Showing posts with label Kalat n kalat julale he bandh script bhag १०. Show all posts
Showing posts with label Kalat n kalat julale he bandh script bhag १०. Show all posts

Monday, March 3, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag १० and ११

 Kalat n kalat julale he bandh script bhag १०

Evening /7.00 o’ clock / Outer.

      Action :

संध्याकाळ होत आहे. सुर्य मावळत आहे.

          Dialog :

          रेवती :

    अग, सूर्य मावळला की.

       आण्विका :

 आजचा दिवस कितक्यात गेला हे कळलंच नाही बघ.

      स्वप्नील :

पण सॉलिड मज्जा आली.

       रवी :

  मला ही. माझ्या जीवनातील हा एक अप्रतिम क्षण आहे. यासाठी मी तुमचा आभारी आहे ईशान सर.

           ईशान :

 त्यात कसले अभार मानायचे सर. जीवनात थोडा विरंगुळा हवाच.

( सर्व कारमध्ये बसतात. )

        ईशान :

 बोला आता कूठे दौरा न्यायचा.

       आण्विका :

 आता खूप झाली मौज. चला आता मावशी वाट पाहत असेल.

       ईशान :

     बरं मॅडम.

     आण्विका :

 स्वप्नील काय झालं मगाच.

     स्वप्नील :

 हा ते होय. जाताना वाटेत गाव आहे. मित्रांच. तिथून जाऊ की.

( ईशानने  कार चालवत आहे. त्यानंतर लवकरच कार इश्चीत ठिकाणी येते.)

  स्वप्नील :

( ईशानला)

गाडी आतील बाजूस वळव.

         Action :

इशान स्वॅप्निल ज्या दिशेने सांगितले त्या दिशेने कार चालवतो. त्यानंतर लवकरच ते इच्छित ठिकाणी पोहोचतो. स्वप्निल मित्राकडून संपूर्ण माहिती घेते. आणि निघून येतो.

Cut to...

…… ……. …… …… ….. …

Night /8.00 o’ clock / Outer- inter.

       Action :

(कार अलिबाग  दिशेने जाते.)

      आण्विका :

 स्वप्नील इथ जवळ जेवणाची सोय आणखी कुठे आहे.

      स्वप्नील :

आहे की एक मस्त गावरान हॉटेल.

      आण्विका :

 मग गाडी घ्या तिकडे. जेवून जाऊ.

            Action :

( स्वॅप्निल रस्ता सांगतो. इशान तेथे गाडी घेतो. ते रेस्टॉरंटमध्ये जातात. हे एक गारवा हॉटेल आहे. गारान  जेवण थेट चुलीवर बनविले जाते.)

      ईशान(वेटरला) :

    बिल किती झालं.

       आण्विका :

 थांब, मी देणार आहे बिल.

       ईशान :

      मी देतो.

     आण्विका :

 सकाळपासून सगळा खर्च तूच करत आहेस. ते काही नाही मी देणार.

(अन्विका वेटरला बिल आणण्यास सांगते. त्यानंतर, ती बिल देते. ते निघतात.)

Cut to ....

….. …… …..

Night / in the car /9.00 O’clock / outer

       Action :

ईशान ड्रायव्हिंग करत आहे. अलिबाग जवळ येत असताना. रेवा अन्विकाला गप्प बसण्यास सांगते.

         Dialog :

         रेवती :

काय दीदी काल फोन आला होता ना.

       आण्विका:

     काय ग कुणाचा?

        रेवती :

आईला आला होता ना, मावशीचा, तुला पाहायला येणार आहेत म्हणे.

(रेवाचे बोलणे ऐकल्यानंतर, ईशान बाजूला कार  घेतो.)

       ईशान :

काय? अण्विकाच लग्न ठरतंय.

        रेवती :

 लग्न अजून काय ठरल नाही. पण पाहायला येणार आहेत म्हणे, गडहिंग्लज कडील स्थळ आहे. मुलगा एम. बी. बी. एस. झालेला आहे. चांगला जोडा शोभेल अशी मावशी म्हणत होती

(ईशानला ही बातमी ऐकून  नाराज होतो. आणि त्याने आपली मान वळविली आणि ड्रायव्हिंग सुरू करतो. )

       स्वप्नील :

 काय हे अनु दीदी लपवतेस होय.

