Saturday, February 1, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag 5

 Kalat n kalat julale he bandh script bhag 5


Night / 11 o’clock. / Alibag anvika mavshi home in revti room / inter - outer

                 Action

अन्विका पलंगावर झोपली आहे. ती सारखी  कुशी बदलत आहे.  तिला झोप येत नाही. जेव्हा ती डोळे बंद करते, तेव्हा तिला ईशान दिसतो. तिला महाविद्यालयात आपल्या आठवणी आठवत आहेत. ते  दोघे बसमध्ये ज्या घटनांबद्दल बोलले आहेत . त्या तिला आठवत आहेत. तिला डोळ्यासमोर सुंदर  देखणा, पिळदार शरीरयष्टी असणारा ईशान दिसत आहे.

                  आण्विका :

        ( मनात )

 काय होतय मला. झोप का येत नाही. सारखं तो का दिसतोय मला. अस काय होतंय. एक अनामिक ओढ लागल्यासारखी झालेय. काहीच कळत नाही.

( पुन्हा ईशान तिला दिसतो.)

     आण्विका :

 ( मनात)

 किती सुंदर व निरागस आहे तो. स्पर्धा परीक्षा दिलीय. व जोबल लागला. तरी देखील त्याच्या चेहऱ्यावर गर्विष्ठपणा कुठेच दिसत नाही. मला कॉलेज मध्ये असताना फूटबॉल लागला. तेव्हा किती अगतिक झाला होता. त्यास किती गिल्टी वाटत होत . अन् मी त्याला घालून पाडून बोलत असे. तरी देखील तो क्षमा मागायचा.

आज ही बसमध्ये मी त्याच्याशी भांडले. चूक केली. गाढवासारखी वागले. एवढी डॉक्टर असूनही बुद्धी कशी काय चालली नाही.

तरी देखील त्याने मेसेज पाठवला. एखादा गर्विष्ठ असता तर ढुंकूनही पहिला नसता.

एक अनामिक ओढ त्याच्याविषयी मनात निर्माण का होतेय माझ्या.

    Action

अन्विका मोबाईल ऑन  करते. आणि ईशानचा डीपी वरील त्याचा फोटो पाहत आहे.

               Dialog :

     आण्विका :

(मनात स्वतःशी)

मस्त आहे. रुबाबदार. देखणा इतका आहे की कोणालाही भुरळ पडेल.

ताकद इतकी की दोन चार पहिलवान लोळवेल. अन् फुटबॉल खेळताना लक्षवेधक खेळी करणारा.

अ ..व्यसन असेल का याला.

नसेल कदाचित. मी त्याला पाहिलंय. त्याच्या ओठांवर अजिबात पांढरट डाग नव्हता. म्हणजे सिगारेट पित नसणार. पण दारू वगैरे . छ नसेल तस काही. आपण आज पाहिलय जवळून तस काही जाणवल नाही. डॉक्टरकीचा एक तरी फायदा झाला.पण याच प्रेमप्रकरण वगैरे कुणावर नसेल ना.

हा ते माहीती करून घ्यावे लागेल.

नाहीतर मी इकडे प्रेमाचे इमले बांधत बसायची. व हा लग्न करून यायचा पुढ्यात.

मगाशी तो बसमध्ये कुणाशी तरी बोलत होता. एखादी महिला असावी. कॉलेज मध्ये मुलींशी बोलण्यास दचकणारा इतका फ्री कोणाशी बोलत असेल.

ती त्याची प्रेमिका असेल तर…

                Action

आण्विकेस झोप येत नाही; ती इकडे तिकडे कुशी बदलत आहे.

तिचा अस्वस्थता पाहून, रेवती उठते.

           

       रेवती :

 काय झालं दीदी.

झोप येत नाही का?

    आण्विका :

     हो ग.

      रेवती :

 अग, नवीन जागी अस होतच.

                 आण्विका :

    थोड पाणी देतेस का?

        रेवती :

       हा थांब,

   ( रेवती पाण्याची बाटली देते.)

         आण्विका :

      थोड पाणी पिते.

