Showing posts with label 20. Show all posts
Showing posts with label 20. Show all posts

Monday, April 7, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag 18and 19, 20

 Kalat n kalat julale he bandh script bhag 18and 19,20

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग १८

क्रमशः पुढे चालू.....

Evening /5.30. P.m./ outer - inter.

Action :

( आण्विका स्कूटी संयोगिताच्या दुकानाकडे वळवते. दुकानाच्या दारात जाते. तिथे पाटी लावलेली असते. त्यावर लिहिलेलं असत. अनुरूप कलेक्शन मागील बाजूस. ती गाडी तिकडे नेते. दुकानाचे बोर्ड वाचत ती अनुरूप कलेक्शन जवळ येते. काऊंटरवर संयोगिताचा नवरा असतो. आण्विका दुकानात जाते.)

    Dialog :

आण्विका :

काय दाजी कस काय चाललय?

संयोगिताचा नवरा दाजी :

 अरे,.. अण्विका… बऱ्याच दिवसांनी ,

आण्विका :

 हो म्हटल बघू मैत्रिणीला आठवण येत नाही आमची, आपणच जाऊ मॅडम किती बिझी आहेत ते बघायला.

दाजी :

 काय करणार खरंच या पंधरा दिवसात अजिबात विश्रांती नीट भेटली नाही.

 (आपल्या मांडीवरील बाळाला,)

जा आतमध्ये सांग जा की अनु मावशी आलेय म्हणून.

आण्विका :

 नको, मी जाते आत. ती कामात असेल.

Action :

(आण्विका आतमध्ये जाते. तिथे दोन – चार कामगार दिसतात. त्यांना संयोगिता इंस्ट्रक्शन देत आहे.  आण्विका पाठीमागे उभा राहते.)

आण्विका :

मॅडम पटक्याचे व धोतराचे कापड मिळेल का?

( संयोगिता मागे वळून पाहते. तिला आश्चर्याचा धक्का बसतो. ती आश्चर्याने,)

संयोगिता :

 कोण अनू, काय सरप्राइज, मॅडम ना वेळ मिळाला म्हणायचा. कशी आहेस? अन् पटका धोतर कापड काय हे. कुणाला नेसवतेस, जिन्सचा जमाना आहे. समजल का. हल्ली म्हातारी माणसे पण जिन्स घालतात.

आण्विका :

 काय ग कधी गाळा बदललास. काही कळवल नाही.

संयोगिता :

अग सगळ गडबडीत झालं बघ. अचानक जुन्या गाळेमालकाने भाडं वाढवून मागितलं. काय करणार? शेवटी हा गाळा बघितला. व ठरवून खरेदी केला. थोड लोन झालंय. पण फिटेल आपोआप.

 आण्विका :

 मस्त आहे की ही जागा. व फ्रंटला पण.

( इतक्यात एक कर्मचारी बाहेरील दालनातून आत येतो.)

कर्मचारी :

 मॅडम एक कस्टमर आलेय. ते जरा बिल कमी करून मागत आहे. तुमच्या ओळखीने आलय म्हणत आहेत.

जरा बघा चला.

( संयोगिता व अण्विका बाहेर येतात. एक उंच मुलगा उभा असतो.)

संयोगिता :

 बोला सर काय हवंय?

तो मुलगा : म्याडम मला लग्नाचा ड्रेस घ्यायचा आहे.

संयोगिता :

 आधी कपडे तरी बघा मग बोलू.

तो मुलगा :

 मॅडम मला माझा मित्र ईशान पाटील याने हा पत्ता दिला होता. लग्न असल्याने लग्नाची कपडे खरेदी करायची होती.

(तो लगेच फोन लावून संयोगिताकडे देतो. संयोगिता फोन घेते.)

ईशान :

 हा हॅलो संयोगिता.

संयोगिता :

 हॅलो बोल की रे.

ईशान :

 तो आलेला माझा मित्र आहे. त्याला लग्नासाठी कपडे हवी आहेत. परिस्थिती बेताची आहे. जरा समजलं का?

संयोगिता :

 देते रे बाबा, बाकी काय चाललय तुझं, जॉबला लागलास , पार्टी कधी देणार?

ईशान :

 देवूया की. त्यात काय.

या इकडे सुट्टी घेऊन राधानगरीला कधीतरी.

(इतक्यात अण्वीका कपडे पाहत असते.ती ईशानला )

संयोगिता :

 थांब हं.

