ll श्री गणेशाय नमः ll
Kalat n kalat julale he bandh
कळ त न कळत जुळले हे बंध
लेखक : निशिकांत हारूगले.
One liner :
आण्विका भोसले एक डॉक्टर व ईशान पाटील एक फॉरेस्ट ऑफिसर शाळेतील एका घटनेने दुरावलेले क्लासमेट्स पुढे प्रवासात बसमधे अचानक भेटतात. जुन्या आठवणीवर चर्चा करता करता एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांच्या भेटीगाठी होतात. पण एकमेकांसमोर प्रेम व्यक्त करण्यासाठी घाबरतात. पण पुढे राधानगरी येथे पुन्हा त्यांची भेट होते. व जवळीकता येवून ते प्रेम व्यक्त करतात. याचवेळी ईशान फॉरेस्ट खात्यात असल्याने त्याचे जंगल तस्करांशी वितुस्ट येते, ते त्याला अडकविण्यासाठी अन्विकाचे अपहरण करतात. ईशान तिला सोडवतो. या प्रकरणात झालेल्या बदनामीमुळे अन्विकाचे घरचे लग्नास नकार देतात. शेवटी त्या दोघांचे प्रेम पाहून होकार देतात. व लग्न ठरवले जाते.
मुख्य कॅरेक्टर :
• अन्विका भोसले (२५) B.H.M.S. डॉक्टर सुंदर गोरी लाघवी मुलगी.
• ईशान पाटील (२६) फॉरेस्ट ऑफिसर, सावळा रंग उंच बांधेसूद युवक. अन्विकाचा प्रियकर
• वेदांगी अग्रावकर : (2५) B.H.M.S. डॉक्टर अन्विकाची मैत्रीण.
• संयोगिता (२५) : अन्विकाची मैत्रीण कापड दुकान व्यवसाय करणारी.
• सुलभा : (५०) अन्विकाची आई गृहिणी.
• बाबा: ( ५५) अन्विकाचे वडील खाजगी नोकरी.
• सुधा माने (४८) अन्विकाची मावशी गृहिणी
• रेवती माने : (२२) अन्विकाची मावस बहीण
• स्वप्निल माने (२३) अन्विकाचा मावस भाऊ, (M.C.A.) शिक्षण
• रेवाचे बाबा (५५) : अलिबाग शहरात एका सरकारी नोकरीवर असलेले.
• राहुल भोसले (२७) अन्विकाचा भाऊ
• गौण कॅरेक्टर :
• भिवा (४५) ,सदा (४०), तुकाराम (४२), किश (३८) सर्व जंगल तस्कर. कळम्या जीवा (४०) सुपारी घेऊन खून करणारा गुंड.
• सौरभ, सात्विक, मदन आण्विकाचे क्लासमेट (B.H.M.S. कॉलेज)
• श्रीकांत, मोहन : तालमीत व्यायाम करणारी मुले.
• शिरीष साळुंखे : फॉरेस्ट ऑफिसर.
• पांडू : वन खात्यातील शिपाई.
• बबलू : अलिबाग शहरात गॅरेजवर काम करणारा
• रवी (३०) : फॉरेस्ट ऑफिसर.(नाशिक विभाग)
* डॉक्टर संजय वाघवेकर (४५) : राधानगरी सिटी रुग्णालय डॉक्टर.
Day /Radhanagari Forest /morning. outer
Actions :
अभयारण्यात, नऊ तस्करांच्या टोळी जंगलात एका ठिकाणी जेवण घेत आहेत. त्यांच्यासमोर ते पत्रावळीवर तांदूळ आणि मासे खात आहेत.
Dilog
भिवा :
बातमी क्लिअर हाय ना?
सदा :
म्या काल स्वतःच्या कानान ऐकलय, आज कुठेतरी ट्रेनिंगला जाणार हाईत म्हणून.
तुक्या :
हे बघ खर सांग नायतर सापडायचो , अन् सगळं केलेलं काम फुकटात जायचं.
भिवा :
( आत्मविश्वासाने)
चल बघू सकाळचे सात वाजलेत कोण येतय एवढ्या सकाळी मरायला. आफिसर पडलं असतील डाराडूर होऊन.
तुक्या :
(तिरकस पहात)
बर ...किशा तू जा,.. टेकावल्या जांभळीवर,
किशा :
जी दादा.
Action :
किशा झाडाच्या दिशेने जाते, तर इतर लोक नजर चुकवून एक एक करून, त्या गुप्त स्थळाकडे जातात जिथे त्यांनी त्यांचा माल लपवलेला आहे.
Cut to
……. ……. ……. …….
