कळत नकळत जुळलेले बंध भाग २
Respectively. To be continued……
Day / Morning / Outer/ kolhapur – on the road
Action :
अन्विका पन्हाळा रोडवर स्कूटी चालवण्यास सुरवात करते.
Dialog
आण्विका:
हा आता सांग पुढलं
वेदांगी :
अग ती तन्वी आहे ना,
आण्विका :
हा
Action :
ड्रायव्हिंग स्क्यूटी
Dialog
वेदांगी :
ती गेली पळून शेजारच्या दातक्या मोहन बरोबर.
आण्विका :
काय खरंच.
वेदांगी :
हो, काल बाबांना कळलं, अन…
आण्विका :
खर सांगू काय वेदे, आज तुमच्या घरी यायलाच हवं होतं. तुझ्या बाबांचा पडलेला चेहरा बघायला.
काय तिचं कौतुक करायचे, बर झालं गेली पळून ते, आता तरी उघडले का डोळे तुझ्या बाबांचे?
वेदांगी :
कुठले उघडतात,पळून गेली ती अन् शिक्षा आम्हाला सुरू, त्यांच्या डोक्यात आता मी पण जाईन कुणाचातरी हात धरून म्हणून माझं लग्न जमवायचं चाललंय.
आण्विका :
असं आहे तर, कमाल आहे बाई तुझ्या बाबाची.
वेदांगी :
मामाला फोन पण झालाय, तो लागला लगेच कामाला,
आण्विका :
एवढ्या लगेच,……
( तोंड वाकडे करत)
मामा सुद्धा राहिला नाही बघ तुझा.
वेदांगी :
आमचा कोळी समाज तिकड लांब आहे ना, मला तर वाटतयं आता काय बाबा ऐकणार नाहीत!
आण्विका :
म्हणजे सुपारी फुटणार तर तुझी या एक दोन महिन्यात.
अग, मुलगा बघितलास का काय करतो ते.
वेदांगी :
मी बघायच्या आधीच ७५% ठरलंय.
आण्विका :
असे कसे तुझे बाबा पाहणं नाही, बोलचाल नाही, मुलगीची पसंती काय आहे की नाही. लगेच कंडका पाडायला.
वेदांगी :
त्यांना वाटतयं मी जर का तन्वी सारखी गेले पळून तर त्यांचं नाक कापेल.
आण्विका :
नाक आहे कुठे त्याचं कापायला. नकटे तर आहेत.
वेदांगी :
काय म्हणालीस, तुला चेष्टा सुचतेय.
आण्विका :
तस नाही ग मला म्हणायचेय, अस का वाटत त्यांना?
वेदांगी :
ते तरी काय करणार नोकरी मुळे कोल्हापूरला यावे लागले. आमचा अग्री कोळी समाज तिकडील कोकणातील , इकडे सगळे घाटी लोक. कुणासंगे गेले तर. हाच विचार घोळतोय मनात.
आण्विका :
त्यांचं तरी चुकीचं कसं म्हणायचं. कायम नटून थटून असतेस. अस वाटणं स्वाभाविक आहे.
वेदांगी :
काय म्हणाली
( तिच्या डोक्यावर टपली मारत.)
Dialog
आण्विका :
आई ग, ए मारू नको की.
आण्विका :
स्वतः च काढलेल्या पोरीवर विश्वास नाही साधा त्यांचा.
वेदांगी :
नाही तर काय? मला तर खूप राग येतो बघ.
आण्विका :
म्हणजे काय,... तू तर जाणार म्हण, ...कोकणात सुरमई खायला.
वेदांगी :
गप्प ग, मामा स्थळ काढणार म्हणजे तो आधी झिंग्याल्याला, त्याच स्थळ पण तसच झिंग्याल्याल असणार.
आण्विका :
फोटो, बायोडेटा तरी पाहिलास काय.
वेदांगी :
फोटो नाही पणं बायोडेटा पाठवलाय पपांच्या फोनवर.
आण्विका :
तू पाहिलास काय?
वेदांगी :
हो पाहिलाय,
आण्विका :
तुझ्याकडे आहे आता.
वेदांगी :
आहे की, कालच चार्जींगला त्यांचा फोन असताना माझ्या मोबाईलमध्ये सेंड केला.
Action :
मोबाइल हातात घेत, ती स्क्रीन उघडते आणि ती दाखवते.
Dialog
वेदांगी :
हा बघ
Action:
(अनविका स्कूटी बाजूला हलवित असताना, ती आपल्या मोबाईल फोनवर मेसेज तपासते.)
Dialog
आण्विका :
अग, हे सगळ ठीक आहे. पण तो कसा दिसतो ते तरी माहीत आहे का?
हे बघ तुला मी सांगते ...मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होईलच ना, जर चांगला वाटला तर लग्नाला उभ राहायला काय हरकत आहे.
वेदांगी :
शहाणीच आहेस, तो काळा असुदे नाहीतर गोरा. त्यापेक्षा बेवडा नसला म्हणजे मिळवलं, त्याच्या चार पाच प्रेमिका असल्या तर माझं कसं होईल, ती माहिती नको का काढायला.
आण्विका :
ते तर काढायलाच हवं, बर चल कॉल येतोय पोरांचा जाऊ, नंतर बघू काय करायचं ते. आता दिवसभर फ्री रहा. उगीच या टोळक्याना संशय नको यायला.
वेदांगी :
बर.
Action:
(अन्विका स्कूटी पुढे चालवते.)
Cut to …..
…. …… …… ….. …… ……
Day/ Afternoon. / Outer / Place : panhala
Action :
सर्व मित्र आणि अन्विका आणि वेदांगी हे सर्व फिरत आहेत. आणि एकाच ठिकाणी एकत्र येतात.
