Wednesday, April 23, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag ३३,३४,३५३६

Kalat n kalat julale he bandh script bhag ३३,३४,३५,३६  

कळत नकळत जुळले हे बंध भाग ३३

Day/ Afternoon/ Inter - Room

Action :

ईशान आपला पेहराव करतो. पायात बूट. अंगात ज्याकेट. तसेच इतर सामग्री घेऊन, एक नकाशाचा फोटो गुगल म्यापने मोबाईल मध्ये घेऊन बाहेर पडतो.

Cut to …..

….. ….. ……

Day/ outer/ Road

Action :

ईशान आपली बाईक घेऊन राहुलला सोबत घेऊन जातो. त्या वाटेवर आल्यावर त्यांना ओळखीच्या खुणा दिसतात. तेथून त्याद्वारे ती दोघे पुढे अरण्यात वाटेने जातात. पुढे गाडीच्या चाकाचे माग पाहत गेल्यावर एके ठिकाणी एक काहीतरी पेटवलेली जागा दिसते.

ईशान थांबतो.

Dialog :

राहुल :

काय झालं. इथे का थांबलोय?

( ईशान बोट दाखवत इशारा करतो. ते दोघे गाडीवरून उतरतात. त्यांना एका बाजूला एक कापडी पुठ्ठा अर्धवट जळलेल्या दिसतो.

ईशान गाडीच्या वरील रंगाचा अंदाज बांधतो.)

ईशान :

( राहुलला)

चल.

ते पुढे जातात . पुढे गेल्यावर जंगलात वाट संपलेली आढळते. तिथे आल्यावर ईशान एके ठिकाणी जाळीत कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने आपली गाडी लावतो.

 व तेथील झाडावर चढून अंदाज घेतो.

व पुढे अरण्याच्या सिमेने शेतवडीतून तो जातो.

राहुल :

 इकडे काय असेल का?

ईशान :

शांत रहा. 

(ईशान आपल चालतच गुगल मॅप उघडतो. व त्यावरून तेथे लपण्यासाठी कोणती जागा आहे का ते पाहतो. तेथून तीन चार फॉर्म हाऊस त्याला नकाशात दिसतात. तो एकामागून एक फॉर्म हाऊस पाहत. जातो. शेवटी तो अन्वीकेला लपवून ठेवलेल्या फॉर्म हाऊस वर येतो. त्याला किशा गडबडीने जाताना दिसतो.)

Cut to …..

……. ……. …… …….

Day /Evening /Farm house /outer- inter

Action :

एका बंद खोलीत अन्विकेला बांधून कोंडून ठेवले आहे .बाहेरील बाजूस एकजण पहारा देत असतो.

अन्विकेला जरा गुंगितून शुद्ध येते. तिच्या लक्षात येते की तिला तिथे कोंडून ठेवले आहे. इतक्यात किशा तिथे येतो.

बाहेर दोघे जण बोलत असतात.

किशा गडबडीने आल्याचे पाहून

एकजण :

काय झालं. एवढ्या गडबडीने यायला.

किशा :

 गावात गडबड झाली. सदा व तुक्याला पकडुन नेलय. पोलिसांना संशय आलाय.

दुसरा :

 मग बरच हाय की. सदा जाईल तुरुंगात.

किशा :

 अरे पण आपल्या प्लॅन प्रमाणे नाही ना झालं. ही बाई अजून.

पहिला :

अरे होय, हीच काय करायचं.

किशा :

काय करायचे म्हणजे मारून टाकायची. लांब दरीत.

पोलीस पकडतील सदाला, सदा जेलात. व फारिस्ट ऑफिसर कोमात.

एका दगडात दोन पक्षी मारायचे.

चला लवकर आटपून जाऊ.

(ते अन्विकेला ठेवलेल्या त्या पाठीमागील फॉर्म हाऊसच्या रूमकडे निघतात.)

(ईशानने देखील त्यांचे बोलणे एकलेले असते.)

(तो देखील झाडीतून लपत छपत त्यामागे जातो. तत्पूर्वी आपले लोकेशन पाठवून राजवीर फौजदार यांना कळवतो. व एक कॉल टाकतो. व मोबाईल सायलेंट मोडवर टाकून तो पुढे सरकतो.)

Cut to …..

….. ….

Evening/ 6.00 o’ clock/ Inter - outer./ Farm house

 किशा व त्याचे सहकारी त्या फॉर्म हाऊसच्या मागील खोलीकडे जातात. खोलीचे दार धाडकन उघडले जाते. आण्विकेस शुद्ध आलेली असते.

आण्विका :

कोण आहात तुम्ही, मला का पकडलेय?

किशा:

काय करणार बाई, तू तर सापळा आमचा, माफ कर हा. काही म्हण फारीस्टची आवड मात्र भारी हाय.

दुसरा :

 काही म्हण किशा पाखरू कुस्करून टाकूया का. नाहीतर मरणारच हाय.

पहिला :

लई शहाणा आहेस. अन् नंतर सापडलो म्हणजे या प्रकरणाने.

दुसरा :

 त्याची सोय केली आहे मी.

किशा :

लई कमिने आहीसा तुम्ही

दुसरा :

 उचल तिला.

ॲक्शन :

(आण्विका ते पकडायला येतात. तोपर्यंत त्यांना ढकलून दोन-चार लाथा मारुन पळून जाऊ लागते.

इतक्यात त्यातील एकजण तिला पकडुन धरतो. किशा तिला चाकू काढून मारणार इतक्यात ईशान तिथे येतो. व त्यांना मारतो. राहुल देखील त्यांना बडवतो.

इतक्यात पोलीस तिथे येतात. त्यांना हे तिघे. बांधलेले खांबाला आढळतात. ते त्यांना पकडुन घेऊन जातात. ईशान व राहुल अन्वीकेला घेऊन येतात.)

Cut to …..

….. ……. ……. ……

Night/ Police station/ inter

Action :

किशाला आणून तिथे तुरुंगात टाकले जाते.

त्याला टाकताना एक पोलीस

एक पोलीस :

 आता बस खडी फोडत.

(त्याकडे पाहून सदा, व तुका रागाने लालबुंद होऊन पाहत असतात.)

Cut to …..

…….. …… …..

Night / Inter/ police station

Action :

 पोलिस त्यांना एकत्र एका खोलीत घेऊन येतात.

Dialog :

 फौजदार राजवीर सातवेकर :

आता खर सांगा मॅडमच अपहरण का केले होते.

सदा व तुका :

( एकदम)

 साहेब आम्हाला यातलं काय बी ठाव नाही. आम्ही काय यामध्ये नव्हतो.

(पोलिस आपला मोर्चा किशाकडे वळवतात.)

पोलिस

(करड्या आवाजात)

बोलतोस काय हाणू.

किशा :

बोलतो बोलतो …

किशा :

साहेब एकदा मी बाहेरून येत असताना मी घराजवळ आलो. त्यावेळी मी आतून आवाज ऐकला. या हरामखोर सदान माझ्या बायकोला आपल्या जाळ्यात ओढल, अन् नाशीवल . व तिच्या संगे याचे घाणेरडे संबंध होते. हे कळल्यावर मला राग आला. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. व तेव्हाच मी ठरवलं याचा काटा काढायचा. यासाठी मी खूप प्रयत्न केलं. पोलिसांना आमच्या गुप्त साठ्याचा पत्ता मीच त्या टपरीवाल्या द्वारे कळवला होता. बऱ्याच वेळा हा माझ्या तावडीतुन वाचला. शेवटी मी एकदा फारिस्टला जेव्हा रात्रीच मॅडम सोबत पाहिलं. तेव्हा माझ्या डोक्यात कल्पना सुचली. मी मॅडमला पळवून नेऊन त्यांना ठार मारायचे व संपूर्ण आळ सदावर ढकलायचा प्लॅन केला . पण तो त्या नर्सबाईमुळे उघड झाला.त्या रात्री ती योजना नीट झाली नाही.. त्यात आम्ही नंतर तिथे पडलेले साहित्य व माझे देवाचे लॉकेट आणायला गेलो. त्यावेळी पोलिस पाहून आम्ही परतलो.

व फॉरेस्ट ऑफिसरला आम्ही सापडलो. पण एक चांगल झालं. यात त्या निर्दोष बाईची हत्या आमच्याकडुन झाली नाही. व एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय या सदाला ठार मारता आलं नाही.

( किशा रागाने सदाकडे पाहत असतो.)

Cut to …….

……. ……. ……. ……. …….

