या दिवशी.
बबली :
काय नाही ग, आम्हाला आईस्क्रीम हवं होत. व आईने दिलं. व हा चोमडा पिंट्या घरी सांगत गेला आजीला. आजी दोन दिवस उठता बसता टोमणे मारत होती आईला. काय तर म्हणे,…. सूनचं राज आलय. पुढे माझ्या पोराला बघतील की नाही, आम्ही कुत्र्यासारखे घर राखतो. ही बाहेर जाऊन चैनी करतात.
आण्विका :
मग काय झालं,
बबली :
ऐकूण ऐकूण कंटाळा आला,
मग आईन मोठा आईस्क्रीमचा पॅक आणून दिला आजोबा अन् आजीला. तो पण बटर स्कोच
आण्विका:
मग तर झाली ना शांत.
पिंटू :
(मधेच बोलू लागला.)
शांत , कुठली शांत
पाच – सहा जणांच आईस्क्रीम दोघांनी हादडल. आम्हाला दाखवून दाखवून खाल्ल. व बसला घसा, बोलायचं येईना.
आण्विका :
मग .
पिंट्या :
मग पुन्हा बाबांच्या शिव्या ममीला खाव्या लागल्या. तुला कळत की नाही. म्हातारपणी असल खायला देतात का? सरसर प्यायचं वय आहे त्यांचं. बिनडोक असल्यासारखं आइस्क्रीम काय देतेस खायला त्यांना.
आई म्हणाली की त्यांना हवं होत.
तेव्हा बाबा म्हणाले, ते काय पण मागतील, तुझी अक्कल काय गवत खायला गेलती काय?
आण्विका :
मग तुम्ही काय ठरवलंय.
बबली :
आम्ही ठरवलंय, मम्मीन दिलेलं खायचं, पण कुठेही काय खाल्ल म्हणून ओकायच नाही. व जर पोटात गुपित थांबेना झालं की शाळेला जाताना आम्हाला वाटेत एक भलं मोठ्ठं वडाच झाड लागत. त्याला जाऊन सांगायचं. ते काही कुणाला सांगणारच नाही. कारण ते बोलतच नाही ना.
आण्विका :
वा शाब्बास, बरेच हुशार झालाय आईच्या तालमीत.
पिंटू :
मग व्हायलाच पाहिजे, बाबांच्या मंडळाच्या तालमीत शरीर तंदुरुस्त होते. व ममीच्या तालमीत मेंदू तल्लख करायचा.
संयोगिता :
बर चला आता अटपल असेल तर, नाहीतर वेदी मावशी फोन सारखे करून कानाच्या पडद्यांना भगदाड पाडायची.
(ते सगळे हसतात व निघतात.)
Cut to ….. …..
…… …… ……
Day/ outer – Inter / Vedangi Home
Action:
आण्विका व संयोगिता आपापल्या स्कूटी वरून वेदांगीच्या अपार्टमेंट मध्ये पोहोचतात. तिथे आल्यावर. स्कुटी त्या पार्क करतात. आण्विकेस पाहून कालची मुले.
Dialog :
आकाश :
अरे, ती आलेय. मस्त ड्रेस घातलाय.
राजेश :
चल बघुया.
(ती एका गॅलरीत येतात. वर पायऱ्या चढून येणाऱ्या आण्विका व संयोगिताकडे पाहत.)
सुजित :
काय मस्त दिसते राव.
संग्राम :
मस्त आहे पण आपल्याला नाय भेटणार.
राजेश :
तर काय ?
आकाश :
अरे, डॉक्टर आहे ना ती.
सुजित :
हो यार, आपण बारावी पास. माव्हर पकडणार. अन् ही कोल्हापुरी मिरची. कसं जुळणार.
राजेश :
वेदांगी अक्कान काय सांगितलय माहित आहे ना?
संग्राम :
ती सांगते म्हणून काय झालं. प्रयत्न तरी करूया. कुणाला कटली तर कटली.
आकाश :
तर काय, माव्हर पकडतो म्हणून काय झालं? आपण आपल्या एरियात दादा आहोत.
राजेश :
चला मग प्रयत्न तरी करू.
सगळे :
चला चला…
Cut to …..
……
Inter / Day / Vedangi Home apartment jina
आण्विक व संयोगिता जिना चढून येताना ही मुले खाली येत शायनिंग मारत खाली जातात.
संयोगिता :
काय अनु, बघ बाई बिना कांद्यापोह्याच स्थळ एकाहून एक पसंत आहे का बघ.
आण्विका :
ये चल गप, उगाच डोकं खाऊ नको.
संयोगिता :
तरी पण बघ बाई, पसंत आहे का एखादं.
आण्विक :
चल
आण्विक :
(मनात)
ज्याच्यासाठी काळीज झुरतय त्यालाच माझं मोल कळणा, यांकडे बघून काय करु.
संयोगिता :
( मागे थांबलेल्या अनुस )
कसला विचार करतेस. चल
आण्विक :
कसला नाही.
