Monday, March 24, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag 16and 17

 Kalat n kalat julale he bandh script bhag 16and 17

कळत नकळत जुळले हे बंध १६

क्रमशः पुढे चालू.......

  Morning /Outer / Alibag to Karla road 7.30a.m.

 Action :

(एक प्रायव्हेट टूर गाडी अपार्टमेंट मध्ये खालील रस्त्यावर उभा आहे. आण्विका, रेवती , काका मावशी एकत्र कार्ला देवी दर्शनास निघालेली आहेत.

गाडीमध्ये बसताना. एक शेजारी.

काकांना,)

     Dialog :

शेजारील काका :

काय आज दौरा कुणाक होव.

काका :

 कारल्याक जातंय. पावणीक देवीच दर्शन घडवाक.

शेजारी :

बरं हाय. तेवढंच देव दर्शन पण होव.

(गाडी निघते.)

           Cut to …..

…… …….. …….

Outer / Karla Mandir dongar payttha v Sidi Marg / morning

(Action :

पायथ्याला मंदिरा जवळ पार्किंग ठिकाणी गाडी लावून ती वरती चालून जातात. वाटेत जाताना.)

Dialog :

आण्विका :

 खूप चढायला लागेल का?

रेवती :

चल काही नाही वाटत, बोलत बोलत कधी पोहोचू कळतच नाही.

आण्विका :

 इथ लेणी पण आहेत ना.

रेवती :

हो. मस्त कात्याळ खोदून केलेली.

आण्विका :

 मी पाहिल्यात पण टिव्ही वर.

रेवती :

मग आज प्रत्यक्ष पाहा.

(बाजूने कोळी स्त्रिया जाताना पाहून.)

आण्विका :

 इकडे सगळ्या स्त्रियांना गजर्याची आवड आहे ना.

रेवती :

तुला हवा का? घेऊ एखादा.

आण्विका :

नको.

(इतक्यात मागून मावशी व काका हाक मारतात.)

आण्विका :

 अग ,बोलण्याच्या नादात आपण पुढे आलो. मावशी हाक मारतेय. थांब जरा.

रेवती :

(मागे वळून)

 आई बाबांना सांग उचलून घ्यायला.

आण्विका : 

ए लब्बाड, काय पण बोलतेस.

रेवती:

 थोडी गम्मत केली ग.

( त्या थांबतात. व एके ठिकाणी बसतात. मावशी व काका जवळ येतात. मावशी दमलेली असते.)

मावशी :

 काय ग पायांना भिंगरी बांधल्यासारख काय पळताय. आम्ही मागे आहोत हे विसरलात की काय?

रेवती :

सॉरी ग, बोलण्याच्या नादात पुढे आलो.

मावशी :

बर हे घे. ओटीच सामान.

(त्या घेतात.)

            Cut to …..

…… …… ……. …..

Morning / outer – inter / Karla Devi temple

    Action :

 (त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. व आण्विक मागणे मागते. बाहेर येतात. तेथील बाजूच्या दुकानातून काही वस्तू घेतात. )

रेवती :

चल लेणी पाहूया.

(त्या लेणी पाहू लागतात.)

आण्विका :

 किती सुरेख कोरीव काम आहे ना?

रेवती :

हा, फक्त छन्नी व हातोड्याने बनवलेले.

आण्विका :

 आपल्या कोल्हापूरचं मंदिर देखील असच सुंदर आहे ना.

रेवती :

 हो. कठीण अग्निजन्य खडकात खोदेल्या गेलेल्या लेण्यातील बारकावा बघ.

आण्विका :

 हो, थांब मी जरा फोटो घेते.

(आण्विका वेगवेगळे फोटो घेते. खूप वेळ त्या निरीक्षण करतात. इतक्यात मावशी हाक मारते.)

मावशी :

अग, चला लवकर वेळ होतोय. निघुया आता.

(त्या खाली उतरून एके ठिकाणी भोजन करतात. पुढे एका ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर मौज करतात.)

काका :

चला आता, आज हॉटेलला ट्रीट माझ्याकडून.

रेवती :

 काय, वाव चला मग.

                       Cut to …..

…… …… …

Inter / hotel Karla – Alibag road /evening

(ती हॉटेल जाऊन जेवण करतात. जेवण करताना,)

रेवती :

काय मग मॅडम आज सुट्टी वाटतंय. कीचनला.

मावशी :

गप ग, सुट्टी कुठली. सकाळी आणलेलं जेवण घरीच केलं होत ना.

रेवती :

तरी पण हाफ डे सुट्टी आहेच ना.

मावशी :

 गप जेव, अनु कसं वाटल आज.

आण्विका :

 मस्त.

मावशी :

 अजून आहे भरपूर पाहण्यासारख पण खूप वेळ झाला ना.

आण्विका :

अग एका दिवसात भरपूर पाहिलं आणखी काय.

रेवती :

उद्या जाऊया का?

आण्विका :

नको बाई, बस झालं फिरणं .

रेवती :

 एका माणसाचं काम हल्क झाल. काही म्हण.

आण्विका :

 कोणाचं.

रेवती :

 आईच ,जेवण आज करावं लागणार नाही.

मावशी :

 जेवण करावं लागणार नाही म्हणे. भांडी काय तुझं भूत घासणार आहे. ती किचन कट्यावर ठेवलेली.

रेवती :

 तरी पण जेवण करावं लागणार नाही ना.

मावशी :

 आज नसले तरी उद्या आहेच की.

रेवती :

 ते काय ठरलेलंच आहे की.

त्यात काय एवढं. पण आम्हाला सुट्टी कधी भेटणार.

मावशी :

 तर रोज घरातील सार काम तूच करतेस. तसंच बोलतेस.

रेवती :

 काम नव्हे ग, पोटाला आराम म्हणते.

आण्विका :

मग धर उपवास.

रेवती :

उपवास, अन् मी छे त्यापेक्षा पोटभर खायचा ठेवा. तो जमेल बघ.

मावशी :

चल, खादाड कुठली.

( सर्व हसतात. व निघतात.)

             Cut to …….

…… ……. ……. ..

Night / Revti room /Inter

         Action :

(आण्विका आपली बॅग नीट लावत असते. रेवती तिथे येते.)

     Dialog :

रेवती :

 काय अनु दीदी काय करतेस.

आण्विका :

 बॅग भरतेय.

रेवती :

 कशाला.

आण्विका :

 कशाला म्हणजे, जायला नको आता गावी.

