Sunday, May 25, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

 Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६


कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४

Day/ outer - inter /Myarej holl kolhapur

Action :

ईशान व स्वप्नील बुलेट वरून मॅरेज हॉल वर येतात. त्यांना पाहून अनेकजण त्याकडे पाहत असतात.

स्वप्नील आपली व त्याची भेटवस्तू घेऊन गाडीवरून उतरतो. ईशान ही उतरतो. व ते आतमध्ये हॉलकडे निघालेले असतात. त्यांना पाहून , तिथे असणाऱ्या मुली त्यांना पाहून पुढ्यातून नखरे करत असतात.

एक मुलगी :

( हळू आवाजात)

 ( शेजारील मुलीस )

अग, बघ की तिकडे किती हँडसम आहे ना?

दुसरी :

अग, हो ग मस्त आहे.

तिसरी :

कोण?

पहिली :

अग, बुलेट वाला

दुसरी :

 असा पार्टनर मिळायला हवा.

तिसरी :

( मनात)

( ईशान जवळून जाताना )

अरे बघ ना इकडे. मी कशी आहे. घाल ना मागणी. आयुष्यभर दासी होईन.

( ईशान व स्वप्निल जवळून गेल्यावर )

दुसरी मुलगी :

( मनात )

 अग, न बघताच गेला. एवढं नटून काय उपयोग

ते हॉलमध्ये आल्यावर संयोगिताच्या जवळ जातात.

Dialog :

स्वप्नील :

 काय झाली की नाही तयारी.

संयोगिता :

 हो आलेय आटपत.

स्वप्नील :

 ताई कुठे आहे.

संयोगिता :

 कोण अनु?

स्वप्नील :

 हो.

संयोगिता :

 आहे आतील बाजूस वेदांगीला नटवत आहे.

संयोगिता :

 काय ईशान आज लई चमकतोयस. काय बेत आहे.

ईशान :

 तुझं आपल कायतरी असत. साधा पेहराव तर केलाय.

(थोड्याच वेळात नवरा- नवरी मंडपात आणली जातात. अनुचे आई बाबा देखील येतात.)

(आण्विका तेथून जरा बाजूला संयोगिता जवळ येते.)

आण्विका :

 काय बाई खूप उकडतं होत आत. बाहेर आल्यावर जरा बरं वाटत.

स्वप्नील :

काय ताई नवरी पेक्षा तूच जास्त नटलीयास.

आण्विका,

 साधी साडी नेसलेय मी हे काय नटन म्हणायचं. तिकडे बघ त्या करवल्या कशा नटल्यात.

(मुली नटून मिरवताना दिसतात.)

(इतक्यात तिचे लक्ष ईशानकडे जाते. तिच्याकडे पाहत तो हसू लागतो. पण संयोगिता असल्याने ती डोळे मोठे करते.)

(थोड्या वेळाने अक्षता टाकू लागतात. गर्दी झाली आहे. अक्षता संपतात. गर्दी झालेली असते. त्याचा फायदा घेत ईशान आण्विकेच्या जवळ येतो.)

Dialog :

ईशान :

 काय कशी आहेस?

आण्विका :

 आहे की बरी.

ईशान :

 मेसेज नाही , फोन उचलत नाहीस का? लग्न ठरल वाटत.

(असे ईशान बोलताच ती चिडते.)

आण्विका :

 हो पुढील म्होतुर माझाच आहे. माहित नाही. साधा फोन उचलत नाहीस. कोकणातून आलास साधं एका शब्दाने सांगितलं नाहीस…. पोहोचलो म्हणून देखील फोन केला नाहीस….. अन् म्हणे मी फोन उचलत नाही, मेसेज पण नसतो हल्ली.

ईशान :

 अग, तस नाही गावी गेलो तिथली कामे आटपून मग  ड्युटीवर हजर झालो. तिथे कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचे काम यात व्यस्त होतो.

आण्विका :

 कारणे मस्त जमतात सांगायला. रात्रीच पण ट्रेनिंग असत वाटत.

ईशान :

समजून घे. मी कॉल केला होता. तुला. तूच उचलला नाहीस.

आण्विका :

 हो मी पण कामातच होते.

ईशान :

 बर ते सोड कशी आहेस.

आण्विका :

 कशी दिसते.