(ती जिना चढू लागते.)
Cut to……
….. ….. ….. ….
Inter / Day / Vedangi Home
Action :
आण्विका व संयोगिता वर वेदांगीच्या घरात येतात.
तिचे बाबा शांत विचार करत असतात. कारण बरेच प्रयत्न करून देखील साखरपुड्याच्या कामाचे नियोजन लागत नसते. आचारी ऐनवेळी लेट झालेला असतो. ते फोन करतात.
वेदांगी बाबा :
काय गोपाळ सेठ कुठं हाय.
गोपाळ आचारी :
काय सांगू राव गाडी पंक्चर झाली. वेळ होणार.
वेदांगी बाबा :
कुणाला तरी पाठवतो.
गोपाळ आचारी :
हा पाठवा लवकर.
(इतक्यात अचाऱ्याचा मोबाईल बॅटरी संपते.)
काका :
हॅलो पत्ता सांगा कूठे आहे तो?
मोबाईल :
कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहात.
(काका फोन लावतात पण लागत नाही. ते सोफसेट वर टेंशन मध्ये बसतात.)
Dialog :
आण्विका :
(त्यांजवळ जात)
काय काका शांत का?
काका :
काय सांगू बाळ अजून कामाचे काही नियोजन लागेना झालेय. तीन तासांनी साखरपुडा आहे.
(त्यांचे सगळे ऐकूण घेऊन)
आण्विका :
थांबा मी लावते.
आण्विका :
संयो तू आतमध्ये जा. व वेदूला तयार कर जा. मी पाहते इकडे.
(संयोगिता वेदुच्या रूममधे आपल्या मुलांना घेऊन जाते.)
आण्विका :
(पाहुण्यातील मला ना बोलावते.)
अरे , इकडे या रे.
(पाहुण्याच्या असणाऱ्या सर्व तरुण मुला मुलींना बोलावते. त्यांना वेगवेगळी कामे निवडून देते. कुणी रांगोळी काढायची, कुणी सतरंजी अंथरायची. यासाठी वरील टेरेसवर छोटं मंडप घालायला. गणपती मंडळातील मुलांना सांगते. काही मुलींना रांगोळी घालायला लावते.
तर वेदूच्या आई व आजीला साहित्याची जबाबदारी देते. शेजारील काकूंना वेगवेगळ्या जेवणातील घटक वाटून देवून त्याच्या मदतीला पाहुण्यातील इतर स्त्रियांना लावून देते.
वेदीच्या भावाला व पाहुण्यातील मुलांना राहिलेलं साहित्य आणायला लावून देते. थोड्याच वेळात जय्यत तयारी होते.)
(नवरदेव येतो. व साखरपुड्याचा विधी चालू होतो. त्यावेळी आण्विका वेदूचं आवरायला जाते.
संयोगिता तिथे तीच आवरत असते.)
आण्विका :
काय ग आवरलं की नाही.
संयोगिता :
अग चाललय.
आण्विका :
आवर लवकर, तिकडे बोलावत्यात.
संयोगिता :
झालंच.
आण्विका :
चला एक काम झालं.
संयोगिता :
कुठल ग.
आण्विका :
कुठल म्हणजे बाईसाहेबांच्या लग्नाचं.
संयोगिता :
आता तुझं बघायच राहिलय.
आण्विका :
हे बघ आधी या बाईचं आवरुया मग बघू माझं काय करायचं ते.
वेदांगी :
मला घालवायलाच बसलाय जणू. इतक्या लवकर कंटाळल्यासा,
आण्विका :
आम्ही कुठे कंटाळलोय. तूच कंटाळलीस म्हणून हा खटाटोप चाललाय.
वेदांगी :
ये गप कायपण बोलतेस. मला रडू येतय.
आण्विका :
तू अन् रडणार, गप मगरीच रडू ते, बसत असशील रात्रभर नवऱ्याशी गप्पा मारत फोनवर.
वेदांगी :
मग मारायला नकोत.
तू मारत असशील की
आण्विका :
माझं अजून ठरलं नाही.
संयोगिता :
काय ग कुणाशी प्रेमबिम आहे का?
आण्विका :
(मोठे डोळे करून,)
जाऊ का मी घरी, काय वेदू,
वेदू :
नको मी गप्प बसते.
संयोगिता :
काय ग काय लपवत आहात.
वेदू :
काही नाही ग.
इतक्यात बाहेरून मुलगी येते.
मुलगी :
ताई भटजी काका बोलवत आहेत.
संयोगिता :
हा झालं आलोच.
अग, चला लवकर.
(त्या दोघी वेदांगीला साखरपुडा चालू असलेल्या ठिकाणी नेवून सोडतात. व त्या दोघी मंडपात एके जागी बाजूला थांबतात.)
इतक्यात
संग्राम तिथे येतो,
संग्राम :
( अण्विकेस)
हॅलो मिस,
आण्विका :
काय?