रेवती :

 राहा की आणखी काही दिवस. सुट्टी आहे ना.

आण्विका :

 नाही, मगाशी बाबांचा फोन आला होता. यायला सांगितलय.

रेवती :

अग अस काय हे?

आण्विका :

 अग झालं की खूप दिवस येवून, आता जायला हवं. माझ्या इंटरशिपची तयारी करायला हवी. तसेच ताई अजून दोन-चार दिवस आहे. तिच्यासोबत पण थोडावेळ घालवता येईल.

रेवती :

ताई सोबत की साहेबांसोबत.

आण्विका :

 नाही, साधा मेसेज पण केला नाही बघ त्यानं.

रेवती :

 गडबडीत विसरला असेल.

आण्विका :

गडबडीत विसरला असेल म्हणे. सगळं जाणून बुजून चाललंय त्याचं. मला त्रास होण्यासाठी.

रेवती :

 (अनुला नाराज पाहून)

अग कुठल्यातरी कामात अडकला असेल. करेल आज नाहीतर उद्या.

(इतक्यात मावशी काही कोकणी मसाले, अगळ व मिठाई घेऊन येते.)

मावशी :

 अनु हे पण भर.

आण्विका :

 मावशी काय हे. खूप ओझं होईल. कशाला. तिकडे असत ना.

मावशी :

 गप्प भर ताईला आवडेल. अन् हे घे. बाळाचा ड्रेस. व खेळणे माझ्याकडून.

आण्विका :

 अग तुम्ही मला डॉक्टरची हमाल करून ठेवलंय बघ.

रेवती :

 कधी जाणार आहेस .

आण्विका :

 उद्या सकाळी. वेदांगीचे पपा आलेत ना. त्यांच्या पाहुण्यांकडे बाकीची बोलणी करून घ्यायला. आपल्या सासुरवाडीला आलेत ते. त्यांसोबत जाणार आहे.

रेवती :

 वेदांगी ताईच लग्न ठरल.

आण्विका :

 हो, ठरल्यात जमा आहे. नव्हरा चांगला आहे म्हणे. पुण्यातच त्याच स्वतःच हॉस्पिटल आहे, जुन्नरला. बाकी आपण माहिती काढली ना.

रेवती :

म्हणजे मॅडमच फिक्स झालं. आता तुझं बघायचं.

आण्विका :

 माझं एक कोडंच आहे बघ.

रेवती :

 का ग. ईशान आहे ना.

आण्विका :

अग असून काय उपयोग मागणी काय मी घालायची?

रेवती :

 त्यात काय? घालायची. आजकाल चालत.

आण्विका :

 मला ते बर वाटत नाही. एवढं साधं कळत नाही का त्याला, समोरच्या माणसाच्या मनातील भावना.

रेवती :

तस बघायला गेलं तर माझच चुकल. मी नको काढायला हवा होता तुझ्या लग्नाचा विषय.

आण्विका :

 अग तुझं काय चुकलं नाही ग. तू तर प्रामाणिक प्रयत्न केला होतास.

रेवती :

 मी बोलू का त्याच्याशी. सांगतो त्याला तुझ्याविषयी.

आण्विका:

 काही नको, आता मी काही त्याला प्रपोज करणार नाही. जोपर्यंत तो मला लग्नासाठी मागणी घालत नाही.

रेवती:

 अस का?

आण्विका :

हो तसच आहे ते. नाहीतर सगळी मला अगोचर म्हणतील.

रेवती :

 अग पण.

आण्विका :

 पण बिन काही नाही. चल मावशीला मदत करायला.

( त्या दोघी बॅग आवरून जातात.)

                              Cut to …….

…. …… ….. …..

Next day/ Morning /8.०० o’clock / inter

    Action :

वेदुचे वडील हॉल मध्ये बसलेले आहेत. नुकताच जेवण झालेलं आहे. जेवण आटोपल्यावर. निघताना.

आण्विका आपली बॅग घेत असते.

मावशी :

 सार नीट घेतलस ना.

आण्विका :

 हो.

काका :

 चार दिवसासाठी आली अन् वेड लावून गेली पोर.

आण्विका :

 नमस्कार करते.

( काका मावशी आशीर्वाद देतात. )

काका :

तुला पण वेदू सारखा नव्हरा मिळावा. तुझ्या मनाजोगा.

आण्विका :

कायतरीच काका.

रेवती :

 परत कधी येणार?

आण्विका :

 त्यापेक्षा तूच ये. कोल्हापूरला.

काका :

 रेवा, स्वप्नील दोघे सोडून या जावा.

रेवा स्वप्निल एकदम :

 बर बाबा.

रेवा व स्वप्नील गाडी काढतात व अण्विका व वेदूच्या बाबांना सोडायला जातात.

 मावशी :

 पोहोचल्यावर फोन कर.

( अण्विका मान हलवून होकार देते.)

         Cut to …….

…….. ……. ……

Evening / 7.०० o’clock/ kolhapur c.b.s bassthanak /outer.

 Action :

आण्विका व वेदूचे बाबा गाडीतून उतरतात. वेदूचे बाबा फोन लावून अण्विकाच्या बाबांना बोलावतात. व आपल्या मुलग्यालाही अण्विकाचे बाबा आल्यावर

बाबा :

 काय प्रवास कसा झाला.

आण्विका :

मस्त.

बाबा :

 प्रवास झाला ना नीट.

वेदूचे बाबा :

 हो झाला.

बाबा :

 तारीख ठरवली की नाही.

वेदूचे बाबा :

नाही अजून दोन-चार दिवसात नक्की करू.

बाबा :

 न्यायला कोण आले नाही? सोडून येवू का?

वेदूचे बाबा :

 नको फोन केलाय श्रीकांतला येईल एवढ्यात.

हा बघा आला.

(श्रीकांत वेदूचा भाऊ गाडीवरून येतो. ते निघतात.)

          Cut to …….

….. ….. ….. …… ….

क्रमशः पुढे .......

 कळत नकळत जुळले हे बंध भाग १७

क्रमशः पुढे चालू.....

Night / 7.3०/ Inter /Kolhapur Anvika Home

 Action :

( आण्विका बाबा बरोबर गाडीवरून येते. बंगला आवारात आल्यावर वरील गॅलरीत ताई व बाळ बसलेलं असत. ती अण्विकास पाहून.)

    Dialog :

ताई :

 ते बघ कोण आलंय. मावशी खाऊ घेऊन आलेय हो. आता आपण खूप खूप खाऊ खायचा काय.