संयोगिता :

(आण्विकेस )

अनु तुला हवा असेल तर एखादा ड्रेस घे.

आण्विका :

नको, ढीग पडलाय घरात.

संयोगिता :

अग घे ग.

(परत संयोगिता फोन कानाला लावते.)

ईशान :

 कोणाशी बोलत होतीस.

संयोगिता :

अरे आनुशी, म्हणजेच अण्विकेशी, ती आलेय भेटायला. म्हटल एखादा ड्रेस घे.

ईशान :

काय अण्विका आहे. तिला फोन करायला सांग मला.

संयोगिता :

 मी सांगू, नाही रे बाबा. मला फाडून खाईल ती.

ईशान :

 ए सांग की. मला बोलायचं आहे.

संयोगिता :

 बर सांगून बघते. पण तुला काय बोलायचं आहे तिच्याशी.

 ईशान :

काही नाही मेडिकलची माहिती विचारायची आहे.

संयोगिता :

 बर सांगते.

ईशान :

 त्याची कपडे तेवढी त्याच्या बजेटमध्ये बसवून दे.

संयोगिता :

 बर देते बाबा.

(संयोगिता, फोन ठेवते.)

संयोगिता :

( त्या युवकास उद्देशुन)

 थांबा,

संयोगिता :

सुहास ए सुहास,

(सुहास हा कर्मचारी येतो.)

संयोगिता :

हे बघ यांचं बजेट बघ व त्यानुसार यांना कपडे दाखव. व ओळखीचे आहेत. किमान रेट , लाव.

आण्विका :

 बर जाते मी.

संयोगिता :

 अग थांब, जाशील एवढ्यात. एखादा ड्रेस तरी घे.

आण्विका :

नाही, नको

संयोगिता :

 अग पैसे नको देवुस, व थांब जरा.

संयोगिता :

(नवऱ्यास)

अहो जरा लस्सी तरी मागवा.

(संयोगिताचा नवरा लस्सी आणायला जातो.)

आण्विका :

कशाला उगाच दाजीना लावून दिलेस

संयोगिता :

 असूदे, बर तुला सांगायचं होत. ईशान ने तुला फोन करायला सांगितलाय.

आण्विका :

 हो काय,

संयोगिता :

 त्याला कसल्या तरी औषधांची माहिती हवी आहे.

आण्विका :

 बर.

संयोगिता :

 फोन नंबर देवू.

आण्विका :

नको, आहे माझ्याकडे.

संयोगिता :

 हे बघ जून भांडण विसर, तो चांगला मुलगा आहे. व कर मदत त्याला.

आण्विका :

 बर करते.

(इतक्यात संयोगिताचा नवरा लस्सी घेऊन येतो. ती लस्सी ती सर्व घेतात.)

आण्विका :

 ( मनात)

इथल्या इथ दे म्हणायला येत नव्हत, म्हणे फोन कर, नोकरदार झाल्यापासून लई शेफारलाय.

आण्विका :

बरं चल मी निघते.

      ( ती निघते.)

संयोगिता :

 (मनात)

अशी चिडली का? अन् ईशानच काय काम आहे हिच्याकडे. व हिच्याकडे त्याचा मोबाईल कसा. काय बाई कोडंच आहे. आणि भांडू नये म्हणजे झालं. नाहीतर माझं मधी ढोलग व्हायचं. पण काही का असेना, दोघांचा जोडा शोभून दिसेल. पण ही आग व पाण्याची जोडी कशी जुळणार?

चला आपल्या कामाला लागू. ती दुकानाच्या कामात लागते.

           Cut to …… ….

….. ….. …..

Day / afternoon/ Vedangi Home / inter

Action :

( वेदांगीच्या घरात पाहुणे आलेत लग्न ठरवायला. सगळे जमलेत.)

Dialog :

वेदांगी काका :

काय मग आमची पोर पसंत हाय ना.

नवरीचे बाबा :

 हो, आम्हाला पसंत आहे. पण नवरदेवाला विचारा पसंत आहे का ते.

त्रयस्थ व्यक्ती :

काय रे ऋषिकेश आहे का पसंत मुलगी.

ऋषिकेश :

 हो.

वेदूचे बाबा :

 आणखी काही बोलायचे असेल तर. बाजूला जाऊन बोलू शकता.

ऋषिकेश :

नको, आहे पसंत मला, फोडा सुपारी.