(इतक्यात स्वप्नील तिथे येतो.)

स्वप्नील :

 काय दीदी काय चाललय.

( ईशान कडे तिरकस पाहून)

स्वप्नील :

 ईशान लग्नाचं बघतोस की नाही. बघ आता या घोळक्यात कुठली करवली पसंत येते का ते.

( ईशान त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहतो. व गप्प राहण्यास खुणावत असतो.)

(तरी पण स्वप्नील जास्तच चेवाने)

स्वप्नील :

आता बुलेट आणलीयास, निवड एखादी अन् जा घेऊन अंबाबाईच्या देवळात अक्षता टाकायला.

मी जाईन अणू दीदी बरोबर घरी.

हो की नाही दीदी.

(ते ऐकताच अनु चिडते.)

आण्विका :

हो जा की म्हणतोय ना तो,.. शोध जा, …. एखादी परी.

Action :

( एक मुलगी तिथे लग्नाला आलेली आपल्या मैत्रिणी सोबत उभी असते. जी केव्हा पासून ईशानकडे पाहत असते. एक छानसा गुलाब घेऊन एका लहान मुलाला पाठवते. तो मुलगा तो गुलाब आणून ईशानला देतो.)

ईशान :

 काय बाळ,

मुलगा :

 दादा त्या मावशीने हे तुम्हाला दिलेय.

( तो तिकडे पाहतो. ती मुलगी हाय करते.)

( आण्विका ते पाहून चिडते. व रागाने तिथून निघते.)

स्वप्नील :

 तवा गरम झाला वाटत.

ईशान :

तुला कळतच नाही. आधीच ती चिडलीय तिला शांत करत होतो. अन् तू ओतलास आगीत तेल. उडाला भडका आता.

स्वप्नील :

 रुसू देत रुसली तर, जात नाही कुठे? तू फक्त करवल्यांवर नजर फिरव म्हणजे तिकडे आणखीन जाळ होईल.

ईशान :

 नाही नको मला दुसर कोणी, मला फक्त तिच हवी. मी फक्त तिचाच.

स्वप्नील :

 वा, रे प्रभू रामचंद्रच ना तुम्ही, माझ्यासारखं राहा श्री कृष्णा सारखं. सगळ्या गोपिकांना खेळवून शेवटी ब्रह्मचारी.

(ईशान अन्विकेच्या मागे मागे जाऊ लागतो. पण ती त्याला टाळत असते . तिला राग आलेला असतो.)

( त्याला तिच्या मागे जाताना पाहून वेदांगीचे पाहूणे त्याला बाजूला बोलावून घेतात.)

आकाश :

 काय रे लग्नाला आलास की पोरी पटवायला.

संग्राम :

तुझे नखरे आम्ही इथं चालू देणार नाही.

सुयोग :

 काय रे काय चाललय तुझं.

ईशान :

 कुठे काय चाललय?

राजेश :

 तुला काय येड वाटलाव काय?

ईशान :

म्हणजे ?

आकाश :

तू त्या मुलीला का छेडतो आहेस.

ईशान :

 मी छेडत नाही, ती ओळखीची आहे माझ्या.

संग्राम :

 ये नाटक नकोत. लग्नाला आलास ना, जेव अन् सटक, तिच्याकडे बघू नकोस.

ईशान :

 ये तू वट, मागे जायचं की पुढे ते मी बघतो.

(ते हमरी तुमरीवर येतात. इतक्यात स्वप्नील तिथे येतो. त्यांना थांबवून बाजूला घेतो. शांत करून)

स्वप्निल :

(त्या पाहुण्यास)

 ये माझी बहीण आहे ती, अन् हा होणारा दाजी. काय हा आमच्या घरचा म्याटर आहे. आम्ही बघू. तू पाहूणा आहेस काय?

संग्राम :

 घरचा म्याटर घरात ठेवायचा इकडे कशाला आणायचा. चला रे.

(ती निघतात. जाताना)

एकजण :

सगळा प्लॅन फ्लॉप केला.

Cut to …. …..

….. …… …..

Day / Inter /Myarej holl

Dialog :

ईशान :

 मी सरळ विचारतो तिला.

स्वप्नील :

हे बघ शांत हो. मी बोलेन वेळ आल्यावर. जरा दम धर. लगेच गडबड नको. काका व मावशी पण आलेय. आत बसलेत. उगाच शंका नको.