संग्राम :
काय नाही आपला फोन नंबर मिळेल का?
आण्विका :
का कशाला?
संग्राम :
(घाबरून)
काही नाही. म्हटल डेकोरेशनच काम मस्त केलं तुम्ही एखादी ऑर्डर आली तर द्यायला बर.
आण्विका :
मी डेकोरेशनच काम करत नाही. डॉक्टर आहे. चिरफाड करते. येतोस. तुझी करु का?
संग्राम :
(तो घाबरून )
नको,
(संग्राम पळतो)
संयोगिता :
अग अस काय करतेस. तो सरळ सरळ विचारत होता.
आण्विका :
ये बाई गप्प उगाच बाजू घेऊ नको. जेवढा वर आहे ना तो कोकणी, तेवढाच खाली आहे. काल तुला माहित नाही. एकावर एक चिठ्ठी देत होता. आपला फोन नंबर लिहून.
अन् खोटं वाटतंय तर तिकडे बघ लाईन कशी उभा आहे. गॉगल घालून.
संयोगिता :
(तिकडे पाहते. तिला शायनिंग मारताना चार पाच मुले दिसतात.)
अग, खरंच की.
(ती हसू लागते.)
संयोगिता :
बघ एखादा पसंत पडतो का, कंपाऊंडर म्हणून ठेवून टाकू
आण्विका :
तुझ्याच दुकानात ठेव जा.
संयोगिता :
तो बघ दातक्या माव्हरा कसा दिसतोय.
आण्विका :
मी जाऊ का इथून.
(ती अण्विकेचा हात धरते.)
आण्विका : इथे साहेब फोन उचलत नाहीत माझा, त्यामुळे टेन्शन आलंय अन् ही दाखवतीय मला फुलकोबी.
संयोगिता :
काय म्हणालीस.
आण्विका :
काही नाही, नशीब माझं म्हणाले.
संयोगिता :
अग बस ग, बर सांग लग्नाचं काय ठरवलं आहेस.
आण्विका :
काही नाही अजून.
संयोगिता :
माझ्यापासून काही लपवू नकोस.
आण्विका :
काही नाही ह. इंटरशिप झाल्यावर बघायचं आहे.
संयोगिता :
कोण आहे का मनात?
आण्विका :
आहे पण आणि नाही पण.
संयोगिता :
आहे पण आणि नाही पण याचा अर्थ काय? सांग कोण असेल तर.
आण्विका :
कळेल तुला, तुला चोरुन करणार नाही.
संयोगिता :
हे बघ कोड्यात बोलू नको, मला कळेलच. सांग.
आण्विका :
मॅडम आपण बोलू यावर पुन्हा कधीतरी. इथे साखरपुडा आटपूया.
( थोड्या वेळात साखर घातली जाते.)
(आण्विका कामाचा लेखाजोखा देवून जायच्या तयारीत असते.)
वेदांगी :
(सारखी विनवणी असते.)
आज राहा की इकडे.
आण्विका :
राहायचं येवढं बोलू नकोस बाई, लग्नाला वाटल्यास लवकर येते.
आण्विका :
बाय येते मी
(आण्विका ,संयोगिता निघते.)
Cut to …….
…… …… …..
Outer / on road / kolhapur
Action :
वाटेत गाडीवर
संयोगिता आपली स्कूटी अण्विकाच्या स्कुटीजवळ आणत,
संयोगिता :
का ग थांबायची होतीस.
आण्विका :
ये बाई, तिथं कामापेक्षा नको तो त्रास जास्त. कुठ वॉशरूमला देखील जायची पंचायत. नुसती भुतावळ माग.
संयोगिता :
मग करायचा त्यातला एक पसंत.
आण्विका :
कशाला?
संयोगिता :
कशाला म्हणजे लग्नाला, नेला असता की कोकणात एखाद्यानं म्हावर खायला.
आण्विका :
इकडे मिळतात मासे. त्यासाठी कोकणात कशाला जायला हवे.
संयोगिता :
मग कोल्हापूर सोडत नाहीस म्हण.
आण्विका :
ते बघू चल.
(ती संयोगिताच्या दारात जाते. तिच्या मुलीला उतरते. इतक्यात मागून संयोगिता येते.)
आण्विका :
हा झालं, चल बाय मी निघते.
संयोगिता :
अग, चहा तरी घेऊन जा.
आण्विका :
बस पित तूच .
( आण्विका सुसाट स्कुटी घेवून जाते.)
संयोगिता :
मॅडम काहीतर लपवत आहेत. ही अन् कुणाच्या जाळ्यात गावली. की हिने कुणाला ओढल बघायलाच पाहिजे.
Cut to …..
……. ……. ……. ……
कळतं नकळत जुळले हे बंध भाग २२
Evening / outer/ Day/ Forest
Action :
ईशान रपेटला जंगलात गेलेला असतो. तिथे त्याचा मोबाईल फोन पडतो.