           रेवती :

 अरे, बघायला येणार आहेत तिला, अजून काय ठरल नाही. काल रात्री फोन आला होता. बघ मावशीचा तेव्हा आईलां सांगत होती.

       स्वप्नील :

 म्हणजे या सुट्टीत बार उडणार म्हणा.

         रेवती :

अरे, अजून पाहायला येणार आहेत. ठरायच लांब आहे.

       स्वप्नील :

त्याला काय वेळ लागतोय होय. पसंती झाली की झालं. व आमची ताई काय कमी आहे होय. न आवडायला. काय ईशान सर.

        ईशान :

ते आहेच, पण लगेच लग्न, अनुला काय हवंय ते तरी विचारा. तिची आवड निवड.

रेवती :

तस पाहायला गेलं. तर अनु दिदीला तुझ्या सारखा जोडीदार मिळायला हवा. पण काय करणार तिच क्षेत्र पाहून घरची लोक ठरवणार.

         स्वप्नील :

 ते शेवटी आलंच. नाहीतर , आमचे कोल्हापूरचे काका, भारी कडक बुवा.

        रेवती :

 ते तर आहेच. काय अणू दीदी, काय… चालेल का डॉक्टर , की बघुया दुसरा.

      आण्विका :

 गप ग थट्टा पुरे.

        ईशान :

अण्विकाची आवड निवड काय आहे.

        रेवती :

तिने अजुन नव्हरा पाहायचा आहे. काळा की गोरा ते. तस पाहता ती गोरी आहे. पण लग्नात डाव उजव चालत. शिवाय नव्हरा एम बी बी एस म्हंटल्यावर केवढी मोठी डिग्री ती. मग काय मॅडम हो म्हणतीलच.

      आण्विका :

 रेवा बाई उगाच इमल्यावर इमले चढवू नका.

Action :

अधिकृत निवासस्थानावर वाहन येते. प्रत्येकजण गाडीतून बाहेर पडतो आणि एकमेकांशी हस्तांदोलन करत. निरोप देतात .  ईशान थोडा अस्वस्थ होता. आण्विकास निरोप घेताना हस्तांदोलन करताना हात हलवत असताना, त्याने अन्विकाचा हात घट्ट पकडतो.

           ईशान :

पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

 Action :

त्या क्षणी, रेवा आणि स्वॅप्निल त्यांची मोटारसायकल व स्कुटी पार्किंगमधून बाहेर काढतात. ईशान अन्विकाजवळ उभा आहे.

      Dialog :

      ईशान :

 बघू पुन्हा कधी भेट होते ते.

      आण्विका :

 आता फोन नंबर आहे म्हंटल्यावर होईलच की.

         Action :

स्वॅप्निल  मोटारसायकल बाहेर काढतो. अन्विका त्यावर बसली आहे. त्यांनी पुन्हा निरोप दिला आणि ती निघून गेली. बर्‍याच वेळ, ती दृष्टीक्षेपात अदृश्य होईपर्यंत तो त्यांना पाहतो. दरम्यान, फोन वाजतो.

       Dialog :

       बबलू :

 साहेब आलात काय?

       ईशान :

 हो, आलोय. ये गाडी घेऊन जा.

(बब्लू येतो. ईशानने त्याला कारच्या चाव्या दिल्या. ईशान विचारात हरवला आहे . )

         Dialog :

         बबलू :

      साहेब , साहेब,साहेब पैसे.

(बबलू दोन तीन वेळा बोलतो)

        ईशान :

(विचारातून जागा होऊन)

    हा हे घे.

(  तो पैसे देतो. रवी देखील निरोप घेऊन आपल्या खोलीकडे जातो. ईशान त्याच्या खोलीकडे जात आहे.)

                  Cut to…..

….. ……. ……. ……

Night / Mavashi home/inter/ 10.00 o’ clock

       Action :

स्वॅप्निल, अन्विका आणि रेवती  घरात हसत प्रवेश करतात.