Today / that time / morning
Action :
वन व्यवस्था विभागाची जीप राधानगरी फोंडा रोडवरून निघाली आहे आणि फोंडा रोडवरील चहा स्टॉलवर थांबली आहे. त्यातील एक तरुण सावळ्या रंगाचा अधिकारी, खाली उतरतो आणि रस्त्या कडेच्या चहा स्टॉलवर जातो.
Dialog :
ऑफिसर ईशान :
आज काय गरमागरम.
टपरीवाला :
सॉलिड गरमागरम म्हणाल तर चहा आहे,
ईशान :
द्या मग सहा गरमागरम चहा. आज थंडी पण खूप आहे. होऊ द्या गरम.
Action :
टपरी वाला चहा देतो. ईशान चहा घेतो, टपरी वाला बोट दाखवत . इशारा करतो. आणि एक पत्र पुढे ढकलतो. त्यानंतर तो पत्र उचलतो आणि गाडी मध्ये बसलेल्या सुरेशकडे पाहतो.
Dilog
ईशान :
सुरेश चहा दे
Action :
सुरेश जीपमधून बाहेर येतो व चहा नेतो आणि सर्वांना चहा ऑफर करतो. सर्व आवडीने चहा स्वीकारतात.
ऑफिसर ईशान :
“ मोहन स्टार्टर मार. आज शिकार्यांची शिकार करूया. लई दिवस दमवत होते. आज बरोबर सापडले.
Action:
मोहनने जीप सुरू करतो. जीप निघते.
Cut to…
……….
Day/outer /Forest
Action :
एका जंगलातील वाटेवर जीप जाते , जिथे एक नाला पुढे वाहतो आहे. हिवाळा असल्याने पाणी कमी आहे, जंगल रूपांतरित झाले, थंडी मुळे धुके पडलेले आहे.
इथे जास्त पानी शिल्लक नाही. जेव्हा जीप ओढ्याच्या पात्रातून जाते, तेव्हा कुक्कूचा आवाज ऐकू येतो.
Dialog
ईशान :
( आवाजाचा अंदाज घेत )
गाडी थांबवं, पांडू, महादू उतरा व ती झाडावरील कोकिळ पकडा आधी.
Action:
ते दोघे जीप मधून खाली उतरतात आणि झाडाकडे धावतात. कुठून कोकू ,कोकू कोकिळ आवाज येतो ते ऐकतात
Cut to ....
…. ….. ….. …. …..
Day / outer / Forest
Action :
भीवा आणि त्याचे सहकारी एकमेकांकडे पाहतात, त्यांच्या कान उभे राहिले आहे जसे ते तो आवाज लक्षपूर्वक ऐकतात..
Dialog
भिवा :
ये झाका लवकर,
Action:
ते वस्तूं सुरक्षित खड्ड्यात टाकतात.आणि त्यावर माती घालतात आणि त्यावर झाडाची सुकलेली पाने ठेवतात. नंतर, ते जंगलातून लाकडे गोळा करतात आणि एक लहान बिंडा बांधायला सुरुवात करतात.
Cut to ....
………..
Day/ Outer /Forest
Action:
गाडी जाते जाते आहे , एका वळणावर, ईशान धावत्या जीपमधून उडी मारतो आणि धावायला लागतो. चालक जीप थांबवतो आणि इतर जंगल रक्षक त्याच्यामागे धावायला लागतात. तो एक आडव्या झाडावरुन उडी मारतो आणि एका टेकडीकडे धावतो. तिथे पोहोचल्यावर, ईशान आजूबाजूला पाहतो.
Dialog
ईशान :
‘काय करताय इथं येवढ्या सकाळी.
भिवा :
काय नाही साहेब, वाईच लाकड गोळा करताव, चुलीच सरपण संपलय, तवा म्हंटल…..
Action:
तुका तिथे बसला आहे आणि एक छोटी लाकडाची मोळी तयार करत आहे, जो थोडासा त्रासलेला आहे . घामावलेला आहे. दरम्यान, एक जंगल रक्षक तिथे येतो.
Dialog
एक वनरक्षक :
फॉरेस्ट एरीयात विना परमीशन सरपन गोळा करताय, कायतरी गौडबंगाल तर नाय ना.
भिवा :
काय पण नाही साहेब बघा की काटक्याच गोळा केल्यात फक्त.
Action:
ईशान लक्षपूर्वक पाहतो आहे. त्यांचे हात आणि पाय मातीने लाल झाले आहेत. त्याच्या शरीरावरून घाम वाहत आहे, तो आसपास पाहत आहे. काही अंतरावर, एक ठिकाणी उकरलेली माती आढळते तो हसतो. ईशान फॉरेस् रेंजर्स कडे पाहतो.