(सुपारी फोडली जाते. मानपान आहेर देवघेव केली जाते. साखरपुडा व लग्नाची तारीख ठरते.)

Cut to….

….. …… ……

कळत नकळत जुळले हे बंध भाग १९

क्रमशः पुढे चालू .....

Day / Afternoon / Inter /Vedangi Home

Action :

वेदांगीचे बाबा बाहेरून घरी लग्नपत्रिका घेऊन येतात.

घरातील सगळी मंडळी पत्रिका पाहू लागतात.

Dialog :

वेदांगीचा भाऊ :

 मस्त आहे. हे बघ दोघांचा फोटो पण छापलाय. मस्त आहे.

आई :

 बघू रे,

आजी :

तारीख कधीची धरलीय.

बाबा :

 तेवीस जानेवारी.

आजी : दिवस चांगला आहे ना?

बाबा :

 अग ते सगळ पाहूनच ठरवलय.

आजी :

 लग्नं कुठे करणार आहेस.

बाबा :

अग आपल्याकडेच घेतलय. हॉल बुक केलाय.

आई :

 पावण्या रावळ्यांना बोलवायला हवं.

बाबा :

 ते ठरलंय बोलवू आपण. फोन केले आहेत सगळ्यांना, दोन दिवसात हजर होतील सगळे.

आई :

 अगं बाई तयारीला लागायला हवं.

बाबा :

 वेदू तुझ्या मित्र मैत्रिणींना देखील सांग.

वेदांगी :

 हो बाबा मी आताच तयारीला लागते.

(वेदांगी आपल्या रूम मध्ये जाते. व आपल्या मित्र मैत्रिणींची यादी बनवू लागते. ती कागदावर नावे लिहू लागते. आण्विका, संयोगिता, सात्विक, बबलू, अशी यादी करत शेवटी तिच्या लक्षात ईशान येतो.)

वेदांगी :

( मनात )

ईशानला बोलवू काय?

हो बोलवलेच पाहिजे. त्याशिवाय अणूच्या मनात काय चाललय हे कळणारच नाही. बोलावतेच. पण फोन कसा मिळणार. अनुला विचारू. नको. ती उगाच चिडायची. त्यापेक्षा संयोगिताकडे असेल.

चला संयोगितालाच फोन करु.

(ती फोन घेऊन रिंग करू लागते.)

Cut to….

….. …… ……

Inter /Vedangi Home /

Action :

(वेदांगीच्या घरी. पाहुण्यांची रेलचेल सुरू आहे.

सगळे कामात आहेत. जो तो कामाला लागलाय तिचे कोकणातले भाऊ व मामांची मुलेही आलेत.

वेदांगी आपली कपडे व दागिने पाहत असते. तिला काय घालू व काय नको असे झालेले असते. ती हताश होऊन.)

   Dialog :

वेदांगी :

 ( मनात)

 काय करू. कोणता घालू. काहीच सुचत नाही. त्यापेक्षा अण्विकाला बोलावते. तेच बरं होईल.

(ती मोबाईल घेते व अण्विकाला फोन करते.)

Same time :

 Action :

(आण्विका आपल्या घरात आईला जेवणाचा डबा करून देण्यासाठी मदत करत असते. वेदांगीचे फोन येतो. आण्विका फोन उचलते.)

Dialog :

आण्विका :

बोला मॅडम काय सेवा करू.

वेदांगी :

 सेवा बिवा काय नको. तू कुठे आहेस? इकडे सगळा बोजवारा उडालाय. मला काही समजत नाहीये, तू आधी पहिली इकडे ये.

आण्विका :

 अग, येते थोड्या वेळाने.

वेदांगी :

 काही नको थोड्या वेळानं वगैरे. त्यापेक्षा अस कर. रहायलाच ये इकडे.

आण्विका :

ए बाई,.. राहायचं नाव एवढं काढू नकोस. आज जरा वेळ होईल. उद्या मात्र सकाळी सातला हजर होते.

वेदांगी :

 ते काय सांगू नको. ये लवकर.

आण्विका :

 अग, बाबांचा डबा करून देते. मग निघते की मी.

वेदांगी :

 ते डबा बिबा राहू दे. तू लवकर ये बघू.

आण्विका :

 येते बाई. थोड्या वेळात हजर होते.

(आण्विका फोन ठेवते.)

