Wednesday, April 16, 2025

Kalat n kalat julale he bandh script bhag 27,28,29

  कळत नकळत जुळले हे बंध भाग २७,2८,२९

Day / Outer /Afternoon / 2.00 o’clock.

Action :

डॉ. श्वेता व अण्विका या मार्केटमध्ये खरेदी करत असतात. त्यावेळी ईशान सुट्टीचा दिवस असल्याने घरचे काही साहित्य भरण्यासाठी तिथे आलेला असतो. आण्विकेला तिथे पाहतो. व डॉक्टर मॅडम सोबत असल्याचे त्याला दिसते.

ईशान जवळ जातो.

Dialog :

ईशान :

नमस्कार डॉक्टर मॅडम.

डॉक्टर श्वेता :

 अरे ईशान सर, कसे आहात. आज सुट्टी का?

ईशान :

 हो. खरेदी जोरात चाललेय.

डॉ, श्वेता :

हो थोडे पाहुणे येणार आहेत. त्यामुळे घरात लागणारे रोजचे साहित्य घेते.

बर तुझी ओळख करून देते. हा या नवीन डॉक्टर आहेत. इंटरशिप साठी जॉईन झाल्यात कोल्हापूरच्या आहेत. अन् बर का मॅडम हे ईशान सर. फॉरेस्ट खात्यात असतात.

ईशान :

 माहित आहे यांच्याबद्दल.

 (तो रागाने अन्विकेकडे पाहतो.)

ईशान :

 बर मॅडम येतो.

( असे सांगून तो जाताना मॅडम साहित्य घेताना पाहून अन्विकाकडे पुन्हा नजर टाकतो. व आपले बिल भरून डोळ्यावर गॉगल लावतो. निघून बाहेर पडतो.

आण्विका त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागते. ईशान बाहेर पडतो व आपली गाडी स्टार्ट करतो. त्याला इतकं चिडलेल तिने पहिल्यांदाच पाहिलं होत. तिला खूप वाईट वाटत होत.)

 मॅडम :

( साहित्यावरील नजर आण्विकाकडे टाकत.)

हा डॉ. आण्विका म्याम बघा साहित्य नीट आहे का?

(आण्विका भानावर येते. व साहित्य पाहू लागते.)

आण्विका :

हा पहाते.

Cut. To ……

……. ……. ……. …….. ……..

Day /Evening/ Inter /4.00 o’ clock

Action :

ईशान आपल्या रूमवर आल्यावर रागाने आपल्या शासकीय निवासस्थानी आल्यावर गाडी पार्क करतो. व रागाने साहित्य आपल्या आतील टेबलवर ठेवतो. व लगेच फोन स्वप्नीलला करतो.

स्वप्नील फोन उचलतो.

स्वप्नील :

हा बोल ईशान,

ईशान :

 काय बोलू, तू सगळ नीट करतो म्हणालास. अन् तिकडे पळालास.

स्वप्नील :

 काय झालं एवढ चिडलायस का?

ईशान :

 मॅडम इकडे राधानगरीला आलेत. इथे इंटरशिप करताहेत.

स्वप्नील :

 मग भारीच आहे की. कधी जॉईन झाली. मला माहित पण नाही.

ईशान :

 छान म्हणजे घरातील माणूस कुठे आहे. याची जराही कल्पना नाही म्हण की. उद्या लग्न करेल कुणाशी व मग म्हणशील मला कळलेच नाही काय.

स्वप्नील :

 अरे, खरंच नाही माहित. पण जरा ऐक चिडू नकोस. अरे उलट बरच आहे की. ती तिथे आहे. भेटशील की तिला. फ्री मध्ये

ईशान :

 अरे मला साधं कळवाव देखील वाटल नाही का? अस का करतेय ती? की मला टाळतेय?

स्वप्नील :

 हे बघ बघतो मी. होईल नीट, खूपच ताणलेय हे.

ईशान :

 मला काही सुचेनासे झालंय. काहीतरी कर. मघाशी तिला पहिल्यापासून वेड लागायची पाळी आलेय.

स्वप्नील :

 ठीक आहे बघतो काहीतरी. लई टेंशन घेऊ नकोस.