Dialog
सात्विक :
अरे खूप भुक लागलेय फिरून, चला काहीतरी पोटपूजा करूया.
वेदांगी :
हो तर मला पण लागलीय, चला की काहीतरी खाऊया.
आण्विका :
चला तिथे एक माझ्या ओळखीचं स्टॉल आहे. तिथे मस्त नाष्टा पाणी मिळतं.
Action:
ते तिथे जातात. लोणी डोसा ऑर्डर करतात. प्रत्येकाला नाष्टा आवडतो. लोणी डोसा.
Dialog
मदन :
वाव मस्त, आवडला मला.
अगदी कोल्हापूर सारखं आहे नाही.
सात्विक :
बाळा हे ठिकाण पण कोल्हापूर जिल्ह्यातच आहे हा.
मदन :
पण कोल्हापूर पेक्षा चार्जेस कमी आहेत इथे.
सात्विक :
ये अनुच्या ओळखीमुळे चीफ दरात मिळालाय डोसा. नाहीतर
मदन :
नाहीतर काय?
सात्विक :
बघ तिकडे पाटी.
Action :
मदन बोर्ड कडे पहातो.
Dialog
मदन :
अरे हो रे. खरंच.
Action :
मदन अन्विका कडे पाहत.
Dialog
मदन :
थ्यांक्स अनु,
आण्विका :
गप रे, त्यात काय थ्यान्क्स मानायचे.
बर ही ट्रीट माझ्याकडून ह.
सात्विक :
काय ,
आण्विका :
मग द्यायला नको का? म्हंटल शेवटची आपली कॉलेजची भेट आहे. यानंतर जो तो आपापल्या कामात असणार. म्हणून आपण द्यावी एखादी नाष्टा ट्रीट. आवडली का?
मदन :
हो आवडली की.
बर चला वेळ होतोय. थोडी राहीलेली ठिकाणे पाहू अन् जाऊया.
सर्व मित्र :
हो, बर थ्यांक्स हं अनु.
Cut to ......
…. ….. …… …
Evening / Panhala kolhapur rod/ Outer
On skuty
निरोप घेवून परतताना वाटेत.
आण्विका :
मग काय ठरवलस
वेदांगी :
अजून काही ठरवलं नाही. तू काहीतरी सुचव की.
आण्विका :
चल मग घरी गेल्यावर बघू.
वेदांगी :
घरी, केव्हा? नको इथंच बोलू की, नाहीतर घरी बाबा ….
(वेदिक बोलणे थांबवते.)
आण्विका :
तू गप ग, बघते मी तुझ्या बाबांना.
Action :
अन्विका बाजूला स्कूटी थांबवते आणि फोन लावते. वेदांगीचे वडील फोन उचलतात.
Dialog
आण्विका :
हॅलो काका,
वेदांगीचे बाबा :
हं बोल आनु कुठे आहात, आलात की नाही.
आण्विका :
निघालोय आम्ही परत, सहापर्यंत पोहोचू , पण…
वेदांगीचे बाबा :
पण काय आणखीन,
आण्विका :
वेदुला आज घरी जेवायला नेवू का?
वेदांगीचे बाबा :
घरी की बाहेर कुठे?
आण्विका :
घरीच, दीदी आलेय, त्यामुळे जेवणाचा बेत आहे. म्हटलं परीक्षा झालेय, व बरेच दिवस झालेत तिला बोलवायचं म्हणतेय जेवायला. म्हणून ..जरा.
वेदांगीचे बाबा :
चालेल सोड मग जेवल्यावर पण लवकर या,.. इकडे तिकडे फिरत बसू नका.
आण्विका :
बर काका.
Action :
अन्विकाने फोन खाली ठेवला.व पुन्हा आपल्या घरी फोन केला.
Dialog
आण्विका :
हॅलो आई.
आई :
हा बोल बाळ, कुठं आहेस, निघाला की नाही.
आण्विका :
अग निघालोय आम्ही झालं आमचं पाहून येतोय थोड्या वेळात. बर ऐक, आज मी वेदूला घरी बोलवलेय बघ जेवायला
आई :
बर, या लवकर.
Action :
(अन्विका फोन ठेवते.)
Dilaug
वेदांगी :
आज काय खास बेत आहे का?
आण्विका :
हो,
वेदांगी :
काय ग सांग की.
आण्विका :
काय नाही ताई आलेय, बिर्याणीचा बेत आहे.
वेदांगी :
वाव, मग काय मज्जाच मज्जा
आण्विका :
मज्जा करायला आधी घरी तर जायला हवं.
वेदांगी :
बिर्याणी कोण करणार?
आण्विका :
कोण म्हणजे?.. अपकोज ताई आणखी कोण?
वेदांगी :
हे आपल बर नाही ह. ताई दोन दिवस आली सुख खायला अन् तिला काम लावायच.
आण्विका :
मागचे आठ महिने आम्ही केलीय सेवा म्हणून ती आमची आज करणार आहे. तिनेच बेत आखलाय
वेदांगी :
पण आपण काहीतरी मदत नको का करायला.
आण्विका :
करू की,... बिर्याणी खायला.
(हासत)
(असे म्हणून आण्विका गाडी मारते.)
Cut. To.
….. …… ….. ….. ….
Outer – inter evening. Anvika house
Action :
अन्विका आणि वेदांगी अन्विकाच्या बंगल्यावर पोहोचतात. ती स्कूटी व्यवस्थित पार्क करते.
Dialog
वेदांगी :
पोहोचलो एकदासे.
अग बाई, मी बाळाला एखाद खेळन घ्यायचं म्हणते.
आण्विका :
ए बाई गप्प चल,
वेदांगी :
थांब आलेच.
Action :
( वेदांगी बाहेर जाते.)