कामावरून परत आल्यावर जीप मधून उतरताना. खिशात हात घालत
ईशान :
अरे मोबाईल.
ड्रायव्हर :
काय झालं सर.
ईशान :
मोबाईल पडला कुठेतरी वाटेत.
ड्रायव्हर :
गाडीच्या हाद्र्याने पडला असेल कुठेतरी.
ईशान :
मागे जाऊया का?
ड्रायव्हर :
आता रात्र होत आहे सर, उद्या सकाळी पाहावं लागेल. तास इकडे कोण नसत. सापडेल आपल्याला.
ईशान :
ते ही खरंच.
ड्रायव्हर :
काही महत्वाचं होत का?
ईशान :
काही महत्वाच्या फाईल व काँटॅक्ट नंबर
ड्रायव्हर :
सकाळी बघू
( जीप गाडी रस्त्यावरून जाते.)
Cut to …..
…… ….. ……
Day/ morning/ Radhanagari Forest / outer
भिवा :
या फॉरेस्ट ऑफिसरच काहीतरी करायलाच पाहिजे.
किशा :
तर काय हा आल्याने आमचं सगळ काम ठप्प झालय.
प्रमुख :
(हातातील बिडी पायात टाकून विझवत प्रमुख)
चला बघू सापडेलच आपल्या टप्प्यात.
(ते घोंगडी पांघरून निघतात.)
Cut to …..
…… …… ……
Morning / Day/ outer / Forest
Action :
सकाळच्या वेळी मोबाईल शोधण्यासाठी ईशान छोटी टू व्हीलर घेऊन येतो. तेव्हा तो आपल्या रपेट केलेल्या वाटेवरून शोधत जात असतो. तेव्हा हे टोळके वेषांतर करून त्यावर हल्ला करते. तो त्यासंगे फाईट करतो. शेवटी त्याचा कोल्हापुरी दणका पाहून सगळे पळून जातात. तो परत येतो.
आपल्या ऑफिसवर आल्यावर
बाकीचे कर्मचारी त्याकडे पाहतात. व त्याच्या शेजारी येऊन त्याची चौकशी करू लागतात.
Dialog
एक शिपाई :
काय झालं साहेब.
ईशान :
काही नाही लांडग्यांनी हल्ला केला होता. तो निपटला.
दुसरा कर्मचारी :
काही लागल तर नाही ना.
ईशान :
नाही, फक्त ड्रेस जरा उसवला.
( कॅमेरा हताजवल फाटलेल्या शर्ट कडे)
Cut to….
…… …… ….
Day / Morning / Forest
Action :
हल्ला करून पळून गेलेले एके ठिकाणी थांबून
Dialog :
भिवा :
जरा वाचलो नाहीतर त्याने संपवलच असत.
तुका :
ताकदिचा गडी हाय. असा सहज नाही सापडायचा.
किशा :
याच्यासाठी काहीतरी वेगळीच युक्ती करायला हवी.
भिवा :
चला आता. उगीच शंका नको. तोंड धुवा ती नाल्यात.
(ती सर्व आपली तोंडे नाल्यात धुतात. व निघतात.)
Cut to ….
…… …… ……. …… …… …….
Day /afternoon/ outer - Inter/Radhanagari citi Mobile shop
Action :
ईशान मोबाईल शॉप मध्ये येतो.
Dialog :
कर्मचारी :
बोला साहेब काय हवंय?
ईशान :
मोबाईल दाखवा एखादा छान सा.
( तो दाखवतो, ईशान मोबाईल खरेदी करतो. त्यानंतर तो सिमकार्ड घ्यायला जातो. व नवीन मोबाईल सिम विकत घेतो. व कंपनी कडून जुना नंबर मागून घेतो.)
Cut to ……
….. ……
Day/ Inter - Outer /Ishan Room Radhanagari and C.B.S. bas stand
Action :
कोल्हापूर बस स्थानकावर आल्यावर स्वप्नील ईशानला फोन करतो.
ईशान :
(फोन उचलून.)
हॅलो कोण?
स्वप्नील :
काय राव कोल्हापूरास आल्यापासून विसरला की काय.
ईशान :
अरे , स्वप्नील ना.
स्वप्नील : नाव तरी राहिलय म्हणायचं लक्षात.
ईशान :
अरे, तस नाही. फोन हरवला माझा रपेटच्या वेळी, सापडलाच नाही. तेव्हा नवीन घेतला. त्यामुळे कॉन्टॅक्ट डिलीट झालेत, अनूचा फोन ही.
स्वप्नील :
झालं म्हणजे कॉन्टॅक्ट नाही म्हणा. मग हा नंबर.
ईशान :
अरे कंपनी कडून परत तोच नंबर मागून घेतला. अजून अपडेट करून नंबर देखील घ्यायचे आहेत.
स्वप्नील :
ते ठीक आहे रे. तू लग्नाला येणार आहेस ना.