ईशान :

 नको, आतापर्यंत तुझ्याच भरोषावर होतो. आता नाही राहणार. मीच बघतो.

( ईशान फोन ठेवतो.)

Cut to ….

…… …… ….. …

Night / Dr. Vaghvekar Home. Inter /Daining Table

Action :

 डॉ. वाघवेकर यांची पत्नी जेवण वाढत असते.

Dialog :

डॉ. वाघवेकर यांचे वडील :

 वा.. मस्त झालेय जेवण. कोणी बनवले?

श्वेता डॉक्टर :

मी व डॉक्टर अण्विका मॅडमनी.

वडील :

 मस्त जादू आहे हातात.

श्वेता :

 आवडल.

वडील :

 हो. कुठे आहेत त्या.

श्वेता डॉक्टर :

 त्या होय. गेल्या मघाशी.

सासू :

 अग, जेवायला थांबवायचं नाही.

श्वेता :

 किती विनंत्या केल्या. ऐकायलाच तयार नाहीत. शेवटी डबा दिला.

डॉ. वाघवेकर :

अग, जाऊ द्यायचं नाहीस तस.

श्वेता वाघवेकर् :

 काही नाही. ती जरा डोके दुखतेय म्हणाली. व विश्रांती हवीय. म्हणून. व सारं आटपून निघाली होती. मी मग जबरदस्ती डबा भरून दिला.

व त्या गेल्या.

Cut to…..

……. …….. ……, …….

Night / Inter/ 9.00, o’ clock

Action :

आण्विका जेवण करते. जेवतेवेळी

 तिचे लक्ष लागत नव्हते. ती आपले कसेबसे आटपते. व आपल्या अंथरुणावर झोपायला जाते.

अंथरुणावर पडल्यावर तिच्या मनात अनेक प्रश्न उमटतात.

Dialog :

आण्विका :

माझं काही चुकतय का?.. की मी उगाच टाळतेय त्याला? …की रुसलेय… काय करू? तो चिडला तर नसेल ना?

(आण्विका रेवाला फोन लावते.)

रेवती :

 हा बोला मॅडम.

आण्विका :

 झोपलीस काय?

रेवती :

 नाही अजुन,… थोड काम आहे. लिखाणाचं …ते करतेय. का ग.

आण्विका :

 काय सांगू

(फक्त ओठ हलतात. नो oc)

( असे म्हणून ती सर्व हकीकत सांगते. तिचे बोलणे झाल्यावर)

रेवती :

अग, त्याने कित्येक मेसेज केले. तू त्याला रिप्लाय दिला नाहीस. लग्नात पण वेदीच्या काही जास्त बोलचाल केली नाहीस. वरती रुसून बसलीस तूच. मग काय ठरवलेस तू, की दुसर स्थळ बघुया?

आण्विका :

 माझं मलाच कळत नाही. काय करावे ते. त्याला एकदा पण माझं प्रेम दिसत नाही. काय झालंय प्रपोज करायला?

रेवती :

 अग, सगळी माणसं तशी नसतात. मग तुला काय झालंय विचारायला. तो सरळ चांगला मुलगा. उगाच तू जास्त ताणू नकोस. आता बघ एक दिवस भेटून काय म्हणतो ते.

आण्विका :

 स्वारी जास्तच चिडलेय.

रेवती :

मग काढ की समजूत.

आण्विका :

हा 

(ती फोन ठेवते. लाईट ऑफ होते.)

Cut to ……

……. …….. ……

२८ कळत न कळत जुळले हे बंध

Day /Morning/ Outer / Radhanagari

Action :

सकाळी आपले आवरून अण्विका हॉस्पिटलला निघालेली असते. तेव्हा तिला ईशान बाईक घेऊन निघालेला दिसतो. त्याच्या बाईक वर एक मुलगी असते. आण्विका त्यांना जाताना पाहते. व चिडते.

आण्विका :

 (मनात)

काय वाटतं नसेल याला. इकडे मी याने प्रपोज करावे म्हणून झुरतेय. व हा कुशाल मुलींना गाडीवर घेऊन फिरतोय.

(ती तशीच हॉस्पिटलला जाते.)