Dialog
ईशान :
(हसत आत्मविश्वासाने)
काय रे सरपन जमिनीच्या खाली सापडत की झाडावर
वनरक्षक :
झाडावर.
ईशान :
मला तर इथं जमिनी खालीच दिसतंय...राव
Action:
ईशानचे बोलणे ऐकून ते एकमेकांकडे पहात आहेत.
ईशान पुढे सरकतो आणि माती खोदलेल्या ठिकाणची माती दूर सरकते आणि त्याच्या खाली मुजलेल्या वस्तू उघडकीस आणतो. तेथे प्राण्यांची शिंगे, वन्य औषधी वनस्पती आणि कातडे आहेत.
Dialog:
ईशान :
(रागीट मुद्रा)
सरपण गोळा करतात मग हे काय आहे.
पाठीमागे असणारा वनरक्षक :
अरेर.... हे असलं सरपण मी तरी कधी चुलीत घालताना नाही पाहिलं.
दुसरा वनरक्षक :
साहेब ,हे सरपन आता कुणीकडून चुलीत घालायचं.
वनरक्षक :
धरा रे यांना
Action:
ते दोघेही रेंजर्स त्याना पकडण्यासाठी पुढे जातात. त्यातील एकाने त्या दोघांनाही मानेने पकडले आणि झाडाकडे खेचले.
ते किंचाळणे सुरू करतात.
उर्वरित तस्कर हसू लागतात.
दरम्यान, त्यातील एक ईशानला पकडण्यासाठी जातो. त्याला ईशान एक चापट मारतो. तो चक्कर येऊन पडतो.. मग दुसरा एक त्याच्यावर धावतो. इशान प्रत्येकाला एक एक करून मारतो.
थोडया वेळात धूळ उडते. बाकीचे जमिनीवर लोळत आहेत.
त्यानंतर तो राकट माणसाकडे पाहतो. ज्याने दोन वन रक्षकांना पकडले आहे. तो त्याच्याकडे जातो आणि त्याला एक चापट मारतो. तो खाली पडतो.
Dialog:
एक वनरक्षक :
(गळा धरुन दमलेल्या अवस्थेत)
साहेब होते म्हणून बर झाल, नाही तर त्या रेड्यान यमाकडेच पाठवलं असत.
दुसरा वनरक्षक :
तर काय त्याचा तो काय हात म्हणायचा. हत्तीचा पायच जणू. वाचलो बुवा.
ईशान :
आता बघत बसू नका पकडा त्याना ,.... चला बघू त्यांचा हिशोब.
Action:
इतर जंगल रक्षक अतिक्रमण करणाऱ्यां तस्करांना दूर करतात. ईशान शैलीत त्याच्या चेहऱ्यावर गॉगल्स घालतो. व निघतो.
Cut to….
….. ….. ….. ….. …..
Day /next day/ Morning 11.30
Inter – outer- inter.
Forest Office Shirish Salunkhe Forest Officer Cabin
शिरीष साळुंखे घंटी वाजवतो आणि बाहेरून कर्मचारी पांडू प्रवेश करतो.
Dialog:
शिरीष साळुंखे :
पांडू ,..ईशान सर आलेत का?
पांडू :
मघाशी केबिन झाडताना दिसले नाहीत. येतील इतक्यात साडे अकरा झालेत.
साळुंखे :
ते आले की पाठव केबिनमध्ये. अन् हो ही फाईल क्लार्क देशपांडेंच्या टेबलावर नेऊन दे.
पांडू :
जी सर.
Cut to
..... ..... ....
Day /Outer - Inter /Forest office
Action:
दरम्यान, ईशान त्याच्या मोटारसायकलवर तेथे येतो.
बाहेर एक कर्मचारी कार्यालयासमोर उभा आहे.
Dialog
कर्मचारी :
नमस्कार सर,
ईशान :
नमस्कार.
Action:
ईशान त्याच्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये जात असताना पांडू त्याच्या जवळून जात असताना.
Dialog
पांडू :
ईशान सर,
ईशान :
काय रे.
पांडू :
साळुंखे साहेब बोलावत होत?
ईशान,
बर, हा.. ह.. कुठे निघालास.
पांडू :
देशपांडे साहेबाना फाईल द्यायला.
ईशान,
बर, माझं एक काम कर, एवढी बॅग माझ्या केबिन मध्ये टेबलावर नेऊन ठेव.
पांडू,
बर, द्या ती इकडे.
Cut to
..... ..... .....