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग ३४

Night/ Radhanagari bas stand / Inter Bus /8.00 o’clock.

Action :

(कोकणातून कणकवली सांगली बस निघालेली आहे. ती बस कोल्हापूरकडे निघालेली आहे. अण्विकाचे कुटुंब बसमधून प्रवास करत आहे.

आण्विका व आई एका शिटवर बसलेल्या आहेत बसमध्ये. तिचा भाऊ राहुल शेजारील सिटला धरून उभा आहे. वडील पुढील बाकावर बसले आहेत.

बस कोल्हापूरच्या दिशेने निघालेली आहे.

तिचे बाबा तिच्याकडे पाहत आहेत.

तिचा नाराज चेहरा त्यांना सर्व काही सांगत आहे.

अनुच्या मनात अनेक विचार चालू आहेत.)

आण्विका :

( मनात)

आपल कसं होणार? या प्रसंगाने घरची आपल्या लग्नाला परवानगी देतील काय?

 (आण्विकेस राधानगरी पोलिस स्टेशन मधील सर्व घटना आठवू लागतात.)

Cut to ……..

…….. …….. ……

(फ्लॅश बॅक)

Day/Inter / Police station

इन्स्पेक्टर आपल्या खुर्चीत बसलेले आहेत. समोर आण्विकाचे आई बाबा समोर खुर्चीवर बसले आहेत. शेजारी ईशान व राहुल उभे आहेत.

Dialog :

इन्स्पेक्टर राजवीर :

आता सगळी प्रोसेस पूर्ण झाली आहे. आपण जाऊ शकता. आपली मुलगी आपणास मिळालेली आहे.

(ईशान अन्विकाकडे पाहत असतो.)

Cut to …....

……. …….. ……. ……

Day / outer / police station

Action :

पोलिस स्टेशनच्या बाहेर आल्यावर

ईशान :

 ती उपाशी असेल आपण इथे जवळ कुठेतरी जेवण करूया का?

आण्विकाचे बाबा :

( हात जोडून)

काही नको. झाली तेवढी मदत पुरे. आता आमचं आम्ही बघतो. या आता तुम्ही.

ईशान :

 आता सापडली ना अनु. मग.

आण्विकाचे बाबा :

हो सर सापडली. पण बदनामी ही झाली आमची, त्याच काय? संकटात सापडली तुझ्याच मुळें? आता दूर राहा तिच्यापासून…

आण्विका :

 अस काय म्हणताय बाबा.

बाबा :

 तू तर काहीच बोलू नकोस? तुला तर घरी गेल्यावर पाहतो.

चला आता शेवटची गाडी भेटते का पाहू?

(ते निघालेले असतात. ईशान एका गरीब मुलासारखा अगतिक चेहरा करून तिच्याकडे पाहू लागतो. ती सुद्धा रडत निघालेली असते.ती सुद्धा मागे वळून त्याच्याकडे पाहू लागते. आण्विकाची आई तिच्या हाताला धरून ओढत असते.)

(ब्रेक लागतो, बस थांबते.आण्विका आपल्या विचार चक्रातून बाहेर येते.)

आण्विकेची आई :

 ह चल आता आपला थांबा आला.

ती सर्वजण खाली उतरतात.

बस पुढे सी बी एस ला जाते.

Cut. To….

…… …… ……. ……..

Night /Room / Inter

Action :

ईशान आपल्या रूमवर आलेला आहे.. शांतपणे तो आपल्या बेडरूममध्ये जातो. जाताना त्याला तेथील कर्मचारी

 कर्मचारी :

सर जेवण लावू.

ईशान :

 नाही नको. भूक नाही.

 Action :

ईशान आपल्या रूम मध्ये जाऊन रडत आपल्या बेडवर बसतो.त्याला डोळ्यापुढे अण्विका दिसत असते.

Cut to …..

… …… ……. …… …….

Day / Inter / Ishan home

Action :

ईशान आण्विकेच्या मोबाईलवर फोन करतो.

तिकडे तिची आई फोन उचलते.

आण्विकेची आई :

 हॅलो कोण?

ईशान :

 अनुं कशी आहे.

आण्विकेची आई :

 आपण कोण?

ईशान :

 मी ईशान,

आण्विकेची आई :

 ठेवा फोन परत फोन करू नका. व ती ठेवते.

ईशान :

 हॅलो हॅलो

(ईशान पुन्ह फोन लावतो. फोन कट केला जातो. ईशान अस्वस्थ होतो. )

(ईशान स्वप्नीलला फोन करतो.

रिंग वाजू लागते. स्वप्नील फोन उचलतो. ईशान त्याच्याशी संवाद साधतो. व घडलेली हकीकत सांगतो.)(No voice)

स्वप्नील :

 हे बघ टेन्शन घेऊ नकोस. होईल नीट. जरा शांत रहा.

(इतक्यात तिथे रेवती येते.)

रेवती :

कुणाचा फोन आहे?

स्वप्नील :

 ईशानचा.

रेवती :

काय म्हणत होता?

(स्वप्नील रेवाला सगळी घटना सांगतो.)

रेवती :

आपल्याला जायला हवं.

स्वप्नील :

 हो. पण आधी कॉल तरी दिदिला कर.

(रेवती लगेच फोन लावते.पण फोन बंद असतो.)

(तेव्हा रेवती मावशी म्हणजे अणुच्या आईच्या फोनवर कॉल करते.)

(आण्विकेची आई फोन उचलते.)

अणुची आई :

हॅलो.

रेवती :

मावशी कशी आहेस?

अणुची आई :

आहे बरी.तू कशी आहेस.

रेवती :

आहे ठीक.अनु दीदी कुठे आहे? तिचा फोन लागत नाही.

अन्विकाची आई :

 आहे इथे तिच्या रुममध्ये.

 रेवती :

 जरा तिच्याकडे दे.

आण्विकेची आई :

 हा देते.

(आण्विकेची आई तिच्या रुमकडे जाते. आण्विक शांत बसलेली असते.)

आई :

 हा घे फोन, रेवाचा आहे.

( आण्विका जवळ फोन ठेवून ती खाली जेवण खोलीकडे जाते.)

(आण्विका फोन घेते. व रडू लागते.)

रेवती :

 अग अस रडायला काय झालेय. सुटका झाली ना तुझी. अग एवढी धाडशी तू अन् कशी काय अडकलीस.

आण्विका :

 (रडवेल्या आवाजात)

काय सांगू, अग अचानक त्यांनी हल्ला केला. मला कळलंच नाही.

आण्विका :

 अग, पण आई बाबा चिडलेत. मला सगळ अवघड वाटतंय. आता वाटत नाही मला की ते लग्नाला परवानगी देतील आमच्या.

रेवती :

अस कस देणार नाहीत. बघते मी.दोन दिवस थांब माझे शेवटचे दोन पेपर देते व येते.

आण्विक :

लवकर ये.

रेवती :

 हा बाई येते.

Cut to …..

….. ….. ….. …..

 कळत नकळत जुळले हे बंध भाग ३५

Day / Radhanagari Forest office/ inter

Action :

ईशान आपल्या केबिन मध्ये येतो.आपल्या खुर्चीत बसलेला असतो. इतक्यात बाहेरून एक कर्मचारी त्याला एक लेटर आणून देतो.

कर्मचारी :

 ईशान सर तुमच्यासाठी एक लेटर आलंय पाहा.

ईशान :

हा आण इकडे.

(कर्मचारी लेटर देतो. ईशान ते उघडतो. व पाहतो.

तो नाराज होतो.)

कर्मचारी :

(त्याला पाहून)

काय झालं साहेब.

ईशान :

काय होणार आणखीन. बदली झालिये माझी.

कर्मचारी :

काय सर अडीच वर्षे तर झाल्यात आपल्याला अन् लगेच बदली.

ईशान :

 काय माहित.

कर्मचारी :

 कुठे पोस्टिंग झालीय.

ईशान :

 कोयना अभयारण्य.

कर्मचारी :

 चांगली जागा आहे सर. मस्त शांत परिसरात, तुम्ही जा तिकडे.

ईशान :

 हा बर.

(इतक्यात त्याला घरून फोन येतो.)

बाबा :

 ईशान कुठे आहेस?

ईशान :

 कामावर.

बाबा :

घरी ये शनिवारी.

ईशान :

का काही काम आहे.

बाबा :

काही नाही, जरा चर्चा करायची होती.

ईशान :

 कशा बद्दल?

बाबा :

 तुझ्या लग्नाबद्दल.

