Sunday, February 23, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag 9

  कळत नकळत जुळले हे बंध भाग ९

क्रमशः पुढे चालू.....

Day / Outer / Morning / 8.30a.m./ Ishan trening cotej

    Action :

स्वॅप्निल, रेवती आणि अन्विका ईशानच्या कॉटेजमध्ये येतात. स्वॅप्निलने त्याच्या दुचाकीला पार्क केले. रेवतीने तिची स्कूटी पार्क केली. दरम्यान, ईशान आपल्या गोष्टी व्यवस्थित करीत आहे. तो शूज घालत आहे. ईशान फोनवर चहाची मागणी करतो.

           Dialog :

         ईशान :

         ( मोबाईल फोनवर)

 पाच चहा पाठवून द्या.

( तो आपला फोन खाली ठेवतो. आणि तो अन्विकांशी बोलू लागतो.)

       ईशान :

 केव्हा पासून वाट पाहतोय.

      आण्विका :

 अरे ,काय करणार, एवढ्या सगळ्यांच्या अंघोळी वगैरे आटपण म्हणजे वेळ होतोच.

 (चहाचा विक्रेता येतो आणि चहा सर्व्ह करण्यास सुरवात करतो.)

        ईशान :

 हा, चहा घ्या सगळी. या आत मध्ये.

       आण्विका :

 मस्त आहे की निवास व्यवस्था.

        ईशान :

मॅडम, मस्त आहे. पण सरकारी आहे .

      आण्विका :

    हो ते तर आहेच.

     ईशान :

    घ्या चहा.

      Action :

प्रत्येकाकडे चहा आहे. ते चहा पितात. चहा विक्रेता कप गोळा करतो. आणि निघून जातो.

         Dialog :

         ईशान :

 चला वेळ होतोय. वाटेत ओळख करून घेऊ.

( ईशान खोलीस कुलूप लावतो. )

         Action :

ते सर्व कारच्या जवळ येतात. नंतर, ईशान आणि रवी आणि त्याच्या शेजारी स्वप्नील आहे. अन्विका आणि रेवा मागे बसले आहेत. रेवा अनुला  इशारा करते. बोटांनी  खाणाखुणा करत छान आहे. अन्विका डोळ्यांनी खुणावत. शांत राहण्यास इशारा देते.

कार सुरू होते. शांत गाणे लावले आहे ईशान. आणि प्रवास सुरू . थोड्या वेळात.

       Dialog :

        ईशान :

काय अनु ओळख करून देतेस का नाही.

       आण्विका :

अरे हो, थांब ओळख करून देते.

हा माझा मावस भाऊ स्वप्नील, व ही रेवती.

        ईशान :

 स्वप्नील काय. मुळचे अलिबागचे की.

       स्वप्नील :

 छे नाही, आम्ही मूळचे बेळगावकडील. बाबांची बदली झाली इकडे व त्यामुळे इकडे , माझं नाव तस पाहायला गेलं तर स्वप्नील माने.व ही माझी बहिण रेवती. व अनु दीदी तर आपल्याला माहीतच आहे.

बर आपल नाव काय सर.

       ईशान :

 मी ईशान…. ईशान पाटील. मी कोल्हापूरचा, तस पाहायला गेलो. तर अण्विका व मी दोघे क्लासमेट. आमचं तस पाहायला गेलं तर मुळगाव कोकण साइडला राधानगरीकडील. पण वडलांच्या नोकरीमुळे कोल्हापूरला स्थाईक झालोय.

       स्वप्नील :

 आता तुम्ही काय करता ?

       ईशान :

 मी सध्या फॉरेस्ट ऑफिसर म्हणून कामाला आहे. दाजीपूर साईटला. इकडे आमचे ट्रेनिंग आहे. म्हणून आलोय. आज सुट्टी आहे. म्हटल मस्त एन्जॉय करूया. पुन्हा या नोकरीतून आलिबाग पाहायला मिळेल न मिळेल.

      स्वप्नील :

    हे सर कोण?

       ईशान :

 माझ्या खात्यातील आहेत. ते पण ट्रेनिंगला आलेत. म्हटल सुट्टी आहे. चला आपण फिरून येवू.

बर तुला माहीती आहे ना अलीबागची. मग आम्हाला गाईड कर की जरा.

         स्वप्नील :

       हा सांगतो. त्यात काय एवढं मला पाठ आहे संपूर्ण अलिबाग …..

                स्वप्निल

  हा इकडून पुढे…..

     ( म्युझिक चालू)

          Action :

स्वॅप्निल ईशानला अलिबागमधील स्थळे  व माहिती सांगण्यास सुरवात करतो. 

ईशान आणि स्वॅप्निलची गप्पा पहात 

        Dialog :

       रेवती :

    (हळू आवाजात)

काय मेव्हन्या पावण्यांच्या गप्पा मस्त रंगल्यात नाही.

    आण्विका :

    गप्प ग.

     आण्विका :

 काय झाली का ओळख स्वप्नील.

       स्वप्नील :

 हो झालीय. तसे पाहता आम्ही दोघे मूळचे एकाच भागातले आहोत ना.

       ईशान :

 बर तू काय करतोस हल्ली.

         स्वप्नील :

 माझं होय. बी बी ए कंप्लीट झालंय. आता एम. सी. ए. ला आहे. त्याबरोबर डाक्युमेंट्रीची कामे. ट्रेकिंगची देखील आवड आहे.

         ईशान :

 मस्त आहे की. म्हणजे शिकत शिकत कमाई सुरू.

इथच झालं का शिक्षण?

         स्वप्नील :

 छे नाही, बाबांच्या बदलीमुळे एक ठिकाण नाही. पण बी बी ए माझं पुण्याला झालं. तिथे काही काळ हॉस्टेलवर होतो. मात्र एम सी ए इकडे करतोय.

अरे तुम्हाला ओळख करून द्यायची राहिली. ही माझी बहिण रेवा, आयमीन रेवती. सध्या बारावी कंप्लेंट झालेय तिची. तसेच तिने ऑनलाईन कोर्स देखील केलेत. अनेक पोस्ट व व्हिडिओज तिचे असतात यु ट्यूब वरती.

अन् या मॅडम काय ओळकीच्या आहेतच की.

       आण्विका :

 नाहीये माझी ओळख करून दे की मग.

( सर्व हसतात.)

       स्वप्नील :

काय साहेब आपली ओळख करून घ्यायची राहिली.

        रवींद्र :

मी मूळचा मराठवाड्यातील औरंगाबाद विभागातील एक छोटस आमचं गाव. सध्या गौताळा अभयारण्यात कामाला आहे. फॉरेस्ट खात्यात. लग्न झालंय. पत्नी साधी सरळ गृहिणी आहे. दोन मुले आहेत मला. असा सुखी संसार चाललाय.

या की कधीतरी आमच्या इकडे. मस्त अभयारण्य पाहू, किल्ले लेणी मस्त आहेत बघण्यासारखे पॉइंट आमच्याकडे.

