Showing posts with label अक्रोडाचे झाड. Show all posts
Showing posts with label अक्रोडाचे झाड. Show all posts

Thursday, August 18, 2022

अक्रोडाचे झाड

 अक्रोडाचे झाड


एका शेतकऱ्याने आपल्या अंगणात अक्रोडाचे झाड लावले होते. कारण तेथील माती व हवामान त्यासाठी उपयुक्त होती. त्याची मुले तेव्हा लहान होती. मुले जशी मोठी होत गेली तसं ते झाड ही मोठं झाल.

त्याला लागणारी चित्र विचित्र फळ त्या मुलांना आवडत नसतं. ते वडिलांना म्हणत ही अशी कशी ही फळे चित्र विचित्र. गोडसर पण नाहीत. त्यापेक्षा हे झाड तोडलेल बर.

तेव्हा वडील म्हणाले तुम्हाला आज नाही या झाडाचं महत्त्व कळणार. प्रतिकूल वेळ आल्यावर समजेल.

कालांतराने त्या प्रदेशात दुष्काळ पडला. घरातील सर्व धान्य संपलं.

तेथे पिण्यापूरते पाणी मिळू लागलं.शेतकरी आपण पित्याल्या पाण्यातील थोडे पाणी त्या झाडाला घालू लागला.

त्या थोड्याशा पाण्यावर ते झाड तग धरून आपली फळे देऊ लागले.

सुरवातीस बेचव वाटणारी ती फळे आज उपाशी पोटी खाताना त्या मुलांना रुचकर लागू लागली.

तात्पर्य : कोणत्याही वस्तूला वेळ यावी लागते तेव्हाच त्या वस्तूचे महत्त्व समजते.


Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...