Day / Inter / Office
Action:
पांडू बॅग घेऊन जातो. ईशान साळुंखे सरांच्या केबिनला जातो. नोक आऊट करून,
Dialog
ईशान :
सर आत येऊ का?
Action:
साळुंखे साहेब टेबलावर असलेल्या फाईलची तपासणी करत आहेत आणि त्याच वेळी वर पाहत आहेत.
Dialog
साळुंखे साहेब :
कोण?.. ईशान ,ये ये, अभिनंदन .
ईशान :
कशाबद्दल,
साळुंखे साहेब :
अरे ,..तू एवढी मोठी तस्करी
पकडलीस, त्याबद्दल.
ईशान :
ती तर माझी ड्युटी होती सर.
साळुंखे साहेब :
पण आजकाल तुझ्यासारख्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांची कमी आहे. तू ज्या कौशल्याने काम करतोस मला तर नवलच वाटत.
ईशान :
काय पण सर, येवढं काय मोठ काम केलं नाहीये मी.
साळुंखे साहेब :
नाही कस, अरे बऱ्याच वर्षापासून आम्हाला गुंगारा देवून हे तस्कर बऱ्याच प्राण्यांची, त्यांच्या अवयवांची, जंगली औषधांची तस्करी करत आहेत. बऱ्याचदा सापळा रचून ही सापडत नव्हते. आपल्यातील काही महाभाग सामील आहेत त्यांना म्हणा, पण तू मोठ धाडस केलस.
ईशान :
उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका सर,
साळुंखे साहेब :
उगाच नाही.खरंच
ईशान :
बर आणखी काय काम होत का माझ्यासाठी, मघाशी पांडूने सांगितल तुम्ही बोलावल म्हणून.
साळुंखे साहेब :
हा,.. हे बघ ही ऑर्डर घे.
Action:
साहेब ईशानला एक लिफाफा देतात. तो घेतो.
ईशान,
यात काय आहे.
साहेब,
अरे आपल्या फॉरेस्ट खात्याची मोठी परिषद अलिबागला आयोजित केली आहे. प्रत्येक विभागातील एक कर्मचारी तिकडे ट्रेनिंग व मार्गदर्शन घेण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. यासाठी फोरेनहून अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक येणार आहेत. आपल्या ऑफिसतर्फे तुझी निवड केली आहे. या लिफाफ्यात सर्व माहिती आहे.ती बघून घे.
ईशान :
ठीक आहे सर, आणखी काही.
साळुंखे साहेब :
आणखी काय, याबरोबरच अलिबाग सफर पण करून ये.
ईशान :
(हसतो)
ठीक आहे सर, येतो,
साहेब :
हा.
Cut to.
……. ……. ……. ……. …… ….
Day /inter- outer/ Exam center Kolhapur medical College
Action:
कोल्हापूर मेडिकल कॉलेजच्या परीक्षा केंद्रात, विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू आहे मुले लेखनात गुंतलेली दिसत आहेत. अचानक, घंटा वाजते, जो वेळ संपलेला असल्याचे सूचित करते. विद्यार्थी त्यांचे पेपर्स जमा करतात आणि परीक्षा केंद्राबाहेर जातात. अन्विका तिच्या जवळच्या पार्क केलेल्या स्कूटीकडे जाते. ती तिच्या स्कूटीची ट्रंकेत उघडते, तिचे पेपर त्यात ठेवते. दरम्यान,)
Dialog :
सौरभ :
काय मॅडम पेपर कसा गेला.
अन्विका :
मस्त सोपा गेला.
Action:
त्याच वेळी, वेदांगी तिथे येते.
वेदांगी :
हाय अनु, हाय सौरभ,
सौरभ :
हाय, काय वेदांगी पेपर कसा गेला.
वेदांगी :
ठिक गेला.
सौरभ :
मग आता परीक्षेच्या अभ्यासातून सुट्टी ना.
वेदांगी :
हो यार, काय सांगू खूप टेन्शन होत ,गेलं एखदास.
(या दरम्यान, सत्विक तिथे पोचतो.)
सात्विक :
हाय वेदांगी, हाय अनु,
वेदांगी व अनु
हाय.
सात्विक :
पेपर कसा गेला?
अन्विका :
मस्त, सोपा होता. तुला रे.
सात्विक :
मस्त
सात्विक :
बर… एनिवे गाईज आपण उद्या एक छोटीशी ट्रीप काढतोय हा.
वेदांगी :
अरे यार,... मला आधी नाही का सांगायचं, घरी वांदे होतात रे, आमचे पप्पा जाम कडक आहेत,
सात्विक :
ये वेदे, उगाच खोडा घालू नकोस ह. तू फक्त हजर रहा.