Dialog
आण्विका,
अग ये एक की… गेली ऐकतच नाही.खेळणी भरपूर आहेत. काय दुकान काढायचेय.
Action :
(अन्विका स्कूटी लावते आणि घरात जाते, जिथे एक लहान बाळ आनंदाने बाहेरील हॉलमध्ये खेळत आहे, ते आपला अंगठा चोखत आहे आणि अन्विकाची आई त्याच्या बाजूला बसलेली आहे.)
Dialog
आण्विका :
( बाळाकडे प्रेमळ पहात.)
अरेरे, बाळ आहे, पाय धुवायच राहिलच.
Action :
(अन्विका मागे वळून तिचे पाय धुण्यासाठी तळघरात जाते. आई अन्विकाकडे पहात आहे.)
अन्वीकाची आई :
आलेले ले... कोण आलय बघ,.. मावशी आलेय.
आण्विका :
काय रे काय चाललय, मम्मी कुठ हाय.
आई :
(दरवाजा कडे पहात)
ती होय जेवणं करतेय.
अग, वेदु कुठेय.
आण्विका :
गेलीय खेळणं आणायला.
नको म्हणताना ऐकतेय कुठे?
Action :
(वेन्दांगी येताच, अनविका तिच्याशी बोलने सुरू करते.)
आण्विका :
ते आधी खाली बेसमेंटला जाऊन पाय धूवून ये. लहान बाळ आहे ना.
वेदांगी :
अरे हो खरंच, थांब आले. हे
(टेडी भालू देत.)
(अन्विका टेडी भालू हातात घेत.)
आण्विका :
अरे टेडी, बघ बाळा तुझ्या वेदू मावशीनं काय आणलय ते. टेडी आणलाय. चल आपण मस्ती करूया.
आई :
काय ग इतका वेळ, सकाळी गेला होता.
आण्विका :
रंकाळा बघायला गेलो नव्हतो. पन्हाळा फिरायला गेलो होतो. सगळा किल्ला पाहायचा म्हणजे होणार की वेळ.
Action :
( वेदूने तिचे पाय धुते. व बाळाजवळ येऊन बसते
आण्विका बाळाकडे पहाते.)
Dialog
आण्विका :
बघ वेदू मावशी.
वेदांगी :
काय रे काय चाललय, सायकल मारतोयस, मार जोरात.
(दरम्यान, सातचे ठोके पडतात.)
आई :
सात वाजलेत जा जरा मदत कर जा तिला. दुपारपासून ती एकटीच करतेय. मला साध भांड्याला सुद्धा हात नाही लावू दिला.
अन्विका :
मात्रुसेवा चाललेय म्हण की सरळ.
Action :
(अन्विका वेदांगीला मुलाकडे बघण्यास सांगते आणि आत जात असते. दरम्यान, ताई स्वयंपाकघरातून बाहेर आली.)
Dialog
आण्विका :
चल मी आले मदतीला.
ताई :
झालंय सगळं. भांडी तेवढी स्वच्छ करून घे.
आण्विका :
बरं.
(अणू आत जाते.)
Cut to
...... ..... ..... .....
Night/ Inter / Anvika Home/ hall and Room
आण्विका हॉल मध्ये आल्यावर ,
Dialog
आण्विका :
( गप्पा मारणाऱ्या वेदांगीस)
चल आत.
( Action : वेदांगी मागे जाते)
Cut to …,
….. ……. …… …… ……
Anvika room/ Inter / Night 7.30
Action :
( अन्विका आणि वेदांगी खोलीत प्रवेश करते. आणि टेबलाच्या ड्रॉवरमधून तिचा लॅपटॉप्स काढते.)
Dialog
आण्विका :
दाखव बायोडेटा.
वेदांगी :
( मोबाईल फोन स्क्रिन दाखवत )
हा घे.
Action :
(अन्विका नेट चालू करते आणि बायो डेटावर ऋषिकेश अग्रावकर यांचे नाव प्रविष्ट करून शोधते.
सात किंवा आठ लोक येतात. नंतर जन्म तारखेशी संबंधित आयडी निवडते.
एक काळी स्क्रीन दिसते.)
Dialog
आण्विका :
वेदे, हा बघ चालतोय का?
वेदांगी :
ई…नको ग बाई मला. त्यापेक्षा बिन लग्नाची राहीन मी.
(दुसरी प्रोफाइल पाहाते. त्याचे लग्नाचे फोटो पाहून )
अण्विका :
याच तर वाजलय.
Action :
तिसरी प्रोफाइलकडे पाहते. कोणताही फोटो नसतो. परंतु जन्मतारीख, ठिकाण आणि सर्वकाही जुळते. त्यावर पत्ता. आहे आणि तळाशी एक अभिनंदन संदेश आणि गट फोटो आहे. ते पहात आहे
आण्विका :
हा, ही तुझ्या नवऱ्याची आय डी आहे. याची माहिती हवी. यामधील तो कोणता हे कळायला हवं.
Action :
वेदांगी नाराज असते.
……….
Inter /Dayning hall / Anvika home
Action :
दरम्यान, बाहेर, ताई जेवणाच्या टेबलावर जेवन देत असते.
आण्विकाची बहिण :
( oc)
पाने वाढलेत या दोघी जेवायला.
आण्विका :
आलो, आलो,
वेदांगी :
आता काय करायचं?
आण्विका :
हे बघ आधी जेवू नंतर मग ठरवू काय करायचे ते.
Action :
त्या जेवायला जातात.
Cut to……..
….. …… …. ….. ……
Outer / On the Road in kolhapur City / . Night /9.०० o clock
Action :
अन्विका वेदांगीचा संतप्त मूड पाहून वेदांगीला घरी सोडायला जाते.