ईशान :

 इतक्या लवकर कशाला?

बाबा :

मग काय तू पळून गेल्याची बातमी पेपरात यायची वाट बघायची. अन् मग तुला विचारू का? ते काही नाही शनिवारी घरी यायचं. ते ही दोन दिवसांची सुट्टी घेऊन.

ईशान :

 मला एवढ्या लवकर नाही लग्न करायचय.

बाबा :

 मग काय म्हातारं झाल्यावर बोहल्यावर चढणार आहेस.

ईशान :

थोड दोन चार महिने तरी द्या मला.

बाबा :

 म्हणजे कुठली तरी घेऊन यायला पोरगी. ते काही नाही. शनिवारी यायचं म्हणजे यायचं. बाकी काय आम्हाला माहीत नाही.आम्ही एक मुलगी पहिली आहे.

ईशान :

मला ती पसंत नसेल तर.

बाबा :

पाहायच्या आधीच कसे ठरवतोस ,ते बघू नंतर. तू जर का आला नाहीस तर मी काहीतरी बरंवाईट करून घेईन

(ते फोन ठेवतात.)

(ईशान खूप चिडतो.)

Cut to ……

….. …… ……. ……

Day / inter/ Anvika Home

Action :

आईने जेवण वाढलेले असते. बाबा , भाऊ जेवायला येतात.

बाबा :

 अनु कुठे आहे?

आई :

 आणखी कुठे असणार, असेल तिच्या खोलीत.

बाबा :

जेवली का?

आई :

 नाही.

बाबा :

 का?

आई :

 हे बघा तिच्या मनात तो असेल तर.

बाबा :

 अग पण तिने आपल्याला आधी सांगायचं नाही का?

आता बघ सगळीकडे बदनामी चालू झालीय.

बाबा :

 ( हाक मारतात)

 अनु ये अनु.

आण्विका :

 (आपल्या खोली बाहेर येत )

 काय बाबा,

बाबा :

 चटकन जेवायला ये .

आण्विका :

 भूक नाही.

बाबा :

बाहेरच हॉटेलचे जेवायची सवय लागलीय ना. घरचं कसं गोड लागेल. चल झटकन ये.

(आण्विका, खाली येते. व जेवायला बसते.)

बाबा :

वाढ तिला.

(आई जेवायला वाढते.)

( जेवत असताना थोड जेवण झाल्यानंतर.आपल्या बायकोला)

बाबा :

एक छानशी साडी काढून ठेव. दोन दिवसांनी रविवारी एके ठिकाणी आपण स्थळ बघायला जाणार आहोत.

आण्विका :

 मी फक्त ईशान संगे लग्न करेन.

बाबा :

येवढ्या मोठ्या संकटातून वाचलीस तरी देखील डोळे उघडले नाहीत.

आण्विका :

 वाचवली कुणी ? त्यानेच ना.

बाबा :

हो वाचवली पण बदनामी आमची झाली त्याच काय?

आण्विका :

 मग तुमची ही बदनाम मुलगी कुणा दुसऱ्याच्या गळ्यात घालण्यापेक्षा त्याच्याच गळ्यात घाला.

बाबा :

 ते बघू आमचं आम्ही काय करायचं ते. तू लग्नाला उभी राहायचं बघ. स्थळ मी बघितलंय.

आण्विका :

 मी ईशानला  सोडून दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही.

आई :

 अनु एवढी उद्धट बोलायला कुठून शिकलीस. माझी अनु अशी नव्हती. शांत सोज्वळ माझी अनु आज इतकी उद्दट कशी?

आण्विका :

 माफ कर आई मला. पण तुम्हाला माझ्या भविष्याची काळजी नाही. मला तो आवडतो. व प्लीज मला त्याच्यापासून वेगळ करू नका.

बाबा :

 ते बघू काय करायचं ते. तू परवा रेडी रहा.

(आण्विक रडू लागते. ती उठते व आपल्या रूममधे जाते.)

आई :

अहो आयका की, हा मुलगा पण छान आहे. करू तिच्या मनासारखं. मला पण मुलगा पसंत आहे. चांगला वाटतोय.

बाबा :

बघू विचार करून.

Cut to …..

….. …… …. …..

कळत नकळत जुळले हे बंध भाग ३६

 (दोन दिवसांनी रेवती व स्वप्नील येतात.)

Day /Inter/Home teres

Action :

आण्विका व रेवा घराच्या वरील गच्ची मध्ये एकत्र उभ्या असतात.

Dialog :

आण्विका :

 हे काय ग झाल अस….. काय करू….. मला तर बाई काहीच सुचत नाही. बाबा काय ऐकायला तयार नाहीत?

रेवती :

 अग एवढी मोठी घटना घडल्यावर कोणते पालक शांत राहतील. त्यात पेपरात बातमी छापून आल्यामुळे तर गावभर बभ्रा झालाय. मी मगाशी आल्यावर बोलले होते मावशीला. पण ऐकायच्या मनस्थितीत नाहीत काका.

आण्विका :

 फोन दे

(आण्विका फोन घेऊन ईशानला फोन करते. तेव्हा ईशानची बहिण फोन उचलते.)

आण्विका :

 हॅलो ईशान, ईशान आहे का.?

(ईशानची बहिण, आहे पण कामात आहे )

आण्विक :

तुम्ही कोण?

ईशानची बहिण :

 मी कोण म्हणजे, मी त्याची बहीण बोलतेय. आपण कोण?

आण्विका :

मी अण्विका , तुझ्या दादाला फोन दे.

ईशानची बहिण :

बाबा आहेत तिथे. उगाच दंगा करायचे.

आण्विका :

फोन केला होता म्हणून सांग. प्लिज.

बहिण ईशानची :

 हा सांगते. वहिनी.

अण्विका :

थॅन्क्स.

बहिण ईशानची :

थॅन्क्स कशासाठी?

अण्विका :

तू मला एक्स्पेक्ट केल्याबद्दल.

बहिण ईशानची :

अग, दादाची आवड ती माझी आवड. मला तू खूप आवडलिस

अण्विका :

तेवढं तूझ्या दादाला सांग.

बहिण ईशानची :

हा सांगते.

(ती फोन ठेवते.)

(आण्विका रडू लागते.)

Cut to ….

….. …… …..

Day/Inter/ Ishan home

Action :

ईशान खोलीत फिरत आहे.

इकडे ईशानला देखील घरच्यांनी स्थळ काढलेले असतात. व ते देखील मुलगी पाहायला त्याला नेणार असतात. तिथं टेबलावर बायोडेटा ठेवलेले असतात. तो एक सुद्धा पहात नाही. ईशान अनूच्या फोनवर कॉल करतो. पण स्विच ऑफ लागत असतो.

तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो. पण कॉल लागत नसतो. त्याची बहीण त्याला चहा द्यायला येते.

ईशान :

( बहिणीला)

 काय मुला तू खूप हुशार आहेस ना?

बहिण :

 काय दादा?

ईशान:

  माझी लाडकी बहिण आहेस ना.

बहिण :

म्हणूनच रोज माझ्याशी भांडतोस ना.

ईशान :

माझं एक काम केलस की तुला या दीपावलीला चांगल गिफ्ट देईन.

बहिण :

तू देणार अन् मला.

ईशान :

 हो खरंच देणार.

बहिण :

 आधी काम बोल.

ईशान :

 हे बघ आई बाबा मला जे स्थळ बघणार त्यात तू खोडा काढायचा. व मोडायच.

बहिण :

शहाणा आहेस. माझं कोण ऐकणार इथे. नाही बाबा, बाबांचा काव मी खाऊ. नको तुझं गिफ्ट.

ईशान :

 अस काय आपल्या भावासाठी येवढं पण नाही करणार.

बहिण :

बर बघते.

पण मला जर चांगली वाटली वहिनी तर मी काय नाही मोडणार हा सांगून ठेवते.

ईशान :

 जा लई शहाणी आहेस. तू मी सांगतो तस कर मग बघ. मस्त वहिनी आणतो तुला.

बहिण :

 हा बरं. ठीक आहे.

(ती चहाचा ट्रे घेते अन् आत जाताना खुदकन हसते. अन् म्हणते.)

वेडा रे वेडा.

Cut to ….

….. …… ….. ……

Day/Sunday/ outer 9.30 a.m./ Anvika Home

Action :

आण्विका तिच्या रुममध्ये असते. आई कपाटातून उघडुन एक छान साडी काढून तिच्यासमोर ठेवते.