         रेवती :

मला पण करपे ढेकर येत आहेत. मसालेभात मला खूप आवडतो. पण अँसिडिटी लगेच होते बघ.

       आण्विका :

अग ,मग एक वेलदोडा खा. अन् थोडी सोलकढी घे. बर वाटेल.

         रेवती :

 हा, हे चांगल आहे. चल तू पण आपण थोडी सोलकढी पिऊ. व थोडावेळ टेरेसवर जाऊ. मस्त फेरफटका मारू

        आण्विका :

 अग पण बाकी घरातले झोपलेत.

        रेवती :

     झोपू देत. तू चल.

          रेवती :

 चल थोडावेळ वरती टेरेसवरून येवूया.

Action

अन्विका आणि रेवती दोघीही उठतात. त्या स्वयंपाकघरात जातात, फ्रीजमधून  सोलकढी घेतात आणि पायर्‍या वर चढतात वरील टेरेसवर. थंड वारा वाहत आहे. समुद्राचा आवाज ऐकू येतोय.

              Dialog

        रेवती :

 मस्त गार हवाय बघ.

       रेवती :

         ( आण्विकास विचार करताना पाहून)

 काय ग, लग्नाचा विचार तर करत नाहीस ना.

         आण्विक :

         छे ग.

           रेवती :

 मग काही प्रेमप्रकरण. तस नसेलच म्हणा.

       आण्विका :

 तस . आ …काय सांगू. काय करु.

          रेवती :

 म्हणजे आहे. काय ग.

        आण्विका :

 नाही ग. माझं तस काही. पण मला कसतरीच होतंय.

           रेवती :

 अग, कसतरीच होतंय म्हणजे काय नेमक होतंय?

       आण्विका :

        बर एक.

 Action :

अन्विका तिच्या सर्व आठवणी सांगते आणि ईशानबद्दल बोलते.

                     Dialog

           रेवती :

 म्हणजे तू प्रेमात पडलीस तर

         आण्विका :

 तसं काय सांगू शकत नाही. पण..

          रेवती :

      तसंच आहे ते.

           रेवती :

बर , त्याचा फोटो वगैरे आहे का?

      आण्विका :

 हे बघ मोबाईल मध्ये.

   Action

अन्विका तिच्या मोबाइलवर फोटो दाखवते, आणि रेवती तो मोबाइलवर D P चा फोटो पाहत आहे..

                   Dialog

        रेवती :

       मस्त आहे.

       आण्विका :

 पण मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे.

        रेवती :

      हो ते तर आहे.

      आण्विका :

 मग आता काय करायचे.

          रेवती :

 अग, तू जगाला चांगल काय अन् वाईट काय हे पटवून देणारी. तुला काय यात अवघड आहे. मला कसं अल्लड वयात प्रेमप्रकरणात फसण्याआधी वाचवलस.

जीवनातील सर्व व्यवहार बुध्दीने घ्यायचे हृदयाने नाही म्हणणारी तू व स्वतः बाबत एवढी अडखळतेस तुझ्या त्यावेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी आज एवढी टॉपर आहे. सर्व व्यवहारात.

      आण्विका :

अग ती गोष्ट निराळी. हा लाईफ पार्टनरचा प्रश्न आहे. व मी जगाची कोडी सोडवणारी या ईशान नावाच्या कोड्यात अडकलेय.

           रेवती :

 म्हणून मॅडमला झोप येत नव्हती का? तस पाहता दाजी मस्त आहे.

          आण्विका :

 गप. ग अजुन कशात काय नाही. अन् उगाच मजले रचू नकोस ह. गप्प बस तिथं

         रेवती :

गप्प काय गप्प. म्हणजे पंच्छी पिंजरे मे फस गया.

     आण्विका :

     नाही अजुन.

         रेवती :

हे बघ काढू माहिती त्याची. आता झोपुया. चल.रात्र खूप झाली.

        आण्विका :

 तुझ्याशी बोलल्यावर बर वाटल बघ.

         रेवती :

 चला मग. बघू उद्या काय ते.