(आण्विका घरात येते. फ्रेश होऊन आल्यावर.)

आई :

 काय मावशीच घर सुटतं नाही होय. गेली स्वारी ते तळच ठोकून बसली.

(अण्विका हसते.)

(ती आपली बॅग उघडते. व साहित्य काढून देते.)

आई :

 काय काय दिलंय मावशीनं.

आण्विका :

 हे घे, ही मिठाई, आगळ व हे तुमचे मसाले.

आई :

 बर झालं, आगळ संपलच होत.

आण्विका :

 अन् हा बघ बाळासाठी ड्रेस दिलाय. अन् हे खेळणे.

ताई :

 (खेळणे उचलून)

बघ आजीनं काय पाठवलंय.

(ती बाळाला खेळवू लागते.)

Cut to. ….

…. ….. …

Action :

(ईशान ट्रेनिंगवरून थेट गावी जातो. तेथील घराचे बांधकाम पाहतो. कामावरील कंत्राटदारांचे बिल पेड करतो. व घराच्या बाकीच्या कामाची जोडणी लावतो.)

Day / Inter / Radhanagari village.

Action :

 ( ईशानची आई जेवण वाढत असते.)

आई :

 घर झालं एकदास बांधून. आता लग्नाचं तेवढं बघायला हवं.

बाबा :

 बघुया की.

ईशान :

 थांब जरा. आणि दोन चार महिने.

बाबा :

 का दोन चार महिन्यांनी काय म्होतूर आहे.

ईशान :

 तस नाही. जरा घराचं काम होऊ दे. मग बघू.

आई :

 तोपर्यंत बघून ठेवू एखादी.

ईशान :

बघुया. आता जेवू.

आई :

 जेव की तुझा काय हात धरलाय की तोंड

( ईशान रागाने बघतो. मान हलवतो व जेवू लागतो.)

       Cut to …….

…… …… …….

Day / Inter/ Radhanagari Office

Action :

(ईशान ड्युटीवर हजर असतो. ऑफिस मधून कामावरील मधल्या सुट्टीत स्वप्नीलला फोन करतो.)

      Dialog :

 ईशान :

हॅलो स्वप्नील,

स्वप्नील :

 हॅलो, बोल की, काय कसा आहेस. काय राव गेल्यापासून फोन नाही की साधा मेसेज नाही.

ईशान :

अरे कसं करणार फोन खराब झाला होता. मगाशी मिळालाय रिपेरी करून.

बर तू कसा आहेस.

स्वप्नील :

आहे मजेत.

ईशान :

 घरातील बाकी कसे आहेत.

स्वप्नील :

 घरातील इतर म्हणजे, नेमकी कोण पपा ,ममी की आणखी कोण?

ईशान :

सर्वच रे.

स्वप्नील :

 इकडून गेल्यापासून स्वारी गायबच झाली.

ईशान :

 जरा घराच्या कामात गुंतलो होतो.

स्वप्नील :

 बर फोन सहज केला होता की आणखी काही काम. आ..

ईशान :

तुझ्यापासून काय लपलय, कशी आहे अनू.

स्वप्नील :

 म्हणजे तुला माहित नाही.

ईशान :

काय रे.

स्वप्नील :

 अरे तिच लग्न ठरलं की.

ईशान :

काय, अस कस लगेच ठरलं.

स्वप्नील :

बाकीची लग्न ठरतात तस.

ईशान :

 गप चेष्टा करू नकोस. सांग खर काय ते.

स्वप्नील :

मग फोन कर व विचार की.

ईशान :

 ये प्लीज , असं काय बोलू नकोस.

स्वप्नील :

 का? काळीज दुखतय.

ईशान :

 अरे चेष्टा थांबवं व काय ते सांग.

स्वप्नील :

 मॅडम कोल्हापूरला गेल्यात. दोन दिवस झाले. इट्रनशीप आहे ना.

ईशान :

 कधी आली, मला काही बोलली नाही.

स्वप्नील :

 तू तिला मेसेज करत नाहीस, फोन करत नाहीस. कशी सांगेल तुला?

ईशान :

 अरे फोन बंद होता. आता कॉल करतो.

स्वप्नील :

 मग वाट कसली बघतोयस, कर.

ईशान :

तू ठेवलास तर करेन ना.

स्वप्नील :

बर ठेवतो.बाबा.

(फोन ठेवल्यावर ईशान अण्विकास कॉल करतो.)

(फोनची रिंग वाजत असते. फोन रुमामधील बेड वर वाजत असतो. आण्विका बाल्कनीत उभा असते. फोनची रिंग ऐकून ती आत येते फोन पाहते. त्यावर ईशानचे नाव पडलेलं असत.)

       Dialog :

आण्विका :

 (मनात)

आता आठवण झाली होय स्वारींना. इतकी दिवस कुठे होता. उचलतच नाही.

( ती बेडवर फोन ठेवून देते. रिंग वाजते. व बंद होते.)

 ईशान :

 मॅडम उचलत नाहीत वाटत. रागवलेल्या दिसतात.

बर मेसेज तरी करतो.

(तो मेसेज पाठवतो. आण्विका मुद्दाम मेसेज पाहत नाही.थोड्या वेळाने ती तेथून उठते. व गाडी घेऊन कॉलेजला निघते.)

     Cut to ……

….. ……. ……. ……

Day /outer /Kolhapur city /12.o’ clock

Action :

(आण्विका स्कुटीवरून वेदांगीच्या घरी जाते. लग्नाच्या खरेदीची व इतर लगबग चालू असते.

बाहेर रोडवर उभा राहून ती हॉर्न वाजवते व वेदांगीला बोलावते. ती येते.)

Dialog :

आण्विका :

 (हॉर्न वाजवून)

वेदे, ये वेदे,

(वेदांगी आवाज ऐकून बाहेर येते.)

वेदांगी :

 थांब आलेच .

 ( वेदांगी बाहेर अण्विकाच्या गाडीजवळ येते.)

आण्विका :

 काय झालं ना मनासारखं.

वेदांगी :

 झालं, आहे चांगल स्थळ.

आण्विका :

 तारीख फिक्स झाली.

वेदांगी :

नाही अजून, गावाकडील पाहुणे आल्यावर जाणार आहेत.

आण्विका :

इंटरशिपच कसं करणार.

वेदांगी :

 काल गेले होते कॉलेजवर तेव्हा प्राचार्यांशी बोलण झालय.