आई :

 हं घे नेस ही. अन् झटकन आटप. उगाच तोंड पाडून बसू नकोस. मस्त मुलगा शोधलाय तुला त्यांनी. आज जायचय शरद काकांकडे तिकडेच बोलणी करून आजच जमल तर ठरवू. व सुपारी फोडू. आटप लवकर.

आण्विका :

 आई तू तरी समजून घे.

आई :

 तुला समजून घेतल तर मलाच बाहेर काढतील घरातून.

बाबा : (oc)

(बाहेरून)

अवरल काय नाही अजून.

आई :

 हा आवरतेय.

बाबा :

 आटपा उशीर होतोय.

आई :

उगाच नखरे करू नकोस आटप नेस ही साडी.

रेवा मदत कर तिला.

(आई खालील खोलीत जाते.)

आण्विका :

रेवा,… तू तरी सांग. समजावून.

रेवती :

 मी कालपासून थकलेय समजावून हे बघ आता ही वेळ मारून नेवू नंतर बघू आपण काय करायचं ते.

स्वप्नील :

 हे बघ स्थळ पाहायचा कार्यक्रम होऊ देत मग बघू नंतर घरी चर्चा करून.

आण्विका :

 बर.

Cut to …..

…… …… …….

Day/ afternoon/ 1.00 o’clock/ Inter / Sharad chugale Home

 Action :

आतील रूममध्ये अन्विकेला तयार करत असतात. ती नाराज असते. इतक्यात एक चारचाकी येवून बंगल्याच्या आवारात थांबते. त्यातून पाहुणे खाली उतरतात. आण्विकाच्या बाबांचे मित्र शरद चौगले जाऊन त्यांना पाणी देतात. ते आत येतात.

शरद चौगले :

घर शोधायला काही त्रास नाही ना झाला?

पाहुणे :

 नाही. सापडलं लगेच.

शरद चौगले :

 बर या बसा.

अग जरा पाणी आण.

(शरद चौगले यांची पत्नी तारा पाणी घेऊन येते. पाहुण्यांना  पाणी दिले जाते.)

पाहुणे :

(बसल्यावर)

मुलगीला बोलवा.

(शरद चौगले पत्नीला डोळ्यांनी इशारा करतात.)

(अणुची आई व बाबा आत असतात.)

अन्विकेला :

उगाच नखरे नकोत. गुमान चल बाहेर पोहे घेऊन.

(रेवती पोह्यांची प्लेट असलेला ट्रे देते.आण्विका नाखुशिनेच तो घेऊन जाते.)

(पोहे सर्व करू लागते. तिची नजर खाली असते. मुलगाही खाली मान घालून बसलेला असतो.

ती नवर्या मुलाला पोह्याची प्लेट देवू लागते.

इतक्यात तिच्या कानावर आवाज येतो.)

संयोगिता :

अग पोहे देतेस. मुलग्याचा चेहरा तरी बघ.

(आवाज ओळखीचा वाटल्याने ती साइडला पाहते. तर तिथे संयोगिता असते. ती समोर पाहते. तिच्या समोर ईशान असतो.)

आण्विका :

(आश्चर्याने)

तू.

ईशान :

 वर तोंड करत अनु तू.

 ईशानचे बाबा :

 बघ बाबा पसंत आहे का ते. नाहीतर दुसरी बघायला बर.

आण्विकेची आई :

 बघ तुला ही पसंत आहे का?

आण्विका :

 काय हे बाबा. अस कधी करतात काय?

राहुल :

मग काय तुझ्यासारख लपत छपत करायचं काय?

(आण्विका इकडे तिकडे पाहते. तेव्हा रेवा व संयोगिता दोघी एकमेकींना टाळ्या देत असतात.)

संयोगिता :

 काय रे ईशान तुला तरी आहे का पसंत. बघ बाबा नाहीतर नंतर नावे ठेवायचास

(ईशान हसत असतो. त्याच्या डोळ्यातून पानी पडत असत.)

 ईशान :

 काय हे किती टेन्शन देता. अस कधी करतात का?

स्वप्नील :

 मग काय पळून जावून करतात.

असच करतात.

(आण्विका बाबाजवळ जाते. तिचे डोळे पाणावलेले असतात.)

आण्विका :

थॅन्क्स बाबा, खरंच आज तुम्ही मला जगातील सर्वात मोठं अन् माझ्या आवडीच गिफ्ट दिलेत.

अणुचे बाबा :

अग तुला नाराज करून काय करू. शेवटी तुला आयुष्य काढायचं आहे. तुझ्या मावशीने आम्हाला सगळ सांगितलं होत. व मी पण संपूर्ण माहिती काढली होती. पण हा घोळ झाला. व आम्हाला पण लोक बोलू लागले. म्हणून थोडा चिडलो होतो. नाहीतर आम्ही कधीच पसंत केलं होत. फक्त तुझा दादा आढे वेढे घेत होता.. ते ही परवा दूर झाले. ज्याप्रमाणे त्याने तुझा शोध घेऊन सोडवून आणले. तो ही राजी झाला 

आण्विका :

 मग अस का मला अंधारात ठेवला.

बाबा :

हा सगळ प्लॅन तिकडला आहे.

या संयोगिता, रेवा अन् स्वप्नीलचा आहे.

आण्विका :

 काय रेवा, स्वप्नील थांबा तुम्हाला दाखवते.असं छळतात का आपल्या ताईला.

स्वप्नील :

 काय दीदी कसं वाटल गिफ्ट फोडायची का सुपारी आता.

काय ईशान,

(ईशानकडे पहात)

ईशान व अन्विका :

(एकदम)

 फोडा की. आम्ही तयार आहोत.

(सगळे जल्लोष करतात.)

Cut to …..

…… ……. ……. ……….

        समाप्त


Monday, April 21, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag ३०,३१,३२

 Kalat n kalat julale he bandh script bhag ३०,३१,३२

कळत नकळत जुळले हे बंध भाग ३०

Night / Inter / Ishan Home /6.00 o’clock

Action :

ईशानच्या घरी त्याच्या फोन वाजू लागतो. त्याचे वडील फोन उचलतात.

Dialog :

ईशानचे वडील :

 हॅलो बोला.

वन कर्मचारी :

 ईशान सर जखमी झाले आहेत. त्यांना आताच राधानगरी ग्रामीण रुग्णालयात अडमिट केलेय.

ईशानचे वडील :

 काय झालय, घबरण्या सारखं काही नाही ना? कसा आहे तो?

वन कर्मचारी :

 आता आहेत नीट. हाताला लागलेय त्यांच्या, तुम्ही या लवकर.

ईशानचे बाबा :

 आम्ही निघतोय.

(फोन ठेवल्यावर)

ईशानची आई :

काय झालं ईशानला? .. बोला की. काय झालं.

ईशानचे बाबा :

 काही नाही झालं. फक्त जरा अपघात झालाय. हाताला लागलंय वनसफरी वेळी. चल जाऊ.

आई :

 (रडवेल्या आवाजात.)

 चला लवकर मला तेला पाहिल्या शिवाय चैन नाही पडणार.

( ती रडू लागते.)

ईशानचे वडील :

अग, रडू नकोस. चल जाऊ. बघुया काय झालय.

बहिण :

 बाबा काय झालंय दादाला.

ईशानचे बाबा :

 काही नाही बाळ जरा वन सफरी वेळी लागलंय.

ईशानची बहिण :

 मी पण येते.

बाबा :

कशाला उगाच, तू थांब घरी. आम्ही जाऊन येतो.

(ते निघतात.)

Cut to ……

…… ……. …… …..

Night / Inter / Radhanagari Rugnalay /8.00

Action :

ईशानचे आई व बाबा आपल्या गाडीवरून राधानगरी रुग्णालयात प्रवेश करतात. पोहोचल्यावर.

Dialog :

ईशानचे वडील :

(वन कर्मचाऱ्यास)

 कुठे आहे ईशान, ठीक तर आहे ना?

वन कर्मचारी, आत आहेत रूम मध्ये,… उपचार चालू आहेत.

(आतून नर्स येते.)

ईशानचे वडील :

कसा आहे ईशान?

नर्स :

 दंडाला लागलंय. ब्लड गेलय.. टाके मॅडम घालत आहेत.

ईशानचे वडील :

 काही भीतीच नाही ना.

नर्स :

 थोड्या वेळाने सांगते. जरा बाजूला व्हा. त्या तिथे जाऊन बसा.