        ( Action : त्या झोपतात. लाईट ऑफ होते)

                          Cut to…..

…… …… ……. ……. …….

Morning/ 7.30a.m../ Alibag Anvika mavshi home /  Inter

                 Action :

मावशीच्या घरी. सर्व  उठले  आहेत. आणि त्यांचे स्वतःचे काम करत आहे. मावशी स्वयंपाकघरात  जेवण करीत आहे. काका जॉगिंग गेले आहेत. स्वप्निल अजूनही झोपलेला आहे.

अनू जेवणाच्या टेबलाजवळ बसली आहे. रेवती चहा  घेऊन येते. अनु तिच्या मोबाइलकडे पहात आहे.

चहा ठेवते. ती अनुस चहा देते.

Dialog :

         रेवती :

 काय मेसेज बघतेस. इंपॉर्टन्ट की सिंपल.

       आण्विका :

      दोन्ही पण.

         रेवती :

 दोन्ही पण नसणार, इंपॉर्टन्ट असणार.

   Action :

( दरम्यान, खोलीतून काकू त्यांचे शब्द ऐकत आहे.)

                 मावशी :

काय बहिणींचं चाललय, खास काय ग हे.

(रेवती तिची जीभ तिच्या दातांनी चावते . )

                    Dialog

          रेवती :

 अग खास मेजवानीच चाललय आमचं. मोबाईल मध्ये नवनवीन रेसिपी आलेल्या आहेत. त्या शिकायच्या आहेत.म्हणून अनु दीदी त्यातील सामान्य व खास रेसिपी निवडत आहे

         आण्विका :

 ये कायपण सांगू नकोस मावशीला.

         रेवती  :

      (हळु आवाजात)

   मग सांगू का अनु दी प्रेमात पडलीय म्हणून.

       आण्विका :

(हळू आवाजात, हाताने इशारे करत)

         नको 

          रेवती :

गप्प तू तिला काय कळतंय. सातवी झालीय ती.

        आण्विका :

पण हुशार आहे ती. व्यवहारात काकांपेक्षा तीच हुशार आहे ह.

         रेवती :

 म्हणजे बाबा मठ्ठ आहेत अस म्हणायचेय तुला, सांगू का?

      आण्विका :

 ए बाई मी तस कुठं म्हंटल. गप्प बस. काय कोंबड झुंजवतेस आहेस.

        रेवती :

 त्यांना काय कळतंय. ते गेलेत जोगिंगला.

तू आवर आपण जाऊ नंतर अलीबाग दर्शन घ्यायला. मी फक्त एका तासात आले क्लासवरून.

अन् हो टेन्शन घेऊ नकोस. काढू कुंडली दोघी जणी मिळून.

           Action

त्याचवेळी मावशी किचन मधून बाहेर येत.

                   आण्विकाची मावशी :

काय चर्चा चाललेय बहिणींची. व रेवे सातवी झाली तरी मला व्यवहार कळतो. ह. त्यावेळी आमच्या वेळी शिक्षणाची जास्त सोय नव्हती जवळपास शाळा नव्हती नाहीतर…..

( रेवतीचा कान पिळंगळत.)

         रेवती,

आई ग…. ये सोड बाई दुखतोय ग कान. रींगा ओढून काढतीस काय माझ्या.

       (कान सोडत.)

         मावशी :

हे बघ ती आलेय दोन चार दिवस सुट्टीला तेव्हा तिला सर्व परिसर दाखवून घे. व तू ही शिक काहीतरी तिच्याकडून…

           रेवती :

        (हात जोडून नमस्कार मुद्रेने)

     बर माझे आई, शिकतो.

           Action :

रेवतीची आई आत जाते. रेवती न्याहारी करून आपली बॅग घेऊन निघते.

                      रेवती :

  बाय अनु दी, क्लासल जाऊन येते. आवरुन बस.

Cut to ...