मी सगळं सुरळीत लावीन.

चल ते गिफ्ट देवू अन् निघू.

(ते जावून गिफ्ट देतात. व जेवायला जातात. जेवून तो पुन्हा वधू व वराना भेटून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. देतो.)

(स्टेजवर गेल्यावर.)

ईशान :

हॅपी मॅरेज लाईफ

 वेदांगी :

थॅन्क्स, जेवून जा

 (त्याकडे पाहते. नमस्कार करते.व आपल्या मनात)

 खरंच हा आपल्या अनुसाठी योग्य वर आहे.

 ( ती देवाला डोळे मिटून)

परमेश्वरा ही जोडी अखंड राहू दे.

Action :

निरोप घेतल्यावर तो स्टेजवरून खाली येतो. आण्विकाकडे एक नजर टाकतो. तिची व त्याची पुन्हा नजरा नजर होते. व तो निघतो. त्याच्या डोळ्यातील प्रेम तिला जाणवते. ती त्याच्या पाठमोऱ्या निघालेल्या आकृतीकडे पाहत राहते. ती अस्वस्थ होते. त्यांचे हे चाललेले दृश्य संयोगिता पाहते. ती अन्विकेजवळ येते.)

संयोगिता :

 चल गिफ्ट देवू व जेवायला जाऊ.

( त्या दोघी स्टेज वर जाऊन गिफ्ट देतात. वेदांगी आपल्या मालकांशी ओळख करून देते. ती अनुला थांबायला सांगते. थोड्या वेळाने संयोगिता अन्विकास जेवायला नेते. तिथे तिचे जेवणात लक्ष नसते.)

संयोगिता :

 काय ग लक्ष कुठे आहे तुझे?

आण्विका :

 काही नाही.

 संयोगिता :

मग जेव की.

(आण्विका जेवू लागते. पण तिचे लक्ष नसते.)

Cut to …..

…… ……. ……

 Day /evening / Outer /Marej Holl

Action :

गाडी सजवलेली दारात येते. नवरा व नवरीला निरोप देतात. ती गेल्यावर संयोगिताचा नवरा गाडी घेऊन येतो.

Dialog :

संयोगिता नवरा :

 चल आवरलं ना.

संयोगिता :

तुम्ही मुलांना घेवून जा.

माझं जरा अनुकडे काम आहे. आम्ही दोघी येतो.

(तो निघतो.)

संयोगिता व अण्विका वेदांगीच्या घरच्यांचा निरोप घेतात.

संयोगिता :

 चल अनु मला घरी सोड.

आण्विका :

 बर चल.

(त्या गाडीवर बसून निघतात.)

Cut to …..

…. …,. ……. …… ……


कळत नकळत जुळले हे बंध भाग २५

Day / evening / Inter cyaphe House

Action :

आण्विका व संयोगिता दोघी कॅफे हाऊस मध्ये एका टेबलवर बसून कॉफी घेत आहेत.

Dialog :

संयोगिता :

 तुझी काही हरकत नसेल तर एक विचारू.

आण्विका :

( पुढ्यात कॉफित चमचा फिरवत.)

 विचार.

संयोगिता :

माझ्यापासुन तू काही गोष्टी लपवत आहेस. अस मला वाटत.

आण्विका :

 काय लपवलेय.

संयोगिता :

 ईशान तुझ्या एवढा क्लोज कसा?

आण्विका :

काही नाही. बोलतो आम्ही त्यात काय नवीन.

संयोगिता :

 शाळेत असताना साधं बोलणच काय पाहणंदेखील नव्हतं तुमच्यात. अन् ..

आण्विका :

 अन् काय..

संयोगिता :

 आज मी पाहिलं एखाद्या प्रियकरा सारखं त्याच वागणं मला जाणवलं.

तुझं व त्याच प्रेम वगैरे नाही ना.

आण्विका :

 अस काही सांगता येत नाही मला. माझं मलाच काही कळेनास झालंय.

संयोगिता :

तू व तो इतक्या क्लोज कसे काय आलाय तुम्ही.

( No voice only Action : आण्विका सगळी हिस्ट्री सांगते. ते कसे भेटले वगैरे.)