आई :

 वेदूचा होता का फोन.

आण्विका :

हो.

आई :

 मग जा तू. मी करते डबा.

आण्विका :

 थोडेच तर राहिलेय. ते करते अन् जाते.

आई :

 अग, तीच लग्न आहे ना. मग जा लवकर.

आण्विका :

 अग एवढ्या लवकर जाऊन काय करू. व वेळ झालाय डब्याला उगाच तुला ओरडा खावा लागेल.

( बाबा बाहेर हॉल मध्ये आलेले असतात.)

बाबा :

 झाला काय डबा तयार. मला वेळ होतोय.

अनु :

 झाला झाला.

( अनु डबा भरते. व बाबाना द्यायला जाते.)

बाबा :

 (हसत डबा घेताना)

काय अनु वेदूचं लग्न झाल्यात जमा हाय. तुझा काय विचार लग्नाचा.

आण्विका :

घ्या डबा जावा उशीर होतोय. उगीच चेष्टा नको.

आण्विकाचे बाबा :

 चेष्टा नाही बाळ, आता तुझं ही बघायला हवं.

( इतक्यात आई जेवणखोलितून तिथे येते.)

आण्विका :

 थोडे दिवस थांबा. एवढी एंन्ट्रनशीप झाली की बघू.

बाबा :

 कोण बघून ठेवलास काय.

आण्विका :

 बागितल तर तुम्हाला सांगेन की. अंधारात थोडेच ठेवणार.

बाबा :

चालेल, पण विचार कर. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला हवा. तस तू खूप गोड अन् समजूतदार मुलगी आहेस. तुला नक्की एखादा राजकुमार भेटेल बघ.ाग

आण्विका :

पुरे थट्टा मस्करी.

 जावा उशीर होतोय.

आई :

जावा काय जावा, खरंच सांगतात ते बाळ. तुझ्यासारखी मुलगी लाभन देखील भाग्यच आमचं. एवढं शिक्षण घेतलस. तरी देखील घरातील सर्व कामात मदत करतेस. ताईच लग्न. भावाच शिक्षण व इतर उलाढाल यातील ओढाताण समजून घेतलीस. एम बी बी एस होण्याची पात्रता असून देखील घरातील ओढाताण समजून घेऊन बी एच एम एस ला अडमिशन घेतलंस. तिथे ही टोपच राहिलीस. मिळेल ते खाल्ल्यास दिल ते कपडे घातलीस कोणता हट्ट नाही का अवांतर खर्च नाही. नाहीतर शेजारी पाजारील मुलींचे नखरे बघतोय आम्ही, साध भांड घासत नाहीत. शिक्षण कमी घेतले पण थाट नवाबी असतात. अन् तू खूप वेगळी आहेस. येवढच नाही तर भावालाही योग्य लाईन गाठून दिलीस. तुझ कौतुक करावं तितकं थोडच. अहो, काल फोनवर सुधा कौतुक करत होती. काय काय मदत केलीस मावशीला.

आण्विका :

 पुरे कौतुक उगाच बैला सारखं फुगवू नका. जावा आता कामावर उशीर होईल.

(बाबा हसतात व डबा घेऊन जातात. आण्विका पसारा आवरन्यास आत येते.)

आई :

 माझ्या लेकीला देवा चांगल स्थळ भेटू दे.

(आण्विका मनात ईशानचा विचार करू लागते. तिला तो दिसू लागतो.)

 Dialog :

आण्विका :

 ( मनात)

किती दिवस झाले. माझी आठवण येत नसेल का?

 (इतक्यात आई आत येते. आण्विकाला भांडी गोळा करताना पाहून.)

आई :

 अग ठेव ते. मी करते.

(ती जेवण वाढून घेते. व खाऊ लागते. इतक्यात पुन्हा तिला वेदांगीचा फोन येतो. तो आल्यावर अनु फोन उचलते.)

वेदांगी :

 अग कुठे आहेस अजून?

आण्विका :

 अग, थोड्याच वेळात हजर होते. थोड जेवते मग निघते.

वेदांगी :

 ते जेवण बिवन राहु दे. थेट इकडे ये सरळ. इथे ये जेवायला.

की पाठवून देवू कुणाला.

आण्विका :

ये बाई येते मी.

वेदांगी :

 हे बघ अर्ध्या तासात आली नाहीस तर थेट मीच येईन बघ न्यायला.

आण्विका :

 येतेय ठेव आता.

