Monday, January 13, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag २

 कळत नकळत जुळलेले बंध भाग २

Respectively. To be continued……

Day  / Morning / Outer/ kolhapur – on the road

Action : 

अन्विका पन्हाळा रोडवर स्कूटी चालवण्यास सुरवात करते.

                     Dialog

         आण्विका:

     हा आता सांग पुढलं

         वेदांगी :

   अग ती तन्वी आहे ना,

    आण्विका :

      हा

 Action : 

ड्रायव्हिंग स्क्यूटी 

                     Dialog

           वेदांगी :

 ती गेली पळून शेजारच्या दातक्या मोहन बरोबर.

       आण्विका :

      काय खरंच.

        वेदांगी :

हो, काल बाबांना कळलं, अन…

        आण्विका :

खर सांगू काय वेदे, आज तुमच्या घरी यायलाच हवं होतं. तुझ्या बाबांचा पडलेला चेहरा बघायला.

काय तिचं कौतुक करायचे, बर झालं गेली पळून ते, आता तरी उघडले का डोळे तुझ्या बाबांचे?

         वेदांगी :

कुठले उघडतात,पळून गेली ती अन् शिक्षा आम्हाला सुरू, त्यांच्या डोक्यात आता मी पण जाईन कुणाचातरी हात धरून म्हणून माझं लग्न जमवायचं चाललंय.

         आण्विका :

 असं आहे तर, कमाल आहे बाई तुझ्या बाबाची.

        वेदांगी :

 मामाला फोन पण झालाय, तो लागला लगेच कामाला,

           आण्विका :

 एवढ्या लगेच,……

( तोंड वाकडे करत)

 मामा सुद्धा राहिला नाही बघ तुझा.

           वेदांगी :

 आमचा कोळी समाज तिकड लांब आहे ना, मला तर वाटतयं आता काय बाबा ऐकणार नाहीत!

          आण्विका :

म्हणजे सुपारी फुटणार तर तुझी या एक दोन महिन्यात.

अग, मुलगा बघितलास का काय करतो ते.

            वेदांगी :

 मी बघायच्या आधीच ७५% ठरलंय.

         आण्विका :

 असे कसे तुझे बाबा पाहणं नाही, बोलचाल नाही, मुलगीची पसंती काय आहे की नाही. लगेच कंडका पाडायला.

          वेदांगी :

 त्यांना वाटतयं मी जर का तन्वी सारखी गेले पळून तर त्यांचं नाक कापेल.

         आण्विका :

नाक आहे कुठे त्याचं कापायला. नकटे तर आहेत.

             वेदांगी :

काय म्हणालीस, तुला चेष्टा सुचतेय.

            आण्विका :

 तस नाही ग मला म्हणायचेय, अस का वाटत त्यांना?

           वेदांगी :

 ते तरी काय करणार नोकरी मुळे कोल्हापूरला यावे लागले. आमचा अग्री कोळी समाज तिकडील कोकणातील , इकडे सगळे घाटी लोक. कुणासंगे गेले तर. हाच विचार घोळतोय मनात.

          आण्विका :

 त्यांचं तरी चुकीचं कसं म्हणायचं. कायम नटून थटून असतेस. अस वाटणं स्वाभाविक आहे.

           वेदांगी :

काय म्हणाली

( तिच्या डोक्यावर टपली मारत.)

                   Dialog

         आण्विका :

 आई ग, ए मारू नको की.

          आण्विका :

स्वतः च काढलेल्या पोरीवर विश्वास नाही साधा त्यांचा.

           वेदांगी :

 नाही तर काय? मला तर खूप राग येतो बघ.

          आण्विका :

 म्हणजे काय,... तू तर जाणार म्हण, ...कोकणात सुरमई खायला.

         वेदांगी :

गप्प ग, मामा स्थळ काढणार म्हणजे तो आधी झिंग्याल्याला, त्याच स्थळ पण तसच झिंग्याल्याल असणार.

          आण्विका :

फोटो, बायोडेटा तरी पाहिलास काय.

            वेदांगी :

फोटो नाही पणं बायोडेटा पाठवलाय पपांच्या फोनवर.

        आण्विका :

    तू पाहिलास काय?

          वेदांगी :

       हो पाहिलाय,

         आण्विका :

      तुझ्याकडे आहे आता.

         वेदांगी :

आहे की, कालच चार्जींगला त्यांचा फोन असताना माझ्या मोबाईलमध्ये सेंड केला.

Action : 

मोबाइल हातात घेत, ती स्क्रीन उघडते आणि ती दाखवते.

Dialog

              वेदांगी :

       हा बघ

          Action:

(अनविका स्कूटी बाजूला हलवित असताना, ती आपल्या मोबाईल फोनवर मेसेज तपासते.)

                    Dialog

           आण्विका :

 अग, हे सगळ ठीक आहे. पण तो कसा दिसतो ते तरी माहीत आहे का?

हे बघ तुला मी सांगते ...मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होईलच ना, जर चांगला वाटला तर लग्नाला उभ राहायला काय हरकत आहे.

          वेदांगी :

 शहाणीच आहेस, तो काळा असुदे नाहीतर गोरा. त्यापेक्षा बेवडा नसला म्हणजे मिळवलं, त्याच्या चार पाच प्रेमिका असल्या तर माझं कसं होईल, ती माहिती नको का काढायला.

         आण्विका :

ते तर काढायलाच हवं, बर चल कॉल येतोय पोरांचा जाऊ, नंतर बघू काय करायचं ते. आता दिवसभर फ्री रहा. उगीच या टोळक्याना संशय नको यायला.

           वेदांगी :

           बर.

Action:

(अन्विका स्कूटी पुढे चालवते.)

                                   Cut to …..

…. …… …… ….. …… ……

Day/ Afternoon. / Outer / Place : panhala

Action :

सर्व मित्र आणि अन्विका आणि वेदांगी हे सर्व फिरत आहेत. आणि एकाच ठिकाणी एकत्र येतात.

                  Dialog

         सात्विक :

 अरे खूप भुक लागलेय फिरून,  चला काहीतरी पोटपूजा करूया.

           वेदांगी :

 हो तर मला पण लागलीय, चला की काहीतरी खाऊया.

         आण्विका :

 चला तिथे एक माझ्या ओळखीचं स्टॉल आहे. तिथे मस्त नाष्टा पाणी मिळतं.

Action:

ते तिथे जातात. लोणी डोसा ऑर्डर करतात. प्रत्येकाला नाष्टा आवडतो. लोणी डोसा.

                 Dialog

          मदन :

 वाव मस्त, आवडला मला.

 अगदी कोल्हापूर सारखं आहे नाही.

          सात्विक :

 बाळा हे ठिकाण पण कोल्हापूर जिल्ह्यातच आहे हा.

            मदन :

पण कोल्हापूर पेक्षा चार्जेस कमी आहेत इथे.

            सात्विक :

 ये अनुच्या ओळखीमुळे चीफ दरात मिळालाय डोसा. नाहीतर

            मदन :

         नाहीतर काय?

          सात्विक :

       बघ तिकडे पाटी.

Action :   

मदन बोर्ड कडे पहातो.

                    Dialog

           मदन :

      अरे हो रे. खरंच.

Action : 

 मदन अन्विका कडे पाहत.

                Dialog

        मदन :

     थ्यांक्स अनु,

       आण्विका :

गप रे, त्यात काय थ्यान्क्स मानायचे.

बर ही ट्रीट माझ्याकडून ह.

      सात्विक :

        काय ,

           आण्विका :

 मग द्यायला नको का? म्हंटल शेवटची आपली कॉलेजची भेट आहे. यानंतर जो तो आपापल्या कामात असणार. म्हणून आपण द्यावी एखादी नाष्टा ट्रीट. आवडली का?

         मदन :

     हो आवडली की.

बर चला वेळ होतोय. थोडी राहीलेली ठिकाणे पाहू अन् जाऊया.

      सर्व मित्र :

 हो, बर थ्यांक्स हं अनु.

 

    Cut to ......

…. ….. …… …

Evening / Panhala kolhapur rod/ Outer

On skuty

निरोप घेवून परतताना वाटेत.

         आण्विका :

      मग काय ठरवलस

          वेदांगी :

 अजून काही ठरवलं नाही. तू काहीतरी सुचव की.

         आण्विका :

चल मग घरी गेल्यावर बघू.

           वेदांगी :

घरी, केव्हा? नको इथंच बोलू की, नाहीतर घरी बाबा ….

(वेदिक बोलणे थांबवते.)

       आण्विका :

 तू गप ग, बघते मी तुझ्या बाबांना.

Action :

 अन्विका बाजूला स्कूटी थांबवते आणि फोन लावते. वेदांगीचे वडील फोन उचलतात.

             Dialog

        आण्विका :

      हॅलो काका,

      वेदांगीचे बाबा :

 हं बोल आनु कुठे आहात, आलात की नाही.

          आण्विका :

 निघालोय आम्ही परत, सहापर्यंत पोहोचू , पण…

        वेदांगीचे बाबा :

     पण काय आणखीन,

           आण्विका :

 वेदुला आज घरी जेवायला नेवू का?

       वेदांगीचे बाबा :

    घरी की बाहेर कुठे?

         आण्विका :

 घरीच, दीदी आलेय, त्यामुळे जेवणाचा बेत आहे. म्हटलं परीक्षा झालेय, व बरेच दिवस झालेत तिला बोलवायचं म्हणतेय जेवायला. म्हणून ..जरा.

        वेदांगीचे बाबा :

 चालेल सोड मग जेवल्यावर पण लवकर या,.. इकडे तिकडे फिरत बसू नका.

        आण्विका :

       बर काका.

Action :

अन्विकाने फोन खाली ठेवला.व पुन्हा आपल्या घरी फोन  केला.

         Dialog

      आण्विका :

      हॅलो आई.

           आई :

 हा बोल बाळ, कुठं आहेस, निघाला की नाही.

          आण्विका :

अग निघालोय आम्ही झालं आमचं पाहून येतोय थोड्या वेळात. बर ऐक,  आज मी वेदूला घरी बोलवलेय बघ जेवायला

          आई :

     बर, या लवकर.

Action :

(अन्विका फोन ठेवते.)

                    Dilaug

          वेदांगी :

आज काय खास बेत आहे का?

       आण्विका :

         हो,

        वेदांगी :

    काय ग सांग की.

        आण्विका :

 काय नाही ताई आलेय, बिर्याणीचा बेत आहे.

         वेदांगी :

 वाव, मग काय मज्जाच मज्जा

         आण्विका :

 मज्जा करायला आधी घरी तर जायला हवं.

        वेदांगी :

 बिर्याणी कोण करणार?

        आण्विका :

 कोण म्हणजे?.. अपकोज ताई आणखी कोण?