अग हे आपल शेवटचं वर्ष, परत कधी भेटू न भेटू. तुम्ही उद्या येताय. सगळ्यांचं ठरलंय.
अन्विका :
बर जायचयं कुठ.
सात्विक :
पन्हाळ्याला
अन्विका, चालेल आम्ही येवू.
वेदांगी :
अरे इथे कुठेतरी जवळ काढुया की.
सौरभ :
ये जवळ काय जवळ, हॉस्टेलवर कराय पाहिजे मग ट्रीप.
Cut to
..... ..... ......
Day / Outer /on road
Action:
अन्विका नंबर डायल करून कानाला लावत
Dialog
अन्विका :
हॅलो काका,
(ऑनलाइन फोन)
काका :
हा बोल,
अन्विका :
काका, मी अन्विका बोलतेय.
काका :
हा बोल की अनु बाळ पेपर झाला का?
अन्विका :
हो काका,
काका :
बर कसा गेला? वेदांगी कुठे आहे?
अन्विका :
चांगला गेला , व ती माझ्या सोबत आहे. बर का काका उद्या आम्ही एक छोटीशी ट्रीप काढतोय. पन्हाळ्याला, वेदुला घेऊन जाऊ ना.
काका :
अ..हो.. चालेल की, लगेच येणार ना.
अन्विका :
हो काका सात पर्यंत येऊ संध्याकाळी.
काका :
तू असलीस तर ठिक आहे. चालेल.
काका :
बर तिच्याकडे दे.
Action:
वेदांगी, अस्वस्थ होते आणि फोन घेते.
Dialog
वेदांगी :
हॅलो, बाबा
वेदांगीचे बाबा :
पेपर कसा गेला.
वेदांगी :
ठिक गेला बाबा.
बाबा :
मग आता घरी ये. उद्या जा ट्रीपला पण सात पर्यंत घरी परत यायचं. समजल काय?
वेदांगी :
हो बाबा.
बाबा :
बर आईला घरी गेल्यावर सांग मला जरा वेळ होईल, मी बाहेरच जेवून येईन म्हणावं.
वेदांगी :
बर सांगते. ठेवू का.
बाबा :
ठेव, व अनु बरोबर घरी जा.
वेदांगी :
जी.
Action:
वेदांगी फोन हँग अप करते. आणि अन्विकास आनंदाने मिठी मारते,
Dialog
वेदांगी :
थॅन्क्स अनु, तू असलीस म्हणजे सगळं कोड सोडवतेस. म्हणून मला जाम आवडतेस तू.
अन्विका :
उगाच मस्का नको लावूस.
सौरभ :
मिळाला वाटत हिरवा सिग्नल.
वेदांगी :
अनु असली की मिळतो लगेच.
अन्विका :
बर किती वाजता निघायच, कस.
सात्विक :
सकाळी ८ वाजता निघुया. व प्रत्येकी दोघांमध्ये एक गाडी घेऊ.
अन्विका :
चालेल. मी व वेदांगी येतो दोघी. साडे आठला आहोत आम्ही शिवाजी पुलावर. तुम्ही सगळे या तिथे मग निघू.
सात्विक :
चालेल, मी सांगतो सगळ्यांना.
अन्विका :
बर बाय.
सात्विक :
बाय.
( त्या सर्वांना भेटतात आणि निघतात.)
Cut to….
…. ….. …… …… …… …..
Day/ morning/ Anvika home/ inter
Action:
कोल्हापूर शहर ‘शिव-सदन बंगला’ अलार्म घड्याळ सकाळी सहा वाजता वाजत आहे, अन्विका उठते. ती जोरात उसासा देते. अलार्मचे घड्याळ बंद केल्यावर, ती आपले केस बांधते आणि तिथे टेबलावर एक पिन ठेवते. ती उठून रुममधून खाली जाते. जेव्हा ती स्वयंपाकघरात येते. तेथे तिची आई तिच्या वडिलांचा डब्बा तयार करीत आहे. तिला पाहून,
Diloug
अन्विका :
काय सकाळी सकाळी लई धावपळ चाललीये,
आई :
(चेहऱ्यावर दयेचे भाव दाखवत)
काय सांगू आज जरा उठायला वेळ झाला ग, त्यांना डबा द्यायचाय, जराशी मदत करतेस का? चार चपात्या तेवढ्या लाट, तोपर्यंत मी भाजीला फोडणी देते.
अन्विका :
तुला अलार्म लावायला काय होत?
आई :
आजच उशीर झालाय, उगाच शहाणपणा करू नको, आधी तू कितीला उठलीस बघ.