Cut to …..

….. ….. …..

Day/ Afternoon / outer

Action :

  आपली ड्युटी करून आण्विका विश्रांतीसाठी आपल्या विश्रांती रुमकडे निघालेली असते. इतक्यात ईशान आपली बाईक घेऊन येतो. व तडक तो गाडी पार्क करून हॉस्पिटल मध्ये येतो.)

(आण्विका विश्रांतीरुमकडे निघालेली असते.

तो पाठीमागुन येतो.)

Dialog :

ईशान :

 नमस्कार डॉ. मॅडम.

( ती मागे वळते. ईशान असतो.)

आण्विका :

 बोला काय हवंय?

ईशान :

 तुझा मोकळा वेळ.

आण्विका :

 आता नाही, मी बिझी आहे.

ईशान :

 संध्याकाळी तरी, ड्युटी संपल्यावर.

आण्विका:

 कशाला, काय काम आहे?

ईशान :

 काम असल्यावरच भेटाव का?

आण्विका :

तुम्ही काय हिरो, रोज एका मुलीला बाईक वरून फिरवता. लग्नात तर कित्येक ललना तुमच्या मागे लागलेल्या असतात. तुम्ही तर कृष्णाचेच अवतार. माझ्यासारख्या सामान्य डॉक्टरकडे काय काम असणार.

ईशान :

मी कुठल्या मुलींना घेऊन फिरत ही नाही. अन् लग्नात नटून आलेलो. होतो ते फक्त एकाच व्यक्तीसाठी.

आण्विका :

 हो का?

ईशान :

 बर राग सोडा मॅडम , आज जाऊया का जेवायला संध्याकाळी.

आण्विका :

चालेल, पण ड्युटी.

ईशान :

उगाच काही सांगू नको. मी चौकशी केली आहे. संध्याकाळी तू फ्री आहेस.

आण्विका :

बर, ठीक आहे जाऊया.

ईशान :

 किती वाजता येवू इथे.

आण्विका :

 इथे नको. तू रूमवर ये. हा घे पत्ता.

ईशान :

संध्याकाळी ७.३० वाजता.

आण्विका :

 ठीक आहे.

(तो निघून जातो. आण्विका आपल्या विश्रांती कक्षात येते.)

Cut to …..

…. …… …… …….

Night /Inter/ 7.30 p.m./ Radhanagri Citi /Anvika cautar

Action : 1)

संध्याकाळी अण्विका आपल्या रूमवर येते. मस्त आपले आवरते. छान ड्रेस घालते. व आपला थोडा श्रृंगार करते आहे .

Cut to 

2) Action :

 Night/Ishan Government cautar Room /Inter / Outer

ईशान ही आपले आवरून छान ड्रेस घालून त्यावर परफ्यूम मारून आपली बाईक घेऊन अण्विकाच्या रूमवर येतो. बाहेर गाडी उभा करतो.

व अण्विकेला आपल्या मोबाईल वरुन कॉल करतो.

आण्विका फोन उचलते.

ईशान :

काय आवरलं की नाही. बाहेर आलोय मी.

आण्विका :

थांब आलेच.

(आण्विका आपले आवरते. व बाहेर येते. आपल्या रुमला कुलूप लावून ती बाहेर येते. व ईशानच्या गाडीवर बसते. त्यांना जाताना वाटेत. डबा देणारी आजी भेटते.)

आण्विका :

जरा गाडी थांबावं,

ईशान, का?

आण्विका, त्या आजीना आज डबा नको म्हणून सांगते.

ईशान :

 ठीक आहे.

आण्विका :

 ओ …मावशी,

आजी :

 बोला मॅडम, काय कुठे दौरा वाटत.

आण्विका :

 हो. दौराच आहे. जरा बाहेर जातेय. जेवण करूनच येईन. आज नको डबा.

आजी :

 बर बर.

(ती निघतात.)

Cut to …..

……. …… ……

Night / Tempal Ariea / Outer

Action :

पुढे एका ठिकाणी तो एका शांत परिसरात तिला घेऊन येतो. जिथे आजूबाजूला कोणी नाही. व छान लाईट आहे. तिथे जवळ एक मंदिर आहे. त्या बाहेर प्रांगणात एका बाजूला बसायला बाक आहे. त्या बाकावर ती दोघे येवून बसतात.