Dialog
आण्विका :
कशाला जास्त विचार करतेस. सगळ काय आपल्या मनासारखं होईल का?
वेदांगी :
तस नाही पणं…
आण्विका :
लग्नचं होतय ना. कुठल्या जेलमध्ये तरी टाकत नाहीत ना?
वेदांगी :
ते तर आहेच.
आण्विका :
हे बघ लग्न हे तर करावेच लागणार. व आता आपल वय पहाता घरच्यांनी आपल्या पायावर उभे राहण्याइतकं शिक्षण तरी दिलेय व ते आपल्या भल्याचाच विचार करतात ना.
वेदांगी :
ते खरंय ग पणं घरच्यांनी जरा माझ्या मनाचा विचार तरी घ्यायल हवा होता.
आण्विका :
हे बघ तुझ लग्न विचार करूनच ठरवतील. उगाच कुण्या ऐर्या गैर्याच्या गळयात नाही टाकणार तुला. आता फक्त प्रश्न आहे. की तो दिसतो कसा हे पाहायचा व त्याचा स्वभाव कसा आहे? तो काम कोणत करतो? याचाच.
वेदांगी :
हो ते कळलं की बस, आणखी काय हवं.
आण्विका :
हे बघ तो कसा दिसतो. व त्याचे कामकाज वगैरे सर्व हिस्ट्री मी काढते. माझे काका आहेत. की कोकणात अलिबागला. त्यांकडून काढेन माहिती. हा मी पण आता सुट्टीला तिकडे जाणार आहे. तेव्हा समजेलच की सगळं.
जर का मुलगा बरा वाटला. तर होकार दे लग्नाला नाहीतर बघू दुसरा. मी समजावेन काकांना. काळजी करू नकोस.
वेदांगी :
चालेल मग, कर चौकशी तेवढी.
Cut to……
….. …… …..
Action : And Dialog explane
1) Photo Sanyogita
संयोगिता अन्विका आणि वेदांगी यांची मैत्री आहे, त्या तिघी 5 व्या इयत्तेपासून एकत्र शिकत आहेत. एखादीची समस्या तीघींची समस्या मानली जाते.
2) Photo of Vedika, Anvika and Sanyogita eating Bhelpuri
त्या तिघी इतक्या जवळ आहेत की त्या भेल किंवा पानिपुरी असो की ते एकत्र खातात.
या तिघींच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करुन देणे आवश्यक आहे.
2) Vedangi Photo,
ती रायगड जिल्ह्यातील कोळी समुदायाची आहे, तिचे वडील सरकारी सेवक आहेत आणि त्यांची कोल्हापूरमध्ये बदली झाली. त्यावेळी वेदांगी पाचव्या इयत्तेत होती. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे ते येथे टिकून राहिले आहेत. परंतु ते नवीन पिढीच्या विचारांशी सहमत नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की मुलगी आज्ञाधारक असावी. म्हणून, त्यांनी वेदांगीवर बारीक नजर ठेवलीय. ते तिचे दप्तर तपासत असो किंवा तिचे मोबाइल संदेश तपासत असो, ते नेहमीच तिच्यावर लक्ष ठेवत असतात. त्यांचा एकच विचार आहे की जर आपली मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडली आणि पळून गेली आणि त्याच्याशी लग्न केले तर त्यांचे नाक कापले जाईल. म्हणून, ते जागरुक आहेत. त्यांची पत्नी खूप साधी आहे. ती गरीब मूक गायी सारखी प्रत्येक गोष्ट ऐकते.
3) Sanyogita Photo:
ती मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. तिचे वडील ड्रायव्हर आहेत, म्हणून ते केवळ घर चालवू शकत. जर एखाद वर्गात भांडण झालं असेल तर ती ते सोडवायची. तिचा मैत्रीपूर्ण स्वभाव होता. पण जेव्हा ती १२ वी इयत्तेत होती, तेव्हा तिच्या वडिलांना समजले की ते तिला पुढील शिक्षण देऊ शकणार नाही आणि तिच्या लग्नाची जोडणी केली. व लग्न केले .आणि तिचा संसार सुरू झाला.आपल्या दोन मुलांची काळजी घेत. पती आणि भांडखोर सासूला सांभाळते. तिची कडक सासू तिला टोमणे मारत असे. मग अन्विकाने तिला ब्यांकेतून कर्ज काढून दिले आणि कपड्यांचे दुकान काढले. तिने आपले जीवन व्यवस्थापित केले आणि ते इतके मोठे केले. आज, सात किंवा आठ लोक तिच्या हाताखाली काम करतात.
तिची सासू, जी एकेकाळी कठोर चिडवण्यास ओळखली जात होती, आता गुलाबाच्या पाकासारखी मऊ व गोड बनली आहे.
4) Anvika. Photo,
अन्विका गोड, कोमल आणि पाहण्यास सुंदर आहे. पण तिचा स्वभाव खूप शांत आहे. परंतु ती स्वतःच कोणालाही दुखावत नाही, परंतु जर कोणी तिच्याशी कोणत्याही कारणास्तव वाईट बोलले तर ती त्वरित भांडण करते. पण ती तिच्या मित्रांना मदत करते. तिची मोठी बहीण विवाहित आहे. तिचे वडील एका चांगल्या कंपनीत काम करतात. तिची आई गृहिणी आहे आणि तिचा भाऊ शिकत आहे.