( दुसरी नर्स काही औषधे व इतर साहित्य घेऊन येते. ते घेऊन त्या दोघी आत जातात.)

(ईशानचे बाबा हॉस्पिटल मधील व्हरांड्यातून फेऱ्या मारू लागतात)

(थोड्याच वेळात अण्विका सर्व उपचार करते. व त्याला नीट करते. पण भुल दिल्याने तो बेशुद्ध असतो.)

( थोड्या वेळात डॉक्टर येतात.

 आतमध्ये जातात. तोपर्यंत अण्विकाने सर्व उपचार केलेलं असतात.)

डॉक्टर :

 चेक करतात. व अण्विकाकडे पहात. काय सीचुयेशन.

(आण्विका संपूर्ण माहिती देते.)

डॉक्टर :

खूप हुशार आहात. मस्त. वेल डन.

(डॉक्टर व डॉक्टर अण्विका बाहेर येतात.)

ईशानचे वडील :

 कसा आहे ईशान. घाबरण्यासारखं काही नाही ना?

डॉक्टर :

आहे आता नीट. येईल थोड्या वेळाने शुद्धित, काळजी करू नका.

ईशानची आई :

 आम्ही बघू शकतो का?

डॉक्टर :

 हो पाहू शकता पण बोलू किंवा डिस्टर्ब करू नका. आराम करू द्या.

(डॉक्टर निघून जातात.)

Cut to …..

…… ….. …… …

Night / Inter/ Hospital

Action :

आण्विका रात्रभर फेऱ्या मारत असते. पहाटे ईशानला थोडी शुद्धा येऊ लागते. तेव्हा तिला बरे वाटते. ती त्याला शुद्ध आल्यावर. थोड पुन्हा चेकप करते.

Dialog :

आण्विका :

 हा ठीक आहे.

(ईशान उठण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा )

अन्विका :

 साहेब हळू, झोपा गप्प थोडावेळ.

(तो पडून राहतो.)

नर्स :

 मॅडम तुम्ही जरा विश्रांती घ्या जावा. रात्रभर जाग्या आहात.

(ईशान अन्विकाकडे एकटक पाहू लागतो.)

आण्विका थोडी विश्रांती घ्यायला जाते.

Cut to …..

…… …… ……

Morning / Inter /Hospital / 7.00 o’clock.

Action :

ईशानला शुद्ध आलेली असते त्याची आई त्याला फळे चिरून देत असते. तो आता आपल्या बेडवर बसलेला असतो. आण्विका चेकअप करायला येते.त्याचे ब्लडप्रेशर, व इतर टेस्ट तपासत. नॉर्मल वाटल्यावर.

आण्विका :

 येवढं कळत नाही. येवढ्या संध्याकाळी कशाला गेला होतास. स्वतःला काय बाहुबली समजतोस काय? कायतरी झालं असत म्हणजे?

ईशान :

काही झालं तर नाही ना? अन् झालं तर तुम्ही आहात की.

आई :

 शहाणा आहेस. काल मॅडम नसत्या तर काय झालं असत.

आण्विका :

 साहेबाना याच काहीच नाही, हा काही साधा सुधा वार नव्हता. ते लोक खालच्या पातळीचे असतात. मी पण कुणाला सांगतेय.

ईशान :

 काय झालंय, थोड तर खरचटलय. होईल ठीक.

आण्विका :

 थोडस खरचटले म्हणे मी ड्रेसिंग केलय. चांगले दहा टाके पडलेत. जरा वार चुकलं असता तर जीवावर बेतल असत. अशा ठिकाणी फौजफाटा घेऊन जाता येत नाही. चार शिपाई घेऊन गेलास. ते ही विनाशस्त्रांचे.

ईशान :

बर मॅडम पुन्हा अस घडणार नाही ह. नॉर्मल रपेट होती ती.

(तो उठू लागतो.)

आण्विका :

काय चाललय. जखम ओली आहे. उगाच गडबड नको. हळुवार.

आई :

 काय करायला निघालास.

ईशान :

 आलो बाथरूमला जाऊन.

आई :

अहो, न्या धरून तुम्ही.

(ईशानचे बाबा त्याला धरुन घेऊन जातात.)

ईशान :

 होईल ठीक लवकर.

आण्विका :

 दोन दिवस अजून सुट्टी नाही इथून.

ईशान :

 बर बर. चालेल मला.

(हळू आवाजात)

तेवढंच तुला पाहता येईल.

Cut to ……

….. ….. ….

Day / outer /Village

Action :

इकडे वस्तीवर सदा, भिवा, तुका, हे एका बाजूला निर्मनुष्य ठिकाणी उभा असतात. त्यांमध्ये चर्चा चालू असते. किशा तेवढ्यात बातमी घेऊन तिथे येतो.

Dialog :

सदा :

 काय झालं र.

किशा :

 फारिस्ट ऑफिसर वाचला.

तुका :

 जरा वाचला. थोडक्यात चुकलं.

भिवा :

 लई शहाणं हाईसा. सरकारी अधिकार्यावर हल्ला केल्यासा. येवढं सोप नाही. पोलिस चौकशी करायला लागलेत.

सदा :

 मग काय गप्प राहावं. सगळा माल पकडला.

सदा :

 वातावरण शांत होईपर्यंत आता थोड दिवस दडी मारा. बघू नंतर काय करायचं ते.

सगळी :

 जी.

Cut to …..

…… ……. ……. …

After same Days

Day / Inter morning

Action :

ईशान रूममध्ये बसलेला असतो.

ईशान :

(मनात )

बरेच दिवस भेटून झाले कूठे तरी फिरुन यावं वाटतंय. अनुला विचारू …. विचारतोच

( तो कॉल करतो.)

Cut to ……

……. …….. ….

Day / Afternoon/ 12.00 / inter

Action :

आण्विका आपल्या कामात वॉर्डमध्ये असते. जवळच जाधव नर्स पेशंटला लागणारे सलाईन बदलत असते. इतक्यात तिला फोन येतो.

ईशानला सुट्टी असते. ईशान अन्विकाला फोन करतो.

Dialog :

ईशान :

 हॅलो, अन्विका.

आण्विका :

बोल.

ईशान :

आज फ्री आहेस?

आण्विका :

 दुपार नंतर आहे. का ?

ईशान :

मग जाऊया का फिरायला?

आण्विका :

 हो चालेल की.

ईशान :

मग तयार रहा. येईन मी न्यायला.

आण्विका :

 हो,चालेल.

(फोन ठेवल्यावर)

जाधव नर्स :

काय मॅडम आज दौरा वाटत.

आण्विका :

हो जरा जाणार आहे फिरायला.

जाधव नर्स :

 साहेब मस्त आहेत. पण कसकाय जुळले तुमचं काही कळलंच नाही आम्हाला.

आण्विका :

 आम्ही एकाच वर्गातील आहोत. वर्ग पार्टनर

जाधव नर्स :

 म्हणजे लहानपणापासून आहात संपर्कात म्हणा. मग लग्नाचे लाडू कधी देताय.

आण्विका :

 देवू की लवकरच.

जाधव नर्स :

आजचा डबा क्यांसल सांगू ना काकूंना.

आण्विका :

 सांगेन मी फोन करून नंतर.

जाधव नर्स :

 रात्री किती वाजता परत याल.

आण्विका :

 येईन की आठ पर्यंत.

का हो?

जाधव बाई :

नाही लाईट बंद करायला बर बाहेरील.

आण्विका :

नाही जास्त वेळ राहणार, लगेच परतू, साडे नऊ पर्यंत येईन.

जाधव नर्स :

 हा बर. तेवढच फ्रेश व्हाल.

Cut to ….

…… …… ……. ….

Day – Night / outer – Inter Radhanagari

Action :

ईशान दुपारी अण्विका सोबत घेऊन निघतो. ते दोघे खूप फिरून रात्री बाहेर जेवण करतात. व नंतर

एके ठिकाणी जाऊन बसतात.

Cut to …..

…. …… ……

Night/ outer / Garden

Action :

ईशान व अण्विका एके ठिकाणी बाकावर बसले आहेत

Dialog :

आण्विका :

किती दिवसांनी भेटलो नाही?

ईशान :

 हा.

आण्विका :

माझी आठवण येत नाही.

ईशान :

 तुझी आठवण नाही असा एकपण दिवस जात नाही.

आण्विका :

खोटं. उगाच माझं मन राखण्यासाठी बोलतोस ना.

ईशान :

 नाही. खर सांगू मला तू लहान असल्यापासून खूप आवडतेस. शाळेत असल्यापासून मी तुला कायम चोरुन पाहत असे.