     स्वप्नील :

नक्की येवू. दरवर्षी आम्ही ट्रेकला कोणता न कोणता पॉइंट निवडतो. जर का तिकडे येणं झालं. की नक्की येवू आम्ही.

         ईशान :

 स्वप्नील आता कुणीकडे जायचं.

        स्वप्नील :

 हा पुढील चौकातून डावीकडे तिथे आहे एक पॉइंट. मस्त बघण्यासारखा.

स्वॅप्निल त्यांना अलिबॅगमधील विविध मंदिरे दाखवतो. मग ते नाष्टा  करण्यासाठी थांबतात आणि नंतर अलिबॅग बीचकडे जातात.

                Cut to…..

….. ….. ….. …..

Alibag beach /Afternoon / Outer


  Dialog :

     स्वप्नील :

 चला आपण पाण्यात खेळू.

(स्वप्निल आपला शर्ट काढून रेवती कडे देत.)

        स्वप्निल

    चल की. पाण्यात एन्जॉय करू

          ईशान :

 अरे पण मी कपडे आणली नाहीत बदलायला.

      स्वप्नील :

 पाण्यात भिजण्यासाठी कपडे कशाला. चला.

(रविकडे पाहत)

सर तुम्ही पण चला.

              Action :

इशान आपले कपडे देखील काढतो. आणि ते पाण्यात जातात. तो, रवी आणि स्वॅप्निल थंड पाण्याचा खेळण्याचा आनंद घेतात. रेवा आणि अन्विका वाळूमध्ये किल्ले तयार करण्यास सुरवात करतात.थोड्या वेळाने ती अन्विका आणि रेवास  ओढून नेतात. परंतु जास्त पान्यात न जाता त्या थोड्याशा पाण्यातून परततात.भिजलेले कपडे बदलण्यासाठी. बीच किनाऱ्यावरील दुकानातून त्या दोघांनाही कपडे घेतात.

                  Cut to…..

…… …… …… ……. …

Day / Afternoon / 2.00p.m./ outer

       Action :

स्वॅप्निल आणि ईशान रवी जवळ येतात.

     Dialog :

     स्वप्नील :

चला आपण कुलाबा किल्ला पाहायचा.

      रेवती :

    पाहिलाय परवा.

      स्वप्नील :

     पुनः पाहायचा.

       ईशान :

 चला की आम्ही नाही पाहिलाय पुन्हा पाहा.

        Action :

ते किल्ला पाहायला जातात. अन्विका त्यांना सर्वत्र माहिती देते. . . ते तोफ पाहण्यास पुढे जातात. रेवा आणि अन्विका मागे आहेत.

     रेवती :

       (अण्विकेस)

 मस्त गाईडच काम केलंस ह.

       आण्विका :

      हो खरंच.

         रेवती :

 चॉइस चांगली आहे मॅडम, शारीरिक दृष्ट्या फिट्ट आहे. व बोलण व स्वभाव देखील चांगला आहे.

याच्याशीच विवाह कर.

      आण्विका :

 एवढ्या लवकर रिझल्ट. कमाल आहे बाई तुझी.

          रेवती :

 अग, असली अपोरचूनिटी सोडायची नसते.

            ईशान :

 अरे, त्या दोघी कूठे आहेत?

           स्वप्निल :

     त्या बघ मागे…या पण ना…

( त्या दोघींना मागे असल्याचं पाहून स्वप्निल व ईशान बोलावतात.)

.

       आण्विका :

 अग चल ती बोलवताहेत

Cut to

.....  ..... ..... ....

Day  / outer / beach 

(किल्ला पाहून कार जवळ आल्यावर)

          Dialog :

           ईशान :

 स्वप्नील इथे चांगल जेवण कोठे मिळेल.

          स्वप्नील :

 तस पाहता या ठिकाणी भरपूर हॉटेल्स आहेत. पण माझ्या पाहणी नुसार एक मस्त रेस्टॉरंट आहे. आपण तिथे जावूया. 

Cut to ...

( रेस्टॉरंट मध्ये जेवत आहेत. )

                Cut to……

……. …… ……..

Afternoon / outer / restorant.3.00 p.m. o’ clock./

जेवणानंतर 

       रेवती :

 मस्त जेवण होत नाही.

     आण्विका :

       हो ग.

( अन्विका बिल देत असते. ईशान तिला थांबवतो आणि स्वत: बिल देतो. )

        ईशान :

    मॅडम थांबा देतो मी.

      आण्विका :

   अरे, देते की मी.

       ईशान :

 नको म्हणजे नको. मी देतो.

( वेटर येतो आणि ईशान बिल देते. )

Cut to…..

..,… ……. …… … …..

Day /Evening / 4.30 o’ clock/ Outer in car

( ईशान गाडी चालवत. )

         ईशान :

 आता बोला कुणीकडे जाऊया?

        स्वप्नील :

 आता शेवटचा जवळील पॉइंट म्हणजे किहीम बीच.

     ईशान :

चला तर मग, स्वप्नील रस्ता तेवढा सांग.

     स्वप्नील :

  हा…. हा घे.

(स्वॅप्निल गुगल  मार्गदर्शन नकाशा दाखवतो आणि तो ईशानला दाखवत.)

      आण्विका :

 स्वप्नील माझं एक काम आहे इकडे. अरे आपली वेदांगी आहे ना. तिला इकडील एक स्थळ आलं आहे. त्याची माहिती काढायची आहे. हा बघ बायोडेटा.

       स्वप्नील :

 हा, एवढंच ना. थांब सांगतो.

      ईशान :

   वेदू लग्न करतेय.

      आण्विका :

         हो.

       ईशान :

 नव्हरा जरा स्ट्राँगच बघा. नाहीतर महिन्यात मारून खुळखुळा करेल.

     आण्विका :

 एवढी काही वाईट नाही हो ती. अत्यंत साधी आहे.

ईशान :

ती…अन् ..साधी, भांडण करण्यासाठी नेहमी तयार असते. की.

               आण्विका :

   तिला मी कधी भांडताना नाही पाहिली.

(स्वप्निल मित्राला फोन करतो.)

       Dialog :

       स्वप्निल

“ हॅलो, कोण मोहण्या काय?

      मोहन :

      बोल की.

       स्वप्निल

 मी तुला बायोडेटा पाठवला आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती हवी होती

        मोहन :

 येवढच होय. काढुया की. त्यात काय?

तो फोन ठेवतो.

                  Cut to….

…. …… ….. …..

Evening /5.00 o’clock / Kihim beech / outer

       Action :

किहिममधील बीचवर सर्व खूप मजा करत आहेत. अन्विका आणि रेवती काही काळ खेळतात. अन्विका आणि ईशान एकमेकांकडे पाहतात. हे स्वॅप्निल आणि रेवती यांच्या लक्षात येते, परंतु ते दाखवत नाहीत. अन्विका स्वत: वर ताबा ठेवत .

         Dialog :

      आण्विका :

रेवा चल मस्त वाळूत घर बांधूया.