आण्विका :

 अस आहे बघ, त्याने मला विचारायला हवं. खर सांगायचं तर मला आवडतो तो. पण प्रपोज करत नाही तो मला.

संयोगिता :

 हे बघ तू आहेस डॉक्टर, व तो फॉरेस्ट खात्यात. तस तुमचं क्षेत्र जरी भिन्न असल. तरी जुळवून घेतल पाहिजे. तस पाहता तो तुझ्यासाठी योग्य वर आहे. अस मला वाटत. मी त्याला लहानपणापासून पाहत आलेय. तो खूप कष्टाळू, प्रामाणिक, जिद्दी व धाडशी मुलगा आहे. रंगानं सावळा जरी असला तरी स्मार्ट व देखणा आहे. शिवाय नोकरी पण चांगली आहे. माझं मत आहे की तू हा चान्स सोडू नकोस. लग्न कर त्याच्याशी.

की कुठला डॉक्टर बघुया?

आण्विका :

 नाही नको, मला तोच हवा. पण घरात कसं सांगू?

संयोगिता :

 हे बघ तुझं आधी ठरव. तळ्यात मळ्यात असं काही नको.

 आण्विका :

 मी स्टेडी आहे ग. पण त्याने मला प्रपोज करायला नको काय?

संयोगिता :

 अग तो धाडशी असला. तरी या बाबत शंभर पावले मागे आहे. अन् तो येईल प्रपोज करेल याची वाट पाहत राहिलीस तर झालं लग्न.

मग बस म्हातारी होईपर्यंत वाट पाहत.

आण्विका :

 हा,.. मी बसते, बघच तू.

संयोगिता :

 ए लई तानू नकोस तुटेल.

आण्विका :

 ही सोन्याची तार आहे. ताणली तरी तुटायची नाही. काय?

संयोगिता :

 तोपर्यंत दुसरी कोणतरी येवून तार तोडायची व घेऊन जायची त्याला.

मगाशी ध्यानात आलं नाही का?

आण्विका :

 काय.

संयोगिता :

 आजू बाजूला पाहिले नाहीस, करवल्या कशा मिरवत होत्या.त्याच्या बाजूला, अन् ते एड बांबू त्याच्या ध्यानात नाही आलं. तू जशी तसाच तो. एक दुजे के लिये.

आण्विका :

 एकदा त्याने प्रपोज करू दे. बस मला.

संयोगिता :

 हे बघ, तुला मी हे प्रकरण जुळवायला तीन महिने मुदत देते. यात जर तुझं व त्याचं जुळल नाही. तर मी स्वतः साखर घेऊन जाईन तुझ्या बाजूने बोलणी करायला. कळलं काय?

आण्विका : 

हो बाई कळलं, चला कॉफी घ्या, थंड होईल.

(त्या कॉफी घेतात व निघतात.)

Cut to …..

….. ….. ….. ……

काही दिवसानंतर

Day / Outer inter / Radhanagari Government Hospital

Action :

आण्विका आपल्या भावासोबत राधानगरी रुग्णालय आवारात टू व्हीलर वरून येते. तिथे ती दोघे रुग्णालयात जातात. आत गेल्यावर


 आण्विका :

 (तेथील एका नर्सेला)

डॉ. संजय वाघवेकर यांची केबिन कुठे आहे?

नर्स :

 हा तिकडे जा त्या बाजूला गेल्यावर लेफ्ट वळा तिथून पाच नंबर केबिन. तिथे पाटी आहे.

आण्विका :

 थ्यांकस.

(आण्विका रुमजवळ जाते.आत ते एक पेशंट तपासणी करत असतात.)

(आण्विका थोडा वेळ बाजूला थांबते. व आत जाणाऱ्या नर्सकडे एक लेटर देते.)

आण्विका :

 हे येवढं सरांना द्या.

(नर्स आत जाते.)

(डॉक्टर पेशंट चेक करून आपल्या जागेवर येतात.

पेशंटचे सोबत आलेल्या मेंबरला.)

डॉक्टर :

काही जास्त काळजी करायचं काम नाही. औषध लिहून देतो. ती वेळेवर घ्या.

बाई वय काय तुमचं.

पेशंट :

असल की पस्तीस चाळीस.

डॉक्टर :

 मसेरी लावता ना.

बाई :

 व्हय.

डॉक्टर :

 मग बंद करा ती. नाहीतर पोटात ढेप होईल.