Dialog :

(गाडी थांबवून)

आण्विका :

 गाडी का थांबवलीस

ईशान :

 चल थोडावेळ या मंदिरात घालवू

आण्विका :

 हा.

( ते तिथे जातात . दर्शन घेतात. मंदिरा बाहेर असणाऱ्या बागेत फिरत तो)

ईशान :

चल तिकडे बसू.

आण्विका :

 हा.

( ती दोघे त्या ठिकाणी बसतात.)

ईशान :

( मनात )

 कशी सुरवात करू ?

आण्विका :

 हा बोल.

ईशान :

मंदिर मस्त आहे ना.

आण्विका :

 हो आहे की.

ईशान :

 खूप जुने आहे.

आण्विका :

 हा.

ईशान :

 खूप मोठी यात्रा भरते इथे.

आण्विका :

हो काय? बर.

ईशान :

आ..

आण्विका :

 हे सांगायला इथे थांबलोय का आपण.

ईशान :

 नाही,मी तुझ्याशी काही तरी माझ्या मनातल बोलणार आहे.

आण्विका :

 बोल की.

ईशान :

अनु तू इथे आलीस. साधं कळवले पण नाहीस, मी इतका वाईट आहे का?

आण्विका :

 नाही तू वाईट नाहीस. मीच आहे थोडी हट्टी.

ईशान :

 तू माझ्यावर सारखी रागवतेस का?

आण्विका :

 तू साधं माझा कॉल घेत नाहीस. की रिप्लाय साधा देत नाहीस.मग काय करू. असशिल कुणाच्यातरी प्रेमात पडलेला. मी कशाला उगाच तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू.

ईशान :

 हे बघ माझ्या आयुष्यात अस कोण नाहीये. व लग्नाचं म्हणत असशील तर मला एक मुलगी आवडते. पण तिला मी आवडतो की नाही हे मला माहीत नाही.

आण्विका :

 विचारून बघ. तिला.

ईशान:

 ती जरा जास्तच शिकलेली आहे. व गोरी आहे मी सावळा तिला आवडेल की नाही कुणास ठावूक ?

आण्विका :

 तुझं तूच ठरवतो आहेस. विचारून बघ तरी.

ईशान :

 अन् ती नाही म्हणाली तर…

आण्विका :

 बोलून तरी बघ….

आण्विका :

(मनात)

बोल की साधं प्रेमाचा इजहार करायला एवढा वेळ. अनु बाई लई स्लो प्रेम तुमचं.

ईशान :

 अस म्हणतेस.

आण्विका :

 हो बघ विचारून.

एका तेथील झाडाचं फुल तोडून तिच्या समोर धरून.

ईशान :

 बर…. अनु तू मला आवडतेस. व

आय लव यू.

आण्विका :

 ( हसते)

काय रे, एवढे तीन शब्द बोलायला चार महिने घालवलेस तू.

ईशान :

 म्हणजे.

आण्विका :

 म्हणजे वाघाचे पंजे.

ईशान :

 म्हणजे मी तुला पसंत आहे.

आण्विका :

 हो. खरंच माजही तुझ्यावर प्रेम आहे.

ईशान :

( आनंदात)

अरे,… म्हणजे मी उगाच घाबरून होतो. खरंच अनु आय डोन्ट बिलिव्ह धीस.

आण्विका :

 हो, माझं ही तुझ्यावर प्रेम आहे.

तो आनंदाने तिला मिठी मारून उचलून धरतो.

(ते खूप गप्पा मारतात.)

ईशान :

 (घड्याळात बघत )

चल खूप वेळ होतोय. जेवायला जाऊ.

आण्विका :

 अस वाटतंय की असच बोलत बसावं.

ईशान :

मॅडम रात्र खूप होतेय. चला नाहीतर उपाशी झोपाव लागेल.

आण्विका :

 काय हे थांबलो असतो ना आणखीन.

ईशान :

हो, पण आधी थोडी पेटपुजा करूया.

(ती बाईक वर बसून निघतात.)