ईशान :
कुणाच्या?
स्वप्नील :
कुणाच्या म्हणजे वेदांगी दिदीच्या.
ईशान :
हो बोलावलंय तिने. येणार आहे. बर तू कधी येतोयस.
स्वप्नील :
आलोय मी कोल्हापूरात.
ईशान :
कधी, कुठे आहेस ?
स्वप्नील :
आहे सी बी एसला.
ईशान :
मग ये की राधानगरीला, पार्टी करु,उद्या जाऊ परत आपण दोघे.
स्वप्नील :
नको, जरा जोतिबाला जाणार आहे. त्यामुळे नाही येता येणार.
ईशान :
मी येईन आज रात्री कोल्हापूरला.
स्वप्नील :
उद्या भेटू मग लग्नात.
ईशान :
चालेल की, अरे हो जरा अनुचा फोन नंबर पाठव.
स्वप्नील :
माझ्याकडे नाही रे.
ईशान :
हे बघ चेष्टा करू नकोस. दे रे.
स्वप्नील :
(फोन नंबर सेंट करून.)
पाठवलाय बघ.
( ईशान फोन नंबर सेव्ह करतो.)
स्वप्नील :
बर चल ठेवतो बाय.
ईशान :
बाय.
(स्वप्नील बस पकडतो.)
Cut to ……
….. …… …… ..
Day / inter / Anvika Home
Action :
आण्विका घरी येते. ती घरात स्कूटी लावून जाते. तिथे तिला सोफासेटवर स्वप्नील बसलेला दिसतो.
त्याला पाहून,
Dialog :
आण्विका :
काय रे, तू केव्हा आलास?
स्वप्नील :
थोडा वेळ झाला.
आण्विका :
कळवायच नाहीस का? मी आले असते न्यायला. मावशी, काका व रेवा कशी आहेत.
स्वप्नील :
सीबी एस ला पोहोचताच बस मिळाली. त्यामुळे कळवल नाही. बाकी ठीक आहेत. तुझी आठवण काढत असतात.
आण्विका :
थांब चहा टाकते.
स्वप्नील :
नको ,झालंय नाष्टा पाणी. एव्हाना जेवलोय म्हणायला हरकत नाही.
अण्विकाची आई :
थोडच खाल्लय ग. पोहे नुसते.
स्वप्नील :
थोडेच, अग चांगल ताटभर दिले होते. तेवढे खायला लावले हिने.
आण्विकाची आई :
त्यात काय वाळलास किती बघ, आणि तुझ्या सारख्या मुलानं भरपूर खायला पाहिजे.
स्वप्नील :
बहिणी बहिणी सारख्याच आहात दोघी.
आण्विका :
चहा करते की थोडा.
स्वप्नील :
नको, मला तेवढी दादाच्या गाडीची किल्ली दे.
आण्विका :
अरे, आत्ताच आलास ना, …. आता कुठे आणखीन, …. फिरायला जाणार.
स्वप्नील :
थोड जोतिबा, पन्हाळा करून येतो.
आण्विका :
अरे आता चार वाजलेत. इतक्या वेळाने कुठे जातोस ?
स्वप्नील :
वेळ कुठे झालाय. जातो. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत येतो.
(आण्विका शोकेश मध्ये ठेवलेली किल्ली काढून देत.)
आण्विका :
हा घे
(तो निघतो.)
Cut to ….
…. ….. …..
Inter/ Anvika Home / Holl Evening
आई :
काय ग , कसा झाला साखरपुडा?
आण्विका :
झाला नीट,
आई :
नवरा कसा आहे?
आण्विका :
आहे की छान.
आई :
झालं ना नीट सगळ काही.
आण्विका :
झालं की.
Cut to …..
…… …… …….. …….. ……
Night / Inter / Anvika Home / In room
Action :
आण्विका इकडे तिकडे फिरत आहे
Dialog :
आण्विका :
(मनात)
काय हे हा फोन का करत नसेल. की कंटाळला मला. की दुसऱ्या लफड्यात पडला.
फोन करून बघते.
( ती ईशानला फोन लावते. तो उचलत नाही.)
आण्विका :
काय झालंय कोण जाणे. उचलत नाही.
(इकडे तो फोन उचलत नाही म्हणून अण्विका खूप चिडते. व फोन अंथरुणावर आपटते. व नाराज होऊन अंथरुणावर पहुडते. त्यावेळी तो ऑफिस मीटिंग मध्ये असतो. ती एक नाईट गुप्त बैठक असते.)
Cut to …..
….. …… …… ….
Night / Inter /Radhanagari Forest office / in Room /
Action :
अनेक कोल्हापूर विभागातील ऑफिसर तिथे आलेले आहेस त्यामधे चर्चा चालू आहे. फोन त्यांनी सायलेंट मोडवर ठेवलेले असतात.