….. …….. ……. ……. …

Morning / 8.00 o’ clock. / Inter Anvika mavashi home

        Action:

काका बाहेरून जॉगिंगमधून येतात. ते आंघोळ करून  आणि त्यांचे कपडे परिधान करतात. डोक्याचे केस विचरत  आहेत. अन्विका पेपर वाचत सोफासेटवर बसली आहे.

                  Dialog :

         काका :

काय अनु नाष्टा पाणी झालं का.

       आण्विका :

 हो काका, तुम्हाला आणू.

        काका :

 आणेल ग ती. तू बस. मला गप्पा मारायच्या आहेत.

( त्याच वेळी मावशी चहा देते. )

        मावशी :

        हा घ्या.

( चहा हातात देत)

           Dialog :

       मावशी :

अनु तुला पण आणू का आणखी चहा.

       आण्विका :

       नको बाई.

         काका :

बर घरची सगळी कशी आहेत.

      आण्विका :

      आहेत ठीक.

         काका :

मामाकडे गेली होतीस का?

         आण्विका :

 नाही जायला एक्झाम असल्याने जाता नाही आलं. आई गेली होती. आजीला जरा बरं नव्हत. मावशीची आठवण काढत होती.

        काका :

 आम्हाला पण जाता आलं नाही. खूप कामे असल्याने सुट्टी मिळत नव्हती. या सुट्टीला नक्की जाणार आहोत. तेव्हा येवू बघून.

         काका :

अनु तू खूप धाडशी आहेस. हुशार पण, सारासार विचार करून निवड करून शिक्षण पूर्ण केलेस. जरा तुझ्या प्रेरणेने मार्गदर्शन कर रेवती व स्वप्नीलला.

         आण्विका :

काका त्यांची काळजी करू नका. मी कायमच मार्गदर्शन करते. त्या दोघांनी माझ्या सल्यानेच आपलं करियर निवडलय.

व मला पुरेपूर खात्री आहे. ती दोघेही छान यश मिळवतील.

         काका :

अस झाल की बरच होईल. देव पावला म्हणायचा.

 बर रेवती आली की फिरायला जा. मी माझं आवरून ड्युटीला जातो. रेवाण आधीच नियोजन केलय. तू आल्यावर काय काय करायचं ते. म्याप व टाईम टेबल पन केलेय.

एवढंच काय स्कुटीची टंकी फूल करून घेतलीय मॅडमनी.

       आण्विका :

 मला बोलली नाही ती. मॅडम नियोजन करू लागल्या म्हणायच्या.

           काका :

 सरप्राइज देणार आहे तुला. तू कसे दिलेस तुमच्याकडे आल्यावर तसे.

       आण्विका :

हो का. तरी मला मघाशी म्हणाली होती की फिरायला जाऊ म्हणून.

बघुया मॅडम काय सरप्राइज देतात त्या.

                  काका :

 मला आवरायला हवं. कामावर जायला वेळ होईल.

(काका  आपले आवरण्यास आत जातात. )

                                       Cut. To….

…… …… …. ……..


Morning/ 10.00 o’ clock/ Inter and outer /mavdhi home and Alibag city

            Action :

( रेवती क्लासवरुन येते. ती स्कूटी पार्क करते. फ्लॅटमध्ये येते. आपले श्यांडेल काढून  रॅक वर ठेवत आहे 

        रेवती :

अनु दीदी, ये अनु दीदी.

(आण्विका रेवतीचा आवाज ऐकत आहे आणि रेवतीच्या खोलीतून वाचत्याले पुस्तक मिटवत  )

              आण्विका :

       ओ, आले .

         रेवती :

ये वेडाबाई आटप लवकर आपण बाहेर जायचं आहे. मघाशी बोलले होते ना.अलिबाग दर्शन.

        आण्विका :

 अग हो पण स्वप्नील कुठ आहे? तो येतोय ना.

        रेवती :

 तो कशाला आणखीन तीन तिगाडा काम बिगाडा

 तो नाही, आपण दोघी जायचं. स्कूटी वरून , त्याचा आता क्लास आहे. तो नाही येणार आपण दोघी फक्त.

        आण्विका :

 जायचं कुणीकडे ते तरी सांग.