       रेवती :

       चल.

ते दोघे जातात. ते लाटांवर खेळण्यास सुरवात करतात.

ते लांब आहेत हे पाहिल्यानंतर रेवती 

          रेवती :

 काय अनु दीदी आता पासून मालकाचे पैसे वाचवायला लागलीस.

      आण्विका :

 काय ग, मला नाही समजल. असं का म्हणतेस.

       रेवती :

 हॉटेलमध्ये जेवणाचे बिल भागवत होतीस.

      आण्विका :

 मग भागवायला नको. सकाळ पासून सर्व खर्च तोच करतोय. गाडीचार्ज, नाष्टा, जेवण वगैरे. सार काही तोच करतोय.

तो काही जमीनदार घरातील नाहीये.

      रेवती :

 अग, हो. किती बाजू घेशील. खरंच आजच्या मुली एकेका मुलाला प्रेमात पाडून वर्षभर खेळवून त्याला एका दोन लाखाला बुडवून ब्रेकअप करतात. व तू मात्र अजून कशात काय नाही अजून, लगेच होकार देशील. गप्प बस जरा.

     आण्विका :

 हे बघ रेवा. त्याला माझ्याबाबत काय वाटत. किंवा मला त्याच्या बाबत काय वाटत हे महत्त्वाचं नाही. हा साधा सरळ व्यवहार आहे.

         रेवती :

 अग हो.. हो.. मला कळतंय. म्हणून मी पैसे आणलेत. पण नंतर करू की पेड.

       आण्विका :

 नंतर तो घ्यायचा नाही, नाईटच जेवणं आपण द्यायचं.

        रेवती :

 बर बाई. पण लई भाळू नकोस. आवर घाल भावनांना आजच्या दिवस तरी.

      आण्विका :

 ए काही विपरीत तरी करणार नाहीस ना.

        रेवती :

 नाही ग, बघ तुझा प्रेमी पागल होईल तुझ्या मागणं प्रपोज करायच्या आधीच निकाल कळेल.

     आण्विका :

    ते कस काय?

        रेवती :

 बघच, थांबवं आता बोलण, स्वप्नील दादा येतोय.

      अण्विका :

 अग तो आपलाच आहे ना?

      रेवती :

 गप बस. तो… त्याच्या तोंडात तीळ देखील राहत नाही. सगळ्या घरभर करील तो.

स्वप्निल व ईशान त्या दोघींजवळ येतात. तो जवळच्या बाटलीतून पाणी पितो. ईशानचे  लक्ष पूर्णपणे अन्विकाकडे आहे.

       रेवती :

चॉइस चांगली आहे तुझी

     आण्विका :

    कसा वाटला?

       रेवती :

 पहिलवानच क्याप्चर केलास की. आता काय घरातच तालीम.

       आण्विका :

ये तो काही पैलवान नाही. ऑफिसर आहे.

       रेवती :

 मग जावा जंगलात दोघेजण. झाडे व प्राणी बसा मोजत.

      आण्विका :

 तू ये की ठसे व दात मोजायला.

         रेवती :

 मला काय वाघाची बिर्याणी बनवायचा बेत आहे.

         Action :

 ते तिघे पाण्यातून बाहेर पडतात. गोड पाण्यात आंघोळ केल्यानंतर ते कपडे बदलू लागतात. अन्विका ईशानला कपडे देते. त्या क्षणी, रेवती तिरकस डोळ्यांनी पाहते.

               Cut to….

…… ……. …… ……. …..

 क्रमशः पुढे.....


Monday, February 17, 2025

Kalat n kalat julale he bandh marathi script bhag 8

 

Kalat n kalat julale he bandh marathi script bhag 8

क्रमशः पुढे चालू .....

Night / 9.00 o’ clock / Inter

 Action :

जेवणानंतर इशान खोलीत येतो. आल्यावर आल्यानंतर तो अन्विकेला कॉल करतो.

       Dialog :

      ईशान :

   हॅलो अण्विका

    आण्विका :

     हा बोल.

      ईशान :

 मी गाडी ठरवलीय. उद्याच नक्की हा.

    आण्विका :

 चालेल. पण कुठे जायचय.

        ईशान :

 अलिबाग व परिसर पाहू.

आणखी कोण येणार आहे का?

     आण्विका :

माझी मावस बहीण. व..

     ईशान :

     व काय.

      आण्विका :

 मावस भावाला पण घेऊ का?

         ईशान :

चालेल की? तेवढीच मला कंपनी मिळेल.

      आण्विका :

 तुझ्यासोबत आणखी कोण आहे?

        ईशान :

एक सहकारी आहे. ट्रेनिंग साठी आलेला. रवी नाव आहे त्याच.

      आण्विका :

        चालेल.

 बर उद्या किती वाजता.

          ईशान :

सकाळी आठ वाजेपर्यंत या की. मी पत्ता पाठवतो.

 त्या पत्यावर.

    आण्विका :

 हा पोहोचू आम्ही.

      Action :

अन्विका फोन खाली ठेवते. ती रेवतीकडे पाहते. ती रागावलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पहात आहे.

      आण्विका :

 काय चुकल काय माझं?

          रेवती :

नाही सर्व बरोबर केलस. काय गरज होती स्वप्नीलला घेण्याची. त्याला घे म्हणजे लग्ना आधी वरात काढेल तुझी.

      आण्विका :

 तस् काही होणार नाही. आम्ही फक्त मित्र म्हणून भेटणार आहोत. बाकी काही नाही. स्वप्नील बरोबर असला म्हणजे घरची काळजी करणार नाहीत.

       रेवती :

मी सांगितलं असत ना काहीतरी कारण.

       आण्विका :

 तस नसत. एक तर मी पाहुणी. मावशी वर माझी जबाबदारी आहे. तिला अंधारात ठेवून काय करू. जे काही असेल ते उघड उघड.

        रेवती :

 कर तुझ्या मनासारखं. पण आधी त्या स्वप्नाला सांग.

नाहीतर उद्या कायतरी घाट घालायचा.

      आण्विका :

 हो बाई. बर झालं आठवण केलीस.

( अन्विका स्वॅप्निलला मोबाईलवर कॉल करीत. )

     आण्विका. :

हॅलो स्वप्नील का?

    स्वप्नील :

 बोल काय दीदी.

     आण्विका :

 कुठे आहेस. घरी कधी येणार.

       स्वप्नील :

अग, मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय. येतो थोड्या वेळात.

      आण्विका :

 उद्याच काय नियोजन नाही ना?

        स्वप्नील :

 उद्या मी ट्रेकला जाणार आहे. का?

        आण्विका :

 अरे , माझा मित्र इथे ट्रेनिंगला आलाय. त्याला उद्या सुट्टी आहे. त्याला अलिबाग फिरायच आहे. मी व रेवा दोघी जाणार आहोत. आमच्या सोबत चल तू पण. तेवढीच सोबत.

       स्वप्नील :

 बर ,मी करतो ट्रेक क्यांसल. येतो.