          वेदांगी :

 हे आपल बर नाही ह. ताई दोन दिवस आली सुख खायला अन् तिला काम लावायच.

         आण्विका :

 मागचे आठ महिने आम्ही केलीय सेवा म्हणून ती आमची आज करणार आहे. तिनेच बेत आखलाय

         वेदांगी :

 पण आपण काहीतरी मदत नको का करायला.

          आण्विका :

 करू की,... बिर्याणी खायला.

(हासत)

(असे म्हणून आण्विका गाडी मारते.)


                                       Cut. To.

….. …… ….. ….. ….

Outer – inter evening. Anvika house

Action :

अन्विका आणि वेदांगी अन्विकाच्या बंगल्यावर पोहोचतात. ती स्कूटी व्यवस्थित पार्क करते.

                 Dialog

        वेदांगी :

     पोहोचलो एकदासे.

अग बाई, मी बाळाला एखाद खेळन घ्यायचं म्हणते.

         आण्विका :

      ए बाई गप्प चल,

        वेदांगी :

      थांब आलेच.

    Action :

( वेदांगी बाहेर जाते.)

                   Dialog

         आण्विका,

 अग ये एक की… गेली ऐकतच नाही.खेळणी भरपूर आहेत. काय दुकान काढायचेय.

Action :

(अन्विका स्कूटी लावते आणि घरात जाते, जिथे एक लहान बाळ आनंदाने बाहेरील हॉलमध्ये खेळत आहे, ते आपला अंगठा  चोखत आहे आणि अन्विकाची आई त्याच्या बाजूला बसलेली आहे.)

             Dialog

      आण्विका :

    ( बाळाकडे प्रेमळ पहात.)

अरेरे, बाळ आहे, पाय धुवायच राहिलच.

Action :

(अन्विका मागे वळून तिचे पाय धुण्यासाठी तळघरात जाते. आई अन्विकाकडे पहात आहे.)

      अन्वीकाची आई :

आलेले ले... कोण आलय बघ,.. मावशी आलेय.

          आण्विका :

 काय रे काय चाललय, मम्मी कुठ हाय.

          आई :

(दरवाजा कडे पहात)

 ती होय जेवणं करतेय.

     अग, वेदु कुठेय.

        आण्विका :

 गेलीय खेळणं आणायला.

 नको म्हणताना ऐकतेय कुठे?

Action :

(वेन्दांगी येताच, अनविका तिच्याशी बोलने सुरू करते.)

            आण्विका :

ते आधी खाली बेसमेंटला जाऊन पाय धूवून ये. लहान बाळ आहे ना.

         वेदांगी :

अरे हो खरंच, थांब आले. हे 

(टेडी भालू देत.)

       

(अन्विका टेडी भालू  हातात घेत.)

 आण्विका :

 अरे टेडी, बघ बाळा तुझ्या वेदू मावशीनं काय आणलय ते. टेडी आणलाय. चल आपण मस्ती करूया.

            आई :

 काय ग इतका वेळ, सकाळी गेला होता.

       आण्विका :

 रंकाळा बघायला गेलो नव्हतो. पन्हाळा फिरायला गेलो होतो. सगळा किल्ला पाहायचा म्हणजे होणार की वेळ.

Action :

( वेदूने तिचे पाय धुते. व बाळाजवळ येऊन बसते

आण्विका बाळाकडे पहाते.)

             Dialog

      आण्विका :

    बघ वेदू मावशी.

       वेदांगी :

 काय रे काय चाललय, सायकल मारतोयस, मार जोरात.

(दरम्यान, सातचे ठोके पडतात.)

           आई :

सात वाजलेत जा जरा मदत कर जा तिला. दुपारपासून ती एकटीच करतेय. मला साध भांड्याला सुद्धा हात नाही लावू दिला.

          अन्विका :

 मात्रुसेवा चाललेय म्हण की सरळ.

Action :

(अन्विका वेदांगीला मुलाकडे बघण्यास सांगते आणि आत जात असते. दरम्यान, ताई स्वयंपाकघरातून बाहेर आली.)

           Dialog

     आण्विका :

चल मी आले मदतीला.

         ताई :

झालंय सगळं. भांडी तेवढी स्वच्छ करून घे.

         आण्विका :

          बरं.

(अणू आत जाते.)

Cut to 

         ...... ..... ..... .....

  Night/ Inter / Anvika Home/ hall and Room

      आण्विका    हॉल मध्ये  आल्यावर ,    

                      Dialog

          आण्विका :

(  गप्पा मारणाऱ्या वेदांगीस)

 चल आत.

       ( Action :  वेदांगी मागे जाते)

                             Cut to …,

….. ……. …… …… ……

Anvika room/   Inter / Night 7.30

Action :

( अन्विका आणि वेदांगी खोलीत प्रवेश करते. आणि टेबलाच्या ड्रॉवरमधून तिचा लॅपटॉप्स काढते.)

                 Dialog

      आण्विका :

     दाखव बायोडेटा.

          वेदांगी :

 ( मोबाईल फोन  स्क्रिन दाखवत )

हा घे.

Action :

(अन्विका नेट चालू करते आणि बायो डेटावर  ऋषिकेश अग्रावकर यांचे नाव प्रविष्ट करून शोधते.

सात किंवा आठ लोक येतात. नंतर जन्म तारखेशी संबंधित आयडी निवडते.

एक काळी स्क्रीन दिसते.)

                   Dialog

        आण्विका :

 वेदे, हा बघ चालतोय का?

           वेदांगी :

 ई…नको ग बाई मला. त्यापेक्षा बिन लग्नाची राहीन मी.

(दुसरी प्रोफाइल पाहाते. त्याचे लग्नाचे फोटो पाहून )

        अण्विका :

      याच तर वाजलय.

Action : 

 तिसरी प्रोफाइलकडे पाहते. कोणताही फोटो नसतो. परंतु जन्मतारीख, ठिकाण आणि सर्वकाही जुळते. त्यावर पत्ता. आहे आणि तळाशी एक अभिनंदन संदेश आणि गट फोटो आहे. ते पहात आहे

        आण्विका :

हा, ही तुझ्या नवऱ्याची आय डी आहे. याची माहिती हवी. यामधील तो कोणता हे कळायला हवं.

 Action :  

 वेदांगी  नाराज असते.

……….

Inter /Dayning hall / Anvika home

Action :

दरम्यान, बाहेर, ताई जेवणाच्या टेबलावर जेवन देत असते.

                    आण्विकाची बहिण :

 ( oc)

पाने वाढलेत या दोघी जेवायला.

        आण्विका :

     आलो, आलो,

वेदांगी :

 आता काय करायचं?

        आण्विका :

हे बघ आधी जेवू नंतर मग ठरवू काय करायचे ते.

Action : 

  त्या जेवायला  जातात.

                               Cut to……..

….. …… …. ….. ……

Outer / On the Road in kolhapur City / . Night /9.०० o clock

   Action :

 अन्विका वेदांगीचा संतप्त मूड पाहून वेदांगीला घरी सोडायला जाते.

                   Dialog

        आण्विका :

 कशाला जास्त विचार करतेस. सगळ काय आपल्या मनासारखं होईल का?

           वेदांगी :

         तस नाही पणं…

           आण्विका :

 लग्नचं होतय ना. कुठल्या जेलमध्ये तरी टाकत नाहीत ना?

         वेदांगी :

      ते तर आहेच.

         आण्विका :

हे बघ लग्न हे तर करावेच लागणार. व आता आपल वय पहाता घरच्यांनी आपल्या पायावर उभे राहण्याइतकं शिक्षण तरी दिलेय व ते आपल्या भल्याचाच विचार करतात ना.

           वेदांगी :

 ते खरंय ग पणं घरच्यांनी जरा माझ्या मनाचा विचार तरी घ्यायल हवा होता.

         आण्विका :

हे बघ तुझ लग्न विचार करूनच ठरवतील. उगाच कुण्या ऐर्या गैर्याच्या गळयात नाही टाकणार तुला. आता फक्त प्रश्न आहे. की तो दिसतो कसा हे पाहायचा व त्याचा स्वभाव कसा आहे? तो काम कोणत करतो? याचाच.

          वेदांगी :

हो ते कळलं की बस, आणखी काय हवं.

          आण्विका :

 हे बघ तो कसा दिसतो. व त्याचे कामकाज वगैरे सर्व हिस्ट्री मी काढते. माझे काका आहेत. की कोकणात अलिबागला. त्यांकडून काढेन माहिती. हा मी पण आता सुट्टीला तिकडे जाणार आहे. तेव्हा समजेलच की सगळं.

जर का मुलगा बरा वाटला. तर होकार दे लग्नाला नाहीतर बघू दुसरा. मी समजावेन काकांना. काळजी करू नकोस.

          वेदांगी :

 चालेल मग, कर चौकशी तेवढी.

                                   Cut to……

….. …… …..

Action : And Dialog explane

1) Photo Sanyogita

संयोगिता अन्विका आणि वेदांगी यांची मैत्री आहे, त्या तिघी 5 व्या इयत्तेपासून  एकत्र  शिकत आहेत. एखादीची समस्या तीघींची समस्या मानली जाते.

2) Photo of Vedika, Anvika and Sanyogita eating Bhelpuri

त्या तिघी इतक्या जवळ आहेत की त्या भेल किंवा पानिपुरी असो की ते एकत्र खातात.

या तिघींच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करुन देणे आवश्यक आहे.

2) Vedangi Photo,

ती रायगड जिल्ह्यातील कोळी समुदायाची आहे, तिचे वडील सरकारी सेवक आहेत आणि त्यांची कोल्हापूरमध्ये बदली झाली. त्यावेळी वेदांगी पाचव्या इयत्तेत होती. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे ते येथे टिकून राहिले आहेत. परंतु ते नवीन पिढीच्या विचारांशी सहमत नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की मुलगी आज्ञाधारक असावी. म्हणून, त्यांनी वेदांगीवर बारीक नजर ठेवलीय. ते तिचे दप्तर तपासत असो किंवा तिचे मोबाइल संदेश तपासत असो, ते नेहमीच तिच्यावर लक्ष ठेवत असतात. त्यांचा एकच विचार आहे की जर आपली मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडली आणि पळून गेली आणि त्याच्याशी लग्न केले तर त्यांचे नाक कापले जाईल. म्हणून, ते जागरुक आहेत. त्यांची पत्नी खूप साधी आहे. ती गरीब मूक गायी सारखी प्रत्येक गोष्ट ऐकते.

