Showing posts with label Kalat n kalat julale he bandh script bhag 9. Show all posts
Showing posts with label Kalat n kalat julale he bandh script bhag 9. Show all posts

Sunday, February 23, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag 9

  कळत नकळत जुळले हे बंध भाग ९

क्रमशः पुढे चालू.....

Day / Outer / Morning / 8.30a.m./ Ishan trening cotej

    Action :

स्वॅप्निल, रेवती आणि अन्विका ईशानच्या कॉटेजमध्ये येतात. स्वॅप्निलने त्याच्या दुचाकीला पार्क केले. रेवतीने तिची स्कूटी पार्क केली. दरम्यान, ईशान आपल्या गोष्टी व्यवस्थित करीत आहे. तो शूज घालत आहे. ईशान फोनवर चहाची मागणी करतो.

           Dialog :

         ईशान :

         ( मोबाईल फोनवर)

 पाच चहा पाठवून द्या.

( तो आपला फोन खाली ठेवतो. आणि तो अन्विकांशी बोलू लागतो.)

       ईशान :

 केव्हा पासून वाट पाहतोय.

      आण्विका :

 अरे ,काय करणार, एवढ्या सगळ्यांच्या अंघोळी वगैरे आटपण म्हणजे वेळ होतोच.

 (चहाचा विक्रेता येतो आणि चहा सर्व्ह करण्यास सुरवात करतो.)

        ईशान :

 हा, चहा घ्या सगळी. या आत मध्ये.

       आण्विका :

 मस्त आहे की निवास व्यवस्था.

        ईशान :

मॅडम, मस्त आहे. पण सरकारी आहे .

      आण्विका :

    हो ते तर आहेच.

     ईशान :

    घ्या चहा.

      Action :

प्रत्येकाकडे चहा आहे. ते चहा पितात. चहा विक्रेता कप गोळा करतो. आणि निघून जातो.

         Dialog :

         ईशान :

 चला वेळ होतोय. वाटेत ओळख करून घेऊ.

( ईशान खोलीस कुलूप लावतो. )

         Action :

ते सर्व कारच्या जवळ येतात. नंतर, ईशान आणि रवी आणि त्याच्या शेजारी स्वप्नील आहे. अन्विका आणि रेवा मागे बसले आहेत. रेवा अनुला  इशारा करते. बोटांनी  खाणाखुणा करत छान आहे. अन्विका डोळ्यांनी खुणावत. शांत राहण्यास इशारा देते.

कार सुरू होते. शांत गाणे लावले आहे ईशान. आणि प्रवास सुरू . थोड्या वेळात.

       Dialog :

        ईशान :

काय अनु ओळख करून देतेस का नाही.

       आण्विका :

अरे हो, थांब ओळख करून देते.

हा माझा मावस भाऊ स्वप्नील, व ही रेवती.

        ईशान :

 स्वप्नील काय. मुळचे अलिबागचे की.

       स्वप्नील :

 छे नाही, आम्ही मूळचे बेळगावकडील. बाबांची बदली झाली इकडे व त्यामुळे इकडे , माझं नाव तस पाहायला गेलं तर स्वप्नील माने.व ही माझी बहिण रेवती. व अनु दीदी तर आपल्याला माहीतच आहे.

बर आपल नाव काय सर.

       ईशान :

 मी ईशान…. ईशान पाटील. मी कोल्हापूरचा, तस पाहायला गेलो. तर अण्विका व मी दोघे क्लासमेट. आमचं तस पाहायला गेलं तर मुळगाव कोकण साइडला राधानगरीकडील. पण वडलांच्या नोकरीमुळे कोल्हापूरला स्थाईक झालोय.

       स्वप्नील :

 आता तुम्ही काय करता ?

       ईशान :

 मी सध्या फॉरेस्ट ऑफिसर म्हणून कामाला आहे. दाजीपूर साईटला. इकडे आमचे ट्रेनिंग आहे. म्हणून आलोय. आज सुट्टी आहे. म्हटल मस्त एन्जॉय करूया. पुन्हा या नोकरीतून आलिबाग पाहायला मिळेल न मिळेल.

      स्वप्नील :

    हे सर कोण?

       ईशान :

 माझ्या खात्यातील आहेत. ते पण ट्रेनिंगला आलेत. म्हटल सुट्टी आहे. चला आपण फिरून येवू.

बर तुला माहीती आहे ना अलीबागची. मग आम्हाला गाईड कर की जरा.