बाई :

 काय करू मग साहेब. मला इंग्लिश पेस्ट आवडत नाही.

डॉक्टर :

 आवडत नसेल तर आवड निर्माण करा. व ते जमत नसेल तर आयुर्वेदिक पावडर मिळते की. बाजारात ती लावत जा.

बाई :

 माग आणली व्हती मालकानं तांबडी पावडर. खर तोंड लई जळत तेन.

डॉक्टर :

 मग सॉफ्ट पावडर लावत जा.

डॉक्टर :

(तिच्या नवर्याला,)

हे बघा मिस्री लावण चांगल नाही. मी एक पावडर लिहून देतोय ती घ्या.

पेशंटचा नवरा :

 बर.

(डॉक्टर औषध लिहून देतात. ती चीठ्ठी घेऊन ती दोघे निघतात. तोपर्यंत नर्स लिफाफा देते.

तो घेऊन)

(डॉक्टर तो लीफाफा खोलून वाचतात.)

 

डॉक्टर :

 (नर्सेला)

 मॅडमना आत लावून दे.

(नर्स जाऊन बोलावते.)

नर्स :

 मॅडम आपल्याला बोलावलं आहे.

(आण्विका आत जाते.)

आण्विका :

 गुड मॉर्निंग सर.

डॉक्टर :

 या बसा. मला प्राचार्य सरांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलय तुमच्या बद्दल. चालेल कधी जोईन होताय.

आण्विका :

 उद्या पासून होते. बर राहण्याची सोय कुठे होईल.

डॉक्टर :

 तशी सोय नाहीये पण एक रूम अडजेस्ट होईल. इथे जवळच एक नर्स जॉईन झालीय. तिच्या क्वाटरमध्ये अडज्येष्ट होईल.

डॉक्टर :

 (एका वार्ड बॉयला)

अरे , जरा जाधव नर्स बाईना बोलावं.

(तो जातो थोड्याच वेळात जाधव नर्स येते.)

जाधव नर्स :

 बोला सर.

डॉक्टर :

 जाधव बाई तुमच्या क्वार्टर च्या मागील बाजूची रूम या मॅडम ना द्या. या आपल्या इथे नवीन टेम्पररी डॉक्टर म्हणून रुजू झाल्या आहेत.

त्यांची राहण्याची सोय पण होईल. व तुमच्या शेजारी असल्याने तुम्हाला सोबत देखील होईल. बर त्यांना रूम दाखवा.

जाधव नर्स :

 चला मी दाखवते.

Cut to …..

….. ….. ……

Outer – Inter / Day/ Hospital area cottage

Action :

(जाधव मॅडम त्यांना रूम दाखवणेस नेते. आण्विका रूम पाहते. बाथरूम हे सेपरेट असल्याने त्या दोघींना सोईचे असते.)

जाधव बाई :

केव्हा जॉईन होणार?

आण्विका :

उद्या होईन.

जाधव मॅडम :

 बर विचारायचं म्हणजे, जेवणाच काय करणार.

आण्विका :

 म्हणजे,

जाधव मॅडम :

बनवून खाणार की डबा लावणार.

आण्विका :

 डबा लावेन, कारण एकट्या साठी करण्यात वेळ जाऊ शकतो. व तोच वेळ मी माझ्या इतर कामासाठी वापर करू शकेन, म्हणजे अभ्यास इतर प्रोजेक्ट.

जाधव नर्स :

 मग आहे इथे एक मेस. एक आजीबाई चालवतात. त्या देतात डब्बा, चांगली आहे, मस्त घरगुती जेवण मिळत तिथे. एका महिन्याला दीड हजार द्यावे लागतील.

आण्विका :

 चालेल.

आण्विकेचा भाऊ :

 भेटून घेऊया का?

आण्विका :

 दाखवा कुठे आहे ती.

Cut to …..

…… ……. …..

Day /Inter – outer / Radhanagari Citi Hospital area

Action :

( नर्स खाणावळ दाखवते.तिथे एका आजीचे शेजारीच घर असते. आजी जेवण बनवत असते.)

Dialog :

जाधव नर्स :

मावशी,… अहो,… मुकता मावशी,

मुक्ता मावशी :

 कोण आहे.

(त्या बाहेर दरवाजा जवळ येतात.)