त्यांना कल्पना दिली आहे. तेव्हा त्यांनी पुण्याकडील रुग्णालय देण्याचं मान्य केलय. कागदपत्र पण सबमिट केलेत.

आण्विका :

 निकाल पाहिलास.

वेदांगी :

 ऑनलाईन पाहिलाय, झाले पास. तू मात्र बाजी मारलीय.

आण्विका :

बर निघते मी तुझं झालं काम माझ पाहायला नको. का येतेस बरोबर.

वेदांगी :

 येते की…. थांब जरा… मला पण कंटाळा आलाय.

(वेदांगी घरात जाते. आईला )

वेदांगी :

मी जाऊ अनु बरोबर कॉलेजला.

आई :

 जा की, नाहीतर लग्न झाल्यावर कुठे फिरायला मिळणार आहे.

( वेदांगी आपली पर्स घेते. व अण्विका सोबत निघते.)

      Cut to ….. ……

….. …… …… …….

 Day / Medical College/Inter 2. ०० o’ clock

Action :

(आण्विका प्राचार्यांच्या केबिनकडे जाते.)

आण्विका :

 मै आय कम इन सर.

प्राचार्य :

कम इन.

(आण्विका व वेदांगी दार उघडुन आत आल्यावर.)

प्राचार्य :

 कोण अण्विका , अभिनंदन

आण्विका :

थ्यांक्स सर.

प्राचार्य :

कमाल केलीस. टॉपर आहेस तू. अन् वेदांगीला पण चांगले मार्क्स भेटलेत. तुझं ही अभिनंदन.

आण्विका :

 सर इंटरशिपच कसं करायचं.

प्राचार्य :

 सांगायचं म्हणजे पूर्वी लास्ट इअर परीक्षा झाली की आम्ही मुलांना त्यांच्या सोईने हॉस्पिटल निवडण्यास देत होतो. पण बरेचशे विद्यार्थी आप आपल्या परीने हॉस्पिटल निवडायचे. पण हल्ली सरकारी दवाखान्यात डॉक्टर कमी असलेने. व तिथे जास्त गरज असेल ने आपल्या जवळील दवाखाना निवडण्यास सांगितले आहे.

आण्विका :

मग मला इथे कोल्हापूर व जवळील पी ए सी मिळेल ना.

प्राचार्य :

 हे बघ अनु, इंटरशिप म्हणजे उगाच टाईमपास नको. अन् सांगायचं म्हणजे बऱ्याच जणांचे रेक्रूपमेंट कोल्हापूर आहे. व तू चांगल्या डॉक्टरांच्या सहवासात असावेस असे मला वाटते. यासाठी तुला दोन ठिकाणे दिली होती एक आजरा व दुसरे राधानगरी.

आण्विका :

 पण ती लांब आहेत.

प्राचार्य :

 हे बघ जरी लांब असली तरी तिथे चांगले सर्जन डॉक्टर आहेत. माझ्या ओळखीचे. व तू तिथे जावेस अस मला वाटते. त्यांच्या ज्ञानाचा तुला फायदा होईल. व लांबच म्हणत असशील तर राधानगरी घे. ते आजर्यापेक्षा जवळ आहे. व तुझ्या सोईचे पण. तिथल्या कॉटर मध्ये तुझ्या राहण्याची सोय पण होईल.

व त्या परिसरात अनेक वनौषधी असतात. त्याबाबतच तुझं संशोधन देखील पूर्ण होईल.

वेदांगी :

घे जा गप राधानगरी. कोल्हापूर काय सुटतं नाही होय.

आण्विका :

चालेल सर.

प्राचार्य :

हे लेटर घे. ऑफिस मधून सही शिक्का घे. अन् हा फोन नंबर तिथल्या डॉक्टरांचा आहे. संजय पाटील त्यांचं नाव. माझा रेफरन्स सांग.

आण्विका :

चालेल सर.

प्राचार्य :

काय वेदांगी लग्नची तयारी जोरात चालू असेल.

वेदांगी :

चालू आहे.

प्राचार्य :

 पत्रिका छापल्या की नाहीत.

वेदांगी :

तारीख आजुन फिक्स करायची आहे. दोन- चार दिवसात मिळेल.

प्राचार्य :

 तुला परवानगी दिलेय. पूण्याकडील तुझ्या सोईन मिळेल हॉस्पिटल.

आण्विका :

 लेटर घेते. व निरोप घेते.

बर, येते सर.

प्राचार्य :

 ते येणं जाणं तर आहेच. तुझ पण बघायला चालू आहे का? की काढू एखाद स्थळ.

आण्विका :

 नको सर, अजून वेळ आहे.

प्राचार्य :

 वेदांगीच चालू आहे. म्हणून म्हटल. तुला पण पहावा एखादा डॉक्टर.

आण्विका :

 करायच्या वेळी सांगेन सर.

प्राचार्य :

अजून किती थांबणार?

आण्विका :

 फक्त काही महिने.

प्राचार्य :

कोण पाहिलास काय?

आण्विका :

म्हणायला गेलं तर हो, अन् नाही सुद्धा.

प्राचार्य :

कोड्यात बोलायला तू काही ऐकायची नाहीस. बर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

आण्विका :

 हा थ्यांकयू सर.

प्राचार्य :

वेदांगी तुला पण शुभेच्छा

वेदांगी :

 थ्याकयू सर.

(त्या निघतात.)

      Cut to …..

…… …… …

That time office / inter

Action :

(आण्विका ऑफिस मध्ये जाते. तेथील कारकुनाकडे लेटर देत.)

. Dialog :

आण्विका :

 यावर कॉलेजचा सही शिक्का द्या.

(तो क्लार्क घेतो. सही शिक्का देतो. त्या बाहेर येतात.)

      Cut to …....

……. …… …..

Outer /Collage Road /Evening. 4.00 o’ clock

   Action :

(कॉलेज पार्किंग कडे जाताना )

Dialog :

वेदांगी :

 काय ग अस काय सांगितलस सरांना.

आण्विका :

काय.

वेदांगी :

म्हणायला गेलं तर हो अन् नाही सुद्धा.

 अण्विका :

 ते मजेत म्हटल.

वेदांगी :

काय प्रेमात वगैरे नाही ना पडलीस कोणाच्या.

आण्विका :

 काय सांगू तुला.

वेदांग :

 म्हणजे पडलीस म्हणायची.

कोण ते तरी सांग.

आण्विका :

 नाही नको, तू रागवशील.