3) Sanyogita Photo:

ती मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. तिचे वडील ड्रायव्हर आहेत, म्हणून ते केवळ घर चालवू शकत. जर एखाद वर्गात  भांडण झालं असेल तर ती ते सोडवायची. तिचा मैत्रीपूर्ण स्वभाव होता. पण जेव्हा ती १२ वी इयत्तेत होती, तेव्हा तिच्या वडिलांना समजले की ते तिला पुढील शिक्षण देऊ शकणार नाही आणि तिच्या लग्नाची जोडणी केली. व लग्न  केले .आणि तिचा संसार  सुरू झाला.आपल्या दोन मुलांची काळजी घेत. पती आणि भांडखोर सासूला  सांभाळते. तिची कडक सासू तिला टोमणे मारत असे. मग अन्विकाने तिला ब्यांकेतून कर्ज काढून दिले आणि कपड्यांचे दुकान काढले. तिने आपले जीवन व्यवस्थापित केले आणि ते इतके मोठे केले. आज, सात किंवा आठ लोक तिच्या हाताखाली काम करतात.

तिची सासू, जी एकेकाळी कठोर चिडवण्यास ओळखली जात होती, आता गुलाबाच्या पाकासारखी मऊ व गोड बनली आहे.

4) Anvika. Photo,

अन्विका गोड, कोमल आणि पाहण्यास सुंदर आहे. पण तिचा स्वभाव खूप शांत आहे. परंतु ती स्वतःच कोणालाही दुखावत नाही, परंतु जर कोणी तिच्याशी कोणत्याही कारणास्तव वाईट बोलले तर ती त्वरित भांडण  करते. पण ती तिच्या मित्रांना मदत करते. तिची मोठी बहीण विवाहित आहे. तिचे वडील एका चांगल्या कंपनीत काम करतात. तिची आई गृहिणी आहे आणि तिचा भाऊ शिकत आहे.

                                       Cut to……

….. …… …… …… ……

Night /1०.०० p.m./ Anvika home /outer – inter

Action :

अन्विका एक स्कूटीसह गेटमधून येते. आणि घरात प्रवेश करते. ती तिचे शूज काढून टाकते आणि त्यांना स्टँडवर ठेवते. आणि बाथरूममध्ये जाते आणि ताजे होते. टीव्ही चालू आहे. घरात प्रत्येकजण टीव्ही मालिका पहात आहे. बाळ खाली कार्पेटवर खेळत आहे. अन्विका बाळाजवळ बसली आहे. ती सिट्टी वाजवते. त्यानंतरच तिचे वडील स्वयंपाकघरातून हॉलमध्ये येतात. त्यांनी जेवण संपवले आहे. आई मागून येते आणि त्याच्या हातात बडीशेप ठेवते.

ती  ते खातात आणि  सोफ्यावर बसतात.

                      Dilaug

           बाबा :

 काय अनु ट्रीप कशी झाली?

       आण्विका :

    झाली ना मस्त.

     सुलभा : (आण्विका आई)

 म्हणजे तुम्हाला कळलं तर.

            बाबा :

कळलं म्हणजे मला विचारूनच ती गेली होती.

           सुलभा :

 हे आपल बरं आहे हं तुमचं, आमच्या पुढे भांडायच, व मागील बाजूने तह तुम्ही करायचा.

          बाबा :

तह वगैरे काही नाही हं. ती कोणतंही काम मला विचारायच्या आधी करत नाही.

           बाबा :

बर आता सुट्टीत काय करणार आहेस? काही क्लास वगैरे लावणार आहेस का?

          आण्विका :

 नाही, काही क्लास वगैरे नाही लावणार. पण जरा मावशीकडे जावून यायचं म्हणते. गेली चार वर्षे ती बोलावतेय. पण माझा अभ्यास असल्याने चार वर्षे नाही जाता आले. व त्यामुळे ती रुसलेय.

            बाबा :

 मग जा ना बाळ. पण तुला सोडायला कोण जाणार. माझ्या तर सुट्टया जास्त पडलेत. व आता काम पण वाढलंय. त्यामुळे मला वेळ नाही मिळणार.

(तिथे बसलेल्या त्याच्या मुलाकडे पहात .  )

. Dilaug

           बाबा :

 काय रे तू जातोस का सोडायला?

          • मुलगा :

 मला वेळ नाही. माझी पण एक्साम जवळ आलेय.

            आई :

 अरे असे काय करतोस. एकाच तर दिवसाचा प्रश्न आहे. जा की सोडून ये जा. एकटी कशी जाईल पोर.

           मुलगा :

 मला वेळ नाही. म्हणजे नाही.

          आण्विका :

 नको मला कोण सोडायला. मी काय लहान नाही. जाईन मी एकटी.

            दीदी :

 तू एकटी जाणार. ये…… असा काय करतोस रे. समजत नाही. जा की सोडून ये.

             भाऊ :

 गेलो असतो ग. पण माझी एक्झाम आहे ना. तिला येवढच जायचयं तर पंधरा दिवस थांबाय सांग. पेपर झाला की येतो सोडून.

           आण्विका :

 काही नको. मी जाईन एकटीच. मी काय आता लहान नाही. व मला स्वतःच संरक्षण येत करता. व मी काही दिवसाचीच जाणार आहे.

          बाबा :

 बर कधी जाणार आहेस?

        आण्विका :

 परवा निघायचं म्हणते.

          बाबा :

 रिझर्व्हेशन करू का गाडीच.

      आण्विका :

 कशाला नको. बघते मी काय करायचं ते.

           आई :

 बर , जातीस तर मावशीकडून जेवणाच्या नवीन रेसिपी शिकून घे काय?

           ताई :

 अग आई ती डॉक्टर आहे. तिला काय पडलेय जेवणं करायचं. व आजकाल बऱ्याच रेसिपी आहेत युटुब वर व तिला येतं सगळ.

आण्विका तू जा एन्जॉय कर जरा, समुद्र किनारा फिरून कुलाबा पाहून ये.

Action :

(दरम्यान, बाळ रडण्यास सुरवात करते.)

            दीदी :

अलेलेले काय झालं रडायला. मावशी सोबत फिरायला जायचय. नेत नाही का तुला. थांब तीच घर आपण उन्हात बांधू काय. अन् गेली तर जाऊ देत आपण राहू इथ आजोबांनी आणलेलं खाऊ संपवू काय. जा म्हणावं आमची दिवाळी सुरू.

          आण्विका :

 पंधरा दिवसांसाठी चाललेय. आयुष्यभरासाठी नाही हा. ये टग्या आईच लई ऐकू नकोस हं. मागचे आठ महिने मी व माझ्या आईने सेवा केलीय तुझी. तुझी आई पडली होती लोळत अंथरुनावर.

         दीदी :

 हो का मग जा आता झोपायला आम्हाला मालिका बघू दे.

           आण्विका :

 काय त्या मालिका सारख्या बघता देव जाणे. चुगल्या चाहाड्या शिवाय भांडण तंट्या शिवाय काय आसत सांग त्यात. मी जर देशाची पंतप्रधान असते. तर सगळ्या मालिकाच बंद करून टाकल्या आसत्या.

             दीदी :

 ये गप, मालिका बंद करते. सुया टोचून गोळ्या देण्याऐवजी सोपं वाटल काय?

          आण्विका,

 माझा पेशा एवढा सोपा वाटतोय तर फक्त एक दिवस, नको.. नको..., फक्त एकच रात्र काढून दाखव सी पी आर च्या मुडदा घरात. आहे का हिम्मत?

            दीदी,

इ… नको ग बाई… तूच जिंकलीस, राम राम….. रात्रीच्या वेळी नको ती नावे घेतेस. जा तिकड.

         आण्विका,

 कशी जिरली. बर गुड नाईट …

Action :

(अन्विका झोपायला खोलीत जाते.)

                                      Cut to…..

….. …… …… …….

After two days

Morning. / Inter / Anvika home

Action :

( अन्विका तिची बॅग पॅक करीत आहे. दरम्यान, आई काही मसाले, चटणी, लाडू डब्बा आणते.)


             Dialog

       आण्विका :

(त्याकडे पाहात)

 ए बाई काय काय नेऊ मी. इथ माझ्या वस्तूपेक्षा तुझच पार्सल जास्त दिसतंय.

           आई :

 जास्त नाही थोडेच देते. वाटल्यास रिक्षा करून जा बसमधून उतरल्यावर.

       आण्विका :

 मला डॉक्टर सोडून हमाल बनवालियास म्हण.

          आई :

 हे बघ तिथं वाटल्यास रेवतीचे कपडे घाल. पण एवढं ने. तिला बर वाटेल.

           दीदी :

 काय बहिणीवर प्रेम उत्तू चाललय बघ.

Action :

(अणु बॅग पॅक करते.  व आपला कॅमेरा देखील घेते.

सर्वांना नमस्कार करते. दरम्यान, ताई आतून दही आणि साखर आणते.)

     आण्विका :

    बाळ कुठाय?

       ताई :

    झोपलाय तो.

Action : 

अन्विका सर्व वडिलधार्यांना नमस्कार करते आणि आत जाते. गादीवर बसते.    

अन्विका बाळाला पाहून आत जात आहे.

                    Dialog

         आण्विका :

अरे लबाड, झोपलाय काय, मावशीला नाही का टाटा करायचा.

(  अन्विका बाळाचे पापे घेते. दरम्यान, वडिलांनी गाडी बाहेर काढतात.)

                        Dialog

            बाबा :

ये आटप लवकर बस निघेल. मला पण कामावर जायला उशीर होतोय. चल लवकर.

Action :

(अन्विका सर्व वडिलांना अभिवादन करते आणि गाडीवर बसते. बाबा ड्राइव्ह. करतात . )

                                   Cut to……

….. ….. ….. ….. …..

Morning. / Outer…/c.b.s. bas stand kolhapur 

Action :

सीबीएस स्टँड गर्दी आहे. तेथे पार्किंगनंतर ते कोल्हापूर-अलिबाग बस स्टॉपवर येतात. बसमध्ये गेल्यानंतर, रिकाम्या सीट पाहून बाबा बसमध्ये अन्विका साठी जागा पकडतात.

                   Dialog

           बाबा :

 इथ कोण बसलेय का?

        प्रवाशी :

 नाही हो. आताच लागलीय बस.

          बाबा :

       मग ठीक आहे.

       (    बाबा अन्विकाकडे प्रेमाने पहात  )

           बाबा :

 अनु इथे आहे बघ तुझी बॅग. मस्तच सीट आहे.

( अन्विका तिथे जाते.)

        बाबा :

 हे घे पैसे काढून देत.

        आण्विका :

 अहो रात्री दिलेत ना, मग आणखी कशाला.

           बाबा :

गप घे, लांबचा प्रवास आहे. जास्त कमी लागतात.

      आण्विका :

 पण आहेत माझ्याकडे.

 Action :

(बाबा जबरदस्ती तिच्या हातात रुपये देतात. व थोडा वेळ थांबतात.)