       Dialog :

 मावशी :

(रेवतीची आई)

काय कशी झाली ट्रिप.

     रेवती :

     मस्त.

     मावशी :

 काय अनु कसं वाटल.

    आण्विका :

मस्त मजा आली.

      मावशी :

मग काय आहेच हा कोकणचा स्वर्ग.

      आई :

    जेवणार का?

       रेवती :

नाही बाई. खूप जेवलो आज.

आई :

स्वप्नील, अनु तू तरी जेवणार आहेस का?

      स्वप्नील :

  नको, झालंय आमचं बाहेर.

        अनु :

अग, पोट अगदी गच्च झालंय. जाऊन कधी झोपतोय असं झालंय.

         रेवती :

 चल झोपायला. दीदी. खूप कंटाळा आलाय.

(त्या दोघी बाथरूममध्ये जातात, ताजेतवाने होतात आणि नंतर रेवती च्या खोलीत जातात, जिथे त्या झोपतात. दिवे बंद आहेत.)

                   Cut to ….

….. ……. …… ……..

Night / Revati room /Inter / 10. 30 O’clock.

     Action :

रेवती आणि अन्विका पलंगावर पडून आहेत.

         Dialog :

      आण्विका :

 हे काय ग मला लग्नासाठी स्थळ आलय अस का सांगितलस तू.

         रेवती :

 अग, हीच तर खरी गंमत आहे.

      आण्विका :

     कसली गंमत.

       रेवती :

मला जाणून घ्यायचं होत.

      आण्विका :

 काय जाणून घ्यायचं होतं.

         रेवती :

की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे का?

      आण्विका :

 मग काय वाटत तुला.

        रेवती :

मला वाटत त्याच शंभर टक्के प्रेम तुझ्यावर आहे. पण… तुझं नाहीये ना.

       आण्विका :

 काय पण तुझं…म्हणे तुझं नाहीये.

        रेवती :

पण बिचारा,…. काही म्हण, ….आज रात्री झोपणार नाही ग, गुड नाईट तरी सांग. पण ….बाकी काय सांगू नकोस हं.

( आण्विक फोन करते. ईशान उचलतो.)

       ईशान :

       हा बोल.

      आण्विका :

 काही नाही …सहज केला होता. काय झोपलास काय?

        ईशान :

 नाही आजुन. झोपच येत नाही.

       आण्विका :

 इकडे रेवा बघ लागलीय घोरायला.

     ईशान : 

( हळू आवाजात)

ती काय झोपणारच माझी झोप उडवून.

     आण्विका :

    काय म्हणालास.

        ईशान :

 काही नाही. तू काय करतेस.

    आण्विका :

 झोपायची तयारी.

      ईशान :

आता काय तुझं लग्न होणार.

     आण्विका :

 ते काय सगळ्यांचं होत. पण अजून लांब आहे. का?

      ईशान :

तस नाही, आता आपण बोलतोय तस बोलता येणार नाही.

    अण्विका :

 तस काय नाही.

     ईशान :

आता बोलतो तस बोलता येणार नाही. फ्री मध्ये.

      आण्विका :

अजून लांब आहे ते. अन् मला कोण पसंत करणार.

      ईशान :

 का, करेल की. अन् तस पाहायला गेले तर तुझ्या घरचे कुणा आयर्या गैर्याला का देतील.

     आण्विका :

 बघू ज्या त्या वेळी.

      ईशान :

 तुझी आवड काय?

      आण्विका :

 माझी …. आ….. हा तो दिसायला हँडसम हवा. रंगानं

      ईशान :

    हा बोल रंगानं.

   आण्विका :

    गोरा. आ ..

     ईशान :

 का काळ सावळा चालत नाही.

        आण्विका :

 तस काय नाही. सावळा असला तरी चालेल.

अन्…

      ईशान :

   आणखी काय हवं.

      आण्विका :

 आणखी स्वतः कमावता पाहिजे. आईवडलांवर अवलंबून नको. बाकी

      ईशान :

    हा बोल ना.