(आण्विका जेवू लागते.)

Cut to ……

….. …… …..

 Day / Morning / Anvika Home / Inter - outer

 Action :

(आण्विका जेवण करून आपल्या खोलीत जाते. एक गुलाबी कलरचा ड्रेस घालते. एक छानसा सेंट मारते. आपली पर्स घेते. व छानसा गॉगल घालते. व आईला)

आण्विका :

आई जाते मी?

(आण्विका निघते. आपली स्कूटी घेऊन)

Cut to ……

….. ……. …

Day /outer – inter/ Vedangi Apartment.

Action :

(आण्विका वेदांगी रहात असलेल्या फ्ल्याटच्या अपार्टमेंट मध्ये येते. ती पार्कींग एरियात गाडी लावत असते. त्यावेळी तिथे बाकीची पाहुण्याची मुले क्रिकेट खेळत असतात. ते बॉल मारतात. तो बॉल अण्विकाच्या दिशेने येतो. ती तो झेलते. तेव्हा तीच्याकडे पाहून.)

Dialog :

राजेश :

काय र सुया पावनी कोण म्हणायची?

सुयोग :

 कोण का असणा, भारी हाय दिसायला.

सुजित :

 पण आपल्या पावण्यात तरी नाही कोण असली.

आकाश :

कोण का असणा मला जाम आवडली.

सुजित :

 (डोक्यात राजेशच्या टपली मारून)

 काय रे कळत नाय. येणा - जाणारी मानसं बघून तरी बॉल मारायचा.?

आण्विका :

 ए शहाण्या घे हा बॉल.

(आण्विका बॉल फेकते व वेदांगीच प्लॉट कडे जाते.)

सुयोग :

गरमच हाय म्हणायची.

सुजित :

गरम नाही. लवंगी मिरचीच हाय.

 Cut to ……. ….

…… …… …..

Inter / Vedangi Home / Day

Action :

( आण्विका वेदांगीच्या घरी येते. घरात आल्यावर वेदांगीची आई व इतर पाहुण्या काही ना काही कामे करत असतात.)

Dialog :

आण्विका :

काय काकू येवू का आत?

वेदांगीची आई :

 कोण अनु होय. ये की, काय ग, किती वेळ लावायचा? जा आत लवकर मॅडमन घर डोक्यावर घेतलय.

( आण्विका आतील खोलीत जाते. आतील पसारा पाहून.)

आण्विका :

 काय ग हे अस काय, केवढा पसारा केलास हा?

तुला पण कळतच नाही बघ.

वेदांगी :

 अग मला काही सुचेना झालंय.

आण्विका :

 थांब लावते नीट.

(आण्विका वेदांगीच्या घरी आलेल्या पाहुण्या मुलींना बोलावते. इतक्यात त्यांची पाहुण्यातील आजी येते.)

आजी :

( पसारा पाहून)

तेवढच येतय तिला. तरी मी सांगत होते. रघुला, की जरा घरकामाची सवय लाव पोरीला, काय पसारा करून ठेवलाय बघ. आज इथे आई आवरते. उद्या लग्न झाल्यावर सांग नवऱ्याला आटपायला.

आण्विका :

 आजी शांत हो, होईल सर्व नीट.

( असे म्हणत आण्विका पाहुण्याच्या सर्व मुलींना बोलावून कामे लावायला सुरुवात करते. तिने आपल्या पर्स मधून चिठ्ठी काढली. व त्यांना कामे वाटून दिली. त्यापूर्वी प्रत्येकाची क्षमता पाहते.)

आण्विका :

 तुमच्यातील कुणाला छान रांगोळी काढता येते.

( एक दोघी हात वर करतात. त्याकडे कोण देत )

आण्विका :

संध्याकाळी मेहंदी काढायची जबाबदारी तुम्हा दोघींची.

 (काहींना मसाले तयार करायला लावते. काहींना फुले देवून गजरा करायला बसवते. काहींना वस्तू आवरायला लावते. तर आजींना व वेदांगीच्या आईला आहेराची बांधाबांध करायला एका खोलित लावते. वेदांगीच्या भावाला बोलावून जेवणाचे टिपण काढून देते. व काही मुलाना घेऊन जाऊन बाजार करायला लावते. सर्व जोडणी लावून देते. तसेच सर्व कामे आटपून घेते. व थोडा चहा करायला सांगून वेदांगीकडे जाते.)