वेदांगी :

 नाही रागावणार.

आण्विका :

 तुझ व त्याच भांडण झालंय.

वेदांगी :

कोण सांग की , …कोड्यात नको बोलू.

(आण्विका मोबाईल वर डी पी दाखवत.)

आण्विका :

हा बघ.

( वेदांगी बारकाईने पाहत.)

वेदांगी :

याला बघितलय कुठेतरी.

कोण बर….. आ

आण्विका :

 बघ कोण ते.

वेदांगी :

 अग, हा तर तो ईशान आहे ना.

आण्विका :

हो.

वेदांगी :

 बापरे! मला धक्काच बसला, बाई ग , तू याच्या प्रेमात पडलीस…..

आण्विका :

 हो,

वेदांगी :

 अग तो किती वांड आहे माहित आहे ना.

आण्विका :

 हो,

वेदांगी :

 अग तुझं अन् त्याच जमेल का?

आण्विका :

 न जमायला काय झालं. जमवून घेतल तर जमेल.

वेदांगी :

 फिरकी तर घेत नाहीस ना.

आण्विका :

 नाही ग. पण कुणाला सांगू नकोस. अजून काही स्वारींनी कबूल केलेले नाही.

वेदांगी :

एकतर्फी नाही ना.

आण्विका :

नाही.

वेदांगी :

तुझ बोलण एक कोडंच आहे बाई. होय पण, नाही पण, कबूल करायला नाही अजून, काय समजत नाही.

आण्विका :

 गप तू चल.

 (त्या दोघी निघतात.)

      Cut to …….

…. …… …… ….. …..

That day / Evening / outer / On Road Kolhapur city

(वेदांगीला घरी ड्रॉप करून अण्विकाच्या घरी निघ ते. जाताना तिच्या लक्षात संयोगिताला भेटायला जायचे आठवलते.

ती तिकडे गाडी वळवते.)

          Cut to ………

…… …… …

क्रमशः पुढे.....


Sunday, March 23, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag 14and 15

 Kalat n kalat julale he bandh script bhag 14and 15

कळत नकळत जुळले हे बंध भाग १४

क्रमशः पुढे चालू ......

Evening / Aanvika mavshi home /Inter 5.30p.m

      Action :

ईशानला सोडल्यानंतर स्वॅप्निल घरी येतो. फ्रेश झाल्यानंतर तो हॉलमध्ये प्रवेश करतो. तेथे, रेवा चित्रपट पहात जवळ बसली आहे. स्वॅप्निलला येताना पाहून ती आपले तोंड वाकडे  करते आणि टीव्हीकडे  वळवते.

आण्विका स्वॅप्निलसाठी चहा आणते. रेवतीला हे आवडत नाही की अन्विकाने चहा आणला.

       Dialog :

        रेवती :

 कर सेवा, आयुष्य सेवा करतच जाणार तुझं.

     स्वप्नील :

 तू का जळतेस. तसं पाहायला गेलं तर तूच आणून द्यायला हवस.

      रेवती :

 ए जा तुझी सेवा करायला मी काही तुझी बायको नाही.

स्वप्नील :

अनुताई तस पाहता तूच माझी बहिण वाटतेस. नाहीतर हिच्या पोटात थोडीशी पण माया नाही. सारखी चिडून असते माझ्यावर.

रेवती :

 ए लई मोठे बोलू नकोस. लई बहिण म्हणतोस ना मग आल्यापासून किती वेळा तिला फिरायला घेऊन गेलास. परवाची ट्रिप पण तिच्या मुळेच केलीस. तिला एकदा तरी परिसराचे दर्शन घडवले का? तुझ्याच मस्तीत असतोस.

 (रेवा दात ओठ चावत रागाने बोलते.)

स्वप्नील :

 उद्या जाऊया की आपण. बाबांना सुट्टी घ्यायला सांगू. वाटल तर.

रेवती :

 आता बाई या गाढवाला कसं समजावू, सोड बाबा विषय.

आण्विका :

 रेवा शांत बस, आत जा व मावशीला स्वयंपाकात मदत कर जा.

(त्या क्षणी काका येतात. अन्विका त्यांना चहा देखील आणते. काका स्वॅप्निलच्या शेजारी बसले आहेत.)

काका :

 स्वप्नील केव्हा आलास?

मुड ऑफ का?

स्वप्नील :

  थोडा वेळ झाला येऊन. ती आहे ना रेवा. ती सारखी भांडते. त्यामूळे मूड हाफ झालाय.

काका :

 अस का म्हणतोस. काय केलं तिने.

स्वप्नील :

 बघा ना बाबा, आल्यापासून रेवा भांडतेय. की त्यांना नेलं नाही म्हणून. तुम्हीच सांगा बाबा टू व्हीलर वरून दोघेच जाऊ शकतो ना. तिघे जण येवढ्या लांब योग्य आहे का?

( त्याचे ऐकून रेवती बाहेर येते आणि तिच्या वडिलांशी बोलते.)

रेवती :

 तस नाही बाबा. आपल्या घरात एक पाहुणी आलेय. तिला तरी एखादेवेळी फिरवायला घेऊन जायचं.

 व याच काही ऐकु नका बाबा, घरात दुसरी गाडी होती की.

स्वप्नील :

 तुझी स्कूटी, हि झुरळासारखी गाडी चालवतेस तू रे… रे….. संध्याकाळ लागेल पोहोचायला.

रेवती :

साहेब गेल्यावर्षी या झुरळा सारख्या गाडीनेच मारला होता नंबर, पहिला. कारल्याचा पोहोचून.

समजल का कोंबड्या.

स्वप्निल :

कोंबड्यांची बहीण कोण? कोंबडी ना.

रेवा :

तूझ्यासारखा नको मला भाऊ.

स्वप्निल :

जा मला पण गरज नाही तुझी…चल

रेवती :

जा हल..

(स्वॅप्निल रागीट  मुद्रा  करतो. आणि रेवती त्यालाही दाखवते )

काका :

 दोघे, गप्प बसा बघू आधी.

तस पाहायला गेलं. तर अणू इथे आल्यापासून एकदाही बाहेर तू तिला फिरून अलिबाग व इतर ठिकाणे दाखवली नाहीस. उलट तिच्यामुळे तू फिरायला गेलास. हे बरोबर आहे की नाही.

स्वप्नील :

 हो आहे.

काका :

 मग उद्या तिला जा घेऊन कार्ल्याला. तिला पण एकवीरा दर्शन घडव.