      आण्विका :

 मला समजून घेणारा हवा. कामाचं म्हणत असशील तर..

     ईशान :

      बोल.

      आण्विका :

 नोकरीला असो वा बिजनेसमन असो. पण निर्व्यसनी हवा. पण लफडेबाज अजिबात नको.

     ईशान :

 हा… थ्यांक्स गॉड.

     आण्विका :

      काय ,

         ईशान :

काही नाही. तुझी आवड विचारली. डॉक्टर नसला तरी चालेल ना.

      आण्विका :

 तस काय नाही. पण दुसऱ्या फिल्डचा असला तरी चालेल. पण समजूतदार हवा. एवढंच.

काय एखाद स्थळ आहे का?

       ईशान :

स्थळ आहे पण तुला पसंत येत की नाही कुणास ठावूक?

      आण्विका :

 पहिल्यावर ठरवू. बर ठेवते आता. गुड नाईट.

 ईशान :

     गुड नाईट.

    रेवती : (फोन ठेवल्यावर)

काय ग मी घोरतेय होय. आणि म्हटल होत ना.लागला की नाही बाण निशाण्याला.

      आण्विका :

 हो लागला. पण काही विपरीत नाही ना करायचा.

        रेवती :

काय करेल, करुन करून फक्त नेईल पळवून तुला. आमचा खर्च तर वाचेल ना, लग्नाचा.

     आण्विका :

  शहाणी आहेस बघ.

       रेवती :

आठवलं, थांब जरा गंमत करते.

( Action :  रेवती तिचे फेसबुक खाते उघडते. तिने ईशानला हाय पाठविले आहे.  ईशानला झोप येत  नाही, तरीही तो अन्विकासमवेत फोनवर बोलल्यानंतर पहुडला आहे. जेव्हा संदेश वाजतो, तेव्हा ईशानचे लक्ष मोबाईलकडे जाते.)

        ईशान :

        काय,

  रेवती : (फेक अकाउंट)

मला तुम्ही आवडता.

    ईशान :

 मग काय करू.

     रेवती :

 माझ्याशी लग्न,

       ईशान :

 इथ माझ्या लग्नाचा पिक्चर व्हायची वेळ आलीय. तुझ रामायण नको.

       रेवती :

 कोणता पिक्चर.

      ईशान :

माझं लग्न ठरण्याआधीच मोडतय.

     रेवती :

 कोणाशी ठरल होत.

      ईशान :

      ठरल नव्हत.

        रेवती :

 मग काय झालं. ठरायच्या आधी मोडेल कस काय झालं.

        ईशान :

    झालं सगळंच.

       रेवती :

    कोण होती ती?

       ईशान :

 माझी मैत्रिण क्लासमेंट.

      रेवती :

 अरे, मग मी आहे ना.

       ईशान :

 कशाला तू, तू मला आवडत नाहीस. ती आवडते.

      रेवती :

मी पण खुश ठेवीन.

     ईशान :

     नको,

      रेवती :

 मग काय हवंय तुला.

     ईशान :

    ती मिळावी.

      रेवती :

तिच्यापेक्षा मी सुंदर आहे.

     ईशान :

     तरी नको.

       रेवती :

   तिचं नाव काय?

     ईशान :

     अण्विका.

(मेसेज रेवती अण्विकेस दाखवत.)

     रेवती :(अण्विकेस)

 बघ दीदी सापडला की नाही चोर.

    आण्विका :

अग. खरंच की ग तो माझ्यावर प्रेम करतोय.

( रेवती चॅटिंग पुढे चालवत.)

        रेवती :

      कोण अण्विका?

     ईशान :

    माझी प्रेयसी.

     रेवती :

   ब्रेक अप झालाय ना.

      ईशान :

       नाही.

      रेवती :

        मग.

       ईशान :

तिला पाहायला येणार आहेत.

       रेवती :

     एवढंच ना.

       ईशान :

एवढंच काय एवढंच, लग्न ठरेल ना.

        रेवती :

 येवढं सोपे नाहीय. तू प्रपोज केलास का तिला.