         स्वप्नील :

       हा सांगतो. त्यात काय एवढं मला पाठ आहे संपूर्ण अलिबाग …..

                स्वप्निल

  हा इकडून पुढे…..

     ( म्युझिक चालू)

          Action :

स्वॅप्निल ईशानला अलिबागमधील स्थळे  व माहिती सांगण्यास सुरवात करतो. 

ईशान आणि स्वॅप्निलची गप्पा पहात 

        Dialog :

       रेवती :

    (हळू आवाजात)

काय मेव्हन्या पावण्यांच्या गप्पा मस्त रंगल्यात नाही.

    आण्विका :

    गप्प ग.

     आण्विका :

 काय झाली का ओळख स्वप्नील.

       स्वप्नील :

 हो झालीय. तसे पाहता आम्ही दोघे मूळचे एकाच भागातले आहोत ना.

       ईशान :

 बर तू काय करतोस हल्ली.

         स्वप्नील :

 माझं होय. बी बी ए कंप्लीट झालंय. आता एम. सी. ए. ला आहे. त्याबरोबर डाक्युमेंट्रीची कामे. ट्रेकिंगची देखील आवड आहे.

         ईशान :

 मस्त आहे की. म्हणजे शिकत शिकत कमाई सुरू.

इथच झालं का शिक्षण?

         स्वप्नील :

 छे नाही, बाबांच्या बदलीमुळे एक ठिकाण नाही. पण बी बी ए माझं पुण्याला झालं. तिथे काही काळ हॉस्टेलवर होतो. मात्र एम सी ए इकडे करतोय.

अरे तुम्हाला ओळख करून द्यायची राहिली. ही माझी बहिण रेवा, आयमीन रेवती. सध्या बारावी कंप्लेंट झालेय तिची. तसेच तिने ऑनलाईन कोर्स देखील केलेत. अनेक पोस्ट व व्हिडिओज तिचे असतात यु ट्यूब वरती.

अन् या मॅडम काय ओळकीच्या आहेतच की.

       आण्विका :

 नाहीये माझी ओळख करून दे की मग.

( सर्व हसतात.)

       स्वप्नील :

काय साहेब आपली ओळख करून घ्यायची राहिली.

        रवींद्र :

मी मूळचा मराठवाड्यातील औरंगाबाद विभागातील एक छोटस आमचं गाव. सध्या गौताळा अभयारण्यात कामाला आहे. फॉरेस्ट खात्यात. लग्न झालंय. पत्नी साधी सरळ गृहिणी आहे. दोन मुले आहेत मला. असा सुखी संसार चाललाय.

या की कधीतरी आमच्या इकडे. मस्त अभयारण्य पाहू, किल्ले लेणी मस्त आहेत बघण्यासारखे पॉइंट आमच्याकडे.

     स्वप्नील :

नक्की येवू. दरवर्षी आम्ही ट्रेकला कोणता न कोणता पॉइंट निवडतो. जर का तिकडे येणं झालं. की नक्की येवू आम्ही.

         ईशान :

 स्वप्नील आता कुणीकडे जायचं.

        स्वप्नील :

 हा पुढील चौकातून डावीकडे तिथे आहे एक पॉइंट. मस्त बघण्यासारखा.

स्वॅप्निल त्यांना अलिबॅगमधील विविध मंदिरे दाखवतो. मग ते नाष्टा  करण्यासाठी थांबतात आणि नंतर अलिबॅग बीचकडे जातात.

                Cut to…..

….. ….. ….. …..

Alibag beach /Afternoon / Outer


  Dialog :

     स्वप्नील :

 चला आपण पाण्यात खेळू.

(स्वप्निल आपला शर्ट काढून रेवती कडे देत.)

        स्वप्निल

    चल की. पाण्यात एन्जॉय करू

          ईशान :

 अरे पण मी कपडे आणली नाहीत बदलायला.

      स्वप्नील :

 पाण्यात भिजण्यासाठी कपडे कशाला. चला.

(रविकडे पाहत)

सर तुम्ही पण चला.

              Action :

इशान आपले कपडे देखील काढतो. आणि ते पाण्यात जातात. तो, रवी आणि स्वॅप्निल थंड पाण्याचा खेळण्याचा आनंद घेतात. रेवा आणि अन्विका वाळूमध्ये किल्ले तयार करण्यास सुरवात करतात.थोड्या वेळाने ती अन्विका आणि रेवास  ओढून नेतात. परंतु जास्त पान्यात न जाता त्या थोड्याशा पाण्यातून परततात.भिजलेले कपडे बदलण्यासाठी. बीच किनाऱ्यावरील दुकानातून त्या दोघांनाही कपडे घेतात.