अन्विका :
माझं काय आहे, माझी तर कालच परीक्षा झालीय.
आई,
अग, काल बचत गटाच्या मीटिंगमुळे थोडा वेळ झाला उठायला.
अन्विका,
पुरे तुमचा तो बचत गट, त्या मीटिंग पाहिल्यात मी, आर्थिक व्यवहारापेक्षा तुम्हा बायका नटून थटून आपल्या साड्यांची व त्यांच्या दरांचीच चर्चा करता.
आई,
तू उगाच नको ते बोलू नकोस, चपात्या लाटणार की नाही ते सांग.
Diloug
अन्विकाचे वडील :
( Oc बाथरुम मधुन)
झाला की नाही डबा.
आई,
झालाच, थोडा वेळ अजून.
Action:
आई अन्विका कडे मदतीसाठी पाहते. हे पाहून, अन्विका बेशीनला हात धुते, ते रुमालाने पुसते, स्वयंपाक घरात जाते आणि चपात्या वळायला सुरवात करते.
Cut to...
…… …….. …….
Day /Morning /Inter /Anvika home
Action:
अन्विकाचे वडील जेवणाच्या हॉलमध्ये येतात आणि अन्विकाची आई चहा आणि नाश्ता देते. ते घेतात, ती तेथे उभा रहाते. उभा राहूनच चहा घेतात.त्यांचा नाष्टा झाल्यानंतर
Diloug
बाबा :
अग, डबा कुठे हाय?
आई :
अरे, देवा थांबा हं,
Action:
अन्विका जेवणाच्या खोलीतून येते. तिच्या हातात डबा आहे.
Diloug
अन्विका :
( हास्य मुद्रेने)
हा हे घ्या,
Action :
बाबा, हसत हसत आणि डबा घेऊन घाईघाईने निघून जातात.
Cut to
…….. …….. …… ……
Inter/ Day / Morning/Anvika HomePlace : dayning hall
Action:
अन्विका आंघोळ पूर्ण करुन केस बांधलेले आहेत. गडबडीत तिचा नाष्टा खात असते.
Diloug
आई :
अग एवढी गडबड कसली आहे. सुट्टी आहे ना? हळू कर नाष्टा.
अन्विका :
मी जरा बाहेर जाणार आहे, ऐनीवे आमची छोटी ट्रीप आहे.
आई :
काय ट्रीप, हे आणि कधी ठरलं, सांगायचं नाही का?
अन्विका :
त्यात काय सांगायचं, इथं जवळच तर जाणार आहे.
आई :
अग ,जवळ म्हणजे कुठे?
अन्विका :
जवळ म्हणजे पन्हाळा, त्यात काय एवढं आश्चर्य करण्यासारखं.
आई :
हे बघ ते रागावतील, उगाच लांब नको.
अन्विका :
पन्हाळा कुठे लांब आहे, इथं जवळच तर आहे.
आई :
अगं पण,
Action:
दरम्यान, तिच भाऊ खाली जिन्यावरून पाहतो
Dialog
अन्विकाचा भाऊ राहुल :
मी ऐकलंय सांगणार बाबांना,
अन्विका :
ये, जा सांग जा चोमड्या, मी घाबरत नाही.
आई :
ये तू गप रे,
( अनूकडे पाहत)
हे बघ अनू बाबांना तरी फोन करून सांग.
भाऊ राहुल :
मला जर पाचशे रुपये देत असशील तर मी मदत करेन बाबांची परवानगी घ्यायला.
अन्विका :
(तोंड वेडावून दाखवत)
काय पाचशे रुपये, ये भिकारड्या, जा तुला देतोय मी पाचशे, कधी ओवाळणीत तरी घातलेस का? पाचशे.
आई :
गप काय पण काय बोलतेस, तो कुठला देईल अजून ज्योबला लागायचाय तो.
अन्विका :
माझं ऐकशीस तर उगाच जोबचा विचार सोडून दे, मी सांगते ते ऐक, बिझनेस कर बिझनेस.
अन्विकाचा भाऊ राहुल :
ये दिदे, दे की ग, मला हवेत, नवीन स्पोर्ट्स टी शर्ट घेणार आहे मी, सांगत नाही बाबांना तुझ्या ट्रीपच, वाटलं तर शपथ घेऊ का?
अन्विका :
हे बघ तू बाबांचं भ्या मला घालू नकोस, मी आधीच परवानगी घेतलीये, व कपड्याचे म्हणत असशील तर ती तिजोरी भरलिये ना तुझ्या कपड्यांनी तिथं नवीन कपडे ठेवायला जागा नाही त्याच बघ आधी.