      ईशान :

      नाही.

      रेवती :

     मग कर ना.

       ईशान :

 तिला डॉक्टर स्थळ आलंय. ती काय मला निवडते मग. मी साधा फॉरेस्ट ऑफिसर.

       रेवती :

 पण हँडसम आहेस ना.

       ईशान :

त्यानं काय होतंय. तिच्या मनातल कळायला नको.

जाऊ दे. बघेन मी.

मी तुझ्याशी काय बोलत बसलोय. बाय.

( तो ऑफलाइन जातो. आणि तो झोपायला जातो. रेवती हसण्यास सुरवात करते.)

    आण्विका :(रेवतीस)

गप्प ग… उगाच तेला छळू नकोस. बस आता.

       रेवती :

 का राग आला वाटत मॅडमला.

     आण्विका :

  मग, येणारच की.

      रेवती :

लगेच हुरळून जावू नको.

आता गाडी हळूहळू कूठे रुळावर आणायची. अन् मग उडवायचा बार.

     आण्विका :

 ये मला तर भीती वाटते. त्याला कळलं तर.

        रेवती :

गप्प त्याला कळलं तर म्हणे. झोप आता. बघू उद्या काय करायचं ते

(लाईट बंद करतात)

               Cut to….

…… …… ……. ……

क्रमशः पुढे.....

कळतं नकळत जुळले हे बंध भाग ११

क्रमशः पुढे चालू ......

Day /morning/ 8.00 o’clock/ Inter

          Action :

अन्विका पेपर वाचत आहे. काका टीव्ही पहात आहेत. दरम्यान, काकू आतल्या खोलीतून येते. तिच्या हातात तांदूळ आहेत.

        Dialog :

       मावशी

काय ग अनु त्या मुलाचं नाव काय?

      आण्विका :

     कोणत्या ग.

       मावशी :

 काल तुम्ही फिरायला गेलेल्या

      आण्विका :

तो होय. हा तो ईशान.

       मावशी :

 त्याला चहापानाला तरी बोलवायचं ना.

       आण्विका :

 अग ,बोलवणार आहे. पण काकांना तरी विचार की.

       मावशी :

त्यात काय विचारायचं. तरी पण थांब मी विचारते.

अहो, अनुच्या मित्राला बोलवूया का चहाला.

        काका :

 चहाला नुसतं कसलं बोलवतेस. त्यापेक्षा जेवण करूया.

        मावशी :

हे अगदी बर. अनु तू विचार त्याला कधी सवड आहे. व बोलावं जेवायला. लाव फोन.

      आण्विका :

      थांब लावते.

 (अन्विका कॉल करीत आहे. रिंग  वाजत  आहे. पण इशान फोन उचलत नाही .)

      आण्विका :

अग तो उचलत नाहीये. काहीतरी कामात असेल

 नंतर करते.

(अन्विका एक सुंदर सुप्रभात संदेश पाठवते.)

 Cut to….

….. ……. …….. ….

Day / Morning /Outer -Inter. Alibag city.

        Action :

इशान उठतो. तो रनिंग करुन येतो, आंघोळ करतो आणि चहा घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये येतो.

तो टेबलवर बसला असता, त्याला अन्विका आठवते. एक लहान वेदना त्याच्या हृदयात येते. त्याला रनिंग करताना, आंघोळ करताना आणि न्याहारी करताना वारंवार अन्विकाची आठवण येते.

      ईशान : (मनाशी)

हे अस का होतंय मला. सारखी तिची आठवण का येते. तिला आलेलं स्थळ. काय करू. जाऊ का सरळ तिला विचारू, माझ्याशी लग्न करशील का? विचारू. काय म्हणेल ती. माझ्या प्रेमाचा स्वीकार करेल का? अन् तिने नकार दिला तर. काय करू, अन् बोलायचं बंदच केलं तर. तशी ती श्रीमंत कुटुंबातील. एक डॉक्टर. मी एक वनखात्यात असणारा तिच्यापुढे मी सर्वसाधारण , तिच्यापेक्षा आपली परिस्थिती अजूनही कमीच आहे. माझ्यामुळे तिला झालेली दुखापत व त्रास. तिच्या मनात काय चालले असेल ती स्वीकार करेल का माझा. की देईल मला झिडकारून, काहीच सुचत नाही.