                  Cut to…..

…… …… …… ……. …

Day / Afternoon / 2.00p.m./ outer

       Action :

स्वॅप्निल आणि ईशान रवी जवळ येतात.

     Dialog :

     स्वप्नील :

चला आपण कुलाबा किल्ला पाहायचा.

      रेवती :

    पाहिलाय परवा.

      स्वप्नील :

     पुनः पाहायचा.

       ईशान :

 चला की आम्ही नाही पाहिलाय पुन्हा पाहा.

        Action :

ते किल्ला पाहायला जातात. अन्विका त्यांना सर्वत्र माहिती देते. . . ते तोफ पाहण्यास पुढे जातात. रेवा आणि अन्विका मागे आहेत.

     रेवती :

       (अण्विकेस)

 मस्त गाईडच काम केलंस ह.

       आण्विका :

      हो खरंच.

         रेवती :

 चॉइस चांगली आहे मॅडम, शारीरिक दृष्ट्या फिट्ट आहे. व बोलण व स्वभाव देखील चांगला आहे.

याच्याशीच विवाह कर.

      आण्विका :

 एवढ्या लवकर रिझल्ट. कमाल आहे बाई तुझी.

          रेवती :

 अग, असली अपोरचूनिटी सोडायची नसते.

            ईशान :

 अरे, त्या दोघी कूठे आहेत?

           स्वप्निल :

     त्या बघ मागे…या पण ना…

( त्या दोघींना मागे असल्याचं पाहून स्वप्निल व ईशान बोलावतात.)

.

       आण्विका :

 अग चल ती बोलवताहेत

Cut to

.....  ..... ..... ....

Day  / outer / beach 

(किल्ला पाहून कार जवळ आल्यावर)

          Dialog :

           ईशान :

 स्वप्नील इथे चांगल जेवण कोठे मिळेल.

          स्वप्नील :

 तस पाहता या ठिकाणी भरपूर हॉटेल्स आहेत. पण माझ्या पाहणी नुसार एक मस्त रेस्टॉरंट आहे. आपण तिथे जावूया. 

Cut to ...

( रेस्टॉरंट मध्ये जेवत आहेत. )

                Cut to……

……. …… ……..

Afternoon / outer / restorant.3.00 p.m. o’ clock./

जेवणानंतर 

       रेवती :

 मस्त जेवण होत नाही.

     आण्विका :

       हो ग.

( अन्विका बिल देत असते. ईशान तिला थांबवतो आणि स्वत: बिल देतो. )

        ईशान :

    मॅडम थांबा देतो मी.

      आण्विका :

   अरे, देते की मी.

       ईशान :

 नको म्हणजे नको. मी देतो.

( वेटर येतो आणि ईशान बिल देते. )

Cut to…..

..,… ……. …… … …..

Day /Evening / 4.30 o’ clock/ Outer in car

( ईशान गाडी चालवत. )

         ईशान :

 आता बोला कुणीकडे जाऊया?

        स्वप्नील :

 आता शेवटचा जवळील पॉइंट म्हणजे किहीम बीच.

     ईशान :

चला तर मग, स्वप्नील रस्ता तेवढा सांग.

     स्वप्नील :

  हा…. हा घे.

(स्वॅप्निल गुगल  मार्गदर्शन नकाशा दाखवतो आणि तो ईशानला दाखवत.)

      आण्विका :

 स्वप्नील माझं एक काम आहे इकडे. अरे आपली वेदांगी आहे ना. तिला इकडील एक स्थळ आलं आहे. त्याची माहिती काढायची आहे. हा बघ बायोडेटा.

       स्वप्नील :

 हा, एवढंच ना. थांब सांगतो.

      ईशान :

   वेदू लग्न करतेय.

      आण्विका :

         हो.

       ईशान :

 नव्हरा जरा स्ट्राँगच बघा. नाहीतर महिन्यात मारून खुळखुळा करेल.

     आण्विका :

 एवढी काही वाईट नाही हो ती. अत्यंत साधी आहे.

ईशान :

ती…अन् ..साधी, भांडण करण्यासाठी नेहमी तयार असते. की.

               आण्विका :

   तिला मी कधी भांडताना नाही पाहिली.

(स्वप्निल मित्राला फोन करतो.)