Cut to …..

…… ……. ……. ……

Night / 10.00 o’clock. Hotel Radhanagari citi /outer – Inter

 Action :

ते हॉटेलमध्ये जातात.

Dialog :

ईशान :

 बोल काय खाणार?

आण्विका :

तूच सांग तुझ्या आवडीच.

(ईशान मेनू कार्ड पाहू लागतो. इतक्यात वेटर येतो.)

वेटर :

बोला सर, काय ऑर्डर आहे.

ईशान :

 हे बघ नॉनव्हेज मटण करी थाळी दोन दे.

( वेटर ऑर्डर घेऊन निघून जातो.)

ईशान :

 बर आणखी काय हवय डॉ. मॅडम.

आण्विका :

 मॅडम कशाला म्हणतोस. अनु म्हणत जा. ते दवाखान्यात असल्यासारखं वाटत.

ईशान :

 बर, अनु. …अनु ,सांग कशी आहे आमची राधानगरी.

आण्विका :

मस्त आहे. एकदम थंडगार.

ईशान :

हो आहेच कोल्हापूरच हिलस्टेशन. व शीतगृह सुद्धा.

(इतक्यात जेवण येते. जेवत.)

आण्विका :

शीतगृह म्हणजे.

ईशान :

हे बघ कोल्हापुरात काम करून त्रासलेले लोक, जे जास्त गरम होतात. त्यांना थंड करण्यासाठी .

आण्विका :

 हो का, मग तू ही कोल्हापुरातीलच आहेस. माहित आहे ना.

ईशान :

 हो.

ईशान :

 तुझ माझ्यावर खरच प्रेम आहे ना.

आण्विका :

 हो. का.

ईशान :

नाही विचारलं. सहज.

आण्विका :

त्यासाठी काय परीक्षा वगैरे घेणार आहेस का?

ईशान :

 नाही. तुला सांगू, आज माझ्या जीवनातील अत्यंत लकी दिवस आहे.

आण्विका :

 हो का.

ईशान :

तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केलेला दिवस.

आण्विका :

 उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस.

ईशान :

 नाही खरंच. मला तू शाळेत असल्यापासूनच आवडत होतीस.

आण्विका :

 हो म्हणूनच फुटबॉल मारला होतास का?

ईशान :

ते चुकून झालं होत. खर सांगायचं म्हणजे तुझ्यापेक्षा मी भरपूर दुःखी होतो. त्यावेळी.त्या प्रसंगाने आपण दुरावलो.

आण्विका :

 हो.

Cut to ….

…….

Night / Hotel inter

 तिथे काही कॉलेजच्या मुली जेवणासाठी आलेल्या असतात. ज्या कृषी विभागा तर्फे सर्वे करायला आलेल्या असतात.

त्या जेवण करून निघालेल्या असतात. त्यातील

 ज्योती :

एखदासा झाला बाई प्रोजेक्ट पूर्ण.

श्याल्मली :

 हो तर त्या फॉरेस्ट खात्यातील सरांनी मदत केली म्हणून बर.

वैशाली :

 अग, ते बघ, तेच सर ना.

ज्योती :

अग ,हो तेच की ईशान सर.

मयुरी :

 अग त्यासोबत कोणतरी आहे.

श्याल्मली :

 अग मघाशी त्याच्याशी बोलण जास्त झालं नाही. फोटो पण घेतला नाही.

वैशाली :

अग, मग बघताय काय चला.

(त्या ईशान व अण्विका जवळ येतात.)

ज्योती :

अहो, ईशान सर तुम्ही. पुन्हा भेटून आनंद झाला.

ईशान :

तुम्ही इकडे.

ज्योती :

प्रोजेक्ट पूर्ण झाला म्हणून छोटीशी पार्टी करत होतो.

ईशान :

 हा.

वैशाली :

 सर तुमच्या मुळेच आमचा प्रोजेक्ट पूर्ण झाला.

श्याल्मली :

 तुम्ही छान औषधी दुर्मिळ वनस्पतीची माहिती आम्हाला दिली.

मयुरी :

 सर एक छानसा सेल्फी घेऊया.

ईशान :

 हा का नाही.