(असा विचार करत असताना, रवी चहा आणतो आणि ठेवतो.)

रवी :

    ईशान, ईशान.

(ईशान विचारांच्या चक्रामधून बाहेर पडतो.)

          रवी :

 काय कसल्या विचारात आहेस.

      ईशान :

     काही नाही.

       रवी :

 काही नाही कसं. काल संध्याकाळ पासून पाहतोय तुला. काहीतरी विचारात आहेस. बोल की, काय झालं.

         ईशान :

 काय सांगू सर. कालची ती बातमी ऐकल्यापासून मला काही सुचतच नाही.

         रवी :

कोणती बातमी. कसली बातमी.

       ईशान :

 अन्वीकाच्या लग्नाची.

         रवी :

 का काय झालं अण्विकाला.

        ईशान :

काय झालं नाही हो. तिच लग्नाचं बघताहेत.

       रवी :

    ते तर आहेच.

       ईशान :

पण माझं तिच्यावर प्रेम आहे. व मला तिच्याशी लग्न करायचं आहे.

       रवी :

हातेच्या एवढंच ना.

अहो साहेब, सरळ मागणी का घालत नाही तुम्ही.

       ईशान :

 नाही, ती रागावली तर.

        रवी :

असं काही होणार नाही. मी काल जवळून पाहिलेय मॅडमला. चांगल्या स्वभावाच्या आहेत. मात्र तिची ती पाहुनी जरा चॅप्टर वाटली.

     ईशान :

तुम्हाला काय वाटत?

        रवी :

 बघा विचारून. जमलं तर जमलं

            ईशान :

           नाहीतर

         रवी :

 नाहीतर बघायचं दुसर.

       ईशान :

 नको नको.. दुसर काही. मला तिचं हवीय जीवनसाथी म्हणून

        रवी :

 आता चहा घ्या. थंड होतोय. नंतर बघा काय करायचं ते. विचारायचं की नाही.

     ईशान :

       हा.

(ते दोघे चहा घेतात. रवी घड्याळाकडे पाहत)

         रवी :

चला लवकर... वेळ होतोय. ट्रेनिंग सेंटरवर पोहोचायला हवे.

      ईशान :

      चहा घेतो.

(त्याच वेळी, अन्विका फोन कॉल करीत आहे. परंतु ते सायलेंट मोडवर असल्याने, ईशान  ऐकू शकत नाही. आणि प्रशिक्षण केंद्रात जाण्याच्या गडबडीत, तो आपला फोन न तपासता निघून जातो .)

               Cut to.....

…. ….. ….. …… …..

Evening /6.00 o’clock /outer

        Action :

ईशान दिवसभर प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षणादरम्यान त्याने आपला मोबाइल ऑफ ठेवल्यामुळे, त्याला अन्विकाचा संदेश आणि कॉल लक्षात आले नाही. संध्याकाळी, प्रशिक्षण संपल्यानंतर, इशान त्याच्या मोबाइलवर स्विच ऑन करतो.    तेव्हा तो अनुचा गमावलेला कॉल पाहतो आणि त्वरित परत कॉल करतो.

       Dialog :

      ईशान :

     हॅलो अण्विका ,

      आण्विका :

 अरे कुठे आहेस तू. सकाळी मी कॉल केला होता.

        ईशान :

 अग सायलेंट मोडवर होता. त्यानंतर माझ ट्रेनिंग चालू होते. त्यावेळी स्विच ऑफ मोबाईल करावा लागतो.

(तो दबक्या आवाजात बोलतो.)

       आण्विका :

 असा आवाज दबलेला का रे.

. ईशान :

काही नाही. वातावरणाने थोडा घसा बसलाय.

       आण्विका :

        औषध घे.

         ईशान :

           हो

      आण्विका :

 आज आमच्याकडे जेवायला यायला जमेल का?