Cut to……
….. …… …… …… ……
Night /1०.०० p.m./ Anvika home /outer – inter
Action :
अन्विका एक स्कूटीसह गेटमधून येते. आणि घरात प्रवेश करते. ती तिचे शूज काढून टाकते आणि त्यांना स्टँडवर ठेवते. आणि बाथरूममध्ये जाते आणि ताजे होते. टीव्ही चालू आहे. घरात प्रत्येकजण टीव्ही मालिका पहात आहे. बाळ खाली कार्पेटवर खेळत आहे. अन्विका बाळाजवळ बसली आहे. ती सिट्टी वाजवते. त्यानंतरच तिचे वडील स्वयंपाकघरातून हॉलमध्ये येतात. त्यांनी जेवण संपवले आहे. आई मागून येते आणि त्याच्या हातात बडीशेप ठेवते.
ती ते खातात आणि सोफ्यावर बसतात.
Dilaug
बाबा :
काय अनु ट्रीप कशी झाली?
आण्विका :
झाली ना मस्त.
सुलभा : (आण्विका आई)
म्हणजे तुम्हाला कळलं तर.
बाबा :
कळलं म्हणजे मला विचारूनच ती गेली होती.
सुलभा :
हे आपल बरं आहे हं तुमचं, आमच्या पुढे भांडायच, व मागील बाजूने तह तुम्ही करायचा.
बाबा :
तह वगैरे काही नाही हं. ती कोणतंही काम मला विचारायच्या आधी करत नाही.
बाबा :
बर आता सुट्टीत काय करणार आहेस? काही क्लास वगैरे लावणार आहेस का?
आण्विका :
नाही, काही क्लास वगैरे नाही लावणार. पण जरा मावशीकडे जावून यायचं म्हणते. गेली चार वर्षे ती बोलावतेय. पण माझा अभ्यास असल्याने चार वर्षे नाही जाता आले. व त्यामुळे ती रुसलेय.
बाबा :
मग जा ना बाळ. पण तुला सोडायला कोण जाणार. माझ्या तर सुट्टया जास्त पडलेत. व आता काम पण वाढलंय. त्यामुळे मला वेळ नाही मिळणार.
(तिथे बसलेल्या त्याच्या मुलाकडे पहात . )
. Dilaug
बाबा :
काय रे तू जातोस का सोडायला?
• मुलगा :
मला वेळ नाही. माझी पण एक्साम जवळ आलेय.
आई :
अरे असे काय करतोस. एकाच तर दिवसाचा प्रश्न आहे. जा की सोडून ये जा. एकटी कशी जाईल पोर.
मुलगा :
मला वेळ नाही. म्हणजे नाही.
आण्विका :
नको मला कोण सोडायला. मी काय लहान नाही. जाईन मी एकटी.
दीदी :
तू एकटी जाणार. ये…… असा काय करतोस रे. समजत नाही. जा की सोडून ये.
भाऊ :
गेलो असतो ग. पण माझी एक्झाम आहे ना. तिला येवढच जायचयं तर पंधरा दिवस थांबाय सांग. पेपर झाला की येतो सोडून.
आण्विका :
काही नको. मी जाईन एकटीच. मी काय आता लहान नाही. व मला स्वतःच संरक्षण येत करता. व मी काही दिवसाचीच जाणार आहे.
बाबा :
बर कधी जाणार आहेस?
आण्विका :
परवा निघायचं म्हणते.
बाबा :
रिझर्व्हेशन करू का गाडीच.
आण्विका :
कशाला नको. बघते मी काय करायचं ते.
आई :
बर , जातीस तर मावशीकडून जेवणाच्या नवीन रेसिपी शिकून घे काय?
ताई :
अग आई ती डॉक्टर आहे. तिला काय पडलेय जेवणं करायचं. व आजकाल बऱ्याच रेसिपी आहेत युटुब वर व तिला येतं सगळ.
आण्विका तू जा एन्जॉय कर जरा, समुद्र किनारा फिरून कुलाबा पाहून ये.
Action :
(दरम्यान, बाळ रडण्यास सुरवात करते.)
दीदी :
अलेलेले काय झालं रडायला. मावशी सोबत फिरायला जायचय. नेत नाही का तुला. थांब तीच घर आपण उन्हात बांधू काय. अन् गेली तर जाऊ देत आपण राहू इथ आजोबांनी आणलेलं खाऊ संपवू काय. जा म्हणावं आमची दिवाळी सुरू.
आण्विका :
पंधरा दिवसांसाठी चाललेय. आयुष्यभरासाठी नाही हा. ये टग्या आईच लई ऐकू नकोस हं. मागचे आठ महिने मी व माझ्या आईने सेवा केलीय तुझी. तुझी आई पडली होती लोळत अंथरुनावर.
दीदी :
हो का मग जा आता झोपायला आम्हाला मालिका बघू दे.
आण्विका :
काय त्या मालिका सारख्या बघता देव जाणे. चुगल्या चाहाड्या शिवाय भांडण तंट्या शिवाय काय आसत सांग त्यात. मी जर देशाची पंतप्रधान असते. तर सगळ्या मालिकाच बंद करून टाकल्या आसत्या.
दीदी :
ये गप, मालिका बंद करते. सुया टोचून गोळ्या देण्याऐवजी सोपं वाटल काय?
आण्विका,
माझा पेशा एवढा सोपा वाटतोय तर फक्त एक दिवस, नको.. नको..., फक्त एकच रात्र काढून दाखव सी पी आर च्या मुडदा घरात. आहे का हिम्मत?
दीदी,
इ… नको ग बाई… तूच जिंकलीस, राम राम….. रात्रीच्या वेळी नको ती नावे घेतेस. जा तिकड.
आण्विका,
कशी जिरली. बर गुड नाईट …
Action :
(अन्विका झोपायला खोलीत जाते.)
Cut to…..
….. …… …… …….
After two days
Morning. / Inter / Anvika home
Action :
( अन्विका तिची बॅग पॅक करीत आहे. दरम्यान, आई काही मसाले, चटणी, लाडू डब्बा आणते.)