रेवा :

 त्याची काही गरज नाही. मी आणेन तिला फिरवून.

स्वप्नील :

बघा, आता काय म्हणतेय ती.

रेवती :

मग काय म्हणू. जाणार आम्ही उद्या. बाबा तेवढं तेलाचं बघा.

काका :

 हा देतो मी.

काका :

(स्वप्नीलला)

काय रे दाखवलास काय कारल्याची लेणी ईशानला.

स्वप्नील :

 हो दाखवली की. मस्त मज्जा आली. खूप फिरलो.

काका :

काय मग काय म्हणतोय.

स्वप्नील :

 ( अण्विकास पाहून)

दोन दिवस राहिलेलं ट्रेनिंग करून निघतोय. म्हणे. त्याच्या घरचे लग्नाचं बघताहेत म्हणत होता.

काका :

  म्हणजे बोहल्यावर चढायची तयारी चाललेय म्हण.

स्वप्नील :

 हो तर.

काका :

 खूप चांगला मुलगा आहे. एवढा हुशार व नोकरदार. पण, मला तर त्याचा स्वभाव जाम आवडला.

स्वप्नील :

 मघाशी फोन आला होता त्याच्या घरून, त्याला स्थळ आलय म्हणे. बायोडेटा पण पाठवलाय त्यांने.

काका :

 काय मग,.. बार उडणार तर.

स्वप्नील :

 मग काय. मी पाहिलीय मुलगी. मस्त आहे. बी . एस. सी झालीय. त्याच्या गावाकडीलच आहे त्याच्या राधानगरी साईडची.

( स्वॅप्निलचे शब्द ऐकून, रेवा आणि अन्विका एकमेकीकडे पहात आहेत.)

रेवती :

 मग काय स्वारी खुशीतच असेल.

स्वप्नील :

हो तर, आम्ही साकडं पण घातलं देवीला जमू दे म्हणून.

रेवती :

तू काय वरदावडा आहेस का?

स्वप्नील :

 हो आहेच मी, त्याच्या सारख्या मित्रासाठी मी काय पाहिजे ते करीन. तुझं काय जातंय.

       Action :

अन्विकाला वाईट वाटत आहे, परंतु ती कुणाला आपल्या  भावना न दाखवता ट्रे उचलते आणि  आत जाते.

ती तिच्या भावना दडपते आणि रेवाच्या खोलीकडे जाण्यापूर्वी तिच्या चेहेऱ्यावर पाणी मारते . व रेवाच्या रूममध्ये जाते. रेवा तिच्या मागे जातो.

ड्रेसिंग टेबलच्या आरशात पहात असताना, ती पावडर आणि तेल लावण्यास सुरवात करते.

ती रेवाच्या खोलीत जात असताना स्वॅप्निलने तिच्या चेहऱ्यावरील भावना ओळखली. तो आनंदी आहे. त्याला समजले की ती ईशानच्या प्रेमात आहे.

स्वप्निल :

(मनात)

अस आहे होय. म्हणजे डॉक्टर मॅडम प्रेमात पडल्यात म्हणायच्या.

                Cut to……

…… …..

Inter / Evening / 6.30 O’clock

    Action :

अनु तिचा चेहरा आणि डोळे पुसते, आरशात पहात असताना पावडर लावू लागते .आणि त्या क्षणी, रेवा मागून येते.

Dialog :

रेवती :

काय झालं नाराज व्हायला.

(अन्विका तिच्या डोळ्यांतून अश्रूंना  पुसत उभी आहे.)

रेवती :

 गप तो पतंग उडवतोय. उगाच.

आण्विका :

 तो उगाच कशाला उडवेल पतंग,

रेवती :

 अग, तुला एवढं साधं कळत नाही. कालच्या चॅटिंगमध्ये त्याने कबूल केलंय की तू आवडतेस. व लगेच तो बोहल्यावर उभा राहील कसा? या स्वप्न्याला शंका आलेली दिसतेय. अंदाज काढत असेल मेला. अन् …. जर का त्यानं लग्न दुसरीकडे करायचा प्रयत्न केला. तर राडा घालू लग्नात.

आण्विका :

झालं ते वांग भजन पुरे. त्याला माझी परवाच नाही ये. मग मी का झुराव. माझ्या मॅसेजचा साधा रिप्लाय देत नाही.

रेवती :

 अग कामात आहे तो. उगाच काहीतरी, वेड्यासारखं करू नकोस.

(दरम्यान, काकू बोलावते.)

मावशी :

रेवा, अनु .

रेवती :

 आले थांब.

रेवती :

 (अनुला)

 डोळे पुस आधी.

(अन्विका तिचे डोळे पुसते.)

आण्विका :

 (मनात)

आता मी प्रथम मेसेज करणारच नाही. जोपर्यंत त्याचा येत नाही. तोपर्यंत.

                  Cut to…..

……. …….. …….. ….

क्रमशः पुढे.......

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग १५

क्रमशः पुढे चालू .......

Night / 10.30 O’ clock. /Inter

      Action :

ईशान पलंगावर पडलेला आहे. तो त्याच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप संदेश आणि डीपी पहात आहे. अन्विकाचा संदेश आला आहे की नाही हे तो तपासतो.  कोणताही संदेश नाही तर तो तिच्या डीपीकडे पाहतो.

     Dialog :

ईशान :

 ( मनात)

खूप सुंदर दिसतेस...... अस वाटत कुठेतरी लांब जाव, जिथं फक्त तू अन् मी, व हा निसर्ग. एकत्र बसून खूप गप्पा माराव्यात अस वाटत. आपली भेट झाली तेव्हा अस बोलण झालच नाही.... कळत कसं नाही का तुला माझ्या मनातल. घरातील लोकांना सांग की. कशाला स्थळे पाहता? मी माझ्या मनातील राजकुमार कधीच शोधलाय. सांगशील ना.

(स्वप्न पाहत , ईशान त्याच प्रकारे झोपी जातो. )

Cut to …

…… …….. ……. ..

After two days,

निरोप सोहळा आहे. ईशान स्वप्निललाही आमंत्रित करतो. त्या दिवशी, एक मैत्रीपूर्ण जेवण आहे. तो आपल्या जेवणासाठी वैयक्तिकरित्या पैसे देतो.

Cut to 

Afternoon /Ishan trening camp /2.०० o’clock/ Outer.