                Dialog

          बाबा :

बर, मी निघतो. मला आवरून कामावर जायचं आहे. नीट जा, पोहोचल्यावर फोन कर. मी सांगतो फोन करून…… ल येईल तो न्यायला.

          आण्विका :

            बर….

(बाबा निघतात.)

Cut to .....

                              Cantinu….

…… …… …… …….

Morning. /Kolhapur - Aalibag bas/ /Outer - inter

Action :

बस स्टॉपवर . बर्‍याच बसेस बाजूला येत आहेत. अन्विका आपली बॅग सुबकपणे ठेवत आहे. बरेच प्रवासी तिच्या शेजारी असलेल्या जागांवर बसले आहेत. कंडक्टर येत आहे आणि तिकिटे घेत आहे.

अन्विकाचा फोन सीटच्या खाली पडलेला आहे, तो तो उचलत आहे. त्याच वेळी, ईशान बसमध्ये येतो. आणि अन्विकाला पाठमोरी उभा पाहून त्याच्या आरक्षित सीटवर बसलेले पाहून,

तो कंडक्टरला बराच काळ विचारतो.

                  Dialog

         ईशान :

 माझं रिझर्व्हेशन आहे. मला माझी सीट देताय का?.

 Action :

कंडक्टर आरक्षण तपासून. 

      कंडक्टर,

 थांबा साहेब, देतो.

Action :

अन्विका जिथे आहे, तिथे कंडक्टर सीट तपासत येतो . आणि ती फोन खाली पडलेला घेत आहे तेथे येतो. 

               Dialog

         कंडक्टर :

 यस क्युज मी मॅडम, ही सीट रिझर्व्ह आहे .

      आण्विका :

काय,

(  ती सीटकडे पाहते . तेथे राखीव क्रमांक दिसतो)

                     आण्विका :

बापरे, गडबडीत मी पाहिलच नाही.

Action :

 ती वर पाहते. तर .. एक देखणा तरूण तिच्या समोर उभा आहे. ज्याने त्याच्या डोळ्यावर गॉगल घातलेला  आहे. तिला त्याचा चेहरा परिचित वाटतो.

                   Dialog

         आण्विका :

माफ करा मला माहीत नव्हत. मी जागा एक्सचेंज करते.

(अन्विका आजूबाजूला पहाते. बस भरली आहे . )

        आण्विका :

 बापरे, बस फुल्ल झालेय. आता काय करायचं.

       आण्विका :

 कंडक्टरला, मला माहित नव्हत. मला दुसरीकडे जागा अडजेस्ट करून देता का? काय आहे. मी पण लांब प्रवासाला चाललेय. अलिबागला.

         कंडक्टर :

 गाडी तर फुल्ल आहे.म्याडम तरी बघतो काहितरी.

( कंडक्टर  ईशान कडे पहातो)

                   कंडक्टर :

 साहेब तुम्ही एकटे आहात की आणखी कोण आहे.

          ईशान :

 माझी एक सीट रिझर्व आहे. बाकी त्या वाटल तर बाजूला बसू शकतात.

Action :

(ईशान अन्विकेस बारकाईने पाहतो. त्याने तिला ओळखले असते. पण आपण प्रथम कसे बोलणे करावे? जर ती रागावली तर तो शांत राहतो.)

                  Dialog

      आण्विका :

              (मनात)

 हा तर ईशान असेल. हा तोच आहे. काय ताठा आहे बघ याचा. जणू साहेबच असल्यासारखं ताठतोय. यानं मला ओळखलं नाही का. ओळखाय न काय झालं. सीट रिझर्व्ह आहे. म्हणूनच तोरा दाखवत असेल. बर हा कुठे चाललाय म्हणायचा असेल पुण्या बिण्याला मला काय करायचय. पण आता काय करायचं. काही झालं तरी अडजेस्ट तर करावच लागेल.

           कंडक्टर :

 (विचार करणाऱ्या अण्विकास,)

  मॅडम कसला विचार करताय.

       आण्विका :

काही नाही. बर. त्यांना विचारा कोणत्या बाजूला बसणार ते.

         ईशान :

( हसत)

 मी कडेला खिडकी शेजारी बसेन. बाकी शेजारी त्या बसू शकतात.

      आण्विका :

 (मनात)

 गेली खिडकीची साईड, खिडकी कडेला बसून शायनिंग मारायची असेल. बस म्हणावं.

        आण्विका :

        बर बसा.

 Action : 

अन्विकाने तिची बॅग उचलली आणि ती बाजूला केली. आणि 

         आण्विका :

          बसा,

Action :

ईशान आपली बॅग वरील क्यारेजमध्ये ठेवतो. आणि त्याच्या सीटवर बसला आहे. अणू शेजारी सीटवर बसत आहे.

                            Dialog

        आण्विका :

         ( मुद्दामच )

माफ करा मला माहीत नव्हत सीट रिझर्व्ह आहे ते. पुढे गाडीखाली झाली की मी बदलेन सीट.

            ईशान :

 अहो, त्याची काय गरज आहे. मला काय संपूर्ण सीट नकोय.

      आण्विका :

          बर.

         ईशान :

मला ओळखल नाही का?

         आण्विका :

       ( मुद्दामच )

ओळखीचा वाटतोय चेहरा पण…. नाव आठवत नाही.

            ईशान :

मी ईशान पाटील, आता ओळखल का?

        ईशान :

 (मनात )

मला ओळखत नाही की मुद्दाम दाखवत नाही.

        आण्विका :

       हा, ओळखल

ईशान :

 तू अण्विका ना, अण्विका भोसले.

          आण्विका :

हो , बर काय करतोस आजकाल,

             ईशान :

 मी फॉरेस्ट खात्यात कामाला आहे. फॉरेस्ट ऑफिसर म्हणून.

     आण्विका :

 (मनात)

 हा म्हणूनच राजेश्री लई ताठलेत होय. मघाशी बर त्या कंडक्टर जवळ अनोळखी असल्या सारखा उभा होता.

         आण्विका :

 म्हणजे नोकरी करतोस म्हण.

          ईशान :

 बारावी नंतर बी. एस. सी. करत स्पर्धा परीक्षा दिली व ट्रेनिंग पूर्ण करून आता आहे नोकरीला कोल्हापूर- सिंधुदुर्ग सीमेवर दाजीपूर साईटला.

         आण्विका :

हा, मग आज काय दौरा,

           ईशान :

       अलिबागला,

      आण्विका :

     अलिबागला…

           ईशान :

 हो तिकडे आमचं विशेष ट्रेनिंग आहे, खात्याचं, बर तू हल्ली काय करतेस.

           आण्विका :

 मी B.H.M.S ला आहे. लास्ट इयर ची एक्साम झालीय. फक्त ऐंट्रान्शिप बाकी आहे. आता सुट्टी असल्याने चाललेय मावशीकडे अलिबागला.

( थोड्या वेळाने कंडक्टर घंटा वाजवतो.

कंडक्टरचा इशारा ड्रायव्हर समजतो. तो बस चालवितो. )

                                    Cut to…….

…. ….. ….. …..

Morning /Day /Kolhapur pune road/ in bus /Outer

Action :

(बस सध्या धावत आहे आणि कंडक्टर प्रवाशांना तिकीट देण्यात व्यस्त आहे.)

                   Dialog

        कंडक्टर :

    तिकीट…तिकीट….

       पॅसेंजर :

     एक कराड द्या.

( कंडक्टर तिकीट देत पुढे येत आहे…अनूजवळ येत ..)

       कंडक्टर :

     मॅडम तिकीट 

      आण्विका :

    एक अलिबाग द्या.

        ईशान :

 थांब मी काढतो.

        आण्विका :

 नको, काढते मी. ती काय दहापाच रुपयाची बाब आहे.

          ईशान :

 डॉक्टर मॅडम, मी आता कमावतोय.

          अण्विका :

तरी पण नको, काढते मी.

       आण्विका :

 काका द्या एक अलिबाग.

Action :

( कंडक्टर तिकीट देतो. आणि पुढे जातो. थंड  वार्यासाठी  ईशान खिडकीचा ग्लास ढकलतो.

क्वाड आपल्या कानात घालतो. मोबाइलवर संगीत कनेक्ट करतो. आणि गाणी ऐकण्यास सुरवात करतो.

आणि अन्विकाकडे पहात हसत)

                  Dialog

         ईशान :

काल जरा जागरण झाली. थोडीशी विश्रांती घेतो.

        आण्विका :

 काय करत होतास एवढं.

         ईशान :

 काल मित्रांसोबत गेलो होती मूव्ही बघायला. बरेच दिवस झाले पार्टी मागत होते. नोकरी लागल्यावर म्हटलं देवून टाकू पार्टी केली व फिल्म पहायला गेलो होतो.

Action :

( ईशान डोळे बंद करतो. आणि  त्याच्या  सीटवर विश्रांती घेतो. अन्विकास झोप येत नाही. आजूबाजूला पहात असताना ती आजचे वृत्तपत्र तिच्या बॅगमधून बाहेर काढते आणि वाचन करण्यास सुरवात करते. ती ते थोडा वेळ वाचते आणि ती तिच्या बॅगमध्ये परत ठेवते. मग तिचे लक्ष ईशानकडे जाते.)

         आण्विका :

 (मनात)

 आज जवळजवळ पाच सहा वर्षांनी हा दिसतोय. आजपर्यंत कधी इतक जवळून नव्हतं पाहिलं अकरावी बारावी इयत्तेतला हाच का तो ईशान

(अनू भूतकाळाच्या स्मृतीत जाते.)

Flash back

                                          Cut to ….

…. ….. ….. …… …

Day/ 10.00. O clock morning / Rani season school road

Action:

(अन्विका, संयोगिता, आणि वेदांगी आज एकत्र शाळेस जात  आहेत.)

                      Dialog

          वेदांगी :

काय ग कालची नोट्स पूर्ण केलीस ना?

          संयोंगीता :

         हो केली ना,

           वेदांगी :

नाहीतर जोगळेकर बाईंची बोलणी खावी लागतील.

          आण्विका :

 ती बोलत नाही केव्हा, सारखी चटर पटर करत असते नुसती. मुलांनो, हे लिहून आणा. त्या नोट्स पूर्ण करा. सगळ्यांना कारकून करून ठेवलंय बाईने, फळ्यावर काही लिहायला नको, देतेय नोटस,

       संयोगीता :

     पण शिकवते मस्त.

          वेदांगी :

 त्यात काय शंका नाही. पण लेखन लई बाईचं.

          आण्विका :

 तर काय, माझ्या महिन्यात दोन लाँग स्केप वह्या भरल्या.

        संयोगीता :

बरं चला लवकर ...वेळ झालाय.