Dialog
आण्विका :
(त्याकडे पाहात)
ए बाई काय काय नेऊ मी. इथ माझ्या वस्तूपेक्षा तुझच पार्सल जास्त दिसतंय.
आई :
जास्त नाही थोडेच देते. वाटल्यास रिक्षा करून जा बसमधून उतरल्यावर.
आण्विका :
मला डॉक्टर सोडून हमाल बनवालियास म्हण.
आई :
हे बघ तिथं वाटल्यास रेवतीचे कपडे घाल. पण एवढं ने. तिला बर वाटेल.
दीदी :
काय बहिणीवर प्रेम उत्तू चाललय बघ.
Action :
(अणु बॅग पॅक करते. व आपला कॅमेरा देखील घेते.
सर्वांना नमस्कार करते. दरम्यान, ताई आतून दही आणि साखर आणते.)
आण्विका :
बाळ कुठाय?
ताई :
झोपलाय तो.
Action :
अन्विका सर्व वडिलधार्यांना नमस्कार करते आणि आत जाते. गादीवर बसते.
अन्विका बाळाला पाहून आत जात आहे.
Dialog
आण्विका :
अरे लबाड, झोपलाय काय, मावशीला नाही का टाटा करायचा.
( अन्विका बाळाचे पापे घेते. दरम्यान, वडिलांनी गाडी बाहेर काढतात.)
Dialog
बाबा :
ये आटप लवकर बस निघेल. मला पण कामावर जायला उशीर होतोय. चल लवकर.
Action :
(अन्विका सर्व वडिलांना अभिवादन करते आणि गाडीवर बसते. बाबा ड्राइव्ह. करतात . )
Cut to……
….. ….. ….. ….. …..
Morning. / Outer…/c.b.s. bas stand kolhapur
Action :
सीबीएस स्टँड गर्दी आहे. तेथे पार्किंगनंतर ते कोल्हापूर-अलिबाग बस स्टॉपवर येतात. बसमध्ये गेल्यानंतर, रिकाम्या सीट पाहून बाबा बसमध्ये अन्विका साठी जागा पकडतात.
Dialog
बाबा :
इथ कोण बसलेय का?
प्रवाशी :
नाही हो. आताच लागलीय बस.
बाबा :
मग ठीक आहे.
( बाबा अन्विकाकडे प्रेमाने पहात )
बाबा :
अनु इथे आहे बघ तुझी बॅग. मस्तच सीट आहे.
( अन्विका तिथे जाते.)
बाबा :
हे घे पैसे काढून देत.
आण्विका :
अहो रात्री दिलेत ना, मग आणखी कशाला.
बाबा :
गप घे, लांबचा प्रवास आहे. जास्त कमी लागतात.
आण्विका :
पण आहेत माझ्याकडे.
Action :
(बाबा जबरदस्ती तिच्या हातात रुपये देतात. व थोडा वेळ थांबतात.)
Dialog
बाबा :
बर, मी निघतो. मला आवरून कामावर जायचं आहे. नीट जा, पोहोचल्यावर फोन कर. मी सांगतो फोन करून…… ल येईल तो न्यायला.
आण्विका :
बर….
(बाबा निघतात.)
Cut to .....
Cantinu….
…… …… …… …….
Morning. /Kolhapur - Aalibag bas/ /Outer - inter
Action :
बस स्टॉपवर . बर्याच बसेस बाजूला येत आहेत. अन्विका आपली बॅग सुबकपणे ठेवत आहे. बरेच प्रवासी तिच्या शेजारी असलेल्या जागांवर बसले आहेत. कंडक्टर येत आहे आणि तिकिटे घेत आहे.
अन्विकाचा फोन सीटच्या खाली पडलेला आहे, तो तो उचलत आहे. त्याच वेळी, ईशान बसमध्ये येतो. आणि अन्विकाला पाठमोरी उभा पाहून त्याच्या आरक्षित सीटवर बसलेले पाहून,
तो कंडक्टरला बराच काळ विचारतो.
Dialog
ईशान :
माझं रिझर्व्हेशन आहे. मला माझी सीट देताय का?.
Action :
कंडक्टर आरक्षण तपासून.
कंडक्टर,
थांबा साहेब, देतो.
Action :
अन्विका जिथे आहे, तिथे कंडक्टर सीट तपासत येतो . आणि ती फोन खाली पडलेला घेत आहे तेथे येतो.
Dialog
कंडक्टर :
यस क्युज मी मॅडम, ही सीट रिझर्व्ह आहे .
आण्विका :
काय,
( ती सीटकडे पाहते . तेथे राखीव क्रमांक दिसतो)
आण्विका :
बापरे, गडबडीत मी पाहिलच नाही.
Action :
ती वर पाहते. तर .. एक देखणा तरूण तिच्या समोर उभा आहे. ज्याने त्याच्या डोळ्यावर गॉगल घातलेला आहे. तिला त्याचा चेहरा परिचित वाटतो.
Dialog
आण्विका :
माफ करा मला माहीत नव्हत. मी जागा एक्सचेंज करते.
(अन्विका आजूबाजूला पहाते. बस भरली आहे . )
आण्विका :
बापरे, बस फुल्ल झालेय. आता काय करायचं.
आण्विका :
कंडक्टरला, मला माहित नव्हत. मला दुसरीकडे जागा अडजेस्ट करून देता का? काय आहे. मी पण लांब प्रवासाला चाललेय. अलिबागला.
कंडक्टर :
गाडी तर फुल्ल आहे.म्याडम तरी बघतो काहितरी.
( कंडक्टर ईशान कडे पहातो)
कंडक्टर :
साहेब तुम्ही एकटे आहात की आणखी कोण आहे.