      आण्विका :

 हा चल ठेवते. ये लवकर घरी.

(स्वप्नील फोन ठेवून लगेच दुसरीकडे लावतो.)

       स्वप्नील :

 ए बंड्या, उद्या नाय जमणार.

       बंड्या :

       का रे.

      स्वप्नील :

 काही नाही. आमची अणू दीदी आलेय. ना. तिच्यासोबत जरा बाहेर जाणार आहे.

         बंड्या :

 बर. असूदे. जा तू. बघू पुढच्या ट्रेकला. तस तू नाहीच म्हणत होतास.

      स्वप्नील :

    तस नाही भावा.

       बंड्या :

   जा रे बिनधास्त.

       स्वप्नील :

पुढच्या ट्रेकला नक्की येतो.

       बंड्या :

       चालेल .

( ट्र्याफिक सुटते ग्रीन सिग्नल लागतो. )

स्वप्नील :

 अरे ट्र्याफिक सुटल. ठेवतो.

       बंड्या :

       हा ठेव.

(  स्वॅप्निलने गाडी  स्टार्ट  करतो.निघतो.)

                Cut to……

…… …… ……. ……

Night / 7.00 o’ clock / Inter. Anvika mavshi home

   Action :

मासे आणले आहेत. मावशी एक रेसिपी तयार करीत आहे. अन्विका जेवणाच्या खोलीत जाते. अन्विकेस पाहून.

        Dialog :

       मावशी :

 काय हवय का बाळ.

         आण्विका :

 काही नको मावशी. मला काहीतरी बोलायचय.

        मावशी :

        बोल की.

       आण्विका :

 काही नाही. कसं आहे ना मावशी.

      मावशी :

      बोल की.

      आण्विका :

कसं सांगू… आ सांगतोच मावशी माझा एक मित्र इथे ट्रेनिंगला आलाय. त्याला उद्या सुट्टी आहे.

      मावशी :

    हा बर मग.

. अन्विका :

त्यासोबत उद्या जरा अलिबाग फिरायला जाणार आहे. म्हणजे मी, रेवती व स्वप्नील, म्हटल तुझी परवानगी घ्यावी.

       मावशी :

 कुठे लांब तरी जाणार नाही ना.

       आण्विका :

 नाही ग. इथच जवळ जाणार. संध्याकाळी परत.

       मावशी :

ठीक आहे. स्वप्नील आहे ना. मग काळजी नाही. जावा खुशाल. पण तेला घरी बोलवायचं नाहीस. आमची पण ओळख झाली असती.

       आण्विका :

 अग, त्याच ट्रेनिंग चालू आहे. जाण्याआधी बोलवू की घरी.

        मावशी :

 हा चालेल की. नाव काय ग त्याच.

      आण्विका :

 ईशान… ईशान पाटील.

       मावशी :

काय काम करतो तो.

      आण्विक :

फॉरेस्ट ऑफिसर आहे.

      मावशी :

 बर चालतंय …जावा.

     आण्विका :

    मी मदत करू.

        मावशी :

 करते मी. उगाच मस्का लावू नकोस. व आल्यापासून बरीच मदत करतेस.

      आण्विका :

पण मी मच्छी छान करते. बघ जरा.

      मावशी :

 तू मच्छी कर मी बाकीचं आटपते.

( अन्विका मदत करण्यास सुरवात करते. दरम्यान, रेवती तिथे येते.)

        Dialog :

         रेवती :

 काय डॉक्टर मॅडम टेथ्यास्कोप सोडून झाराच धरलाय.

काय बेत आहे आचारी होण्याचा का.?

( रेवतीचे लक्ष माशांकडे जाते.)

                Dialog :

        रेवती :

 वाव, मच्छी, पाहुणी आल्यापासून लई सरबराई चाललेय. पण आज हे काय. एक डिश दोन कोल्हापुरी म्याम बनवत आहेत .

        मावशी :

 हो आम्ही बनवतो. तू ये आयती खायला.

         रेवती :

 ते काय येणारच. पण रेसिपी नीट करा. नाहीतर डॉक्टर मॅडम व तू फेराफेरान चटणी मीठ घालून बिगडवू नका म्हणजे झालं.

नाहितर जोराचा ठसका सुटायचा व जेवताना जाळ व्हायचा आमचा.

        मावशी :

 ए गप्प ग, एवढ्या काय अडाणी नाही आहोत आम्ही.

        रेवती :

ते महिताय मला. मामाच्या गावाला तीन वर्षापूर्वी मटण दोघी बहिणींनी बनवल होत ना. सगळा रसा खारट.

        मावशी :

 अग, ते चुकून झालत. ताईला वाटल मी मिठ टाकल नसेल. म्हणून तीनही टाकल.

       रेवती :

 जेवनापेक्षा दोघींचं लक्ष त्या सिरियलीकडेच होत. ती मालिकाच बंद पडायला पाहिजेत. त्या मालिकेमुळे आम्हाला झुणका खाऊन झोपायची पाळी आली. आज अस काय करू नका म्हणजे झालं.

( अन्विका हसू लागताच रेवा तिच्या हशामध्ये सामील झाली.)

        मावशी :

 अहो ऐकलंत का. ही रेवा बघा कशी करतेय. स्वयंपाक करू देत नाही.

         रेवती :

 ओ बाई, साहेब लग्न झाल्यापासून एकतच आलेत तुमचं. पण आता ऐकु जाणार नाही. नेने काकांकडे गेलेत. ते. नव्हर्याच भ्या घालतेय मला. बाबा आहेत माझे समजल का? करा जेवण.

अनु तुला कुणी सांगितलं जेवण करायला. ये इकडे.

आण्विका :

 अग थोडी मदत करूया. सकाळपासून कामातच आहे ती. जरा भाकरी तरी कर ग.

      मावशी :

 ती - भाकरी.- मग झालंच.

      आण्विका :

       का ग.

      मावशी :

   बोल की ग आता.

       सांगू का.

अनु आमची रेवा आपल्या नव्हऱ्याला भाकरी व चपातीतून जगातील सगळे नकाशे करून घालेल बघ.

       आण्विका :

 मावशी काही काळजी करू नको. मी शिकवीन रेवाला. भाकरी करायला.

        रेवती :

 कळलं काय…. काय अणू दीदी म्हणाली…. माझा नव्हरा ,..गोल गोल भाकऱ्या खाणार...समजल.

           Cut to

 ….. …….. ………

Night / 10.00.o’ clock / Alibag / Inter / Revati room

         Action :

आण्विका पलंगावर पडून आहे. रेवती पाण्याचे भांडे आणि एक ग्लास आणते आणि त्यांना टेबलवर ठेवते. आण्विकेस गप बसलेल पाहून.

      Dialog :

          रेवती :

 काय दिदी कसला विचार करतेस येवढा?

     आण्विका :

    काही नाही ग.

       रेवती :

 काही नाही कसं.