Action :

( त्या शाळेच्या मैदानाजवळील रस्त्यावर चालत आहेत. एक फुटबॉल जमिनीवरुन येतो आणि अन्विकास लागतो. अन्विकाचे  संतुलन जाते आणि रस्त्या  जवळील खड्यात पडते. तिचे कपडे गलिच्छ होतात. तिचा  हात दुखवतो ,थोडस खरचटते , परंतु लोक तिच्याभोवती जमले आहेत.   संयोगीता,वेदांगी अन्विकास उठवण्याचा प्रयत्न करतात.)

                      Dialog

         एक बाई :

अरे, लागल वाटत. काय या मुलांना कळतच नाही. कसे खेळायचे ते.

             दुसरा :

 रस्त्यावरून कोण येत जात हे बघत नाहीत.

           तिसरा :

       बॉल लागला का?

Action :

( तिचा हात थोडा दुखत असतो .अन्विका रडण्यास सुरवात करते. इकडे मैदानावर)

                     Dialog

          विनीत :

अरे ,बॉल लागला वाटत कुणाला?

           महेंद्र :

कळतच नाही बघ, बॉल कसा मारायचा ते? लागलं वाटत कुणाला?

Action :

(घाबरलेल्या अवस्थेत, इशान तिथे मदतीसाठी येतो.)

                      Dialog

         ईशान :

      लई लागलं का?

Action :

( त्याला समोर पाहून आणि त्याने चेंडू मारला हे लक्षात घेत वेदांगी  ईशानला जोरदार थप्पड मारते.)

                    Dialog

          वेदांगी :

 कळत नाही का? लहान आहेस, रस्त्यावरून कोण येत कोण जात याचा तरी अंदाज करायचा,

(  ईशान त्याचा गाल चोळत  बाजूला जातो.)

        इतर लोक :

चला तिला पटकन दवाखान्यात नेऊ.

                                    Flash back

Cut to .....

…… …… …..

Day. / In bus / inter outer

(अन्विका स्वप्नातून बाहेर येते. ती त्याच्याकडे पाहते, त्याचा चेहरा आता शांत दिसत असतो. त्याच्या चेहऱ्यावर   एक नवीन तरूण चमक तिला दिसते.

ती त्याच्याकडे  टक लावून पाहते आणि पुन्हा तिच्या स्वप्नात स्वत: ला हरवते.)

                       आण्विका (मनात)

                खूप लाघवी आहे

                                   Flash back

…. ….. ….. …… ….. …..

Day /after noon / Inter / Hospital

      Action :

( अन्विका रडत आहे, डॉक्टर चेकअप करत आहेत. )

                     Dialog

           डॉक्टर  :

 घाबरु नको बाळ, हाड काही मोडल नाही, फक्त दुखावला गेला आहे. स्ट्यापिंग करावं लागेल. बर होईल थोड्या दिवसात.

           वेदांगी :

त्या मुलाला चांगल बदडले पाहिजे.

         संयोगीता :

 ए गप, त्याने काही जाणून बुजून केलं नाही. चुकून लागला तो बॉल.

          वेदांगी :

 तुला लागायला पाहिजे होता. म्हणजे समजलं असत.

       संयोगीता :

 ये गप्प बस पेशंट पेक्षा तुझाच दंगा जास्त आहे.

डॉक्टर हिला एक इंजेक्शन द्या. गप्प बसायचं.

       वेदांगी :

      हो तर.

       आण्विका :

 ए बाई, गप्प बसा ग उगाच तुमची भांडणे नकोत.

Action :

(स्टेपलिंगनंतर डॉक्टर काही औषधे देतात. दरम्यान, अन्विकाचे वडील येतात. आणि तिला घेऊन जातात.

ईशान एका कोपऱ्यात   हॉस्पिटलच्या बाहेर उभा आहे आणि पहात आहे. अन्विकाला तिचे वडिल घेऊन  जाताना  पाहून त्याला खूप वाईट वाटते.)

                                  Cut to…..

…. ….. ….. ….. ……

क्रमशः. पुढे


Kalat n kalat julale he bandh script

ll श्री गणेशाय नमः ll 

 Kalat n kalat julale he bandh

कळ त न कळत जुळले हे बंध

  लेखक : निशिकांत हारूगले.

One liner :

आण्विका भोसले एक डॉक्टर व ईशान पाटील एक फॉरेस्ट ऑफिसर शाळेतील एका घटनेने दुरावलेले क्लासमेट्स पुढे प्रवासात बसमधे अचानक भेटतात. जुन्या आठवणीवर चर्चा करता करता एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांच्या भेटीगाठी होतात. पण एकमेकांसमोर प्रेम व्यक्त करण्यासाठी घाबरतात. पण पुढे राधानगरी येथे पुन्हा त्यांची भेट होते. व जवळीकता येवून ते प्रेम व्यक्त करतात. याचवेळी ईशान फॉरेस्ट खात्यात असल्याने त्याचे जंगल तस्करांशी वितुस्ट येते, ते त्याला अडकविण्यासाठी अन्विकाचे अपहरण करतात. ईशान तिला सोडवतो. या प्रकरणात झालेल्या बदनामीमुळे अन्विकाचे घरचे लग्नास नकार देतात. शेवटी त्या दोघांचे प्रेम पाहून होकार देतात. व लग्न ठरवले जाते.


मुख्य कॅरेक्टर :

• अन्विका भोसले (२५) B.H.M.S. डॉक्टर सुंदर गोरी लाघवी मुलगी.

• ईशान पाटील (२६) फॉरेस्ट ऑफिसर, सावळा रंग उंच बांधेसूद युवक. अन्विकाचा प्रियकर


• वेदांगी अग्रावकर : (2५) B.H.M.S. डॉक्टर अन्विकाची मैत्रीण.

• संयोगिता (२५) : अन्विकाची मैत्रीण कापड दुकान व्यवसाय करणारी.

• सुलभा : (५०) अन्विकाची आई गृहिणी.

• बाबा: ( ५५) अन्विकाचे वडील खाजगी नोकरी.

• सुधा माने (४८) अन्विकाची मावशी गृहिणी

• रेवती माने : (२२) अन्विकाची मावस बहीण 

• स्वप्निल माने (२३) अन्विकाचा मावस भाऊ, (M.C.A.) शिक्षण 

• रेवाचे बाबा (५५) : अलिबाग शहरात एका सरकारी नोकरीवर असलेले.

• राहुल भोसले (२७) अन्विकाचा भाऊ 

• गौण कॅरेक्टर :

• भिवा (४५) ,सदा (४०), तुकाराम (४२), किश (३८) सर्व जंगल तस्कर. कळम्या जीवा (४०)  सुपारी घेऊन खून करणारा गुंड.

• सौरभ, सात्विक, मदन आण्विकाचे क्लासमेट (B.H.M.S. कॉलेज)

• श्रीकांत, मोहन : तालमीत व्यायाम करणारी मुले.

• शिरीष साळुंखे : फॉरेस्ट ऑफिसर.

• पांडू : वन खात्यातील शिपाई.

• बबलू : अलिबाग शहरात गॅरेजवर काम करणारा 

• रवी (३०) : फॉरेस्ट ऑफिसर.(नाशिक विभाग)

* डॉक्टर संजय वाघवेकर (४५) : राधानगरी सिटी  रुग्णालय डॉक्टर.


 Day /Radhanagari  Forest /morning. outer

Actions : 

अभयारण्यात, नऊ तस्करांच्या टोळी जंगलात एका ठिकाणी जेवण घेत आहेत. त्यांच्यासमोर ते पत्रावळीवर तांदूळ आणि मासे खात आहेत.

                  Dilog

         भिवा :

 बातमी क्लिअर हाय ना?

         सदा :

 म्या काल स्वतःच्या कानान ऐकलय, आज कुठेतरी ट्रेनिंगला जाणार हाईत म्हणून.

        तुक्या :

हे बघ खर सांग नायतर सापडायचो , अन् सगळं केलेलं काम फुकटात जायचं.

                        भिवा :

( आत्मविश्वासाने)

चल बघू सकाळचे सात वाजलेत कोण येतय एवढ्या सकाळी मरायला. आफिसर पडलं असतील डाराडूर होऊन.

          तुक्या :

(तिरकस पहात)

 बर ...किशा तू जा,.. टेकावल्या जांभळीवर,

         किशा :

       जी दादा.

Action : 

किशा झाडाच्या दिशेने जाते, तर इतर लोक नजर चुकवून एक एक करून, त्या गुप्त स्थळाकडे जातात जिथे त्यांनी त्यांचा माल लपवलेला आहे.

                                      Cut to

……. ……. ……. …….

Today / that time / morning

Action :

वन व्यवस्था विभागाची जीप राधानगरी फोंडा रोडवरून निघाली आहे आणि  फोंडा रोडवरील चहा स्टॉलवर थांबली आहे. त्यातील  एक तरुण सावळ्या रंगाचा अधिकारी, खाली उतरतो आणि  रस्त्या कडेच्या चहा स्टॉलवर जातो.

Dialog :

      ऑफिसर ईशान :

आज काय गरमागरम.

         टपरीवाला :

सॉलिड गरमागरम म्हणाल तर चहा आहे,

ईशान :

द्या मग सहा गरमागरम चहा. आज थंडी पण खूप आहे. होऊ द्या गरम.


 Action : 

टपरी वाला   चहा देतो. ईशान चहा घेतो,  टपरी वाला  बोट दाखवत . इशारा करतो. आणि एक पत्र पुढे ढकलतो. त्यानंतर तो पत्र उचलतो आणि गाडी मध्ये बसलेल्या सुरेशकडे पाहतो.

Dilog

         ईशान :

       सुरेश चहा दे

Action :

सुरेश जीपमधून बाहेर येतो  व चहा नेतो आणि सर्वांना चहा ऑफर करतो. सर्व आवडीने चहा स्वीकारतात.

       ऑफिसर ईशान :

“ मोहन स्टार्टर मार. आज शिकार्यांची शिकार करूया. लई दिवस दमवत होते. आज बरोबर सापडले.

 Action:

मोहनने जीप सुरू करतो. जीप निघते.

                                         Cut to…

……….

Day/outer /Forest

Action :

   एका जंगलातील वाटेवर जीप जाते , जिथे एक  नाला पुढे वाहतो आहे. हिवाळा असल्याने पाणी कमी आहे, जंगल रूपांतरित झाले, थंडी मुळे धुके पडलेले आहे.

इथे जास्त पानी शिल्लक नाही. जेव्हा जीप ओढ्याच्या पात्रातून  जाते, तेव्हा कुक्कूचा आवाज ऐकू येतो.

                Dialog

         ईशान :

( आवाजाचा अंदाज घेत )

 गाडी थांबवं, पांडू, महादू उतरा व ती झाडावरील कोकिळ पकडा आधी.         