     Action :

आपुलकीच्या लंच पार्टी दरम्यान स्वप्निल येत आहे. बाहेर, ईशान प्रतीक्षा करीत आहे.

   स्वप्नील :

 काय हे मला कशाला बोलवलेस. पार्टी तर ऑफिसची आहे ना.

ईशान :

काही नाही रे, आज रात्री निघणार आहे ना. म्हटल भेटू. पुन्हा तू काय लवकर भेटणार आहेस.

स्वप्नील :

 अरे पण ही ऑफिस पार्टी आहे.

ईशान :

 त्यात काय? मी परवानगी घेतलीये. व ही फ्री पार्टी आहे. याचा खर्च आम्हीच कर्मचारी करतो. डिपार्टमेंटचा संबंध नाही. व बिल पण पेड केलय मी. काळजी नको.

(ते दोघेही एका ठिकाणी जातात आणि टेबलावर बसतात. रवी देखील त्यांच्या जवळ येतो. चांगली गाणी वाजवत आहेत आणि शांत वातावरण आहे.)

स्वप्नील :

किती वाजता जाणार आहेस.

ईशान :

 आज रात्रीच निघणार आहे.

स्वप्नील :

 लगेच, जरा एक दिवस थांबला असतास तर.

ईशान :

 घरचं काम चालू आहे. दोन - चार दिवस सुट्टी भेटतेय तेवढ्यात जरा बिले भागवून घ्यायचं म्हणतोय. शिवाय बाबांना ही लोड पडतोय.

स्वप्नील :

पुन्हा कधी भेटणार?

ईशान :

 कोल्हापूरला आलास की ये भेटायला.

स्वप्नील :

लग्नाचं काय ठरवलस.

ईशान:

 तुला तर सर्व माहीत आहे. तूच सांग की मार्ग.

स्वप्नील :

मग मी तुला दाजी म्हटलं तर चालेल का?

( इशानला ठसका बसला आहे, तर स्वप्निल त्याला पाणी देत आहे.)

स्वप्नील :

अहो हळू हळू.

रवी :

 ठसका जोराचा लागला. म्हणजे फिक्स झालं म्हणायचं.

ईशान :

(पाणी पितो. हसतच.)

मी आहे रे तयार पण तुझी बहिण तयार होईल का?

स्वप्नील :

 होणार की, मी मोठा सापच सोडलाय पायात. सरळ थाप मारली, की तुझं लग्न ठरतय म्हणून.

ईशान :

अस का सांगितलस. काय वाटेल अनुला.

स्वप्नील :

 काय वाटणार, लग्नाचा विषय तुझा काढल्यापासून वातावरण तापलंय. रेवा तर चांगलीच भांडत होती. माझ्याशी.

पण अनु दीदी नाराज झाली.

ईशान :

 मी सांगू का फोन करून तिला माझं लग्न नाही जमलेय ते.

स्वप्नील :

नको, गप्प बस. मी सांगितलेय तू जातोयेस म्हणून. उगाच फोन करून टाटा बाय बाय करू नकोस.

वातावरण गरमच राहू दे.

अन् एवढं भेटाव वाटतंय अर्धांगीला तर कोल्हापुरातच भेटा की साहेब.

ईशान :

स्वप्न्या तू तर डायरेक्टच बोलतोस बघ. भारी धाडसी आहेस बघ.

स्वप्नील :

 मला उगीच बहिर्जी नाईक म्हणत नाहीत. तुला काय वाटल तुला सहज पसंत केलेय मी , त्या दिवशी ट्रीपलाच तुला व अणू दीदीला बारकाईने न्याहाळल होत. ज्यावेळी रेवाने अनु दिदीच्या लग्नाचा विषय काढला. तेव्हाची तुझी रियाक्शन मी पाहिली , व तुझ्या चेहऱ्यावरून मी समजल की तुझं अनुताई वर प्रेम आहे ते.

वैदेहीच्या स्थळाची चौकशी केली, त्यावेळी तुझीपण माहिती दुसरीकडून काढली. तुझं शिक्षण, गाव, तुझ्या मामाच गाव. नोकरी कुठे कशी लागली. नोकरीच्या ठिकाणाहून तसेच सध्या अलिबाग मध्ये कुठे काय काय करतोस इथपर्यंत बायोडेटा गोळा केला. व अण्विका दीदी साठी वरसंशोधन केलं.

समजल का?

ईशान :

 बापरे, तू तर भलताच पुढचा आहेस रे.

स्वप्नील :

 मग असणारच आजकाल मऊ राहून कस चालेल. अक्टीव्ह असावे. माणसानं.

 ईशान :

एकदा फोन करून सांगू का? निघतोय म्हणून.

स्वप्नील :

 नको, आजिबात नको. जरा तिला पण ओढ वाटू दे.

ईशान :

 तू भाऊच आहेस ना तिचा. तिच्या बाजून व्हायचं सोडून मला सपोर्ट करतोयस.

स्वप्नील :

हो, तिच्या भविष्यासाठी मी हे करतोय. एखाद्या नशिल्या, नर्शेसी लफड असलेल्या डॉक्टरशी लग्न होण्यापेक्षा तुझ्याशी लग्न व्हावं हे बरं.

ईशान :

 अरे पण तिच क्षेत्र वेगळ, माझं वेगळं ती तयार होईल का?

स्वप्नील :

 होईल काय व्हायलाच पाहिजे.

ईशान :

 मग पार्टी तुला माझ्याकडुन.

स्वप्नील :

 पार्टी वगैरे काही नको. तेवढं लग्नात कान पिळीचा मान तेवढा दे.

रवी :

तो तर तुला दिलाच पाहिजे. याला माझा फुल्ल पाठींबा आहे.

ईशान :

 देईन की?.

(ते हसू लागतात.)

             Cut to……

…… …… . ……..

Evening /4. ०० o’clock / Inter - outer.

Action :

स्वप्निल इशानबरोबर त्याच्या खोलीत जातो. इशान आपल्या गोष्टी पॅक करतो आणि त्याच्या खोलीची  चावी रिसेप्शनिस्टकडे  हाती देतो. रवी तेथे आलेला आहे.

 Dialog :

ईशान :

 बर आहे या कधीही आमच्या कोल्हापूरला.

रवी :

 हो नक्की सर. पण त्याआधी तुम्ही या आमच्याकडे एकदा नाशिककडे, तुम्ही इथे पाहुणचार केला. आता आम्हालाही संधी द्या.

ईशान :

 नक्की येऊ. बाकी आपल्याला भेटून आनंद झाला.