आजी :

कोण जाधव बाई, बोला काय काम होत? डबा हवाय काय?

जाधव नर्स :

 मला नको आज डबा, मावशी या नवीन डॉक्टर मॅडम आहेत. यांना जेवणाचा डबा लावायचा आहे.

आजी :

एका महिन्याला पंधराशे घेते. मी, घरगुती जेवण असत.

आण्विका :

 काय काय मेनू असतो?

आजी :

रोजचंच, चपाती भाजी भात आमटी, गुरुवारी गोड खीर देते. रविवारी फक्त मसालेभात असतो.

जेवण पाहणार असाल तर बघा.

(आण्विका आत जाते, तेथे एक डबा भरलेला असतो. आजी डबा खोलून जेवण दाखवते. अनुला आवडते. ती लगेच खाणावळ ठरवते.)

आण्विका :

हा चालेल.

तिथली आजी :

कधी पासून डबा द्यायचा.

आण्विका :

 उद्या संध्याकाळ पासून द्या.

आजी :

 चालेल.

(आण्विका तिथून निघते.)

Cut to …..

….. ……. ….

Next day / . Inter / Radhanagari Government Hospital

Action :

आण्विका कामावर रुजू होते. ती प्रत्येक वार्ड नीट व्यवस्था लावत असते. तिथे काही तरुण डॉक्टर असतात.

एक डॉक्टर :

 मॅडम जास्त धडाडीच्या दिसतात.

दुसरा डॉक्टर :

 नवीन आहेत. तोपर्यंत.

पहिला डॉक्टर :

 पण नियोजन भारी करते.

दुसरा :

 तिच्याकडे एक डायरी आहे. काय नोंदवते ती.

पहिला :

 काय माहित, काय तरी असेल. बघू कळेलच थोड्या दिवसात.

Cut to

….. ……. …

 कळत नकळत जुळले हे बंध भाग २६

Night / Inter /Radhanagri cortar Room/ 9.30

Action :

आण्विका जेवलेला डबा धुवून ठेवत असताना. तिच्या रूममध्ये जाधव नर्स येतात.

Dialog :

जाधव नर्स :

अण्विका मॅडम, ओ अण्विका मॅडम.

आण्विका :

काय हो जाधव बाई.

जाधव मॅडम :

 काही नाही जेवला काय.

आण्विका :

 हो आताच जेवले, डबा धुतेय.

जाधव नर्स :

आज वेळ झाला.

आण्विका :

 अचानक एक पेशंट आला. सर पण नव्हते. त्यामुळे जरा वेळ झाला.

जाधव नर्स :

 त्या दुसऱ्या डॉक्टराना थांबाय सांगायचं.

आण्विका :

 ते त्यांना सलाईन तरी नीट लावता येत का? उगाच रिस्क कशाला?

जाधव नर्स :

शायनींग मारायला येते की मस्त.

आण्विका :

त्यासाठी काय बुद्धी लागते.

जाधव नर्स :

 ते पण खरंच की. तुम्हाला सांगू.

आण्विका :

बोला की.

जाधव नर्स :

आजवर मी कित्येक डॉक्टर पाहिले. पण तुमचा स्वभाव अत्यंत मस्त आहे. पहिल्या पहिल्यांदा वाटल. की तुम्ही एक असाल साधारण डॉक्टर. पण तुम्ही आठ दहा दिवसात संपूर्ण स्टाफ मध्ये एक वेगळीच जागा निर्माण केलीय. मोठे डॉक्टर तुमचे कौतुक करत असतात.

आण्विका :

 काय म्हणतात.

जाधव नर्स :

 की तुम्ही किती हुशार आहात. ही मुलगी एक सर्जन होण्याच्या पात्रतेची आहे. वगैरे. वगैरे.

आण्विका :

 हो का?

जाधव नर्स :

 हो खरंच सांगतेय.

त्यांनी तुमचे कसब परवा ऑपरेशनच्या वेळी पाहिले होते.

आण्विका :

 बर.

जाधव नर्स :

 मॅडम लग्नाचं काही चालू आहे का?

आण्विका :

का हो?

जाधव नर्स :

 तस नाही, जर का असेल तर एखाद स्थळ बघायला.

आण्विका :

 नाही अजून.

