Friday, February 11, 2022

१९ फेब्रुवारी शिवजयंती



llशिवजयंतीll 




llमहाराष्ट्राचे कुलदैवत श्री छत्रपती शिवरायांची जयंतीll


मी एकदा एका गावी किल्ले प्रदर्षणासाठी व निरीक्षक म्हणून गेलो होतो ; तेव्हा मुलांनी आपापल्या गल्लीत किल्ले बांधले होते.

सर्व पहाणी केल्यावर मी मुलांना प्रश्न विचारले.
मी   :   मुलांनो तुम्ही कोणते किल्ले बनवले?
मुले  :  तोरणा, पुरंदर, रांगणा, रायगड, राजगड वगैरे..
मी   :   तुम्ही शिवराया प्रमाणे विचार करता काय?
मुले  :   हो.
मी    :   नाही तुम्ही तसा विचार करत नाही.
मुले अवाक होऊन म्हणाली,  "ते कसं काय?"
मी    :  जर शिवराय इथे असते; तर तुमच्या पेक्षा वेगळं                  काहीतरी केलं असत.
मुले  :   म्हणजे आम्ही नाही समजलो.
मी.   : "बाळांनो शिवराय इथे असते तर सर्व किल्ल्यांचा अभ्यास करुन नवीनच किल्ला बनवला असता.तुम्ही तर अनुकरणीय नक्कल केली."
"सैनिक फक्त लढतात ते शस्त्रांनी, मात्र श्रेष्ठ सेनानी सर्व विचार करूनच लढाई करतो."
"यातून एवढच सांगायचं आहे की आपण अनुकरण करण्यापेक्षा नवीन काहीतरी वेगळ करावं.  आपण ज्या क्षेत्रात काम करणार त्यात सेनानी व्हा,सैनिक  नव्हे."

"आपला महाराष्ट्र घडवण्यासाठी नवनिर्मिती आवश्यक आहे  "
"यासाठी तुमच्यातील लपलेला शिवाजी जाणुन तुमचे कौशल्य विकसित करा व आपल्या क्षेत्रातील छत्रपती व्हा तरच तुम्हाला शिवराय उमगले असे वाटेल."

ll जय भवानी जय शिवाजी ll
ll  जय महाराष्ट्र  ll

लेखक : निशिकांत हारुगले

No comments:

Post a Comment

Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...