Dialog :
मुख्य अधिकारी :
हल्ली प्राण्यांचे दात त्यांचे केस , हाडे यांची तस्करी तसेच जंगली आयुर्वेदिक वनस्पती यांची अवैध संपत्तीची तस्करी चाललेली आहे. ती थांबायला हवी.
दुसरा अधिकारी :
काय करणार साहेब, आम्ही जीवाचे रान करून तस्कर पकडले तरी काळ्याकोटातील वकील खर्याच खोटं व खोट्याच खरं करून सोडवतात. काय करणार?
तिसरा ऑफिसर :
यासाठी काहीतरी खास योजना करायला हवी.
ईशान सर तुमचं मत काय?
(त्यावेळी अनु फोन करते. ईशान कट करतो. व ईशान आपल्याकडील फाईल घेऊन समोर येतो.)
ईशान :
(समोर उभा राहून)
सर आपण मागील जर घटना पहिल्या तर आपल्या जंगलातील वनस्पतीचा व त्यामधील प्राण्यांचा मी अत्यंत बारकाईने अभ्यास केला. तेव्हा अस लक्षात आले की या ठिकाणी जी काही शिकार होते. ती थोडीफार किळकोळ पार्टी लक्षात घेऊन जंगली रानकोंबडे यांची शिकार केली जाते.
दुसरी गोष्ट म्हणजे जंगली वनस्पती ज्यामध्ये आयुर्वेदिक घटक जास्त असणाऱ्या वनस्पती. यांची संख्या आपणास (तो नकाशात निशाण दाखवत) या भागात जास्त आढळून येतात. व त्याच प्रदेशातून चोरी होते. अन् मागील आपणास सापडलेला साठा पाहता. त्यातील माल व त्याची क्वालिटी पाहता तो शरद ऋतूत कलेक्ट केल्याचे दिसून येते. म्हणजे पावसाळा संपताच,
यावरून आपण या एरियात सूर्य प्लॅनेट लाईट व त्याअंतर्गत कॅमेरे बसवले तर अत्यंत बरे पडेल. लोकांना बाहेर दाखवायचं की ती फक्त लाईटसाठी आहे. पण प्रत्यक्ष त्या आधारे आपण अंतर्गत फोटो व शूटिंग करायचे. मग किती दिवस लपून राहतील. …. सदर तस्करांना मदत करणारे,.. हे स्थानिक लोक असल्याशिवाय हे शक्य नाही. आपण या प्रदेशातील गावागावांतून खबर काढली पाहिजे. की यांना कोण मदत करते. तसेच त्यांवर पाळत देखील ठेवली पाहिजे. पण हे एवढं सोपं काम नाही. यासाठी आपले मनुष्यबळ कमी पडते. यावर मी सांगितलेले कॅमेरे ते ही गुप्त बसवलेले बरे. त्याबाबत माहिती आपल्या रेंजर्सना देखील असता कामा नये. संपूर्णत गुप्त रित्या हे केले पाहिजे.
( Action with No voice)
(अशी तेथे बराच वेळ चर्चा चालु असते. व शेवटी ठरवतात.)
पहिला अधिकारी :
वेल डन सर.
दुसरा अधिकारी :
खरंच चांगली योजना आहे.
(ते सगळे हस्तांदोलन करतात. व ही योजना गुप्त ठेवण्याचे ठरवतात.)
(मीटिंग संपल्यावर)
एक ऑफिसर :
सर उद्या सुट्टी हवी होती ना तुम्हाला.
ईशान :
हो एका लग्नाला जायचं आहे.
ऑफिसर :
( हास्य मुद्रेने)
किती दिवस लोकांच्या लग्नाला जाणार. तुमचं पण बघा आता.
ईशान :
( हास्य मुद्रेने)
चाललय सर.
(ते हसतात.)
मीटिंग संपते.
Cut. To. …..
कळत नकळत जुळले हे बंध भाग २३
Day/ morning / Anvika Home
Action :
आण्विका स्वप्नीलसाठी नाष्टा घेऊन येते. ती नाष्टा त्याला देत.
Dialog :
आण्विका :
तू आता येणार वेदांगीकडे.
स्वप्नील :
आता येऊन काय करू. त्यापेक्षा मी थोडावेळ दादा सोबत राहतो. नंतर येईन अक्षताच्या वेळी. तोपर्यंत ईशान पण येईल. आम्ही दोघे मिळून येवू.
आण्विका :
मला तर जायलाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत. मगापासून फोनवर फोन येत आहेत मॅडमचे.
आण्विका :
(मनात)
याच्यासंगे बोलायला वेळ आहे. मी केलेला साधा फोन देखील उचलत नाही. नुसता भेटू देत.
(इतक्यात ईशान अण्विकेस फोन करू लागतो. ती स्वप्निल असल्याने फोन घेत नाही.)
(स्वप्नीलला नाष्टा पाणी देऊन अन्विका आतील आपल्या खोलीत येते. फोन चेक करते. त्यावर ईशानचा मिस कॉल आलेला दिसतो. )
अण्विका :
(मनात)
आता आठवण झाली काय? भेट लग्नात बघतेच मी.