        ईशान :

मला बर वाटल असत. यायला. पण माझं भरपूर काम आहे. त्यामुळे दोन चार दिवस माझं सेड्युल बिझी असणार आहे. दोन-चार दिवसात सेमिनार व ट्रेनिंग पूर्ण करायचं आहे चार दिवसांनी असेन फ्री तेव्हा बघू.

       आण्विका :

 चालेल. मी सांगते मावशीला.

         ईशान :

 हो बर ठेवतो. मला आता खूप काम आहे. चार दिवसांनी सुट्टी आहे तेव्हा सांगतो कॉल करून

       आण्विका :

      आठवणीने ह.

      ईशान :

     नक्की सांगतो.

    (ईशानने फोन खाली ठेवल्यानंतर, तो विचार करण्यास सुरवात करतो.)

      ईशान :(मनात)

किती गोड आहे. अनु. आपल्याला आवडते. पण मी तिला आवडतो की नाही देव जाणे. पण या प्रेमाच्या प्रपोजलमुळे आमच्यात दुरावा यायला नको. मित्र म्हणून तरी राहिलं ना. तस ती डॉक्टर , तिच करियर ती आपल्याला साजेसाच नव्हरा शोधणार.

(ईशानच्या लक्षात येत)

ईशान :

अरे आपल भरपूर काम आहे.

चला आपल काम करू.

      ( तो जात आहे.)

 Cut to……

….. …… ……. ……. …… ……

अन्विका दररोज एक संदेश पाठवते. पण उत्तर येत नाही.

Cut to 

तिला राग येत आहे. ती अस्वस्थ आहे.

Cut to ..

Day / Inter /Room

 स्विच बंद कॉल होत नाही. हा संदेश पाठविण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही.  रिप्लाय नसल्याने.

अन्विका अस्वस्थ आहे.

        रेवती :

 अग कामात असेल तो. म्हणून स्वीच ऑफ असेल मोबाईल.

      आण्विका :

 पण दिवसभरात एकदापण ऑन करत नसेल का. त्याला माझा मिस कॉल पण दिसला नसेल.

        रेवती :

 अग, करेल तो. काळजी नको करुस. काल तूच म्हणत होतीस ना त्याला चार दिवस सवड नाही म्हणून.

      आण्विका :

अस म्हणतेस. तरी पण एखादा कॉल पण करायचा नाही का.

       रेवती :

 अग, पाहिल्यावर करेल तो.

         अण्विका :

 असं म्हणतेस मग ठीक आहे.

          Cut to …. …..

….. …… ….. ….

मंगळवारी सुरू झालेले प्रशिक्षण शनिवारी संपते.

….

Day/ Evening / outer

शनिवारी प्रशिक्षण संपल्यानंतर

बाहेर येत असताना

      रवी :

    एखदास संपल.

        ईशान :

अजून बाकीची कामे आहेत की.

       रवी :

 पण मेंन काम तर संपल ना.

ईशान :

   ते तर आहेच की.

         रवी :

 मग आज काय एन्जॉय , जाऊया का सिनेमाला.

      ईशान :

 त्यापेक्षा समुद्र किनाऱ्यावर जाऊया.

         रवी :

     चालेल की.

       ईशान :

    चला तर मग.

       ईशान :

 फोन ऑन करतो आधी.

(ईशान फोन चालू करतो. तो अन्विकेचा मिस झालेला कॉल आणि एक संदेश देखील पाहतो .)

        ईशान :

 अनुचा मेसेज व कॉल पण आलाय. बर आता कामात असेल ती. आवरून नंतर कॉल करतो.

             Cut to……

…… ……. ……. ……. ………

Night / Alibag Beach/Outer. 7.00, o’ clock

      Action :

रवी आणि ईशान दोघेही समुद्रकिनार्‍यावर एकाच ठिकाणी बसले आहेत.

          

         रवी :

 खरंच सर तुमच्या सहवासात आल्यामुळे दिवस किती मजेत जातो. खरंच तुम्ही खूप गमतीशीर आहात.

       ईशान :

      काय पण सर.