       आण्विका :

 काय ग, कसा असेल तो. त्याच माझं जमेल का? विचार कसे असतील. उद्या भेटल्यावर काय त्याची प्रतिक्रिया असेल.

          रेवती :

म्हणजे मॅडम हा विचार करताहेत होय.

      आण्विका :

         हो.

         रेवती :

 पण हे बघ लगेच इमल्यावर इमले बांधू नकोस. आता आपण जस्ट फ्रेंड म्हणून भेटतोय. बाकी काहीच नाहीये. पण उद्या तुझी व त्याची एकमेका दृष्टीने परीक्षा असेल.

       अण्विका :

    कसली परीक्षा?

       रेवती :

      व्यवहारिक

         आण्विका :

 म्हणजे मला काही समजले नाही.

          रेवती :

 हे बघ, सध्याच्या काळात मुले आणि मुली लग्नाअगोदर ढिगाण प्रेमात पडतात. व एकमेकांना शेंड्या लावतात. मग भेटन आल... फिरण....., नाष्टा ,पाणी..... व इतर खर्च. यात वर्षभर घालवायचे. भेटून गुण उधळायचे. अन् मग घ्यायचा ब्रेकअप. अन् मग मोकळे एकमेकांची बदनामी करायला. अन् लग्न झालं. की थोड्या दिवसात यांचं मन भरत. मग लगेच प्रकरण येत सोडचिठ्ठिवर. मग होतो काडीमोड. राहतो मुलांचा प्रश्न. मग त्यांची होते ससेहोलपट.

        आण्विका :

 हो ते पण खरंच आहे.

          रेवती :

 म्हणून मी उद्या एक डॉच मारणार आहे.

      आण्विका :

      कोणता ?

       रेवती :

     कळेलच.तुला.

     आण्विका :

      काय ते सांग ना?

          रेवती :

 कळेल ग उद्या. त्यावेळी मात्र तू शांत राहायचं.

( अन्विका आश्चर्यचकित होऊन पाहू लागते.)

          रेवती :

 मॅडम झोपा आता. लई विचार करू नका. तुमच्या हिताचच बोलते.

     ( लाईट बंद.)

                Cut to……

……. …… ……. ……. …….. …….

Part 1 :

Next day / Morning / Alibag city /inter - outer.

          Action :

सकाळची  वेळ आहे. रेडिओवर धार्मिक गाणी वाजत आहेत. मावशी ब्रेकफास्ट बनवत आहे. बाहेर, पक्षी किलबिलाट  करत आहेत.

समुद्राच्या पाण्याचा आवाज ऐकू  येत आहे.

अन्विका  आंघोळ करून  केस केस  वाळवत आहे. रेवती आंघोळीस आली आहे. काका आंघोळ करत आहेत.

        Dialog :

         काका :

सुधा ये सुधा माझा टॉवेल कुठे आहे.

      मावशी :(सुधा)

अहो काढून ठेवलाय ना तिथे बाजूला टेबलवर.

       काका :

     पाणी काढलय.

        मावशी :

 काढून घ्या आज. मला वेळ झालाय. कामे आटपायची आहेत.

 ( त्याचवेळी स्वप्निल तिथे येतों. )

        स्वप्नील :

 बाबा, मी आधी आटोपतो. मला बाहेर जायचय.

          काका :

           अरे …

       स्वप्नील :

 बाबा माझे लाडके बाबा.

( तो बाथरूममध्ये जातो. खाली वाकून तो म्हणतो, ‘सुप्रभात, बाबा.’ असे बोलल्यानंतर तो दार बंद करतो. )

        काका :

हा गेला… झाल मग... आज काय अंघोळ लवकर नाही बघ.

       काकी :

 असू दे हो. थोडा वेळ आज अडजेस्ट करा. ती बाहेर जाणार आहेत.

      काका :

      कोण,

         काकी :

 विसरलात …. मला वाटलच होत. काल रात्री झोपताना सांगितलं होत ना. आण्विका व तिचा मित्र यांच्या बरोबर रेवा व स्वप्नील फिरायला जाणार आहेत ते.

       काका :

 हा…, बर पण दौरा कुणीकडे आहे.

         काकू :

 इथ जवळच आलीबाग परिसर बघणार आहेत.

       काका :

 अग नास्ट्याच बघ, तो येईलच.

       काकू :

 तो कुठला इकडे येतोय. हीच मंडळी चाललेत त्याच्याकडे.

         काका :

 मग चहा पानाला तरी बोलवा बिचाऱ्याला.

       काकू :

मी पण तेच म्हणत होते. आता जाऊन येऊ देत. उद्या परवा बोलवू आपण.

        काका :

 त्यानिमित्ताने का असेना भेट होईल.

       काकू :

         हो.

Cut to..

Inter / Day / room

( येथे आपल्या खोलीत रेवती. )

         रेवती :

 अग ताई दादा उठलाय का बघ नाहीतर वेळ व्हायचा.

       आण्विका :

     तो गेलाय अंघोळीला.

      रेवती :

      कधी.

    आण्विका :

     आताच.

       रेवती :

 बाबांना कल्पना दिलीस की नाही.

     आण्विका :

 मावशी सांगतो म्हणालीय.

बर, तुझं आवर लवकर.

Part२

Alibag / morning / Inter

ईशान उठतो. आपली तयारी करतो. अंघोळ करतो.

 गॅरेजला कॉल करतो.

      Dialog :

     ईशान :

  हॅलो,..त्रिमूर्ती गॅरेज

      मालक :

   हा बोला साहेब.

        ईशान :

 गाडी पाठवून देणार होता ना?

        मालक :

 लावून दिलेय साहेब. पोहोचेल थोड्या वेळात.

      ईशान :

    हा ठीक आहे.

   Action :

दरम्यान, बबलू कार बाहेर लावतो.  चावी ईशानला देतो.

चावी  घेतो.

दरम्यान, रवी आलेला आहे. ईशान ताबडतोब अन्विकाला कॉल करतो.

      ईशान :

    हॅलो अण्विका

( आन्विका चहा पीत  फोन घेत आहे.)

     अण्विका :

     हॅलो बोल

       ईशान :

कुठे आहात. या लवकर.

      आण्विका :

 निघतोय. 

बर या लवकर.

     आण्विका :

      हो.

        Action :

ईशानने सेंड केलेला पत्ता  अन्विका पत्ता स्वॅप्निल आणि रेवती यांना पाठवते.

         आण्विका :

हा आटपा लवकर निघायला हवं.

       आण्विका :

 बर मावशी काका येतो आम्ही.

      मावशी :

 हा नीट जा. अन् त्याला पण बोलवा इकडे चहा पाण्याला.

     रेवती :

      (डोळा मारत. )

काय दीदी बोलवूया ना. सगळच होईल.

      आण्विका,

 तुझ आपल काय तरीच.

       काकू :

     काय ग काय ते.

       आण्विका :

 काही नाही. त्याला बोलवणार आहोत आम्ही. पण त्याला ट्रेनिंग मधून सुट्टी नाही. आज आहे.व आम्ही फिरायला बाहेर निघालोय. दोन – चार दिवसांनी बोलवू त्याला.