जाधव नर्स :

 तरी काय अपेक्षा आहेत तुमच्या?

आण्विका :

 तस काही नाही.

जाधव नर्स :

 एक स्थळ आहे.

आण्विका :

 काय?

जाधव नर्स :

 अहो ते जोगळेकर डॉक्टर आहेत ना. त्यांनी मला विचारलं होत. की मॅडमना माझ्या विषयी विचार म्हणून.

आण्विका :

 काय?

जाधव नर्स :

हेच की लग्नाच.

आण्विका :

 तो खिडमिड्या.

जाधव नर्स :

 हो.

आण्विका :

 अहो, त्याला साधंसुध मेडिकल मधल म जमत नाही. परवा तर त्या एका पेशंटला ओवर डोस इंजेक्शनचा दिला होता. मी ऐनवेळी पाहिलं व त्यावर उपचार बदलले म्हणून बर. नाहीतर ती बाई गेली असती ढगात. अन् लग्नाचं सोडा. जवळ तरी कोण उभा करून घेईल का त्याला? कसा वागतो तो. पाहिलंय ना? वेंधळाच आहे. तरी म्हटल हा सारखा माझ्यापुढे केसातून हात का फिरवत असतो सारखा. असं आहे होय.

जाधव नर्स :

 बोलशीला त्याला.

अण्विका :

 छे.

जाधव नर्स :

 मग कोण आहे का मनात?

आण्विका:

( तिला सांगणार इतक्यात आपल्या मनात)

आपल प्रेम अस उघड्यावर सांगणं योग्य नाही. नाहीतर नाहक बदनामी पदरात पडायची.

आण्विका :

तस काही नाही. व लग्नाचा विचार तूर्त तरी नाही माझ्या मनात.

( इतक्यात कोणाची तरी हाक येते.)

जाधव नर्स :

 आले आले.

(नर्स बाहेर पाहते. तिचा मुलगा हाक मारत असतो.)

 जाधव बाई :

बरं येतो मॅडम मुलगा बोलवतोय

(ती जाते)

Cut to ….

…… …….. ….

Night /Inter /cottar / Room

Action :

( नर्सबाई गेल्यावर अनु आपल्या अंथरुणावर पहुडत. व मोबाईल मध्ये पाहत व्हॉट्स अँप डी पी पाहू लागते. ईशानचा फोटो पाहत.)

Dialog :

आण्विका :

 काय हे माझी आठवण येत नाही तुला. किती छळतोस मला. किती दिवस झाले साधा फोन करत नाहीस. की मेसेज नाही

 का रागवलास माझ्यावर. अस काय,….. किती आणि तडफवणार.

(ती एकटक तो प्रेमाने फोटो पाहू लागते.)

Cut to…

…… ……. …… ……..

After two days

Evening /Inter /Doctor Vaghvekar cabin

Action :

डॉक्टर वाघवेकार यांना फोन येतो. त्यांच्या घरी पाहुणे येणार असतात. त्यांच्या वडिलांनी फोन केलेला असतो.

डॉ वाघवेकर :

 बोला बाबा,

बाबा :

 अरे संजू,.. उद्या येतोय आम्ही संध्याकाळी. तिकडे. जरा तिची पण हवापालट होईल. डॉक्टरनी सांगितलय. जरा बाहेर फिरवून आणा म्हणून. तर आम्ही येतोय.

डॉ. वाघवेकर :

 हा चालेल की.

(ते फोन ठेवतात. व आपल्या बायकोला जी याच ठिकाणी डॉक्टर असते तिला बोलवायला नर्सेला सांगतात.)

डॉक्टर :

 पाटकरबाई जरा श्वेता मॅडम ना बोलवा.

(पाटकर बाई जाऊन निरोप देते.

श्वेता मॅडम येतात.)

श्वेता मॅडम :

काय हो , का बोलावलं?

डॉ, वाघवेकर :

 काही नाही फक्त तुमचे सासरे येणार आहेत. त्यांना तुमच्या हातच्या चवी रवीच खायची इच्छा झाली आहे. तेव्हा उद्यापासून स्वयंपाक नीट असावा.

श्वेता वाघवेकर :

 बापरे, अहो आधी नाही का सांगायचं. मी स्वयंपाक वालीला दोन दिवस सुट्टी दिलीय. आता कसं करायचं.