         रेवती :

तू गपचूप गाडीवर बस. मी न्यायचे तिकडे नेतो.

                आण्विका :

 अग, तरीपण सांग ना कुणीकडे?

          रेवती :

कुणीकडे म्हणजे अलिबाग दर्शन करायला.

चल ये जेव लवकर.

(  मावशी जेवण वाढते. ते खात .)

         रेवती :

      जेव लवकर.

        मावशी :

काय वाघ बिघ माग लागला की काय. एका दिवसात सगळ अलिबाग दाखवणार आहेस काय.

      रेवती :

       हो.

 (रेवतीला ठसका लागतो. तिची आई पाणी देत.)

             मावशी :

     अग, हळू जेव.

     Action :

तिचे जेवून झाले आहे. ती आईच्या   पदरास हात पुसत.

              Dialog

               रेवती :

     ह … चला आता.

      मावशी :

    अग ,थांब आले.


( मावशी आत जाते आणि डबा तयार करतात. आणि

मावशी ताबडतोब एक डबा तयार करते. त्यांना डबा आणि पाण्याच्या बाटल्या देत . )

       रेवती :

    हे आणि कशाल ?

       मावशी :

 कशाला म्हणजे फिरल्यावर भूक नाही का लागणार. त्यासाठी थोडीशी पोटपुजा.

          रेवती :

 अग, काय हे, इथ जवळच तर निघालोय. बाहेर खाऊं काहीतरी

        मावशी :

तू काय बाहेरच काहीतरी खासिल बिसिल. अनुच काय? धड जेवू पण दिलं नाहीस. बसलीस लगेच घोड्यावर.

अन् तस काय जास्त दिलं नाही. व जास्त वेळ लावू नका. सहा पर्यंत परत या.

व हो विचारायचं राहिलं, मोबाईल घेतलाय ना दोघींनी.

         रेवती :

 घेतलाय ग. किती काळजी करशील, इथ जवळच तर जातोय ना. कुलाबा किल्ला पाहायला.

          मावशी :

 बर जा नीट. अनु काळजी घे. व तू पुढे स्कूटी घे. नाहीतर ही नेईल तुला मुंबईला.

        रेवती :

 ते मुंबईला जायचं की राहायचं बघतो आम्ही. एव्हाना सगळ अलिबाग पाठ झालंय मला.

                   Action

( तो डबा व पाण्याची बाटली पिशवीत घेऊन स्कुटीच्या डीग्गीत ठेवत.)

                      Dialog

          मावशी :

 ये शिक जरा ताईकडून मोठ्यांशी कसं वागायचं ते. नाहीतर तू बघावं तेव्हा असतेस घोड्यावर स्वार.

       रेवती :

   अग ये इकडे लवकर

    मावशी :

(रेवतीची आई)

          काय ते.

  (रेवती जवळ तिची आई जाते.)

(रेवटी एका हाताने  वाकून नमस्कार करते.)

         रेवती :

 ह.. झालं आशीर्वाद दे आता.

    ( आईचा  हात डोक्यावर घेऊन)

                 मावशी :

असा आशीर्वाद मागतात काय. जा आता. व या लवकर.

    Action :

त्या दोघी स्कुटिवर बसतात. त्यापूर्वी डबा व पाणी बॉटल पिशवी डिकीत ठेवतात. बाय म्हणून निघतात.


                                     Cut to….

…… …… …….. ……… …….

Day / 11 O’ clock /Outer / Alibag city road

     Action :

 रेवती अलिबाग शहरातील मंदिरे, बागा, व पर्यटन स्थळे दाखवत स्कुटी वरुन अनुला फिरवत आहे. व त्या दोघी गप्पा मारत आहेत.

                     Dialog

        रेवती :

 काय अनु दीदी, मजनूचा फोन आलता का. काही मेसेज वगैरे.

        आण्विका :

 नाही ग, रात्री नंतर नाही आला. मला वाटत तस नसेलही कदाचित मला वाटत औपचारिक मेसेज पाठवला असेल.