(ईशान त्यांच्या सोबत शेल्फी घेतो.)

 मुली :

बाय सर

(त्या बाय करून निघतात. अनु चिडलेली असते. ती जेवण आटोपते व बाहेर येते. ईशान बिल पेड करून आपल्या गाडीजवळ येतो.)

(अनु रागावून आल्याचे जाणवते.)

ईशान :

काय झालं.

आण्विका :

( रागाने )

त्यांसोबत शेल्फ काढायला वेळ मिळतो, माझ्यासोबत साधा फोटो शेअर करायला वेळ नाही मिळत. साधा फोन रिसिव्ह करत नाहीस

ईशान :

 अग , मेसेज पाठवतो की मी.

आण्विका :

हो का, काय ते मेसेज तेच तेच मेसेज वाचून विट आलाय नुसता. अभयारण्य एक सहल, या राधानगरीत एकदा, आणखी काय तर हा, हा पाहा रम्य धबधबा.

तुला दुसर काही येत नाही का? तेच तेच मेसेज .

ईशान :

अग छान आहेत, म्हणून पाठवतो. जंगल प्राणी वगैरे.

आण्विका :

 तू अन् तुझे प्राणी ठेव बाजूला. मी कधी तुला एवढी डॉक्टर आहे म्हणून कधी टॅबलेटचे व औषधांचे फोटो पाठवले का?

एखादी मुलगी आपले मॅसेज वाचणार म्हटल तर काहीतरी अस प्रफुल्लित काहीतरी प्रेमाचं वगैरे पाठवायचे. का ते माकडांचे फोटो, गव्याचे फोटो.

ईशान :

 अग एवढं तापायला काय झालं.

आण्विका :

तापू नाहीतर काय करू. माझ्या सोबत एक फोटो तरी आहे का. त्या कोकणात देखील तसच.

ईशान :

 हे बघ शांत हो. इथून पुढे फक्त तुझ्या बरोबरच फोटो घेईन म्हणजे झालं. अन् वाटलाच फोटो काढायचा तर तुला विचारल्या शिवाय काढत नाही. म्हणजे तर झालं.

आण्विका :

 हा …. असच झालं पाहिजे.

ईशान :

 बर, खूप वेळ होतोय. निघुया का?

आण्विका :

 हा चला.

( ते निघतात.)

( त्याच वेळी घोंगडी घेऊन काही तस्कर जेवायला तिथे आलेले असतात. त्यांना ईशान अण्विका सोबत निघताना दिसतो.)

त्यातील एकजण :

हा फॉरेस्ट ऑफिसर ना.

दुसरा :

 हो.

पहिला :

 लक्ष ठेवा.

दुसरा :

जी .

पहिला :

 चला आता,

( ते जेवायला. जातात.)

Cut to …..

….. ….. …… …..

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग २९

Day/ outer/

Action :

ईशान व अण्विका वारंवार भेटत असतं. कधी ते काळम्मावाडी धरण फिरायला जात. तर कधी सनसेट पॉइंट, कधी राधानगरी ड्याम तर कधी बाहेर शांत परिसरात ते फिरायला जात असत.

Cut to …..

….. …… …… …..

Day / Inter / Radhanagari Forest village

Action :

राधानगरी अभयारण्य परिसरातील एक गाव तेथील एका वस्तीवर असणाऱ्या एका घरात. जोत्यावर एका कोपऱ्यात एक शेकोटी पेटवली आहे. तिथे घोंगडी खांद्यावर टाकून चारजण बसले आहेत.

Dialog :

सदा :

 अताचा ऑफिसर लईच द्वांण्ड आहे. सारखी गरुडासारखी नजर असती त्याची.

भिवा :

 कुठून येतो अन् धाड टाकतो हे देखील कळत नाही बघ. सगळीच पंचाईत करून ठेवलीय.

तुकाराम :

 याच कायतरी केलं पाहिजे? नाही नपत केला तर.

किशा :

 तेला नाही नपत करायचो. अन् तुरुंगात जायचो आपण. अन् ही मागली पोर कुणी पोसायची.

सदा :

त्याला धडा तर शिकवलाच पाहिजे.