( तिचे कपडे नीट ठेवले आहेत का पहाते, दागदागिने नीट लोकरला ठेवून लॉक करते. तसेच रहिवासी पाहुण्यांच्या जेवणाचे मेनू ठरवून ती त्याचेही नियोजन लावते.)

(इतक्यात वेदांगीची आई चहा घेऊन येते. तो चहा घेत. )

आण्विका

( वेदांगीला)

काय मग ?

झालं ना मनासारखं.

वेदांगी :

 हो झालं, आता तुझ्या मनासारखं व्हावं असं वाटतंय.

आण्विका :

 काय मनासारख.

वेदांगी :

तुझ्या मनासारखा जोडीदार मिळाला की झालं.

आण्विका :

 हो का. आवरा आता.

Cut to ….. …..

….. ……. …

Vedangi Home / in room / Inter / Evening ४.०० o’clock

Dialog :

वेदांगीची गावाकडली आजी : 

पाहिलस कसं नियोजन केलं त्या पोरीने सगळ काम मार्गी लावलं. अस पाहिजे, पोरीच्या जातीला असा बारकावा यावा लागतो बघ. तू फक्त शाळा शिकवलीस. ही पोरगी कशी संस्कारी आहे बघ.

वेदांगीची ममी :

आई ती मुलगी कोण आहे माहित आहे काय तुला. कितवी शिकलेय?

आजी :

 असेल दहावी बारावी झालेली.

वेदांगीची ममी :

 अग ती डॉक्टर आहे. वेदुची मैत्रीण.

आजी :

 काय डॉक्टर आहे. मला वाटलं असेल दहावी-बारावीला. पण काय नियोजन करते मस्त मला आवडल बाय. अन् एवढं व्यावहारिक बारकावा तिला जमतो म्हंटल्यावर खूप मुरलेली पोर आहे.

( इतक्यात अण्विका घरी जायला निघते.तिला)

 वेदांगी :

त्या पेक्षा इथे रहा की.

(इतक्यात वेदूच्या पाहुण्यांची पोर बराच वेळ शायनिंग मारत असतात. त्याकडे बोट करत)

आण्विका :

 तिकडे बघ तुझी पाहुणे मंडळी.

( वेदांगी त्यांकडे रागाने पहाते. ती बाहेर पळतात.)

(इतक्यात आजी येते )

आण्विका :

बर, चलते आता मी,

आजी :

कशाला जातेस रहा की इथे.

आण्विका :

 नाही आजी, आई घरी एकटी आहे. व बाबा पण बाहेर गावी कंपनीच्या कामानिमित्त गेले आहेत. व भाऊ पण ग्यारेजवरून वेळाने येतो.

(असे बोलून ती बाहेर निघते. आपल्या स्कूटी जवळ येते. तिला ह्यांडल जवळ एक चिठ्ठी दिसते. ती पाहते त्यावर एक नंबर असतो. व खाली लिहिलेल्या ओळी असतात. त्या पाहून वाचते.)

संदेश :

तुम्ही मला आवडलात फोन करा,

( असा मजकूर असतो आण्विका ती चिठ्ठी बाजूला फेकते. व निघते.)

( ती गेल्यावर)

संग्राम :

 काय काम झालं नाही बुवा.

(इतक्यात मागून सुयोग टपली मारून)

सुयोग :

आम्ही सकाळपासून तिला कटवण्याचा प्रयत्न करत आहोत. अन् तुझ काय चाललय,

संग्राम. :

 हे बघ तिला मी पटवणार. ती माझी हाय.

राजेश :

(वेडावून दाखवत)

म्हणे माझी हाय.

 आम्ही काय इथे माशा मारायला आलोय का.?

(ते भांडण करू लागतात.)

आजी : (आतून)

 काय झालं यानले भांडण करायला.

राजेश :

अरे, आजी आली.

( तेव्हा तिचा आवाज ऐकूण सगळे पांगतात. निघून जातात.)

. Cut to …… …..

…… …… …

क्रमशः पुढे........ ...... ......

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग २०

Day/ Evening / Vedangi Home/ Inter

Action

(मुलांचा दंगा चालू असतो तो ऐकून वेदांगी त्यांना गॅलरीतून पाहते.)

Dialog :

वेदांगी :

 काय रे आकाश काय चाललय.

चला वरती या काम आहे.