      काका :

    बर , नीट जावा.

      रेवती :

बाबा इथच तर निघालोय.

      स्वप्नील :

    ये चला लवकर.

     Action :

स्वॅप्निल आणि रेवती  टू व्हीलर काढतात. अन्विका स्वॅप्निलच्या दुचाकीवर बसली आहे. ते तिघे निघतात..

             Cut to……

…… …….. ……. ……. ….

क्रमशः पुढे.....


Friday, February 14, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag 7

 Kalat n kalat julale he bandh script bhag 7

क्रमशः पुढे चालू ........

Morning / 7.30a.m Inter/Anvika mavshi home /Alibag

       Action :

सकाळी, काकू जेवण तयार करण्यात व्यस्त असतात आणि अन्विका चहाची ट्रे ठेवण्यास  येते.

          Dialog:

      आण्विका :

मावशी आज तू आराम कर जा. मी करते स्वयंपाक.

( या दरम्यान, रेवती मागून शांतपणे जवळ येते.)

      मावशी :

अग राहू दे. थोड्या दिवसाच्या सुट्टीवर आलीस तू उगाच कशाला. करते मी.

     रेवती :

 नको म्हणतेय तर कशाला करतेस मदत तिला.

    आण्विका :

गप्प ग तू. आज मी करते स्वयंपाक.

( असे सांगून, ती मावशीकडून भांडे काढून घेते.)

    मावशी:

 करशील ना नीट.

( मावशी तिचे किचेन्स मसाले आणि भांडी दाखवत.)

         मावशी:

हे बघ तिखट ,मीठ, तेल या इथे आहे. व भाजी सर्व फ्रीजला आहे. अन्, हा इथे बाजूला पीठ, तांदूळ व इतर साहित्य आहे बघ.

      आण्विका :

     हो करते मी,

        Action :

मावशी आत जाते. आणि टीव्ही पाहू लागते.

रेवती मदतीसाठी आत येते. त्या दोघेही स्वयंपाक करण्यास सुरवात करतात.

         मावशी :

         (मनात)

या काय करतात ते बघायला पाहिजे. नाहीतर सगळाच बट्याबोळ करायच्या.

( मावशी  किचन मध्ये येते. व रेवाला काम करताना पाहून)

      मावशी :

आज शुक्राची चांदणी कशी काय उगवली. होय आनु.

        रेवा :

 कळतात टोमणे मॅडम, काय. मी कधीच मदत करत नसल्या सारखेच बोलतेस. सुट्टी लागली की मलाच स्वयंपाक करायला लावतेस. ना.

     मावशी :

    हो बाई हो.

     करा कायतरी.

      Action:

मावशी टीव्ही पाहण्यासाठी निघून जाते. दरम्यान, आण्विकाच्या मोबाईल वर एक संदेश वाजतो. रेवतीस दिसतो. ईशानने पाठविलेला हा एक छान संदेश आहे. रेवती लगेच स्वयंपाक करताना अन्विकाचा फोटो घेते आणि पाठवते. ईशान संदेशाकडे पाहतो.

      Mobile chatting

       ईशान :

काय स्वयंपाक चालू आहे वाटत.

येवू का जेवायला.

     (रेवती मेसेज पाठवते,)

      ये.

( अन्विका रेवतीच्या हातातून फोन घेत .)

 ईशान मेसेज पाठवतो.

 काय मेनू आहे.

    आण्विका :

कारल्याची भाजी व भाकरी.

      ईशान :

 कारले कडू, नको मला.

      आण्विका :

आठवड्यातून एकदा तरी कारले खावे. शरीरासाठी चांगले असते.

        ईशान :

 डॉक्टर मॅडम खावा तुम्ही व निरोगी राहा.

    आण्विका :

    अच्छा.

     ईशान :

    ठीक आहे.

(त्या गप्पा मारणे थांबवतात. व जेवण तयार करण्यास सुरवात करतात. )

             Cut to……

…… …….. ……. ……..

That day Afternoon/inter -Outer / 12.00 O’clock

(  भांडी उचलताना)

          रेवती :

अनु दीदी झालं ना जेवण. चल आता.

      काका :

   आज कुणीकडे दौरा.

        रेवती :

काही नाही जवळच बागेतून येतो फिरून.

     काका :

   बर, या जाऊन.

     Active :

अन्विका आणि रेवती निघतात . त्या वसाहतीत बागेत जातात.  तिथे झाडाखाली बसतात.

         Dialog :

     आण्विका :

 काही म्हण, अस बागेत फिरल्यावर खूप बरे वाटते

कामाचा संपूर्ण ताण निघून जातो.

      रेवती :

हो तर. काय मग दाजी काय म्हणतात.

    आण्विका :

 ए गप्प ग, काय पण चिडवतेस.

      रेवती :

 अग माहिती काढायची आहे ना. थांब, बघ कशी मी काढते?

      Action :

रेवती आपल्या मोबाइलमध्ये बनावट फेसबुक खाते उघडते. आणि पुन्हा गप्पा मारण्यास सुरवात करते.

       Dialog :

    रेवती : 

(मेसेज)

   मग काय ठरलं.

      ईशान :

    कशाबद्दल.

      रेवती :

मला तुमच्याशी लग्न करायचं आहे.

        ईशान :

सॉरी, मी नाही करू शकत.

      रेवती :

का, लग्न झालंय तुमचं.

     ईशान :

    नाही अजून.

       रेवती :

 मग कुठे प्रेमात पडलास का?

      ईशान :

       हो

     रेवती :

 कोण आहे ती?

        ईशान :

तुम्हाला का सांगू. माझ्या जीवनातील सिक्रेट गोष्ट.

      रेवती :

माझ्या इतकी सुंदर नसेलच ती.

         ईशान :

 ते तुम्हाला काय करायचय.

       रेवती :

    म्हणजे खरंच.

      ईशान :

 नाही ती खूप सुंदर आहे माझ्यासाठी.

        रेवती :

 काही पण सांगू नकोस. तुझं फुटबॉल वर प्रेम आहे ना.

     ईशान :

      हो,

    रेवती :

 मग काय फुटबॉलशी लग्न करणार आहेस.

      ईशान :

 नाही हो. सोडा तुम्ही हा विषय.

( ईशान ऑफलाइन जातो. रेवती हसण्यास सुरवात करते.)

              Dialog :

      आण्विका :

 नको ग बाई, भलत सलत पाठवूस

         रेवती :

 का ग बाई, तुला लगेच आला पुळका. लागलीय लगेच काळजी करायला.

        आण्विका :

 काही नाही ग तो सरळ मुलगा आहे.

         रेवती :

 दिसत तस नसत मॅडम म्हणून जग फसत.समजल का?

सोन पण घ्यावं ..... पूर्ण झळाळी देवूनच.