Action:

ते दोघे जीप मधून खाली उतरतात आणि झाडाकडे धावतात. कुठून कोकू ,कोकू कोकिळ आवाज येतो ते ऐकतात

Cut to ....

…. ….. ….. …. ….. 

Day / outer / Forest           

Action :

भीवा आणि त्याचे सहकारी एकमेकांकडे पाहतात, त्यांच्या कान उभे राहिले आहे जसे ते तो आवाज लक्षपूर्वक ऐकतात..

           Dialog

        भिवा :

     ये झाका लवकर,

Action:

ते वस्तूं सुरक्षित खड्ड्यात  टाकतात.आणि त्यावर माती घालतात आणि त्यावर झाडाची सुकलेली पाने ठेवतात. नंतर, ते जंगलातून लाकडे गोळा करतात आणि एक लहान बिंडा बांधायला सुरुवात करतात.

Cut to ....

………..

Day/ Outer /Forest 

                

Action:

गाडी जाते जाते आहे , एका वळणावर, ईशान धावत्या जीपमधून उडी मारतो आणि धावायला लागतो. चालक जीप थांबवतो आणि इतर जंगल रक्षक त्याच्यामागे धावायला लागतात. तो एक आडव्या झाडावरुन उडी मारतो आणि एका टेकडीकडे धावतो. तिथे पोहोचल्यावर, ईशान आजूबाजूला पाहतो.

                  Dialog

          ईशान :

‘काय करताय इथं येवढ्या सकाळी.

           भिवा :

काय नाही साहेब, वाईच लाकड गोळा करताव, चुलीच सरपण संपलय, तवा म्हंटल…..

                  

   Action:

 तुका तिथे बसला आहे आणि एक छोटी लाकडाची मोळी तयार करत आहे, जो थोडासा त्रासलेला आहे . घामावलेला आहे. दरम्यान, एक जंगल रक्षक तिथे येतो.

                   Dialog

       एक वनरक्षक :

फॉरेस्ट एरीयात विना परमीशन सरपन गोळा करताय, कायतरी गौडबंगाल तर नाय ना.

          भिवा :

काय पण नाही साहेब बघा की काटक्याच गोळा केल्यात फक्त.

                 

Action:

ईशान लक्षपूर्वक पाहतो आहे. त्यांचे हात आणि पाय मातीने लाल झाले आहेत. त्याच्या शरीरावरून घाम वाहत आहे, तो आसपास पाहत आहे. काही अंतरावर, एक ठिकाणी उकरलेली माती  आढळते  तो हसतो. ईशान फॉरेस् रेंजर्स कडे पाहतो.

                   Dialog

         ईशान :

(हसत आत्मविश्वासाने)

काय रे सरपन जमिनीच्या खाली सापडत की झाडावर

        वनरक्षक :

          झाडावर.

           ईशान :

 मला तर इथं जमिनी खालीच दिसतंय...राव

Action:

ईशानचे बोलणे ऐकून ते एकमेकांकडे पहात आहेत.

ईशान पुढे सरकतो आणि माती खोदलेल्या ठिकाणची माती दूर सरकते आणि त्याच्या खाली मुजलेल्या वस्तू उघडकीस आणतो. तेथे प्राण्यांची शिंगे, वन्य औषधी वनस्पती आणि कातडे आहेत.

                 Dialog:

         ईशान :

(रागीट मुद्रा)

 सरपण गोळा करतात मग हे काय आहे.

  पाठीमागे असणारा वनरक्षक :

 अरेर.... हे असलं सरपण मी तरी कधी चुलीत घालताना नाही पाहिलं.

     दुसरा वनरक्षक :

साहेब ,हे सरपन आता कुणीकडून चुलीत घालायचं.

         वनरक्षक :

        धरा रे यांना

  Action:

ते दोघेही रेंजर्स त्याना पकडण्यासाठी पुढे जातात. त्यातील एकाने त्या दोघांनाही मानेने पकडले आणि झाडाकडे खेचले.

ते किंचाळणे सुरू करतात.

उर्वरित तस्कर हसू लागतात.

दरम्यान, त्यातील एक ईशानला पकडण्यासाठी जातो. त्याला ईशान  एक चापट मारतो. तो चक्कर येऊन पडतो.. मग दुसरा एक त्याच्यावर धावतो. इशान प्रत्येकाला एक एक करून मारतो.

थोडया  वेळात धूळ उडते. बाकीचे जमिनीवर लोळत  आहेत.

त्यानंतर तो राकट माणसाकडे पाहतो. ज्याने दोन वन रक्षकांना पकडले आहे. तो त्याच्याकडे जातो आणि त्याला एक चापट मारतो. तो खाली पडतो.

              Dialog:

      एक वनरक्षक :

(गळा धरुन दमलेल्या अवस्थेत)

 साहेब होते म्हणून बर झाल, नाही तर त्या रेड्यान यमाकडेच पाठवलं असत.

      दुसरा वनरक्षक :

तर काय त्याचा तो काय हात म्हणायचा. हत्तीचा पायच जणू. वाचलो बुवा.

          ईशान :

आता बघत बसू नका पकडा त्याना ,.... चला बघू त्यांचा हिशोब.

   Action:

इतर जंगल रक्षक अतिक्रमण करणाऱ्यां तस्करांना दूर करतात. ईशान शैलीत त्याच्या चेहऱ्यावर गॉगल्स घालतो. व निघतो. 

Cut to….

….. ….. ….. ….. …..

Day /next day/ Morning 11.30

Inter – outer- inter.

Forest Office Shirish Salunkhe Forest Officer Cabin

शिरीष साळुंखे घंटी वाजवतो आणि बाहेरून कर्मचारी पांडू प्रवेश करतो.

                        Dialog:

        शिरीष साळुंखे :

     पांडू ,..ईशान सर आलेत का?

           पांडू :

 मघाशी केबिन झाडताना दिसले नाहीत. येतील इतक्यात साडे अकरा झालेत.

          साळुंखे :

ते आले की पाठव केबिनमध्ये. अन् हो ही फाईल क्लार्क देशपांडेंच्या टेबलावर नेऊन दे.

       पांडू :

      जी सर.

Cut to

..... ..... .... 

Day /Outer - Inter /Forest office 

   Action:

दरम्यान, ईशान त्याच्या मोटारसायकलवर तेथे येतो.

बाहेर एक कर्मचारी कार्यालयासमोर उभा आहे.

         Dialog

                  कर्मचारी :

        नमस्कार सर,

                    ईशान :

         नमस्कार.

 Action:

ईशान त्याच्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये जात असताना पांडू त्याच्या जवळून जात असताना.

                          Dialog

             पांडू :

            ईशान सर,

               ईशान :

              काय रे.

               पांडू :

      साळुंखे साहेब बोलावत होत?

                    ईशान,

    बर, हा.. ह.. कुठे निघालास.

           पांडू :

 देशपांडे साहेबाना फाईल द्यायला.

             ईशान,

बर, माझं एक काम कर, एवढी बॅग माझ्या केबिन मध्ये टेबलावर नेऊन ठेव.

           पांडू,

     बर, द्या ती इकडे.

Cut to

..... ..... ..... 

 Day / Inter  / Office          

  Action:

 पांडू बॅग घेऊन जातो. ईशान साळुंखे सरांच्या केबिनला जातो. नोक आऊट करून,

                   Dialog

           ईशान :

      सर आत येऊ का?

   Action:

साळुंखे साहेब टेबलावर असलेल्या फाईलची तपासणी करत आहेत आणि त्याच वेळी वर पाहत आहेत.

                         Dialog

         साळुंखे साहेब :

  कोण?.. ईशान ,ये ये, अभिनंदन .

            ईशान :

          कशाबद्दल,

           साळुंखे साहेब :

       अरे ,..तू एवढी मोठी तस्करी

                पकडलीस, त्याबद्दल.

              ईशान :

     ती तर माझी ड्युटी होती सर.

        साळुंखे साहेब :

   पण आजकाल तुझ्यासारख्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांची कमी आहे. तू ज्या कौशल्याने काम करतोस मला तर नवलच वाटत.

            ईशान :

काय पण सर, येवढं काय मोठ काम केलं नाहीये मी.

         साळुंखे साहेब :

 नाही कस, अरे बऱ्याच वर्षापासून आम्हाला गुंगारा देवून हे तस्कर बऱ्याच प्राण्यांची, त्यांच्या अवयवांची, जंगली औषधांची तस्करी करत आहेत. बऱ्याचदा सापळा रचून ही सापडत नव्हते. आपल्यातील काही महाभाग सामील आहेत त्यांना म्हणा, पण तू मोठ धाडस केलस.

          ईशान :

 उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका सर,

          साळुंखे साहेब :

          उगाच नाही.खरंच

           ईशान :

बर आणखी काय काम होत का माझ्यासाठी, मघाशी पांडूने सांगितल तुम्ही बोलावल म्हणून.

        साळुंखे साहेब :

    हा,.. हे बघ ही ऑर्डर घे.

Action:

साहेब ईशानला एक लिफाफा देतात. तो घेतो.

         ईशान,

      यात काय आहे.

          साहेब,

अरे आपल्या फॉरेस्ट खात्याची मोठी परिषद अलिबागला आयोजित केली आहे. प्रत्येक विभागातील एक कर्मचारी तिकडे ट्रेनिंग व मार्गदर्शन घेण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. यासाठी फोरेनहून अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक येणार आहेत. आपल्या ऑफिसतर्फे तुझी निवड केली आहे. या लिफाफ्यात सर्व माहिती आहे.ती बघून घे.

         ईशान :

 ठीक आहे सर, आणखी काही.

        साळुंखे साहेब :

आणखी काय, याबरोबरच अलिबाग सफर पण करून ये.

         ईशान :

        (हसतो)

       ठीक आहे सर, येतो,

           साहेब :

              हा.

                                          Cut to.

……. ……. ……. ……. …… ….

Day /inter- outer/ Exam center Kolhapur medical College

                     Action:

कोल्हापूर मेडिकल कॉलेजच्या परीक्षा केंद्रात, विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू आहे  मुले लेखनात गुंतलेली दिसत आहेत. अचानक, घंटा वाजते, जो वेळ संपलेला असल्याचे सूचित करते. विद्यार्थी त्यांचे पेपर्स जमा करतात आणि परीक्षा केंद्राबाहेर जातात. अन्विका तिच्या जवळच्या पार्क केलेल्या स्कूटीकडे जाते.  ती तिच्या स्कूटीची ट्रंकेत उघडते,   तिचे पेपर त्यात ठेवते. दरम्यान,)

                    Dialog :

          सौरभ :

काय मॅडम पेपर कसा गेला.

         अन्विका :

       मस्त सोपा गेला.

 Action:

त्याच वेळी, वेदांगी तिथे येते.