आण्विका :

 हो का मग बोलला का नाहीस.

ईशान :

 धाडसच होत नव्हत. त्यात तू ही माझ्यावर चिडून असायचीस.

आण्विका :

 माझच चुकलं. आता नाही चिडणार.

ईशान :

 खरंच.

आण्विका :

 हो अगदी खरंच.

ईशान :

 बर ,चल ….निघू, खूप वेळ झालाय.

आण्विका :

 काय हे. दिवस लवकर का संपतो.

ईशान :

 मॅडम रात्र आहे.

आण्विका :

 तेच मला म्हणायचं होत.

ईशान :

 वाटल्यास उद्या परत भेटू.

आण्विका :

 खरं

ईशान :

खरं चला आता जाऊ.

(ते निघतात.)

Cut to …..

…….. ……

Night/ outer/ road

Action :

 ईशान अण्विकेला आपल्या रूम जवळ आणून सोडतो. व रिटर्न निघतो. तो थोड्या अंतरावर गेल्यावर इकडे एक मारुती गाडी येते. व त्यातून दोघे खाली उतरतात. व अन्विकेला जी आपल्या रुमकडे निघालेली असते. तिला पाठीमागून येत पकडतात. थोडी झटापट होते. ते अन्विकेला बेशुद्ध करून अपहरण करून पकडुन घेऊन जातात. या वेळी अन्विका व त्या अपहरण कर्त्याची झटापट होते. त्यातील एकाचा शर्ट फाटतो. व त्याच्या गळ्यातून एक लोकेट तुटते. ते तिच्याकडून बाजूला एका झुडपात पडते तिचा फोन व पर्स खाली पडते. ते गुंड तिला घेऊन एका छोट्या मारुती गाडीतून घेऊन जातात.

Cut to ……

….. ….. …..,

Night/ Inter - outer/Anvika cautar

Action :

जाधव नर्स जेवण जेवते. व आपली भांडी घासून धुवून ठेवते.

जेवण झाल्यावर

Dialog :

जाधव नर्स :

थोडी शतपावले करून येवू.

(ती बाहेर पडते. तेव्हा ती अन्विकेच्या खोलीकडे तिचे लक्ष जाते.)

जाधव नर्स :

 (मनात)

अजून कशा आल्या नाहीत डॉक्टर मॅडम, चला जरा फिरून येवू.

(ती थोड्या अंतरावर चालत जाते. तेव्हा तिला पर्स दिसते.)

अग बाई ही पर्स कुणाची. अरे ही तर ओळखीची दिसते. ही तर अन्विका मॅडमची आहे. दरवाजा तर बंद आहे रुमचा, अन् पर्स इथे.

(फोन तरी करून बघुया.)

Action :

(जाधव नर्स फोन लावते. तेव्हा तिला जवळील झुडपातून फोनच्या रिंगचा आवाज ऐकू येतो.

ती जाऊन बघते. तर अन्विकेचा फोन असतो. ती फोन उचलून हातात घेत)

• जाधव नर्स :

फोन इथे, पर्स रस्त्यावर पडलेली, दरवाजा बंद मॅडम कुठे आहेत? काहीतरी गडबड आहे.

(लगेच जाधव नर्स अन्विकेचा फोन घेते. त्यावर कोड असतो. ती इमर्जंशी कॉल निवडते. व त्यावरून ईशानला फोन करते. ईशान गाडीवरून जात असतो. तो फोन उचलतो.)

ईशान :

(नंबर पाहून )

हॅलो , बोल अनु.

जाधव नर्स :

अहो ईशान सर, मॅडम तुमच्या सोबत आहेत का?

ईशान :

 नाही ,मी तर आताच सोडून आलो रूमपासून काही अंतरावर. का हो?

जाधव नर्स :

 काहीतरी गडबड आहे सर, मॅडमची पर्स इथे रस्त्यावर पडलेली आहे. व फोन झाडीत सापडला. व रूम पण बंद आहे. तुम्ही याल काय लवकर इकडे. मला खूप भीती वाटतेय. आण्विका मॅडम नाहीत इथे कुठे?

ईशान :

काय , थांबा आलोच मी.

(ईशान लागलीच आपली गाडी वळवतो व त्या ठिकाणी येतो.तिथे आल्यावर.)

ईशान :

मॅडम अन्विका कुठे आहे?

जाधव नर्स :

तुमच्या सोबतच गेल्या होत्या ना.

ईशान :

 हो, पण मी आताच इथे सोडून गेलो.

(ईशान इकडे तिकडे पाहतो. व लगेच आपल्या ओळखीच्या पोलीस मित्राला फोन करतो.

थोड्याच वेळात त्याचा पोलीस मित्र तिथे हजर होतो.जो राधानगरी येथे फौजदार असतो.)

Cut to ……

…….. …… ……. …..

 कळत नकळत जुळले हे बंध भाग ३१

Night/ Radhanagri /outer.

Action :

आण्विक च पर्स व फोन पडलेला व ती नसल्याचे पाहून ईशान लगेच कॉल करतो.

Dialog :

ईशान :

 हॅलो.

Cut to …..

…… …… …….

Night / outer/ Radhangri

थोड्याच वेळात तिथे एक पोलिस गाडी येते. पोलिस गाडीतून एक अधिकारी खाली उतरतो.

Dialog :

राजवीर सातवेकर :

 बोल ईशान काय झालंय?

ईशान :

 थोड्या वेळापूर्वी मी माझी मैत्रिण अन्विकेला इथे सोडून गेलो होतो. व थोड्याच वेळात जाधव मॅडम यांचा कॉल आला, की त्यांना वाटेत अनूची पर्स व मोबाईल सापडला. व त्यांनी मला लगेच काँन्ट्याक्ट केला. व इथे येऊन मी पाहिलं. व लगेच तुम्हाला कान्ट्याक केला.

 राजवीर सातवेकर :

 कॉन्स्टेबल बघा जरा इकडे तिकडे.

(लगेच कॉन्स्टेबल इकडे तिकडे शोधू लागतात. तेव्हा त्यांना तिथे मारुती कारच्या टायरीच्या खुणा सापडतात. तसेच त्यांना झाडीत एक लोकेट सापडते.)

कॉन्स्टेबल :

 सर इथे पहा, गाडीच्या खुणा आहेत.

(लगेच दुसरा कॉन्स्टेबल, सर हे एक लोकेट सापडले आहे.)

राजवीर सातवेकर :

आण इकडे,

(ते बारकाईने पाहतात.)

राजवीर सातवेकर :

 आजू बाजूला चौकशी करा.

(तेव्हा पोलीस आणखी चौकशी करू लागतात.)

(ईशानला काही सुचत नसते. तो डोक्याला हात लावून बसलेला असतो.)

राजवीर सातवेकर :

 (लगेच फोन करून)

 हॅलो , सामंत का?

सामंत :

हो , बोला सर.

राजवीर सातवेकर :

हे पहा हॉस्पिटल परिसरातून एक डॉक्टर महिला बेपत्ता आहे. जरा किडण्यापची केस वाटते. जरा नाक्यावर कडाक चेक अप करा.

सामंत :

जी सर

( फोन ठेवतो. व ईशान जवळ येतो,)

राजवीर सातवेकर :

 काळजी करू नकोस, सापडतील त्या.

ईशान :

त्या तर इथे नविनच आहेत. त्यांचा कोण शत्रू असणार?

( इतक्यात तिथे एक पोलिस कॉन्स्टेबल येतो.)

(कॉन्स्टेबल सोबत एक मुलगा असतो.)

कॉन्स्टेबल :

 सर, हा मुलगा इकडील जवळच टपरीवर काम करतो. याने एक व्हाइट कलरची मारुती जाताना पहिलीय थोड्या वेळापूर्वी.

राजवीर सातवेकर :

काय रे तू पाहिलीस का?

मुलगा :

हो सर , थोड्या वेळापूर्वी.

राजवीर सातवेकर :

 तिचा नंबर वगैरे काही माहीत आहे का तुला.

राजवीर सातवेकर :

 काही लिहिलं वगैरे होत का गाडीवर.

मुलगा :

 हो सर त्यावर एका कोपऱ्यात स्मशालीचे चित्र होते. व खालील बाजूस मनापासून मनापर्यंत असे लिहिले होते.

राजवीर :

चालवणार्यास काही पाहिलस का? इन म्हणजे त्याचा चेहरा वगैरे.

मुलगा :

 नाही सर.