( अन्विकास दु: खी पाहून)

        रेवती :

 हे बघ मी कालपर्यंत सर्च केलीय प्रोफाईल त्याची. त्याला फक्त सहा स्त्रिया अँड आहेत. त्यातील तीन नात्यातील आहेत. व दुसऱ्या तीन खात्यातील.

त्यातील एखादिशी जरी सुत जुळलेल असल, तर तू कट्टाप.

      आण्विका :

 कट्टाप तर कट्टाप.

      रेवती :

काय कट्टाप म्हणतेय? चेहरा सांगतो तुझा.

    आण्विका :

   काय सांगतो ?

      रेवती :

 तू प्रेमात पडलीस तेच्या.

(त्या क्षणी, अन्विकेला कॉल येतो.  )

    ईशान :

 हॅलो अण्विका,

   आण्विका :

 हा ईशान बोल.

     ईशान :

 उद्या भेटूया का?

   आण्विका :

 काही काम आहे का?

        ईशान :

 उद्या सुट्टी आहे. फिरायला जाऊ मस्त.

     आण्विका :

   (हळू आवाजात रेवा)

फिरायला जाऊ या का म्हणतोय.

       रेवती :

    (कानात शांतपणे)

मला तस कसं येता येईल. मी पाहुण्यांकडे आहे. एकटीला कसे लावून देतील.

     आण्विका :

 मला तस कसं येता येईल. मी पाहुण्यांकडे आहे. एकटीला कसे लावून देतील.

        ईशान :

 मग कोणाला तरी सोबत घेऊन. ये.

      आण्विका :

अरे तिघेजण बाईकवर कसे जाणार?

       ईशान :

 मी अरेंज करतो की फोरव्हिलर.

          आण्विका :

 मी व माझी मावस बहीण येतो. माझं काम पण आहे. किहीमला किहिम बीच पण बघायला जाऊ.

       ईशान :

 ठीक आहे. चालेल. उद्या सकाळी मी न्यायला येतो. पत्ता तेवढा सांग.

     आण्विका :

     ( रेवतीस)

तो घरी येतो म्हणतोय.

      रेवती

  (कानात शांतपणे)

 अग नको म्हण आम्हीच येवू.

      आण्विका :

 इकडे नको. आम्हीच येतो. बर गाडी कुठे बघणार.

      ईशान :

 आहे इथे एक ओळखीन घेऊ, तू ये तर खर.

        आण्विका :

 बर येते बाबा. तुझा पत्ता पाठव.

    ईशान :

     हा.

   आण्विका :

   ओके डण

    ईशान :

 हा ओके. बाय.

( Action : ईशान फोन ठेवतो. ईशान मोबाइलवर पत्ता पाठवतो. अन्विका तो संदेश  रेवतीस दाखवते.)

        Dialog :

      रेवती :

मग आज पार्टी पाहिजे

    आण्विका :

     का ग.

     रेवती :

काही नाही… तुझ्या मनासारखं घडतंय.

      आण्विका :

 तस काही नाही. बघ उद्या तो यावर काही बोलला तर.

       रेवती :

       कशावर.

       आण्विका :

 प्रेमाविषयी, तो प्रथम विचारणार नाही मला.

       रेवती :

   असे का म्हणतेस.

      आण्विका :

 मी ओळखते त्याला. तो शांत व संयमी आहे.

        रेवती :

मॅरेज मटेरियल म्हण की.

     आण्विका :

 तस का म्हणतेस. खूप चांगला आहे तो.

        रेवती :

 म्हणूनच शाळेत व कॉलेजला असताना भांडत होतीस का त्याच्याशी.

      आण्विका :

भांडण हे आपल्या माणसाशीच करतात.

        रेवती :

 उद्या पाहू की तुझी आवड. कळेलच घोडा मैदान जवळ आहे.

      आण्विका :

       बघच.

       रेवती :

ते उद्या बघू, पण आज काय करूया.

       आण्विका :

 एका रोपवाटिकेला भेट देवू या. बरेच दिवस झाले माझा प्रोग्राम लिहायचा राहिलाय.

       रेवती :

     हे चांगल आहे.

        आण्विक :

 हो तेथील रोपे व इतर माहिती घेऊ.

इथे म्युझिअम आहे का?

        रेवती :

 आहे की करमरकर म्युझिअम

      आण्विका :

     मग चला जाऊ.

    Action :

त्या दोघी निघतात. त्या अलिबाग शहरातील करमरकर संग्रहालय सुंदर बागेस भेट देतात.  तेथील माहितीच्या नोट्स घेतात. अन्विका तिच्या कॅमेर्‍यासह फोटो देखील घेते. त्यानंतर, त्या घरी परततात. अन्विका प्रकल्प तयार करण्यास सुरवात करतो.

                                  Cut to……

….. ……. ……. ………

Morning / cafeteria restaurant/12.30 o’clock./ Inter.

        Action :

न्याहारीचे बिल देताना इशान कॅफेटेरियाच्या व्यवस्थापकाशी बोलत आहे. रवींद्र देखील त्याच्याबरोबर आहे.

        Dialog :

       ईशान :

 बिल किती झालं?

     मॅनेजर,

     270 रुपये सर.

(ईशान बिलाचे  पैसे सेंड करत  . )

          ईशान :

इथ एक दिवसासाठी कार भाड्याने मिळेल का?

        मॅनेजर :

मिळेल की. इथ जवळच आहे. त्रिमूर्ती गॅरेज. तिथे मिळेल तुम्हाला पाहिजे तसी गाडी.

        ईशान :

 बर इथे काही बघण्यासारखी ठिकाणे.

        मॅनेजर :

 भरपूर आहेत. किहीम बीच, अलिबाग बीच, खांदेरी, उंदेरी तसेच कुलाबा किल्ला. अशी अनेक स्थळे आहेत.

जवळ स्टॉल वर माहिती पुस्तिका देखील मिळेल.

        ईशान :

        थ्यांक्स.

(ते रेस्टॉरंटमधून बाहेर पडतात. )

Cut to ....

..... ..... ....

  Afternoon / outer / Alibag road

       रवी :

 काय दौरा आहे का?

       ईशान :

 उद्या सुट्टी आहे. म्हटल तेवढाच एन्जॉय करू. अरे,‌.‌हो तुम्ही पण या की. मला पण तेवढी कंपनी होईल.

         रवींद्र :

 पण यासाठी फोर व्हीलर कशाला. टू व्हीलर ठरवू की.

        ईशान :

 माझी मैत्रिण देखील येणार आहे. ती सुट्टीला आलेय इथं.

रवींद्र :

 मैत्रिण की आणखी कोण.?

        ईशान :

 सध्या तरी मैत्रिन आहे. पाहू पुढे. माझी तर खूप इच्छा आहे. पण तिच्या मनातील देखील जाणून घ्यायला हवं.

          रवींद्र :

 म्हणून हा सर्व खटाटोप चाललाय होय.

          ईशान :

 हो. तेवढाच वेळ एकत्र घालवता येईल. आणखी ओळख वाढवता येईल.