          रेवती :

 तुझ म्हणन बरोबर आहे. पण मला सांग तू प्रती मेसेज केला होतास की नाही.

        आण्विका :

 गुड नाईट हा पाठवला होता. तो ही तसच म्हणाला. एवढंच.

       रेवती :

 अग तू इनिंग सुरू व्हायच्या आधीच बोल्ट उडवलास कसं होईल.

       आण्विका :

     म्हणजे, काय?

          रेवती :

 अग, सरळ साधं गणित आहे बघ. तू त्याला बोलायला संधीच दिली नाहीस. मग काय होईल. डायरेक्ट गुड नाईट मेसेज पाठवलास म्हणजे तो झोपणारच ना.

       आण्विका :

 मग काय करायला हवं होत.

        रेवती :

 थांब बोलू …. आधी गाडी पार्क करून जाऊ किल्ला पाहायला.वाटेत सांगते तुला.

            Action :

रेवती मैत्रिणीस  कॉल करून बोलावते. ती अपार्टमेंटमधून खाली येते. रेवती फ्रेंड्सच्या अपार्टमेंटच्या तळघरात स्कूटी पार्क करते. आणि डिकीमधून पिशव्या काढून घेते.               

 (रेवती अन्विकेची  मैत्रिणीस  ओळख करुन देत.)

                  Dialog :

                 रेवती :

 ह बर ओळख करून देते. ही स्वरा स्वरा अग्रावकर माझी मैत्रिण .

अन् हो स्वरा ही माझी अनु दीदी. कशी वाटली. मस्त आहे ना.

          स्वरा :

भेटून आनंद झाला. ताई. तुमचं खूप कौतुक ऐकते. आमची अनुदी अशी आहे. तशी आहे. एक्सेट्रा…. एक्सेट्रा….. , आज प्रत्यक्ष भेटलात. तुम्हाला भेटून आनंद झाला.

       आण्विका :

 काय तरीच ह... उगाच काहीतरी सांगत असते. अन् हो मी काही कुणी मोठी अंब्यासिडर नाही हा. तुमच्यासारखी साधी सरळ आहे . बर तुझ्याशीही भेटून बर वाटल.

        स्वरा :

चला घरी चहा पाणी घेऊ.

         रेवती :

 आता नको ग. वेळ झालाय खूप, किल्ला बघून येतो आधी. मग बघू.

         स्वरा  :

         चालेल.

       आण्विका :

     तू येतेस का बरोबर?

           स्वरा :

 आले असते ग. मला पण तुमच्या संगे वेळ घालवायला आवडला असता. पण घरी खूप काम आहे ग. व आई पण बाहेर गेली आहे.

            रेवती :

 बर चल येतो आम्ही फिरून

         स्वरा :

       बर चल .

     आण्विका :

      बर येते.

( त्या दोघी निघतात. मार्गात अनु रेवास )

       आण्विका :

 काय ग मला हरभर्याच्या झाडावर चडवतेस का.

          रेवती :

 खर सांगायला काय हरकत आहे.

        आण्विका :

           चल.

           रेवती :

चल सांगते तुला. आपलं मघाशी बोलण अर्धच राहिलं ना.

( त्या किल्ल्याच्या  दिशेने चालण्यास  सूरवात करतात.)

          रेवती :

हे बघ आधी जेवलास का. कसा आहेस. अस काहीतरी बोलून त्याला बोलत करायचं होतस. डायरेक्ट गुड नाईट म्हणजे जेवण राहिलं बाजूला, बडीशेप घ्या आधी,…. असं झाल बघ.

        आण्विका :

 अग, एवढं साधं लक्षातच आलं नाही.

         रेवती :

चल किल्ला पाहूया आधी… मग पाहू तुझ्या रोमिओकडे.

     Action :

त्या दोघी किल्ल्याकडे जातात. समोर समुद्र आहे. आणि त्या किल्ल्यावर जातात. वाळूमधून चालत आहेत.

                               Cut. To …….

……. ……. ……. …….. ……

क्रमशः पुढे......


No comments:

Post a Comment

Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...