(इतक्यात वेदांगीचा फोन येतो.)
वेदांगी :
अग, .. कुठे आहेस. ये की लवकर.
आण्विका :
हा आले मॅडम.
(आण्विका मस्त गुलाबी साडी नेसते. सुंदर पेहराव करून ती सर्वांना टाटा बाय करून आपली स्कूटी घेऊन निघते.)
Cut to … …
…… …… ….
Day / Outer / Kolhapur city/ morning /9.00 o’clock
Action :
एका चौकात संयोगिता वाट पाहत असते.
आण्विका स्कूटी घेऊन तिच्याजवळ येते.
Dialog :
संयोगिता :
काय ग किती वेळ ?
आण्विका :
काय करणार नाष्टा पाणी करून निघायला वेळ होणारच. अजून आहे भरपूर वेळ. चल.
संयोगिता :
आधी गिफ्ट घेऊया.
आण्विका :
मुले कुठे आहेत?
संयोगिता :
क्लासला गेलेत. नंतर येतील पपांबरोबर लग्नाच्या वेळी.
बर आपण कुठे जायचे ?
आण्विका :
कुठे म्हणजे हॉल वर.
संयोगिता :
वेदी चिडायची नाही.
आण्विका :
तिला कालच कल्पना दिलीये मी. व आतापर्यंत पोहोचली देखील असेल.
बघू चल , पुढल्या कॉर्नरला…. एखाद छानस गिफ्ट.
(त्यापुढे निघतात.)
Cut to …..
…… ……… ….
Day / Morning / Outer – inter / Gift shop
Action :
त्या दोघी एका दुकानात जातात.
Dialog :
दुकानदार :
बोला मॅडम काय घेणार?
आण्विका :
एक छान गिफ्ट दाखवा.
( तो वेगवेगळी गिफ्ट दाखवतो. डिनर सेट, टी सेट, अशी वेगवेगळी गिफ्ट दाखवतो.
त्या त्यातील एक गिफ्ट सिलेक्ट करतात.)
संयोगिता :
हा तो द्या. मस्त आहे.
( खरेदी करून पॅकिंग करण्याआधी )
अण्विका :
थांबा. एकच मिनिट आले मी
( असे म्हणून बाहेर जाते.
पाच सहा मिनिटात ती परत येते. व त्या सेट मध्ये एक ड्रेस लहान मुलांचा, एक खेळणे, एक चोकन अन मनगटी लहान मुलांची एवढं घालून,)
आण्विका :
हा आता पॅक करा.
(तो दुकानदार हसू लागतो. त्यासोबत संयोगिता देखील हसू लागते.)
आण्विका :
का, काय झालं? एवढं हसायला.
संयोगिता :
हे बघ जेव्हा हा संसार सेट उघडेल तेव्हा यामध्ये असणारे हे चोकण नवऱ्याला द्यायचं की नवरीला.
आण्विका :
अग पुढल्या जोडणीची तयारी आहे ही. अँडव्हान्स मध्ये पुढे बारशाला जायला नको.
संयोगिता :
वेदीचा चेहरा मात्र बघण्यासारखा असेल नाही.
आण्विका :
हो बघण्यासारखा असेलच. चल थोडी गंमत करू.
Cut to …..
….. ….. …
Action :
(त्या दोघी सेट खरेदी करून पॅकिंग करून बाहेर पडतात. व संयोगिता तो सेट स्कुटीवर आपल्या पायात घेऊन निघते. थोड्याच वेळात त्या लग्नमंडपात हॉल वर पोहोचतात.
बाहेर स्वागत करण्यासाठी वधू व वराचे मामा उभारलेले असतात. त्या थेट तिथून वेदांगी असणाऱ्या हॉल मधील रूम कडे जातात.
Cut to…..
….. ….. ……. ……..
Day /Inter / Kolhapur Ishan Home
Action :
ईशान बाथरूम मध्ये जातो. स्नान करतो. आपले आवरतो मेकप करतो. आपले कपड्यांचे कपाट उघडतो. मस्त एक ड्रेस निवडतो. व तो परिधान करतो. व त्यावर सुरेख सेंट मारून तो निघतो. आपली सुरेख बुलेट घेऊन तो निघतो.
गाडीवर असताना त्याला फोन कॉल येतो.
Dialog :
ईशान :
(फोन उचलून)
हा बोल की.
स्वप्नील :
साहेब आवरलं की नाही.
ईशान :
निघालोय गाडीवर आहे. कुठे आहेस?
स्वप्नील :
मावशीकडे, मिनस अनु दीदीच्या घरी. इकडेच ये की.
ईशान :
बर येतो.
Cut to …….
…… …… …….