( अचानक, अन्विका कॉल करते. रिंग आवाज सुरू आहे. ईशान फोनकडे पाहतो आणि तो उचलतो.)

        ईशान :

      हॅलो …बोल की.

       आण्विका :

 कुठे आहेस? काय करतोयस? काय हे गेली दोन चार दिवस मी कॉल करते. तुझा मोबाईल स्वीचं ऑफ का लागतो? एवढा कशात रमला आहेस.

         ईशान :

अग हो हो. किती प्रश्न विचारतेस. अग चार दिवस ट्रेनिंगला असल्याने. फोन स्विच ऑफ असायचा.

       आण्विका:

 मग साधा मेसेज पण करायचा नाही का?

        ईशान :

अग, वेळच मिळाला नाही. रूमवर यायला खूप वेळ होत असे. व सकाळी पुन्हा हजर लवकर राहावे लागत असे.

       आण्विका :

 बर… ते झालं का ट्रेनिंग.

       ईशान :

हो झालं. थोडंसं आहे किरकोळ कामकाज आता.

        आण्विका :

 मग तुला वेळ कधी आहे. ते तरी कळेल का?

      ईशान :

वेळ ..., आहे की उद्या फ्री. का? काही काम होत.

      आण्विका :

 बर उद्या ये जेवायला घरी सकाळी.

      ईशान :

 हा कुठे यायचं.

     आण्विका :

 कूठे म्हणजे घरी आमच्या मावशीच्या आणखी कुठे?

       ईशान :

अग पण पत्ता तरी सांग की. काय फिरत बसू साऱ्या अलिबागभर शोधत.

      आण्विका :

 अरे मी पण किती वेंधळी , पाठवते पत्ता मोबाईलवर. आ.. नको त्यापेक्षा मी स्वप्नीलला लावून देते. तुला पीकअप करायला.

       ईशान :

चालेल मी वाट बघतो.

      आण्विका :

बर चालेल. हा फोन स्विच ऑफ ठेवू नकोस. व्हायब्रेशनवर ठेव वाटल्यास.

      ईशान :

    हा मॅडम ठेवतो.

     अण्विका :

  बर गुड नाईट.

     ईशान :

    हा गुड नाईट.

(ईशान फोन ठेवतो. जेव्हा फोन ठेवला जातो .)

      रवी :

काय मग उद्या मेजवानी आहे म्हणा.

       ईशान :

चला की तुम्ही पण.

        रवी :

 नको तुमच्यासाठी खास मॅडमनी ठेवलेय.

ईशान :

         हा.

         रवी :

 मग प्रेमाचा इजहार केला की नाही.

      ईशान :

     नाही अजून.

       रवी :

 अस काय राव. विचारायचं नाही का?

        ईशान :

नाही तिचा अंदाज घेतल्या शिवाय नाही. नाहीतर आहे ती मैत्री देखील धोक्यात यायची.

      रवी :

 हे पहा सर तुम्हाला वाटत तितक्या मॅडम कडक नाहीत. मी पाहिलंय त्यांना. खूप हळव्या मनाच्या आहेत त्या.

      ईशान :

    ते तर आहेच.

. रवी :

खर सांगायचं म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही व तुमच्यासाठी त्या एक परफेक्ट जोडीदार आहेत.

      ईशान :

ते आहे हो. पण मला हे बंध हळुवार जपतच जोडायचे आहेत. नाहीतर उगाच दुरावा नको.

         रवी :

 आता फोन वरून त्यांचे बोलण जाणवल नाही का?

      ईशान :

       काय?

 रवी :

अहो त्या तुमच्याशी एखाद्या बायकोसारख भांडत होत्या.

      ईशान :

 ते सहज बोलत होती ती.

      रवी :

अहो सहज नव्हत ते . त्या हक्क गाजवत होत्या.

     ईशान : (हसतच)

तस असेल तर तुमचे बोल खरे ठरोत. चला आता खूप वेळ झालाय. जाऊ रूमवर जेवून झोपू.

(ते दोघे निघतात.)

             Cut to……

…. …… ……. …….. ……

क्रमशः पुढे.....


Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...