(स्वप्निल ईशानला त्याच्या दुचाकी वरून  सोडत  आहे. पुणेला जाणारी बस उपलब्ध आहे. ईशानने बसमध्ये एक जागा पकडतो.)

ईशान :

 (स्वप्निलला)

एकदा फोन करू का?

स्वप्नील :

 नको,

ईशान :

 प्लिज,

स्वप्नील :

 जरा धीर धरा साहेब. नाहीतर मॅडम लईच वर चढतील वर आकाशात. जरा वाट पाहा. वाट पाहण्यात पण एक मज्जा असते. समजल काय.

ईशान :

 मी गेलो म्हणून सांग.

स्वप्नील :

 सांगतो की.

Action :

(कंडक्टर लवकरच येतो. तो घंटा वाजवतो. ताबडतोब, ड्रायव्हर बस सुरू करतो. स्वप्निल निरोप घेतो. बस निघते.)

                Cut to …..

….. …… …… ……..

Night / 8. ०० o’clock / Inter

   Action :

स्वॅप्निल घरी येतो. दुचाकी पार्किंग केल्यानंतर  हातात चावी फिरवत, तो प्रवेश करतो. त्याची आई नेहमीच रात्री टेबलवर रात्रीचे जेवण सेट करते. ती स्वप्निलला पाहिल्यावर.

     Dialog :

अण्विकाची मावशी :

 काय रे कुठे होतास सकाळपासून.

स्वप्नील :

होतो एका कामात.

मावशी :

 अरे सकाळ पासून काही जेवला नाहीस. किती वाट बघायची.

स्वप्नील :

फोन केला होता की बाबांना. बाहेर जेवणार आहे म्हणून,

मावशी :

मग कुठला निरोप मिळतो. बर, ये जेवायला मी पाने वाढते.

स्वप्नील :

 नको खूप जेवलो दुपारी.

मावशी :

कुणाच्या लग्नाचं आमंत्रण होत काय?

स्वप्नील :

नाही ग, ईशान सोबत होतो. त्याने दिले जेवण.

(स्वॅप्निल अन्विका दीदीकडे पहात आहे. ती टेबलवर जेवण सेट करीत आहे .)

  स्वप्नील :

तो गेला आज कोल्हापूरला त्याच ट्रेनिंग संपल.

आण्विका :

 काय ? गेला. कधी ? किती वाजता?

स्वप्नील :

 आत्ताच थोड्या वेळापूर्वी. पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये मी बसवून आलोय.

आण्विका :

 (रागावलेली, मनात)

साधं कळवावा सुधा वाटल नाही.

(ती आत जाते .)

आण्विका :

 (बडबडत)

स्वतला काय समजतो कुणास ठावूक. निघतोय म्हणून तरी सांगायचं. एवढी कसली आलेय घमेंड.

रेवती :

 अग काय झालं. अशी काय बडबडतीयस.

आण्विका :

 हो बडबडतेय , खुळ लागलंय मला.

रेवती :

काय झालं ते तरी सांग.

 आण्विका :

स्वप्नील ईशानला पोहोचवून आलाय. त्याने साधं फोन करून कळवल देखील नाही मला, जातो म्हणून.

रेवती :

अग, गडबडीत राहिलं असेल कळवायचं, त्यात काय एवढं चिढायच. तू स्वप्नील दादाकडे लक्ष नको देवूस. त्याला एखादी गोष्ट फुगवून सांगायची भारी हौस.

जाऊन देवू का रट्टा एक तेला.

आण्विका :

तिला थांबवते.

आण्विका :

जाऊ दे गेला तर. मी किती झुराव. याला जरासुद्धा कळकळ नाही. किती दिवस झाले एक मेसेज सरळ नाही. माझ तर डोकं दुखायला लागलंय. मी जरा बाहेर फिरून येवू का?

रेवती :

आता नको, चल जेवू व मग जावू.

आण्विका :

भूक नाही मला.

रेवती :

 ये उगाच नखरे नकोत. तुला माहिती झालंय ना. की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ते. मग जेव व चल बाहेर बोलू.

आण्विका :

ठीक आहे.

(त्या जेवू लागतात.)

Cut to …..

…. …… …….

Night /9.०० o’clock. Alibag city /Outer.

      Action :

अन्विका आणि रेवती  जवळच्या छोट्या बागेत जातात आणि तेथील बेंचवर बसतात.

रेवती :

अनुताई इतकं वाहवून कसं चालेल. मला समजावणारी तू. आज एवढी इमोशनल कशी झालीस.

आण्विका :

 अग तुझ जे होत ते आकर्षण, अग खेळण्या बागडण्याच्या वयात एक आकर्षण म्हणून तू प्रेमात पडली होतीस. ज्यावयात कोणतीही माणसे पारखण्याची कल्पना सुद्धा आपण करत नाही. माझं तस नाही. मी त्याला अगदी जवळून पाहिलंय. व माझ्यासाठी तोच योग्य जोडीदार आहे.

रेवती :

 हे बघ थोडी कड काढ. होईल सर्व नीट.

आण्विका :

 अग काय नीट होईल. सध्या मेसेज देखील करत नाही. व फोन सुद्धा.

रेवती :

 तू तरी कुठे केलास मेसेज व कॉल

आण्विका :

का ? त्याला काय झालंय करायला. मी का झुरावं.

रेवती :

 मग कशाला त्रास करून घेतेस. त्याला काय टिकली लावलेय. त्यापेक्षा बघू दुसरा एखादा डॉक्टर.

आण्विका :

 नाही .. नको. बघते मी किती दिवस ताठतोय.

रेवती :

 अग पण स्वप्नील दादा म्हणत होता ना. की त्याला स्थळ आलय म्हणून.

आण्विका :

 बघतेच मी कोण अन् कशी लग्न करते त्याच्याशी.

रेवती :

 बर ते बघू नंतर आपण उद्या एकविरेला जाऊया का?

आण्विका :

 जाऊया.

रेवती:

 तेवढच तुला बरं वाटेल.

आण्विका :

 स्वप्नील येणार आहे ना.

रेवती :

 मघाशी फोन वर बोलत होता. रत्नागिरीला जाणार आहे म्हणून.

त्याची डाक्युमेंट्रीची ट्रिप आहे.

आण्विका :

 बर, जाऊया आपण.

रेवती :

 चला मग आता घरी मॅडम.

           Cut to …..

….. ……. ………. ….

Nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com


Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...