आई :
काय ग? कधी घेतलीस परवानगी?
अन्विका :
कालच,
आई :
अग पण त्यांना रात्री उशीर झाला न यायला, तू तेव्हा झोपली होतीस.
अन्विका :
मोबाईल कशाला पुजायला आहे. पेपर झाल्यावर मुलांच ठरलं ट्रिपच तेव्हाच बाबांना कॉल केला होता.
अन्विकाचा भाऊ वेदांत :
चला नवीन टीशर्ट क्यांसल.
आई :
तुझा टि शर्ट, गप्प बस, अन् थांबवं ते विनाकारण पैसे खर्च करायचं. कामाचं बघ आदी.
अन्विकाचा भाऊ राहुल :
माझा तेवढा खर्च दिसतो, हिचं ट्रीपच दिसत नाही तुला, ती तेवढी लाडकी अन् मी दोडका काय?
आई :
तिचा नाद करू नकोस, ती अभ्यास करत ओपीडी करते व स्वतःचा खर्च चालवून आम्हाला मदतही करते, समजलं काय.
Cut to .....
...., ..... ......
Day/ Morning/Inter /Anvika Home
Action:
नाश्ता करून, अन्विका बाहेरील हॉलमध्ये प्रवेश करते आणि तिच्या मैत्रिणी वेदांगीला कॉल करते.
वेदांगी फोन उचलते.
Dialog
अन्विका :
काय मॅडम,... कालच लक्षात आहे ना,
वेदांगी :
आहे, तयार होतेय,
अन्विका :
आवरून बस मी येते न्यायला.
वेदांगी :
हा
.......... ..... .....
Day/Outer / Out of Home
Action:
अन्विका फोन ठेवून तिच्या स्कूटरवरून निघून जाते.)
Cut to…
….. …… …… …….
Out. Int/ Rode kolhapur citi vedangi collani / Day /morning
Action:
अन्विका तिच्या स्कूटीवरून जात आहे, सुंदर पंजाबी वेशभूषेत आणि हेल्मेट घालून. ती वेदांगी अग्रावकरच्या अपार्टमेंटच्या बाहेर थांबते आणि हॉर्न वाजवते. हा आवाज ऐकून वेदांगी गॅलरीत बाहेर येते आणि पाहते.
Dialog:
अन्विका :
चल लवकर,
वेदांगी :
आले.
Action:
वेदांगी तिच्या छोट्या पर्ससह आपल्या घरातून निघते. तिचे वडील सोफ्यावर पेपर वाचत आहेत, तिला जाताना पाहून.)
Dialog
वेदांगी बाबा :
( तिरकस पहात)
वेदांगी अन्वीका आहे म्हणून जाऊ देतोय, पण सातच्या आत घरात परत आली पाहिजेस समजलं काय?
वेदांगी :
(घाबरलेल्या अवस्थेत)
जी बाबा.
बाबा :
हं आणखी एक, मी तुझं लग्न ठरवतोय, आता भरपूर शिकणं झालं.
वेदांगी :
बरं,
बाबा,
अन् फोन घेऊन जा,
वेदांगी :
हा,
Cut to
..... ...... .....
Outer /Day /on road
Action:
वेदांगी बाहेर येते. जिन्याने पायऱ्या उतरत आहे. आण्विकाच्या स्कूटी कडे जाताना तिला येताना पाहून
Dialog
अन्विका :
काय सुरमई, इतका वेळ,
Action :
स्कूटी वर बसत
Dialog
वेदांगी :
तुझ्यासारख आहे होय, शंभर सूचना ऐकाव्या लागतात इथे.
अन्विका :
( तोंडाची विचित्र ॲक्शन करत)
असे काय ग तुझे बाबा, काय तर म्हणे, ये वेदे लवकर घरी ये, फोन करत जा. अन् काय , कुठल्या मुलासोबत दिसलीस तर याद राख, मासा सोलल्या सारखं सोलीन,
कुणी या बाबाला ऑफिसर बनवलं देव जाणे, त्या पेक्षा मासळी बाजारात पाठवल पाहिजे मासळी सोलायला, एवढं शिकला तरी जुनाट विचार,
वेदांगी :
ये गप,
अन्विका :
गप काय गप, स्वतःच्या पोरीवर जरा देखील विश्वास नाही, काय पळून जाते की काय?
वेदांगी :
(घाबरत)
ये बाई पुढे रस्त्याने तुझे रामायण लाव , चलं इथनं, ऐकतील ते.