ईशान :
माझी एक सीट रिझर्व आहे. बाकी त्या वाटल तर बाजूला बसू शकतात.
Action :
(ईशान अन्विकेस बारकाईने पाहतो. त्याने तिला ओळखले असते. पण आपण प्रथम कसे बोलणे करावे? जर ती रागावली तर तो शांत राहतो.)
Dialog
आण्विका :
(मनात)
हा तर ईशान असेल. हा तोच आहे. काय ताठा आहे बघ याचा. जणू साहेबच असल्यासारखं ताठतोय. यानं मला ओळखलं नाही का. ओळखाय न काय झालं. सीट रिझर्व्ह आहे. म्हणूनच तोरा दाखवत असेल. बर हा कुठे चाललाय म्हणायचा असेल पुण्या बिण्याला मला काय करायचय. पण आता काय करायचं. काही झालं तरी अडजेस्ट तर करावच लागेल.
कंडक्टर :
(विचार करणाऱ्या अण्विकास,)
मॅडम कसला विचार करताय.
आण्विका :
काही नाही. बर. त्यांना विचारा कोणत्या बाजूला बसणार ते.
ईशान :
( हसत)
मी कडेला खिडकी शेजारी बसेन. बाकी शेजारी त्या बसू शकतात.
आण्विका :
(मनात)
गेली खिडकीची साईड, खिडकी कडेला बसून शायनिंग मारायची असेल. बस म्हणावं.
आण्विका :
बर बसा.
Action :
अन्विकाने तिची बॅग उचलली आणि ती बाजूला केली. आणि
आण्विका :
बसा,
Action :
ईशान आपली बॅग वरील क्यारेजमध्ये ठेवतो. आणि त्याच्या सीटवर बसला आहे. अणू शेजारी सीटवर बसत आहे.
Dialog
आण्विका :
( मुद्दामच )
माफ करा मला माहीत नव्हत सीट रिझर्व्ह आहे ते. पुढे गाडीखाली झाली की मी बदलेन सीट.
ईशान :
अहो, त्याची काय गरज आहे. मला काय संपूर्ण सीट नकोय.
आण्विका :
बर.
ईशान :
मला ओळखल नाही का?
आण्विका :
( मुद्दामच )
ओळखीचा वाटतोय चेहरा पण…. नाव आठवत नाही.
ईशान :
मी ईशान पाटील, आता ओळखल का?
ईशान :
(मनात )
मला ओळखत नाही की मुद्दाम दाखवत नाही.
आण्विका :
हा, ओळखल
ईशान :
तू अण्विका ना, अण्विका भोसले.
आण्विका :
हो , बर काय करतोस आजकाल,
ईशान :
मी फॉरेस्ट खात्यात कामाला आहे. फॉरेस्ट ऑफिसर म्हणून.
आण्विका :
(मनात)
हा म्हणूनच राजेश्री लई ताठलेत होय. मघाशी बर त्या कंडक्टर जवळ अनोळखी असल्या सारखा उभा होता.
आण्विका :
म्हणजे नोकरी करतोस म्हण.
ईशान :
बारावी नंतर बी. एस. सी. करत स्पर्धा परीक्षा दिली व ट्रेनिंग पूर्ण करून आता आहे नोकरीला कोल्हापूर- सिंधुदुर्ग सीमेवर दाजीपूर साईटला.
आण्विका :
हा, मग आज काय दौरा,
ईशान :
अलिबागला,
आण्विका :
अलिबागला…
ईशान :
हो तिकडे आमचं विशेष ट्रेनिंग आहे, खात्याचं, बर तू हल्ली काय करतेस.
आण्विका :
मी B.H.M.S ला आहे. लास्ट इयर ची एक्साम झालीय. फक्त ऐंट्रान्शिप बाकी आहे. आता सुट्टी असल्याने चाललेय मावशीकडे अलिबागला.
( थोड्या वेळाने कंडक्टर घंटा वाजवतो.
कंडक्टरचा इशारा ड्रायव्हर समजतो. तो बस चालवितो. )
Cut to…….
…. ….. ….. …..
Morning /Day /Kolhapur pune road/ in bus /Outer
Action :
(बस सध्या धावत आहे आणि कंडक्टर प्रवाशांना तिकीट देण्यात व्यस्त आहे.)
Dialog
कंडक्टर :
तिकीट…तिकीट….
पॅसेंजर :
एक कराड द्या.
( कंडक्टर तिकीट देत पुढे येत आहे…अनूजवळ येत ..)
कंडक्टर :
मॅडम तिकीट
आण्विका :
एक अलिबाग द्या.
ईशान :
थांब मी काढतो.
आण्विका :
नको, काढते मी. ती काय दहापाच रुपयाची बाब आहे.
ईशान :
डॉक्टर मॅडम, मी आता कमावतोय.
अण्विका :
तरी पण नको, काढते मी.
आण्विका :
काका द्या एक अलिबाग.
Action :
( कंडक्टर तिकीट देतो. आणि पुढे जातो. थंड वार्यासाठी ईशान खिडकीचा ग्लास ढकलतो.
क्वाड आपल्या कानात घालतो. मोबाइलवर संगीत कनेक्ट करतो. आणि गाणी ऐकण्यास सुरवात करतो.
आणि अन्विकाकडे पहात हसत)
Dialog
ईशान :
काल जरा जागरण झाली. थोडीशी विश्रांती घेतो.
आण्विका :
काय करत होतास एवढं.
ईशान :
काल मित्रांसोबत गेलो होती मूव्ही बघायला. बरेच दिवस झाले पार्टी मागत होते. नोकरी लागल्यावर म्हटलं देवून टाकू पार्टी केली व फिल्म पहायला गेलो होतो.