राजवीर सातवेकर :

कॉन्स्टेबल या मुलाचा जबाब घ्या. व बाकीचे पुरावे शोधा.

राजवीर :

हे पहा ईशान सर , तुम्ही कंप्लेंट द्या रीतसर, म्हणजे आम्हाला काम करायला बर.

ईशान :

ठीक आहे.

Cut to ….

…… ……. ….. …..

Night /Radhanagari Police station /Inter.

Action :

 पोलिस स्टेशन ची पाटी दिसते. ईशान व फोजदार राजवीर सर बाहेर येतात.

राजवीर :

 (ईशानला नाराज पाहून)

 आता कंप्लेंट केलीय, आम्ही काढू शोधून पण तुम्हाला जर कुणावर शंका असेल तर सांगा.

ईशान :

 वाटल तस काही तर कळवतो.

Cut to …..

….. …….. …..

Outer / Radhanagri citi Day

राजवीर ऑफिसर सगळीकडे शोधाशोध घेत आहेत. संपूर्ण परीसरात पाहणी करत आहेत. परिसरातील सी सी टी वी चेक करत आहेत. पण काही सापडत नाही.

Cut to ….

…… …… …… ….. …

Night / 12.00 o’ clock Radhanagari Forest Road / Outer

Action :

राधानगरी अभयारण्य एक रोड संपूर्ण कच्ची सडक. एका ठिकाणी गाडी थांबते. त्यातून दोघे खाली उतरतात.मागील बाजूचे दार उघडले जाते. आतील बाजूस हात पाय बांधून बेशुद्ध केलेली अण्विका. तिला घेऊन ते दोघे चालत काही अंतरावर एक फॉर्म हाऊस असते तिथे नेतात. ती एकदम सामसूम जागा असते. जे खूप लांब जंगलाला लागून असणाऱ्या काजूच्या व आंब्याच्या बागेत असते.

तिथे कुणी सहसा येत नसते. अशा ठिकाणी ते तिला घेऊन येतात. या फॉर्म हाऊसच्या मागील बाजूस एक स्टोअर रुम असते. तिचे दार उघडुन अन्विकेला तिथे ठेवलं जाते. ती दोघे बाहेर येतात.

त्यांनी तोंडावर एक नकाब घातलेला असतो.

बाहेर आल्यावर,

Dialog :

एकजण :

 काय करायचं हीच.

दुसरा :

 दोन दिवस ठेवायचं, अन् नंतर टाकायचं मारून व फेकायची दरीत . अन्

पहिला :

 अन् काय?

दुसरा :

 नंतरच नंतर. चल आधी गाडी ठिकाणास लावू.

(ते दोघे निघतात.)

Cut to …..

….. …… …… ……

कळतं नकळत जुळले हे बंध भाग ३२

Night / Inter/ Room

Action :

 ईशान आपल्या रूमवर जाऊन इकडे तिकडे फिरत विचार करत असतो. थोडा विसावलेला असतो.

त्याला एक स्वप्न पडते.

ईशान पोलीस स्टेशनमध्ये आहे. त्याच्या पुढ्यात राजवीर सातवेकर फौजदारांना एक फोन कॉल आलेला आहे.

एक इसम : (oc)

 सर इकडे राधानगरी फोंडा रोडवर घाटात एके ठिकाणी कुबट वास येत आहे. व खाली दरीत पाहिल्यावर एक मानवी प्रेत दिसत आहे.

पोलिस :

 कूठे आहे? प्लेस.

इसम :

कणकवली रोडवर फोंडा घाटात. तरी लवकर या.

Action :

(ते लगेच जीप मधून निघतात. ईशान ही त्यासोबत असतो. घाटात एका कॉर्नरला गाडी थांबते. तिथे अनेक लोक जमलेले असतात. येणा – जाणारी वाहने थांबून पाहत असतात.

पोलिस जीप थांबते. तो इसम जवळ येतो.)

Dialog :

राजवीर सातवेकर :

तुम्हीच फोन केला होता का?

तो इसम :

हो. मी केला होता

पोलिस :

 प्रथम कोणी पाहिलं?

तो इसम :

 मी पाहिलं साहेब. मी कणकवलीला निघालो होतो. वाटेत बाथरूमसाठी थांबलो. तेव्हा मला खालील बाजूस दिसलं व वास सुद्धा येत आहे.

(ईशान लगबगीनं पुढे जातो. व पाहतो. तिथे एक प्रेत पडलेले व त्यावर भयंकर माशा घोंगावत असतात. व ते पाहून त्याला आण्विकाचा भास होतो. तो जोरात रडू लागतो. व बाजूला येवून उलट्या करू लागतो.

इतक्यात राजवीर सातवेकर फौजदार पोलिसांना ते प्रेत काढायला सांगतात.ईशान मोठ्याने रडू लागतो.

प्रेत काढले जाते. राजवीर सातवेकरांजवळ येवून)

राजवीर सातवेकर :

 ईशान सर ,आवरा स्वतःला. ते अण्विकाचे प्रेत नाही.

ईशान :

 अस कस म्हणताय?

राजवीर :

 अहो ….ते एक पुरुष प्रेत आहे.

 आवरा स्वतला. तुमच्या सारख्या धाडशी विरांनी अस घाबरायच नसत सर, तुम्ही उलट यामध्ये माझ्या सोबत कामाला लागल पाहिजे.

(इतक्यात ईशान वर पाहतो. त्याला दरदरून घाम फुटलेला असतो. त्याला अन्विका आठवू लागते. तिच्या आठवणीने तो रडू लागतो.)

Cut to …..

…… ……. …….

Next day / Morning/ police inter

Action :

   पोलिस स्टेशन मध्ये ईशान जातो.

ईशान :

 सर काही लागला का तपास.

राजवीर सातवेकर फौजदार :

नाही सर. आम्ही चौकशी केली, पण पांढर्या रंगाची गाडी शहरातून बाहेर जाताना कुठेही सी सी टी वी मध्ये दिसून आली नाही. फक्त त्या मुलानेच पहिली. येवढच. बाकी त्या मुलीच्या घरी आम्ही चौकशी केली आहे. तिच्या घरातील लोक आलेत. इकडे बाहेर आहेत.

(इतक्यात अन्विकाचे आई वडील तिथे येतात.)

आई :

 अनु बाळ कुठे आहेस तू. ती रडू लागली

पोलिस :

 अहो गप्प बसा. शांत रहा आपण, उगाच दंगा करू नका.

अण्विकाचे बाबा :

 उगाच दंगा करू नका म्हणजे काय, आमची मुलगी गेलीय. हरवली आहे.

अन्विकेचा भाऊ :

( ईशानला पाहून)

तूच का तो ईशान, सांग माझी बहीण कुठे आहे. सांग नाहीतर तुलाच संपवतो.

(तो त्याची गळपट धरायला लागतो.पोलिस कॉन्स्टेबल त्यांची गळपट सोडवतात.)

 अन्विकेचा भाऊ :

सोडणार नाही तुला जर माझी बहिण सापडली नाही तर. याद राख.

(पोलिस स्टेशन फौजदार राजवीर, ईशानला बाजूला घेतात.)

फौजदार राजवीर :

 हे पहा सर मी प्रयत्न करतोय. पण जर का दोन दिवसात त्यांचा पत्ता लागला नाही तर तुम्हाला अटक करावी लागेल. कारण तस पाहायला गेलं तर शक तुमच्याकडेच जातो.

तुमच्या कुठल्या शत्रूने तर नाही ना केलं हे कांड.

ईशान :

माझे शत्रू. अ.. .. हा ते तस्कर ज्यांचा माल मी पकडला तेच असणार. मला खात्री आहे.

राजवीर सातवेकर :

 कॉस्टेबल ती तस्कर केस फाईल काढा बघू.

( कॉन्स्टेबल उठून आतील खोलीत जातो. व तिथून कपाटातून शोधून त्यातील फाईल काढून घेऊन येतो. ती राजवीर सातवेकर फौजदार खोलून पाहतात. व ईशानला ते फोटो दाखवतात.)

राजवीर :

 हे का ते?

(ईशान मान होकारार्थी हलवतो.)

राजवीर :

 ईशान सर, जोपर्यंत मॅडमांचा तपास लागत नाही तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून बाहेर जाऊ शकत नाही.

ईशान :

 बर.

Cut to …..

….. …… …… …

Day / Morning / Outer

Action :

राधानगरी स्थानिक परिसर एक चहाची टपरी, तिथे एक स्थानीक वार्ताहर गेलेला असतो तो.