Action:
स्कुटी स्टार्ट करुन चालवते
अन्विका :
जा घाबर जा तू, मी नाही घाबरत त्या हिटलरला, म्हणूनच मी तुमच्या घरी येत नाही, त्या सूचना ऐकूण कान किटलेत माझे, एक सूचना कोश होईल त्यांचा संचय केला तर.
वेदांगी :
ये बाई तुझी चावचाव बंद कर व बाकीचे कुठं आहेत ते बघ आदी.
Action:
अन्विका गाडी चालवत असताना कॉल करते.
अन्विका :
( फोन वर)
अरे, सात्विक आम्ही निघालोय पंचगंगा पुलावर पोहोचू थोड्या वेळेत.
Action:
मोबाईल वेदांगीला देते, आन्विका गाडी चालवते.
Cut to..
…. ….. …… …… ….. ………
Morning. /. Day / outer. On road
Action:
अन्विका ड्रायव्हिंग सुरू करते. थोड्या अंतरानंतर, वेदांगीला नाराज पाहून
Dialog
आण्विका :
काय झालंय तोंड पाडून बसायला.
वेदांगी :
(नाराज चेहऱ्याने)
काय नाही, उगाच तुझा मुड जायला नको.
आण्विका :
सांग तरी काय झालय ते. पेपर गेलेत ना नीट.
वेदांगी :
पेपरच काय नाही ग, गेलेत सोपे, पण इथं वेगळच वादळ घोंगावतय.
आण्विका :
कसलं वादळ, सांग तर, व कोड्यात बोलायचं सोड स्पष्ट बोल
वेदांगी :
लग्न जमवतायत घरी.
आण्विका :
कुणाचं ,
वेदांगी :
कुणाचं म्हणजे ?...माझं आणखी कुणाचं.
आण्विका :
मग छान आहे की लग्न कर अन् बस सुखान संसार करत.
वेदांगी :
तुला तर नेहमीच चेष्टा सुचतेय नाही.
आण्विका :
अग, तस नाही थोडी गंमत केली.
वेदांगी :
तुला काय गंमत करायला.
आण्विका :
तुझ्या घरच्यांना कसली घाई झालीय गं. इंटरशिप तरी होऊ द्या म्हणावं.
वेदांगी :
इंटरशीप वगैरे काही नाही. आधी लग्न कर म्हणतात.
आण्विका :
कोण म्हणतंय आई की बाबा.
वेदांगी :
आणखी कोण? ..बाबा
आण्विका :
तुझ्या बाबाला कसली घाई झालीय. सदान कदा घाईतच असतात. तुझी आई कशी नांदत असेल देव जाणे.
बर ते सोड अचानक कसं काय ठरवतायेत.
वेदांगी :
कालपर्यंत वातावरण ठीक होत. काल कामावरून आल्यापासून चाललय.
कालपासून कसल्यातरी टेन्शन मध्ये आहेत.
आण्विका :
काल काय झालं एवढं, डायरेक्ट लग्नावर आल्यात.
वेदांगी :
अग ती तन्वी आहे ना.
आण्विका :
ए बाई थांबवं तुझ तन्वी पुराण. कंटाळा आलाय ते सारखं ऐकूण.
तुझे बाबा नेहमी तिचेच गोडवे गात असतात.
काय तर म्हणे, तन्वी लवकर उठते, डब्बा करते, कॉलेजला जाते, पोळ्या करते. वगैरे वगैरे, विट आलाय नुसता सारखं तेच तन्वी पुराण ऐकूण.
वेदांगी :
(आश्चर्य भाव)
अग, ते पूराण सोड, महाभारत घडलय, ऐकल्यावर हसशील.
आण्विका :
काय झालंय आणखीन.
वेदांगी,
अग त्या तन्वीला पृथ्वीराज घोड्यावर बसवून घेऊन गेला ना!
आण्विका :
काय म्हणतेस, तन्वी गेली पळून
Cut to…..
……. …… …….. .......
Day /Outer /Morning /On road and on pool
Action:
त्या पंचगंगा पुलावर पोहोचतात जिथे त्यांचे मित्र त्यांची वाट पाहत आहेत.
Dialog
सात्विक :
त्या बघ आल्या त्या
Action :
त्या येताच
एकजण :
काय हे? किती उशीर....
आण्विका :
अरे बाबा, काय सांगू तुला वेदीच्या घरी जाऊन तिला घेऊन यायचं म्हणजे
सात्विक :
ते आपण नंतर बोलू, चल बाकीचे पुढे गेलेत. उगाच आणखी वेळ नको.
आण्विका :
चला तर मग
Action :
ते सर्वजण निघतात.
Cut to……
….. ….. ….. ….. …. ….
Continue…..
No comments:
Post a Comment