हास्यविनोद
म्हातारीचे गाणे
एका शहरात एक श्रीमंत गृहस्थ रहात असतो.त्याचा बंगला असतो त्याच्या शेजारी एक म्हातारी व तिचा नातू राहत असतात. एका रात्री म्हातारी जोराने गाणे म्हणू लागते.
“ ये ग गवराबाई सुख देऊन जाई”
त्यामुळे त्या श्रीमंतांची झोप उडते.तो खिडकीतून वाकून बघतो.तर म्हातारीच्या परसातील टॉयलेटमध्ये प्रकाश असतो. व तेथून आवाज येत असतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नातू टॉयलेटला गेल्यावर
“ बदका बदका नाच रे तुझी पिल्ली सात रे…”
गाणे गाऊ लागतो. तिथून पुढे असेच चालू असते.एक दिवस म्हातारीकडे पंढरपूरची पाहुनी येते. तिला पण हे टॉयलेटमध्ये गाणे म्हणणे आवडत नसते. ती जेवून झोपी जाते.
रात्री तिच्या पोटात ढवळून टॉयलेटला होते. ती पाणी घेऊन टॉयलेटला जाते.
थोड्या वेळाने टॉयलेटमध्ये गाण्याचा आवाज सुरू होतो.
“ माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी.”
श्रीमंत गृहस्थाची झोपमोड होते. व तो तक्रार करतो पोलिस स्टेशनमध्ये जाऊन
“ साहेब एवढं गाण बंद कराहो वाटेल तेवढा पैसा देईन. रातभर कधीपण हे सुरू होते टॉयलेट काय गाणे म्हणण्याची जागा आहे का?”
पोलिस म्हातारीकडे येतो. व दमदाटी करतो. की तू विनाकारण गाणे म्हणतेस व शेजाऱ्यांना त्रास देतेस.
म्हातारी गप ऐकते.थोड्या वेळाने त्या पोलिसाला लगविला होते व तो म्हातारीच्या टॉयलेटमध्ये जाऊन येतो.
बाहेर आल्यावर तो म्हातारीकडे एकदा पाहतो व हासतो व शेजारील त्या श्रीमंतांकडे जातो.
आताच्या आता मला पाच हजार द्या “मी गाणे बंद करतो.”
श्रीमंत, “ पाच का दहा हजार घ्या.पण गाणे बंद झाले पाहिजे.”
तो पोलीस एक काम म्हातारीच्या घरी करतो. त्यातील दोनशे रुपये खर्चून येतो. दुसऱ्या दिवसापासून गाणे ऐकु ऐत नाही.
श्रीमंताला बरे वाटते. तो दुसऱ्या दिवशी जाऊन त्या पोलिसाचे आभार मानतो व त्याला कोणता उपाय केलास विचारतो.
“ काही नाही टॉयलेटला आतून कडी नव्हती ती मी बसवली, एवढच.”
श्रीमंत डोक्यावर हात मारून
“ अरे बाबा हे तर मीपण केलं असत.यासाठी दहा हजार खर्च केला. यात तर टॉयलेट बांधून दिलं असत मी म्हातारीला.”
तात्पर्य: गर्व न करता शेजारील व्यक्तिशी संवाद साधा प्रश्न आपोआप सुटतील. व कोणी शुल्लक कारणासाठी आपली आर्थिक फसवणूक करणार नाही.
लेखक - निशिकांत हारुगले