Dialog :

वार्ताहर :

 सिगारेट दे.

टपरीवाला :

 बातमी कळली काय?

वार्ताहर :

 कोणती,

(तेव्हा तो टपरी वाला संपूर्ण हकीकत सांगतो.)

Cut to …..

……. …… ……..

Next day / Paper mil / Inter

पेपर मिल मध्ये बातमी छापली जात आहे.

Cut to …..

…… ……….

Day /Outer / morning

पेपर सर्व घरी एक मुलगा टाकत आहे. . त्यातील बातमी लोक वाचत आहेत. पेपर मधील हेडलाईन्स दिसते,

राधानगरी येथून महिला डॉक्टरचे अपहरण.

Cut to …..

….. ….. …..

Day / Outer / citi

सगळीकडे चर्चा सुरू आहे.

Cut to :

….. ….. …..

Day /outer / Citi

Action :

ईशान देखील सर्वत्र शोधत आहे. आण्विकेचा काहीच पत्ता लागत नसतो. तो आपल्या रुमकडे जाताना लोक त्याच्याकडे पाहून कुजबुजत असतात.

Dialog :

एक बाई :

काय बाई दिवस आलेत. चांगल चांगल म्हणता पोर किती बिघडलेत. आता खून अपहरण व खंडणी वसूल करू लागलेत.

ईशानच्या कानावर ती बातमी पडते. तो आपल्या रूमकडे निघालेला असतो.

Cut to …..

…… ……. …..

Day/ Inter/ Room

Action :

तो आपल्या खोलीत जाऊन एका बाजूला बसतो. शांत.थोडावेळ तो वॉश बेसिन जवळ जाऊन खूप रडतो. नंतर तो तोंडावर पाणी मारून तोंड पुसतो.

व कपडे चेंज करून आपली गाडी घेऊन निघतो.

Cut to …..

….. ….. ….

Day / Inter/ Police station

 ईशान पोलीस स्टेशनवर जातो.  तिथे बाजूला बाकावर अन्विकाचे आई व बाबा बसलेले असतात. त्यांजवळ जाऊन. तो खाली बसतो. व अन्विकाच्या बाबांना,

Dialog :

ईशान :

 मला माहित आहे. तुम्हाला खूप राग आला आहे माझा, पण मी खरंच सांगतो. माझं अनुवर खूप प्रेम आहे. अन् तिच माझ्यावर. माझ्यावर विश्वास ठेवा मी शोधून काढेन. तुम्ही आता माझ्या रूमवर चला. विश्वास ठेवा माझ्यावर.

(आण्विकाची आई काही बोलणार इतक्यात तिचे बाबा तिला थांबवतात. व चल)

(ते दोघे बाजूला जातात ईशान त्यांना संपूर्ण हकीकत सांगतो.ते येतात.)

अन्विकाचे बाबा :

चला,

आण्विकेची आई :

 कुठे जायचं?

आण्विकेचे बाबा :

 चला बसा गाडीवर नंतर बोलू.

(ते सर्व निघतात)

Cut to …..

….. …… ……

Day / Inter / room

Action :

 ईशानच्या शासकीय निवासस्थानी रूममध्ये बाहेरील हॉल मध्ये ईशान व आण्विकाचे बाबा व भाऊ बसलेले आहेत. आण्विकाची आई बाजूला उभा आहे.

Dialog :

आण्विकाचे बाबा :

 हे बघ राहुल व तू दोघे शोध घ्या. राहुल तू जा बरोबर. मी ही माझ्या गाडिवरुन शोधतो.

ईशान :

 थँक्स,

आण्विकाचे बाबा :

 कशाबद्दल,

ईशान :

 आपण माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल.

राहुल :

 बाबा तुम्ही असा कसा विश्वास ठेवता?

आण्विकाचे बाबा :

 शांत रहा. आपली अनु हरवली आहे. तिला शोधणं महत्वाच आहे.

ईशान व तू दोघे मिळून शोधा.

(ईशान राहुलला घेऊन आपल्या ऑफिसमध्ये गाडीवरून जातो. तेथील नकाशे. घेऊन तो त्यावर रिसर्च सुरू करतो.)

(लगेच तो राजवीर सराना फोन करतो.)

ईशान :

हॅलो राजवीर सर आपण कोणत्या ठिकाणचे सी सी टी वी तपासले त्यांची नोंद मिळेल का?

राजवीर :

हा, थांबा मी यादी पाठवतो. पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. त्यात कोठेही ती व्ह्यान दिसत नाही.

ईशान :

ते माहितीये सर पण मी वेगळ्या पद्धतीने शोधणार आहे.

राजवीर :

बर, ठीक आहे, मी सेंट करतो. काही कलू मिळाल्यास कळवा.

ईशान :

जी सर.

राजवीर ठिकाणे सेंट करतो.

( फोन वाजतो. ईशान ती ठिकाणे पाहून मॅप पाहू लागतो. नंतर ते एरिये सोडून अन्य शहरा बाहेर जाणारे मार्ग इंटर नेट वरून सर्च करतो.

त्या मार्गांची नोंद घेतो. व नंतर राहुलला घेऊन तो सर्च करायला निघतो.)

Cut to ……

….. ….. …..

Day /outer/ road

ईशान व राहूल बाईक वरून शोध घेवू लागतात. एका एरियातील कच्या रोडवर आल्यावर.

ईशान :

अरे, हा रस्ता तर अरण्यात जातो. या वाटेवर सी सी टी वी नाहीत. मग हा …..

Action :

ईशान बाईक वळवतो. व आपल्या

फॉरेस्ट खात्याच्या मुख्यालयात जातो. व गुप्त कॅमेरे कूठे आहेत हे पाहतो. तो विचार करतो. कॅमेरे ऑनलाईन चेक करतो. तेव्हा त्याला तिथे एका कॅमेऱ्यात एक व्हाईट मारुती जाताना अरण्यातील एका कच्च्या मार्गाने दिसते. तो ती डिटेल पाहतो. तेव्हा त्याला तिच्यावर मशालीचे चित्र दिसते.

तो त्या मार्गाची लोकेशन पाहतो. नंतर आणखी चेक केल्यावर त्याला थोड्या वेळानी एक लाल रंगाची मारुती परत येताना पाहायला मिळते. तो तिला बारकाईन न्याहाळून.

ईशान :

 राहुल चल.

Cut to…..

…… …… ….. ….. …..

Radhanagari Forest Village/ outer- inter /day

Action :

पोलिस जीप थांबते. पोलिस लगेच बाहेर पडतात व पकडापकडी सुरू होते. सदा घरात शांत बसलेला असतो. तो टिव्ही पाहत असतो. इतक्यात पोलिस घरात येतात. त्याला उचलतात.

Dialog :

सदा :

 सोडा मला, मी काय केलंय.

पोलिस :

चल दाखवतो तू काय केलंय ते.

(दुसरे पोलिस तुकाच्या घरात शिरतात. तुका जेवत असतो. त्याच्या घरी जाऊन त्याला ही पकडतात. तसेच भिवा जो घरातील मोरीत हातपाय धूत असतो. त्यालाही पोलिस पकडतात. त्यांच्या बायका मोठ मोठ्या न रडत असतात.)

(किशा आपला रानातून येत असतो. गावातील त्याला कालवा ऐकु येतो. किशाला पोलिस पकडुन न्यायला आल्याची बातमी गावात जाताना)

किशा :

काय रे , कालवा कसला?

एका मुलगा :

गावात पोलीस आलेत. भिवा काका, तुका काकांना पकडून न्यायलेत.

 (किशा लगेच पळून जातो.)

Action :

पोलिस भिवा तुका व सदाला घेऊन जातात व कस्टडी मध्ये घेताना

सदा :

 साहेब काय करताय? काय चाललय? मोगलाई लागली काय?

कॉन्स्टेबल :

 मोगलाई नाही लोकशाही हाय. तुझा सत्कार करायचाय. लोकांच्या पोरी बाळी पळवता काय.

चल.

सदा :

आम्ही एक वेळ चोरी करू पण असल वंगाळ काम नाय करत.

कॉन्स्टेबल :

 ते बघू आत गेल्यावर.

Cut to …..

…… …….. ….

Day / Inter / police station

भिवा , तुका, सदा यांना कस्टडीत टाकून आत चांगली धुलाई करतात.

तरी देखील ते एक जात कबूल करत नाहीत.

Cut to ……

…… ….. ….. ….


Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...