आकाश :

 ( मित्रांना)

अरे दीदी न ऐकले वाटत. आता काय खर नाही.

सुयोग :

 तिला काय कळलं नाही. चल बघू दुसरच काम काहीतरी असेल.

बाकीचे :

 चल चल.

(ती सगळी वरती येतात.)

  वेदांगी :

काय रे खाली काय चालल होत तुमचं.

आकाश :

काय नाही ते.

वेदांगी :

 (फिरकी घेत)

काय रे ती गेलेली मुलगी कशी आहे.

सुयोग :

मस्तच.

(बाकीचे डोळे मोठे करतात.)

सुयोग :

 मस्त म्हणजे छान आहे.

वेदांगी :

 आवडली का?

सुयोग :

 हो तर.

वेदांगी :

आवडली इथपर्यंत ठीक आहे. विचारलं नाहीस ना.

सुयोग :

मी नाही पण.

वेदांगी :

पण काय?

सुयोग :

(संग्रामकडे बोट दाखवत)

पण यान नंबर चिट्टीवर लिहून पाठवला.

(संग्राम घाबरून.)

वेदांगी :

 काय रे काय चाललय.

संग्राम :

 काय नाही. फक्त नंबर पाठवला होता.

वेदांगी :

 ती कोण आहे ते माहीत आहे का?

सुजित :

 कोण आहे, क्याट्रर तर आहे. आली होती लग्नाचं नियोजन करायला.

वेदांगी :

 (त्याचा कान धरत)

 बाळा, ती क्याट्रर नाही. माझी मैत्रिण आहे. अन् ती एक सर्जन आहे.

राजेश :

सर्जन म्हणजे.

वेदांगी :

 सर्जन म्हणजे पोट फाडून आतील दुरुस्ती करेल तुझ्या.

आकाश :

 बापरे, नको रे बाबा.

संग्राम :

 ती डॉक्टर आहे.

वेदांगी :

 हो, अन् तिचा भाऊ कराटे चॅम्पियन आहे. ब्लॅक बेल्ट स्पेशल. त्याला कळलं तर तुमचं काही खर नाही बघ.

(ती घाबरतात. त्यांना तिचा भाऊ त्यांची हाडे मोडत्याला दिसतो. तर ती त्यांना ऑपरेशन कक्षात झोपवून पोट फाडण्याचे लेजर घेतलेली दिसू लागते.)

ती सर्व :

 बापरे.

इतक्यात वेदांगीच्या अजोळची आजी :

 लेकाच्यास बारावी नाही सुटलं. अन् म्हावर पकडते. व डाक्टरची इच्छा करतय बायको म्हणून. जा माकडा ते टिपण घेऊन श्रीकांतसंगे,

कमवायची अक्कल नाही. अन् लग्नाची अपेक्षा करतय.

( त्यातून आकाश धाडस करत.)

आकाश :

काही म्हण दीदी मला ती जाम आवडली. भले तिचा भाऊ मला मारो व हाडे मोडो. पण मी तिका प्रपोज करणार.

(इतक्यात पलीकडील खोलीतून अकाशची आई )

अकाशची आई :

ए थोबडवेन तुका, जर पावण्याच्या गावात काही कल्ला केलास तर. दोन दिस राव अन् खा पी अन् गावची वाट धर. समजल का.. अन् काय आगळीक केलस इथ तर तूका मिरचीची धुरी देतय काय मी.

आकाश :

 ए आय तुका चांगली सून होवो की नको.

(तसा आकाशचा बाप त्यास येवून म्हणतो,)

आकाशचा बाप :

 ए गढड्या तुझं स्टेटस काय, तीच काय? जा झंप्या काम कर. खादडोबा कुठला.

तुका सांगून ठेवतय म्या. उगाच पाहुण्यांच्या लग्नात बारा भानगडी करशील. दोन दिवस राहायचं खायचं प्यायच अन् गावाक सुटायच. समजल का.

आकाश :

(खाली मान घालून)

हो.

आकाशचा बाबा :

 जा त्या दादा सोबत जरा काम कर जा, दिदीच्या लग्नात तेवढीच मदत होईल.

(तो तेथून जातो.)

Cut to …… …..

….. …… …….

Outer/ Day /evening time/ On Road

(गाडीवरून. जाताना)

Dialog :

श्रीकांत :

 काय रे नाराज का आहेस.

आकाश :

बाबा व आय रागावली.