डॉ. वाघवेकर :

 बघ आता काय ते. आम्ही काही मदत करू शकत नाही. हा उद्या जरा मस्त बेत होऊ दे. बघ कोणतरी दोन दिवसासाठी.

डॉ. वाघवेकर :

 तुम्ही पण आधी सांगायला काय होत तुम्हाला. आता येणं वेळी कामवाली कुठून मिळायची. हे काय कोल्हापूर आहे. जे पार्सल आणून कामे चालवायला.

(त्या डोक्याला हात लावून बसतात)

( इतक्यात राऊंड वरून अण्विका तिथे येते.)

आण्विका :

 काय झालं मॅडम.

श्वेता वाघवेकर मॅडम :

 काय सांगू तुम्हाला मॅडम, ही डॉक्टरकीची जबाबदारी पार पाडत घर सांभाळन एक तारेवरची कसरत आहे. उद्या अचानक सासू व सासरे येत आहेत. त्यांची उस्तवारी करताना मला एवढा त्रास होतो मॅडम. त्यात मला जास्त जेवणातल जमत नाही. व सासरे व सासू बाहेरचं काही खात नाहीत. दोन दिवस त्या कामवालीला सुट्टी दिलीये. आता हे दोन दिवस कसे काढायचे याचंच टेन्शन आलंय. त्यात साधं चपाती भाजी असत तर चालले असते. पण साहेबांनी लगेच ऑर्डर खास जेवणाची दिलीये. व काही करून जेवण करायलाच हवं. काय करू. दोन दिवसात अशी सुगरण कोण मिळेल.

आण्विका :

 एखाद्या नर्स बाईना सांगा की.

डॉ. श्वेता वाघवेकर :

 नको बाई, त्यांचे नखरे पाहिलेत मी. काम कमी अन् उसाभर जास्त. व त्यांना सांगणं देखील ओक्कवर्ड वाटत.

आण्विका :

बर कधी येणार आहेत?

श्वेता मॅडम :

उद्या संध्याकाळी.

आण्विका :

 ते व्हेज आहेत का?

श्वेता मॅडम :

नाहीत. म्हणजे दोन्ही,… मासाहार करतात ते.

आण्विका :

मग उद्याच्या फक्त जेवणासाठी मी करेन मदत. परवाच तुमचं तुम्ही बघून घ्या.

श्वेता :

खरंच. देव पावला म्हणायचं.

आण्विका :

 चपात्या तरी जमतील ना.

श्वेता :

 ते तू सोड माझ्यावर.

आण्विका :

 किती जण जेवायला असतील.

श्वेता :

असतील आठ नऊ लोक. म्हणजे सगळे धरून हा?

आण्विका :

 मग मी सांगते ते साहित्य आणा.

थांबा टिपण देते.

( आण्विका टिपण काढून देते.)

श्वेता वाघवेकर :

 चालेल. त्यापेक्षा उद्या या वेळी जाऊ की आपण दोघी. तशी उद्या सुट्टीच आहे ना.

आण्विका :

चालेल. या मग रूमवर तुम्ही.

श्वेता वाघवेकर :

 चालेल. लई भारी , सुटल्यासारख वाटल. पण तुला जमेल ना?

आण्विका :

अहो कोल्हापूरची आहे मी, कोणत्याही कामात उजवीच असणार.

श्वेता :

मग आज माझ्याकडून ट्रीट तुम्हाला.

आण्विका :

 काय?

श्वेता :

 थांबा आताच आणते मी नाष्टा.

(व ती निघते. त्या गेल्यावर)

पाटकर नर्स :

 मॅडम जमेल ना, कारण तिची सासू लई खास्ट आहे.

आण्विका :

 तू बघच तिची सासू दोन दिवस बिर्याणीत लोळेल त्या.

पाटकर नर्स :

 बोलाय ऐकत नाही तुम्ही.

(त्या दोघी हसू लागतात.)

Cut to …..

…… …… …


No comments:

Post a Comment

ट्रॉय एक ऐतिहासिक युद्ध

  ट्रॉय एक ऐतिहासिक युद्ध  आज आपण ट्रॉय या फिल्मची समरी पाहणार आहोत. फिल्मच्या सुरवातीला एका रणांगणावर  ग्रीस राजा एडमेनॉन व दुसरा राजा यां...