Day /Outer - Inter / Anvika Home Kolhapur city
ईशान अण्विकेच्या बंगल्याच्या आवारात येतो. तो आल्याचे पाहून स्वप्नील बाहेर येतो.
तो गाडीवरून,
Dialog :
ईशान :
चल की.
स्वप्नील :
आधी घरात तरी ये. काय लाजतोस.
ईशान :
बर,
स्वप्नील :
साहेब एवढे नटून आलाय म्हणजे काय बेत आहे तुमचा?
ईशान :
काय बेत म्हणजे, माणसाने काय अप टू डेट राहू नये काय.
स्वप्नील :
पण मला तर वेगळच वाटतंय.
ईशान :
( हळू आवाजात)
अनु आहे का?
स्वप्नील :
ती लग्नाला गेली आहे. काही काम होत.
ईशान :
नाही विचारलं.
स्वप्नील :
दारातूनच काय चौकशी करताय. घरात तरी या.
(स्वप्नीलचा आवाज ऐकून आतील खोलीतून अण्विकेची आई)
अण्विकेची आई : (oc)
स्वप्नील कोण आहे रे?
स्वप्नील :
काही नाही पाहुणे आलेत. म्हणजे अनु दीदीचे मित्र.
ईशान :
आतमध्ये येतो.
अनूची आई :
( बाहेर येत)
कोण आहे?
ईशान :
मी ईशान अनुचा मित्र. लग्नाला आलोय. वेदांगीच्या.
अण्विकेची आई :
अनु आताच गेली लग्नाला थोडाच वेळ झाला.
बर चहा करते. बसा.
ईशान :
नको कशाला उगाच
स्वप्नील :
मावशी तू कर जा चहा.
( अनुची आई आत चहा करायला जाते.)
स्वप्नील :
(हळूच)
जावयाने लाजू नये सासुरवाडीत.
ईशान :
फिरकी घेवू नकोस
स्वप्नील :
फिरकी काय यात. खरं तेच बोलतोय.
ईशान :
अरे तिला फोन केला होता. तिने उचलला नाही.
स्वप्नील :
कशी उचलेल. तू संपर्कात आहेस की नाही.
ईशान :
अरे यार, कामातून वेळ मिळेना. ड्युटी करून यायला उशीर होतो. कधी बोलणार. आजपासून थोडा फ्री आहे.
व त्यात मध्ये मोबाईल हरवला. काय करणार.
स्वप्नील :
आजचा दिवस आहे तुला. बघ प्रयत्न करून.
(इतक्यात आण्विकेची आई चहा घेऊन येते.)
(ती दोघे चहा घेतात.)
अण्विकेची आई :
तुझं गाव कोणत?
ईशान :
मी कोल्हापूरचाच आहे. अनु माझी क्लासमेट.
अणुची आई :
बर काय करतोस,
ईशान :
फॉरेस्ट खात्यात आहे कामाला.
अणुची आई :
आमची अनु पण आता डॉक्टर झालेय.
स्वप्नील :
तसा मुलगा भरपूर शिकलाय. नोकरी पण आहे. बघा एखाद स्थळ तुमच्या ओळखीन.
( स्वप्नीलकडे ईशान बघतो. स्वप्नील पाय मारतो पायावर.)
अणुची आई :
स्थळ होय. बघुया की. पण अपेक्षा काय आहेत.
स्वप्नील :
तशा काही जास्त अपेक्षा नाहीत; पण असावी मुलगी साधी सरळ, शिकलेली व जेवणखाण जमणारी. घरात काय एक दोन माणसे. आई बाबा , व एक बहिण व हा सगळ्यांना सांभाळणारी असली तर उत्तमच काय ?
(स्वप्नील त्याकडे डोळे मिचकावत बघतो.)
आण्विकेची आई :
बघुया एखादे मिळाले तर स्थळ.
स्वप्नील :
बर मी मावशी जातो पुढे. तू काका सोबत येणार ना. की येतेस आमच्या बरोबर.
आण्विकेची आई :
नको जावा तुम्ही आम्ही येतो. जरा घरातील पण पसारा आटपते.
स्वप्नील : बर निघू मग मी.
आण्विकेची आई, चला पुढे ते येतीलच एवढ्यात, मी आवरते.
(ते निघतात.)
Cut to …..
…… …….. …
Outer / Day /on road
Action :
बाहेर पडताना गाडीवर बसताना
ईशान :
काय राव तुम्ही, चांगलाच पोपट करता राव. मी मागतोय काय अन् तुम्ही दाखवता काय.
स्वप्नील :
साहेब तुम्हाला जे पाहिजे ते इथे नाही चला तिकडे लग्नात इथे जुळून काय करणार. तिकडे जुळायला हवं ना.
ईशान : आज रागवणार माझ्यावर, सांभाळून घे.
स्वप्नील :
आधी इथंन पाय तरी काढा. पुढे बघू.
(ते निघतात.)
(वाटेत एखादे गिफ्ट घेतात व जातात.)
Cut to ……
……. …… ….