श्रीकांत :

 का कशाबद्दल,

आकाश :

 त्या आलेल्या दीदींच्या फ्रेंडवर लाईन मारली म्हणून.

श्रीकांत :

 अरे, तिच्याकडे बघायची कुणाची हिम्मत होत नाही. अन् तू तिला प्रपोज करायला निघालास. मग काय?

आकाश :

 तू पण दादा.

श्रीकांत :

 हे बघ तिच्या वाटेला जाऊ नको. नाहीतर हातनाक मरशील.

आकाश :

 बर चल आता.

(ती निघतात.)

Cut to ……

…….. …. …..

Inter / Anvika Home/ Night 10.o’clock

Action :

(हॉल मधील टीवी बंद करून ती आपल्या रूम मध्ये जाते. तिच्या मोबाईलची रिंग वाजते. अंथरूण नीट करत असते. आण्विका मोबाईल उचलून पाहते. रेवा चे नाव पडलेले असते. कॉल करते)

(On mobile phone)

आण्विका :

बोला मॅडम.

रेवती :

 काय अण्विका दिदी काय चाललय. कशी आहेस.

आण्विका :

 आहे बरी, चाललीय वेदांगीच्या लग्नाची तयारी.

 रेवती :

तिचं झालं , तुझं काय?

आण्विका :

माझं काय असणार.

रेवती :

साहेब मेसेज वगैरे करतात की नाही.

आण्विका :

 येतो की कधीतरी गुड नाईट शुभ सकाळचा मेसेज.

रेवती :

का फोन करत नाही?

आण्विक :

 परवा केला होता. मी उचलला नाही.

रेवती :

 अग, घ्यायचा नाही का?

आण्विका :

 का घेऊ, एका शब्दाने सांगितल नाही, निघालोय नाहीतर पोहोचलोय ते. त्याला माझी परवा नाही तर मी तरी कशाला करू.

रेवती :

परवा कशी नाही. इकडे स्वप्निलला फोन येतोय की.

फोन आला की मला चकवून बाहेर जाऊन बोलतात साहेब. पण मी सुद्धा वस्तादिन आहे. परवा चार्जिंगला लावून अंघोळीला गेल्यावर चेक केला फोन. तेव्हा ईशानचे मेसेज पाहिले. त्यामधे तुझीच जास्त चौकशी करत असल्याचे दिसून आले.

अन् हा रेडा आपला भाऊ असून आपल्याला काही सांगत नाही.

आण्विका :

त्याच्याकडे चौकशी करायला. मला फोन करता येत नाही.

रेवती :

अग, अस कस म्हणतेस. त्याने केला होता व तू उचलला नाहीस. मग तो का करेल. व आता वेदांगीच्या लग्नात भेटेलच की.

आण्विका :

 शंभर जनातील भेटनं ते. त्यात कसली मज्जा, अण्विका काय? कशी आहेस? याच्यावर साहेबांची गाडी गेली तर शपथ.

रेवती :

अग, तो हळवा आहे. तो जास्त बोलका नाही.

आण्विका :

अरे बाबा, म्हणजे आता पासूनच कड घ्यायला लागलीस काय दाजीची.

रेवती :

 ए काय पण होऊ दे. आपण तुझ्याच गोटात. पण दाजी तोच हवा.

आण्विका :

 बघुया पुढे कोण कोणाच्या गोटात ते.

रेवती :

 इथे काय लढाई करायची नाहीये. उगाच ताणू नकोस. व जरा नमतं घ्याव माणसानं.

 आण्विका :

बर, लग्नाला येणार आहेस काय.

रेवती :

नाही मिळणार ग यायला. माझी एक एक्झाम आहे. स्वप्नील दादा येईल बघ.

आण्विका :

मग स्वप्निलला सांग पोहोचल्यावर फोन कर म्हणून

रेवती :

माझा फोन येईपर्यंत तो गरुड पोहोचला पण असेल. चल ठेवते.

आण्विका :

बर ठीक आहे.

गुड नाईट

रेवती :

 गुड नाईट स्वीट ड्रीम.

आण्विका :

 फोन ठेवते.

( इतक्यात तिच्या मोबाईल वर गुड नाईट मेसेज येतो. तो ईशानचा असतो. ती परत रिटर्न गुड नाईट मेसेज पाठवते. व ऑफलाईन जाते. व झोपी जाते.)

Cut to …..

…… …… …..


Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...