Action :
( ईशान डोळे बंद करतो. आणि त्याच्या सीटवर विश्रांती घेतो. अन्विकास झोप येत नाही. आजूबाजूला पहात असताना ती आजचे वृत्तपत्र तिच्या बॅगमधून बाहेर काढते आणि वाचन करण्यास सुरवात करते. ती ते थोडा वेळ वाचते आणि ती तिच्या बॅगमध्ये परत ठेवते. मग तिचे लक्ष ईशानकडे जाते.)
आण्विका :
(मनात)
आज जवळजवळ पाच सहा वर्षांनी हा दिसतोय. आजपर्यंत कधी इतक जवळून नव्हतं पाहिलं अकरावी बारावी इयत्तेतला हाच का तो ईशान
(अनू भूतकाळाच्या स्मृतीत जाते.)
Flash back
Cut to ….
…. ….. ….. …… …
Day/ 10.00. O clock morning / Rani season school road
Action:
(अन्विका, संयोगिता, आणि वेदांगी आज एकत्र शाळेस जात आहेत.)
Dialog
वेदांगी :
काय ग कालची नोट्स पूर्ण केलीस ना?
संयोंगीता :
हो केली ना,
वेदांगी :
नाहीतर जोगळेकर बाईंची बोलणी खावी लागतील.
आण्विका :
ती बोलत नाही केव्हा, सारखी चटर पटर करत असते नुसती. मुलांनो, हे लिहून आणा. त्या नोट्स पूर्ण करा. सगळ्यांना कारकून करून ठेवलंय बाईने, फळ्यावर काही लिहायला नको, देतेय नोटस,
संयोगीता :
पण शिकवते मस्त.
वेदांगी :
त्यात काय शंका नाही. पण लेखन लई बाईचं.
आण्विका :
तर काय, माझ्या महिन्यात दोन लाँग स्केप वह्या भरल्या.
संयोगीता :
बरं चला लवकर ...वेळ झालाय.
Action :
( त्या शाळेच्या मैदानाजवळील रस्त्यावर चालत आहेत. एक फुटबॉल जमिनीवरुन येतो आणि अन्विकास लागतो. अन्विकाचे संतुलन जाते आणि रस्त्या जवळील खड्यात पडते. तिचे कपडे गलिच्छ होतात. तिचा हात दुखवतो ,थोडस खरचटते , परंतु लोक तिच्याभोवती जमले आहेत. संयोगीता,वेदांगी अन्विकास उठवण्याचा प्रयत्न करतात.)
Dialog
एक बाई :
अरे, लागल वाटत. काय या मुलांना कळतच नाही. कसे खेळायचे ते.
दुसरा :
रस्त्यावरून कोण येत जात हे बघत नाहीत.
तिसरा :
बॉल लागला का?
Action :
( तिचा हात थोडा दुखत असतो .अन्विका रडण्यास सुरवात करते. इकडे मैदानावर)
Dialog
विनीत :
अरे ,बॉल लागला वाटत कुणाला?
महेंद्र :
कळतच नाही बघ, बॉल कसा मारायचा ते? लागलं वाटत कुणाला?
Action :
(घाबरलेल्या अवस्थेत, इशान तिथे मदतीसाठी येतो.)
Dialog
ईशान :
लई लागलं का?
Action :
( त्याला समोर पाहून आणि त्याने चेंडू मारला हे लक्षात घेत वेदांगी ईशानला जोरदार थप्पड मारते.)
Dialog
वेदांगी :
कळत नाही का? लहान आहेस, रस्त्यावरून कोण येत कोण जात याचा तरी अंदाज करायचा,
( ईशान त्याचा गाल चोळत बाजूला जातो.)
इतर लोक :
चला तिला पटकन दवाखान्यात नेऊ.
Flash back
Cut to .....
…… …… …..
Day. / In bus / inter outer
(अन्विका स्वप्नातून बाहेर येते. ती त्याच्याकडे पाहते, त्याचा चेहरा आता शांत दिसत असतो. त्याच्या चेहऱ्यावर एक नवीन तरूण चमक तिला दिसते.
ती त्याच्याकडे टक लावून पाहते आणि पुन्हा तिच्या स्वप्नात स्वत: ला हरवते.)
आण्विका (मनात)
खूप लाघवी आहे
Flash back
…. ….. ….. …… ….. …..
Day /after noon / Inter / Hospital
Action :
( अन्विका रडत आहे, डॉक्टर चेकअप करत आहेत. )
Dialog
डॉक्टर :
घाबरु नको बाळ, हाड काही मोडल नाही, फक्त दुखावला गेला आहे. स्ट्यापिंग करावं लागेल. बर होईल थोड्या दिवसात.
वेदांगी :
त्या मुलाला चांगल बदडले पाहिजे.
संयोगीता :
ए गप, त्याने काही जाणून बुजून केलं नाही. चुकून लागला तो बॉल.
वेदांगी :
तुला लागायला पाहिजे होता. म्हणजे समजलं असत.
संयोगीता :
ये गप्प बस पेशंट पेक्षा तुझाच दंगा जास्त आहे.
डॉक्टर हिला एक इंजेक्शन द्या. गप्प बसायचं.
वेदांगी :
हो तर.
आण्विका :
ए बाई, गप्प बसा ग उगाच तुमची भांडणे नकोत.
Action :
(स्टेपलिंगनंतर डॉक्टर काही औषधे देतात. दरम्यान, अन्विकाचे वडील येतात. आणि तिला घेऊन जातात.
ईशान एका कोपऱ्यात हॉस्पिटलच्या बाहेर उभा आहे आणि पहात आहे. अन्विकाला तिचे वडिल घेऊन जाताना पाहून त्याला खूप वाईट वाटते.)
Cut to…..
…. ….. ….. ….. ……
क्रमशः. पुढे