       Dialog :

       स्वप्निल

“ हॅलो, कोण मोहण्या काय?

      मोहन :

      बोल की.

       स्वप्निल

 मी तुला बायोडेटा पाठवला आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती हवी होती

        मोहन :

 येवढच होय. काढुया की. त्यात काय?

तो फोन ठेवतो.

                  Cut to….

…. …… ….. …..

Evening /5.00 o’clock / Kihim beech / outer

       Action :

किहिममधील बीचवर सर्व खूप मजा करत आहेत. अन्विका आणि रेवती काही काळ खेळतात. अन्विका आणि ईशान एकमेकांकडे पाहतात. हे स्वॅप्निल आणि रेवती यांच्या लक्षात येते, परंतु ते दाखवत नाहीत. अन्विका स्वत: वर ताबा ठेवत .

         Dialog :

      आण्विका :

रेवा चल मस्त वाळूत घर बांधूया.

       रेवती :

       चल.

ते दोघे जातात. ते लाटांवर खेळण्यास सुरवात करतात.

ते लांब आहेत हे पाहिल्यानंतर रेवती 

          रेवती :

 काय अनु दीदी आता पासून मालकाचे पैसे वाचवायला लागलीस.

      आण्विका :

 काय ग, मला नाही समजल. असं का म्हणतेस.

       रेवती :

 हॉटेलमध्ये जेवणाचे बिल भागवत होतीस.

      आण्विका :

 मग भागवायला नको. सकाळ पासून सर्व खर्च तोच करतोय. गाडीचार्ज, नाष्टा, जेवण वगैरे. सार काही तोच करतोय.

तो काही जमीनदार घरातील नाहीये.

      रेवती :

 अग, हो. किती बाजू घेशील. खरंच आजच्या मुली एकेका मुलाला प्रेमात पाडून वर्षभर खेळवून त्याला एका दोन लाखाला बुडवून ब्रेकअप करतात. व तू मात्र अजून कशात काय नाही अजून, लगेच होकार देशील. गप्प बस जरा.

     आण्विका :

 हे बघ रेवा. त्याला माझ्याबाबत काय वाटत. किंवा मला त्याच्या बाबत काय वाटत हे महत्त्वाचं नाही. हा साधा सरळ व्यवहार आहे.

         रेवती :

 अग हो.. हो.. मला कळतंय. म्हणून मी पैसे आणलेत. पण नंतर करू की पेड.

       आण्विका :

 नंतर तो घ्यायचा नाही, नाईटच जेवणं आपण द्यायचं.

        रेवती :

 बर बाई. पण लई भाळू नकोस. आवर घाल भावनांना आजच्या दिवस तरी.

      आण्विका :

 ए काही विपरीत तरी करणार नाहीस ना.

        रेवती :

 नाही ग, बघ तुझा प्रेमी पागल होईल तुझ्या मागणं प्रपोज करायच्या आधीच निकाल कळेल.

     आण्विका :

    ते कस काय?

        रेवती :

 बघच, थांबवं आता बोलण, स्वप्नील दादा येतोय.

      अण्विका :

 अग तो आपलाच आहे ना?

      रेवती :

 गप बस. तो… त्याच्या तोंडात तीळ देखील राहत नाही. सगळ्या घरभर करील तो.

स्वप्निल व ईशान त्या दोघींजवळ येतात. तो जवळच्या बाटलीतून पाणी पितो. ईशानचे  लक्ष पूर्णपणे अन्विकाकडे आहे.

       रेवती :

चॉइस चांगली आहे तुझी

     आण्विका :

    कसा वाटला?

       रेवती :

 पहिलवानच क्याप्चर केलास की. आता काय घरातच तालीम.

       आण्विका :

ये तो काही पैलवान नाही. ऑफिसर आहे.

       रेवती :

 मग जावा जंगलात दोघेजण. झाडे व प्राणी बसा मोजत.

      आण्विका :

 तू ये की ठसे व दात मोजायला.

         रेवती :

 मला काय वाघाची बिर्याणी बनवायचा बेत आहे.

         Action :

 ते तिघे पाण्यातून बाहेर पडतात. गोड पाण्यात आंघोळ केल्यानंतर ते कपडे बदलू लागतात. अन्विका ईशानला कपडे देते. त्या क्षणी, रेवती तिरकस डोळ्यांनी पाहते.

               Cut to….

…… ……. …… ……. …..

 क्रमशः पुढे.....


Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...