         वेदांगी :

    हाय अनु, हाय सौरभ,

           सौरभ :

हाय, काय वेदांगी पेपर कसा गेला.

           वेदांगी :

          ठिक गेला.

            सौरभ :

मग आता परीक्षेच्या अभ्यासातून सुट्टी ना.

             वेदांगी :

हो यार, काय सांगू खूप टेन्शन होत ,गेलं एखदास.

(या दरम्यान, सत्विक तिथे पोचतो.)

        सात्विक :

    हाय वेदांगी, हाय अनु,

        वेदांगी व अनु

           हाय.

         सात्विक :

      पेपर कसा गेला?

         अन्विका :

मस्त, सोपा होता. तुला रे.

     सात्विक :

            मस्त

            सात्विक :

बर… एनिवे गाईज आपण उद्या एक छोटीशी ट्रीप काढतोय हा.

              वेदांगी :

अरे यार,... मला आधी नाही का सांगायचं, घरी वांदे होतात रे, आमचे पप्पा जाम कडक आहेत,

         सात्विक :

ये वेदे, उगाच खोडा घालू नकोस ह. तू फक्त हजर रहा.

अग हे आपल शेवटचं वर्ष, परत कधी भेटू न भेटू. तुम्ही उद्या येताय. सगळ्यांचं ठरलंय.

         अन्विका :

      बर  जायचयं कुठ.

         सात्विक :

         पन्हाळ्याला

अन्विका, चालेल आम्ही येवू.

           वेदांगी :

अरे इथे कुठेतरी जवळ काढुया की.

            सौरभ :

ये जवळ काय जवळ, हॉस्टेलवर कराय पाहिजे मग ट्रीप.

Cut to 

..... ..... ......

Day / Outer /on road

Action:

 अन्विका  नंबर डायल करून कानाला लावत

                    Dialog

        अन्विका :

        हॅलो काका,

(ऑनलाइन फोन)

           काका :

          हा बोल,

        अन्विका :

 काका, मी अन्विका बोलतेय.

             काका :

हा बोल की अनु बाळ पेपर झाला का?

           अन्विका :

            हो काका,

            काका :

बर कसा गेला? वेदांगी कुठे आहे?

          अन्विका :

 चांगला गेला , व ती माझ्या सोबत आहे. बर का काका उद्या आम्ही एक छोटीशी ट्रीप काढतोय. पन्हाळ्याला, वेदुला घेऊन जाऊ ना.

           काका :

अ..हो.. चालेल की, लगेच येणार ना.

            अन्विका :

हो काका सात पर्यंत येऊ संध्याकाळी.

            काका :

तू असलीस तर ठिक आहे. चालेल.

            काका :

           बर तिच्याकडे दे.

    Action:

 वेदांगी, अस्वस्थ होते आणि फोन घेते.

                     Dialog

          वेदांगी :

        हॅलो, बाबा

         वेदांगीचे बाबा :

       पेपर कसा गेला.

           वेदांगी :

        ठिक गेला बाबा.

             बाबा :

 मग आता घरी ये. उद्या जा ट्रीपला पण सात पर्यंत घरी परत यायचं. समजल काय?

        वेदांगी :

       हो बाबा.

           बाबा :

 बर आईला घरी गेल्यावर सांग मला जरा वेळ होईल, मी बाहेरच जेवून येईन म्हणावं.

          वेदांगी :

बर सांगते. ठेवू का.

          बाबा :

ठेव, व अनु बरोबर घरी जा.

         वेदांगी :

          जी.

  Action:

वेदांगी फोन हँग अप करते. आणि अन्विकास आनंदाने मिठी मारते,

              Dialog

          वेदांगी :

थॅन्क्स अनु, तू असलीस म्हणजे सगळं कोड सोडवतेस. म्हणून मला जाम आवडतेस तू.

       अन्विका :

उगाच मस्का नको लावूस.

         सौरभ :

 मिळाला वाटत हिरवा सिग्नल.

         वेदांगी :

अनु असली की मिळतो लगेच.

        अन्विका :

बर किती वाजता निघायच, कस.

         सात्विक :

 सकाळी ८ वाजता निघुया. व प्रत्येकी दोघांमध्ये एक गाडी घेऊ.

           अन्विका :

 चालेल. मी व वेदांगी येतो दोघी. साडे आठला आहोत आम्ही शिवाजी पुलावर. तुम्ही सगळे या तिथे मग निघू.

          सात्विक :

चालेल, मी सांगतो सगळ्यांना.

         अन्विका :

         बर बाय.

         सात्विक :

             बाय.

( त्या  सर्वांना भेटतात आणि निघतात.)

                   Cut to….

…. ….. …… …… …… …..

Day/    morning/ Anvika home/ inter

Action:

कोल्हापूर शहर ‘शिव-सदन बंगला’ अलार्म घड्याळ सकाळी सहा वाजता वाजत आहे, अन्विका उठते. ती जोरात उसासा देते. अलार्मचे घड्याळ बंद केल्यावर, ती आपले केस बांधते आणि तिथे टेबलावर एक पिन ठेवते. ती उठून रुममधून खाली जाते. जेव्हा ती स्वयंपाकघरात येते. तेथे तिची आई तिच्या वडिलांचा डब्बा तयार करीत आहे. तिला पाहून,

                   Diloug

        अन्विका :

 काय सकाळी सकाळी लई धावपळ चाललीये,

            आई :

(चेहऱ्यावर दयेचे भाव दाखवत)

काय सांगू आज जरा उठायला वेळ झाला ग, त्यांना डबा द्यायचाय, जराशी मदत करतेस का? चार चपात्या तेवढ्या लाट, तोपर्यंत मी भाजीला फोडणी देते.

            अन्विका :

 तुला अलार्म लावायला काय होत?

            आई :

आजच उशीर झालाय, उगाच शहाणपणा करू नको, आधी तू कितीला उठलीस बघ.

           अन्विका :

 माझं काय आहे, माझी तर कालच परीक्षा झालीय.

          आई,

 अग, काल बचत गटाच्या मीटिंगमुळे थोडा वेळ झाला उठायला.

           अन्विका,

 पुरे तुमचा तो बचत गट, त्या मीटिंग पाहिल्यात मी, आर्थिक व्यवहारापेक्षा तुम्हा बायका नटून थटून आपल्या साड्यांची व त्यांच्या दरांचीच चर्चा करता.

          आई,

तू उगाच नको ते बोलू नकोस, चपात्या लाटणार की नाही ते सांग.

     

                       Diloug

       अन्विकाचे वडील :

  ( Oc बाथरुम मधुन)

झाला की नाही डबा.

            आई,

झालाच, थोडा वेळ अजून.

Action:

आई अन्विका कडे मदतीसाठी पाहते. हे पाहून, अन्विका बेशीनला हात धुते, ते रुमालाने  पुसते, स्वयंपाक घरात जाते आणि चपात्या वळायला सुरवात करते.

Cut to...

…… …….. …….

Day /Morning /Inter /Anvika home

Action:

अन्विकाचे वडील जेवणाच्या हॉलमध्ये येतात आणि अन्विकाची आई चहा आणि नाश्ता देते. ते घेतात, ती तेथे उभा रहाते. उभा  राहूनच चहा घेतात.त्यांचा नाष्टा झाल्यानंतर

                 Diloug

         बाबा :

     अग, डबा कुठे हाय?

          आई :

      अरे, देवा थांबा हं,

Action:

 अन्विका जेवणाच्या खोलीतून येते. तिच्या हातात डबा आहे.

                   Diloug

        अन्विका :

( हास्य मुद्रेने)

         हा हे घ्या,

Action  : 

 बाबा, हसत हसत आणि डबा घेऊन  घाईघाईने निघून जातात.

Cut to 

…….. …….. …… ……

Inter/ Day / Morning/Anvika HomePlace : dayning hall

Action:

अन्विका आंघोळ पूर्ण करुन  केस बांधलेले आहेत. गडबडीत तिचा नाष्टा खात असते.


        Diloug

       आई :

 अग एवढी गडबड कसली आहे. सुट्टी आहे ना? हळू कर नाष्टा.

         अन्विका :

 मी जरा बाहेर जाणार आहे, ऐनीवे आमची छोटी ट्रीप आहे.

           आई :

 काय ट्रीप, हे आणि कधी ठरलं, सांगायचं नाही का?

            अन्विका :

 त्यात काय सांगायचं, इथं जवळच तर जाणार आहे.

         आई :

 अग ,जवळ म्हणजे कुठे?

         अन्विका :

 जवळ म्हणजे पन्हाळा, त्यात काय एवढं आश्चर्य करण्यासारखं.

            आई :

 हे बघ ते रागावतील, उगाच लांब नको.

           अन्विका :

 पन्हाळा कुठे लांब आहे, इथं जवळच तर आहे.

           आई :

 अगं पण,

Action:

दरम्यान, तिच भाऊ खाली जिन्यावरून पाहतो

                  Dialog

      अन्विकाचा भाऊ राहुल :

 मी ऐकलंय सांगणार बाबांना,

           अन्विका :

 ये, जा सांग जा चोमड्या, मी घाबरत नाही.

            आई :

 ये तू गप रे,

( अनूकडे पाहत) 

हे बघ अनू बाबांना तरी फोन करून सांग.

           भाऊ राहुल  :

 मला जर पाचशे रुपये देत असशील तर मी मदत करेन बाबांची परवानगी घ्यायला.

       अन्विका :

(तोंड वेडावून दाखवत)

 काय पाचशे रुपये, ये भिकारड्या, जा तुला देतोय मी पाचशे, कधी ओवाळणीत तरी घातलेस का?  पाचशे.

             आई :

 गप काय पण काय बोलतेस, तो कुठला देईल अजून ज्योबला लागायचाय तो.

           अन्विका :

 माझं ऐकशीस तर उगाच जोबचा  विचार सोडून दे, मी सांगते ते ऐक, बिझनेस कर बिझनेस.

         अन्विकाचा भाऊ राहुल :

 ये दिदे, दे की ग, मला हवेत, नवीन स्पोर्ट्स टी शर्ट घेणार आहे मी, सांगत नाही बाबांना तुझ्या ट्रीपच, वाटलं तर शपथ घेऊ का?

           अन्विका :

 हे बघ तू बाबांचं भ्या मला घालू नकोस, मी आधीच परवानगी घेतलीये, व कपड्याचे म्हणत असशील तर ती तिजोरी भरलिये ना तुझ्या कपड्यांनी तिथं नवीन कपडे ठेवायला जागा नाही त्याच बघ आधी.

             आई :

 काय ग? कधी घेतलीस परवानगी?

          अन्विका :

          कालच,

           आई :

 अग पण त्यांना रात्री उशीर झाला न यायला, तू तेव्हा झोपली होतीस.