                  रवी :

मग एकटाच जा की उलट एकांत मिळेल. मनातील बोलता येईल स्पष्ट.

                  ईशान :

गेलो असतो यार, पण ती आपल्या मावस बहिणी सोबत येणार आहे. व मला स्पष्ट बोलता येणार नाही. फक्त थोडा वेळ का असेना तिच्या सहवासात राहता आल तर बरं होईल. व तुम्ही सोबत असल्यास थोडा धीर येईल.

               रवी :

 अस आहे होय. मग यायलाच पाहिजे.

            ईशान :

बर चला आता. आपल्याला वेळ होतोय.

(ते आपल्या ट्रेनिंगच्या ठिकाणी निघतात.)

                Cut to…..

….. ……. ……. ……. …..

That day / Afternoon / 2.30 o’ clock / inter

     Action :

प्रशिक्षण केंद्रात एक प्रचंड स्क्रीन आहे. हे जगातील वन वातावरण आणि वनीकरण याबद्दल माहिती दिली जात आहे. भारत हवामानाविषयी माहिती देखील दिली जात आहे. वसुदेव कुटुंबकम  याबद्दल माहिती दिली जात आहे.

        Dialog :

     

       ऑफिसर :

यावर आपणास कोणती शंका आहे का?

        ईशान :

हो सर, मला मी केलेला आपल्या प्रदेशातील वनस्पती व वन वृध्दी तसेच त्याचा लाभ या विषयावर आयोजित प्रोजेक्ट दाखवायचा आहे. तो प्रत्येक विभागाने जर आमलात आणला तर भरपूर लाभ होऊ शकतो. तो सादर करण्याची अनुमती द्या.

     ऑफिसर :

     ठीक आहे.

      ईशान :

    (समोर येवून)

       एनिवे

        Action :

ईशान पुढे येतो. आणि आपला प्रकल्प सादर करण्यास प्रारंभ करतो.

भारतीय वन संसाधने आणि त्याचा वापर देशासाठी. तसेच उद्योग. स्थानिक अभयारण्य क्षेत्रात राहणारे आदिवासी आणि त्यांच्या दैनंदिन समस्या आणि प्राणी. तसेच तस्करी औषधी वनस्पती. त्याने एक उपाय प्रस्तावित केला. त्याचप्रमाणे, जंगलातील औषधी वनस्पती आणि फळांवर आधारित  प्रकल्प आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा  उपाययोजना प्रकल्प, ईशान सादर करतो.

त्यांचे सोल्यूशन प्लॅन दाखवतो  आणि आपला प्रकल्प सादर करतो. तो सर्व घटकांचा विचार करतो.

कार्यक्रमानंतर.

बरेच लोक ईशानचे अभिनंदन करतात.

        Dialog :

    एक ऑफिसर :

 मस्त माहिती सांगितलीत सर,

       ईशान :

      थ्यांक्स.

    दुसरा एक जण :

 आपला यातील अभ्यास खूप दिसतो. हे कधी केलात.

        ईशान :

 त्यात काय आपली ड्युटी करत हे सगळं केलं

      दुसरा एकजण :

 पण तुम्ही तर नवीनच जॉईन आहात ना?

        ईशान :

 साहेब एक वर्ष झाल. मला येवून या खात्यात. अरण्यातून फिरताना तसेच स्थानिक लोकांच्या सहवासातून या विषयी जाणून घेऊन रिसर्च केलं. व हा प्रोजेक्ट साकार झालाय.

          रवींद्र :

 खरंच तुम्ही ग्रेट आहात सर.

         ईशान :

 येवढं काही जास्त केलं नाहीये हो. थोडच रिसर्चींग केलय.

        रवींद्र :

 हे थोड नाहीये सर खूप खोल रिसर्च आहे हे. यामुळे आपल्या खात्याला अरण्यात राबवायचे वेगळे उपक्रम याविषयी प्रेरणा मिळालीय.

         ईशान :

 हो ते तर आहेच.

Cut to …….

….. …… ….. …… ….. …

Evening / 6.00 p.m. / motarsaykal garej / Alibag city/ outer

          Action :

ईशानचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, तो त्रिमुर्ती गॅरेजमध्ये जातो जिथे मालक एक वाहन दुरुस्त करण्यात व्यस्त आहे.

         Dialog :

      गॅरेज  मालक :

 बोला काय काम होत साहेब.

        ईशान :

 मला उद्या एक फोर व्हीलर हवी होती भाड्याने.

    मालक : 

(कर्मचाऱ्यास)

बबलू गाडी दाखव साहेबांना व सांग

       बबलू :

    चला साहेब.

  (बबलू गाडी दाखवतो.)

        बबलू :

साहेब या गाड्या आहेत. कारकडे बोट दाखवत ती लाल गाडी दिवसभर १२०० रुपये भाडे, ती सुमो असेल तर, १५००, अन् हा ती पांढरी ती तर आलिशान आहे. तिच्यासाठी १७०० रुपये पडतील. पेट्रोल चार्ज तुमचा. अन् हो. फक्त ३० किलोमीटर एरियात फिरवण्यास हा चार्ज आहे. त्याच्या बाहेर डब्बल चार्ज असेल. व जर ड्रायव्हर पाहिजे असल्यास वेगळा चार्ज.

      ईशान :

   (कार पाहत.)

चार्ज जास्त आहे आम्ही जवळच जाणार, जास्तीत जास्त १०-१२ किलोमीटर. जाणार आहोत. जवळीलच तर ठिकाणे पाहणार.

     बबलू :

  गाडी तरी बघा.

(ईशान  नीट तपासल्यानंतर एक पांढरी कार निवडतो. )

      ईशान :

 हा ही असु देत.पण चार्ज जरा जास्त होतोय.

        बबलू :

 काय साहेब, एवढी चांगली गाडी नेणार १७०० काही जास्त नाहीत. व गाडीचा मेंटणंस खर्च पण येतो आम्हाला एवढा काही जास्त चार्ज नाही.

       ईशान :

 काही तरी कमी करा. पेट्रोल चार्ज पण आहे ना. आम्हाला ही परवडायला हवं.

        बबलू :

 पंधराशे द्या व न्या गाडी. बर ड्रायव्हर हवा का?

     ईशान :

 नको मला येते चालवता.

बर जरा ट्रायल तरी घेऊ.

       बबलू :

      चालेल.

        Action :

ईशान ड्रायव्हिंगद्वारे चाचणी घेते.कार फिरवून  आणतो. व गॅरेज मालका शेजारीकडे येतो.

       Dialog :

      ईशान :

चालेल ,ही फायनल करा.

    मालक :

गाडी कधी नेणार.

    ईशान :

   उद्या सकाळी.

        मालक :

 चालेल. बर टोकण म्हणून पाचशे रुपये भरा. व गाडी नेताना आधारकार्ड जमा करावे लागेल.

(Action : ईशान पाचशे रुपये देतो आणि कार  फिक्स करतो. )

            Cut to …….

….. ……. ……. …… …..


Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...