          अन्विका :

 मोबाईल कशाला पुजायला आहे. पेपर झाल्यावर मुलांच ठरलं ट्रिपच तेव्हाच बाबांना  कॉल केला होता.

         अन्विकाचा भाऊ वेदांत :

 चला नवीन टीशर्ट क्यांसल.

           आई :

 तुझा टि शर्ट, गप्प बस, अन् थांबवं ते विनाकारण पैसे खर्च करायचं. कामाचं बघ आदी.

        अन्विकाचा भाऊ राहुल :

 माझा तेवढा खर्च दिसतो, हिचं ट्रीपच दिसत नाही तुला, ती तेवढी लाडकी अन् मी दोडका काय?

             आई :

 तिचा नाद करू नकोस, ती अभ्यास करत ओपीडी करते व स्वतःचा खर्च चालवून आम्हाला मदतही करते, समजलं काय.

Cut to .....

...., ..... ......

Day/ Morning/Inter /Anvika Home 

Action:

 नाश्ता करून, अन्विका बाहेरील हॉलमध्ये प्रवेश करते आणि तिच्या मैत्रिणी वेदांगीला कॉल करते.

वेदांगी फोन उचलते.

                     Dialog

         अन्विका :

 काय मॅडम,... कालच लक्षात आहे ना,

          वेदांगी :

 आहे, तयार होतेय,

           अन्विका :

 आवरून बस मी येते न्यायला.

          वेदांगी :

         हा 

.......... ..... ..... 

Day/Outer / Out of Home 

Action:

अन्विका फोन ठेवून तिच्या स्कूटरवरून निघून जाते.)

                                      Cut to…

….. …… …… …….

Out. Int/ Rode kolhapur citi vedangi collani / Day /morning

 Action:

अन्विका तिच्या स्कूटीवरून जात आहे, सुंदर पंजाबी वेशभूषेत आणि हेल्मेट घालून. ती वेदांगी अग्रावकरच्या अपार्टमेंटच्या बाहेर थांबते आणि हॉर्न वाजवते. हा आवाज ऐकून वेदांगी गॅलरीत बाहेर येते आणि  पाहते.

         Dialog:

               अन्विका :

       चल लवकर,

        वेदांगी :

         आले.

Action:

वेदांगी तिच्या छोट्या पर्ससह आपल्या घरातून निघते. तिचे वडील सोफ्यावर  पेपर वाचत आहेत, तिला जाताना पाहून.)

                    Dialog

           वेदांगी बाबा :

( तिरकस पहात)

 वेदांगी अन्वीका आहे म्हणून जाऊ देतोय, पण सातच्या आत घरात परत आली पाहिजेस समजलं काय?

          वेदांगी :

(घाबरलेल्या अवस्थेत)

          जी बाबा.

             बाबा :

 हं आणखी एक, मी तुझं लग्न ठरवतोय, आता भरपूर शिकणं झालं.

              वेदांगी :

             बरं,

            बाबा,

       अन् फोन घेऊन जा,

           वेदांगी :

              हा,

Cut to

..... ...... .....

Outer /Day /on road 

Action:

वेदांगी बाहेर येते. जिन्याने  पायऱ्या उतरत  आहे. आण्विकाच्या स्कूटी कडे जाताना तिला येताना पाहून

                    Dialog

          अन्विका :

 काय सुरमई, इतका वेळ,

   Action : 

स्कूटी वर बसत 

Dialog

         वेदांगी :

 तुझ्यासारख आहे होय, शंभर सूचना ऐकाव्या लागतात इथे.

            अन्विका :

( तोंडाची विचित्र ॲक्शन करत)

 असे काय ग तुझे बाबा, काय तर म्हणे, ये वेदे लवकर घरी ये, फोन करत जा. अन् काय , कुठल्या मुलासोबत दिसलीस तर याद राख, मासा सोलल्या सारखं सोलीन,

कुणी या बाबाला ऑफिसर बनवलं देव जाणे, त्या पेक्षा मासळी बाजारात पाठवल पाहिजे मासळी सोलायला, एवढं शिकला तरी जुनाट विचार,

          वेदांगी :

          ये गप,

          अन्विका :

 गप काय गप, स्वतःच्या पोरीवर जरा देखील विश्वास नाही, काय पळून जाते की काय?

           वेदांगी :

(घाबरत)

 ये बाई पुढे रस्त्याने तुझे रामायण लाव , चलं इथनं, ऐकतील ते.

 Action:

स्कुटी स्टार्ट करुन चालवते

           अन्विका :

जा घाबर जा तू, मी नाही घाबरत त्या हिटलरला, म्हणूनच मी तुमच्या घरी येत नाही, त्या सूचना ऐकूण कान किटलेत माझे, एक सूचना कोश होईल त्यांचा संचय केला तर.

            वेदांगी :

ये बाई तुझी चावचाव बंद कर व बाकीचे कुठं आहेत ते बघ आदी.

Action:

अन्विका गाडी चालवत असताना कॉल करते.

       अन्विका :

( फोन वर)

अरे, सात्विक आम्ही निघालोय पंचगंगा पुलावर पोहोचू थोड्या वेळेत.

Action:

मोबाईल वेदांगीला देते, आन्विका गाडी चालवते.

                                      Cut to..

…. ….. …… …… ….. ………

 Morning. /. Day / outer. On road

Action:

अन्विका ड्रायव्हिंग सुरू करते. थोड्या अंतरानंतर, वेदांगीला नाराज पाहून 

                     Dialog

       आण्विका :

 काय झालंय तोंड पाडून बसायला.

          वेदांगी :

(नाराज चेहऱ्याने)

 काय नाही, उगाच तुझा मुड जायला नको.

          आण्विका :

 सांग तरी काय झालय ते. पेपर गेलेत ना नीट.

            वेदांगी :

 पेपरच काय नाही ग, गेलेत सोपे, पण इथं वेगळच वादळ घोंगावतय.

         आण्विका :

 कसलं वादळ, सांग तर, व कोड्यात बोलायचं सोड स्पष्ट बोल

          वेदांगी :

 लग्न जमवतायत घरी.

       आण्विका :

       कुणाचं ,

         वेदांगी :

 कुणाचं म्हणजे ?...माझं आणखी कुणाचं.

          आण्विका :

 मग छान आहे की लग्न कर अन् बस सुखान संसार करत.

         वेदांगी :

 तुला तर नेहमीच चेष्टा सुचतेय नाही.

         आण्विका :

 अग, तस नाही थोडी गंमत केली.

           वेदांगी :

 तुला काय गंमत करायला.

        आण्विका :

 तुझ्या घरच्यांना कसली घाई झालीय गं. इंटरशिप तरी होऊ द्या म्हणावं.

           वेदांगी :

इंटरशीप वगैरे काही नाही. आधी लग्न कर म्हणतात.

          आण्विका :

 कोण म्हणतंय आई की बाबा.

          वेदांगी :

       आणखी कोण? ..बाबा

          आण्विका :

 तुझ्या बाबाला कसली घाई झालीय. सदान कदा घाईतच असतात. तुझी आई कशी नांदत असेल देव जाणे.

 बर ते सोड अचानक कसं काय ठरवतायेत.

          वेदांगी :

 कालपर्यंत वातावरण ठीक होत. काल कामावरून आल्यापासून चाललय.

कालपासून कसल्यातरी टेन्शन मध्ये आहेत.

        आण्विका :

काल काय झालं एवढं, डायरेक्ट लग्नावर आल्यात.

        वेदांगी :

 अग ती तन्वी आहे ना.

         आण्विका :

ए बाई थांबवं तुझ तन्वी पुराण. कंटाळा आलाय ते सारखं ऐकूण.

तुझे बाबा नेहमी तिचेच गोडवे गात असतात.

काय तर म्हणे, तन्वी लवकर उठते, डब्बा करते, कॉलेजला जाते, पोळ्या करते. वगैरे वगैरे, विट आलाय नुसता सारखं तेच तन्वी पुराण ऐकूण.

वेदांगी : 

(आश्चर्य भाव)

 अग, ते पूराण सोड, महाभारत घडलय, ऐकल्यावर हसशील.

        आण्विका :

 काय झालंय आणखीन.

           वेदांगी,

अग त्या तन्वीला पृथ्वीराज घोड्यावर बसवून घेऊन गेला ना!

       आण्विका :

 काय म्हणतेस, तन्वी गेली पळून

                                    Cut to…..

……. …… …….. .......

Day /Outer /Morning /On road and on pool

Action:

त्या पंचगंगा पुलावर पोहोचतात जिथे त्यांचे मित्र त्यांची वाट पाहत आहेत.

     Dialog

             सात्विक :

 त्या बघ आल्या त्या

  Action :

त्या येताच

        एकजण :

 काय हे? किती उशीर....

          आण्विका :

अरे बाबा, काय सांगू तुला वेदीच्या घरी जाऊन तिला घेऊन यायचं म्हणजे

           सात्विक :

 ते आपण नंतर बोलू, चल बाकीचे पुढे गेलेत. उगाच आणखी वेळ नको.

        आण्विका :

        चला तर मग 

Action :

ते सर्वजण निघतात.

                                Cut to……

….. ….. ….. ….. …. ….

                              Continue…..


Thursday, August 18, 2022

अक्रोडाचे झाड

 अक्रोडाचे झाड


एका शेतकऱ्याने आपल्या अंगणात अक्रोडाचे झाड लावले होते. कारण तेथील माती व हवामान त्यासाठी उपयुक्त होती. त्याची मुले तेव्हा लहान होती. मुले जशी मोठी होत गेली तसं ते झाड ही मोठं झाल.

त्याला लागणारी चित्र विचित्र फळ त्या मुलांना आवडत नसतं. ते वडिलांना म्हणत ही अशी कशी ही फळे चित्र विचित्र. गोडसर पण नाहीत. त्यापेक्षा हे झाड तोडलेल बर.

तेव्हा वडील म्हणाले तुम्हाला आज नाही या झाडाचं महत्त्व कळणार. प्रतिकूल वेळ आल्यावर समजेल.

कालांतराने त्या प्रदेशात दुष्काळ पडला. घरातील सर्व धान्य संपलं.

तेथे पिण्यापूरते पाणी मिळू लागलं.शेतकरी आपण पित्याल्या पाण्यातील थोडे पाणी त्या झाडाला घालू लागला.

त्या थोड्याशा पाण्यावर ते झाड तग धरून आपली फळे देऊ लागले.

सुरवातीस बेचव वाटणारी ती फळे आज उपाशी पोटी खाताना त्या मुलांना रुचकर लागू लागली.

तात्पर्य : कोणत्याही वस्तूला वेळ यावी लागते तेव्हाच त्या वस्तूचे महत्त्व समजते.


Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...