तुका :

 ते पण हाय. साप मारावा ; पण काठी देखील तुटता कामा नये.

किशा :

बाहेरून कोणतरी आणायला पाहिजे.

सदा :

 कळम्या जीवाला बोलवूया काय.

तुका :

ही आईड्या चांगली हाय.

किशा :

 कळम्या जीवाला बोलावून आण.

कीशा :

जी जातो की आताच आणतो.

सदा :

 थांब ,

(सदा आत् जातो व काही रक्कम फडक्यात बांधून आणतो.ती किशाकडे फेकतो. तो झेलून घेऊन तो निघतो.)

Cut to …..

…… …… …… …..

Day/Outer/Karnatak state west Forest area

Action :

किशा गावातील एका लांब बाजूला असणाऱ्या घरात जातो. तिथे एक स्त्री भाकरी थापत असते. किशा तिथे जातो.

किशा :

जीवादा अरे जीवादा.

(आतून भाकरी थापत.)

कळम्या जीवाची बायको :

 कोण हाय ते?

किशा :

 म्या हाय. दाजीपूरकडला किशाप्पा. मला सदा दादानं पाठवलं हाय.

कळम्या जीवाची बायको :

 या आत.

(किशा आत येतो. ती गूळ पाणी देते. तिथे जवळच पोर गोट्यानी खेळत असतात.)

कळम्याची बायको :

 ये पांड्या जा तुझ्या बाला बोलावून आन जा.

(तो मुलगा बाहेर पळत जात.)

Cut to…..

….. …… ……

Day / outer / village /Inter

Action :

 तो मुलगा हातातील खेळ टाकून पळत गल्लीतून जातो. पुढे गावाबाहेर रानात वाटेने पळत. एका ठिकाणी येतो. जिथे त्याचा बाप कळम्या जीवा लाकडे फोडत असतो. काळसावळा, दिसायला रांगडा. हातात कड.

मुलगा :

अण्णा….. अण्णा…..

कळम्या जीवा :

काय र,…. काय झालय?

पोरग :

कोण आलंय घरला. बा,.. तुला बोलावलंय. आईनं.

(तो काम ठेवून लागलीच निघतो.)

Cut to …..

…… …… ….. …..

Day / outer / village house

Action :

गावातून कळम्या जीवा खांद्यावर कुराड टाकून चालतं घराजवळ येतो. घरा बाहेर आल्यावर, तो किशाला पाहून सगळे ओळखतो. डोळ्यांनी इशारा करतो.

बाहेरील मोरीत आपले हातपाय धुतो . त्याची बायको टॉवेल देते.

कळम्या जीवा :

( हात पाय पुसत)

तो जेवायला वाढ.

Cut to ……

…. ….. .

Day /Inter / house kichan Room

Action :

कळम्या जीवा व कुशा दोघे जेवायला बसतात. त्यांच्या ताटात भाकरी, कांदा, ठेचा व पिठले असते. ते जेवत.

कळम्या जीवा :

 काय काम काढलं?

किशा :

 एक माणूस हाय. त्याचा काटा काढायचा आहे.

कळम्या जीवा :

कोण आहे?

किशा :

 फारिस्ट खात्यात हाय. मागली खेप त्यानेच पकडली. लई डोईजड झालाय.

कळम्या जीवा :

जोखमीचे काम हाय. व तो तर सरकारी अधिकारी. जायबंदी करीन, जास्त तर. पण मला रक्कम पण मोठी हवी.

किशा :

 केवढी द्यावी लागेल?

कळम्या जीवा :

 तीन लाख घेईन.

किशा :

 घे हा सस्कार,…. पन्नास हजार.

कळम्या जीवा :

 हा.

(आपल्या बायकोला इशारा करतो. ती ते पैसे घेते.)

 किशा :

 मग चलायचं ना.

कळम्या जीवा :

 थांब आवरतो.

कळम्या जीवा :

(आपल्या बायकोस)

तेवढी लाकड शिरपा कडून फोडून घे. येतो मी.

(ती निघतात.)

Cut to ……

….. ….. ….. …..

Day/ Radhanagri Forest area / outer

Action :

अभयारण्य परिसरातील. एक घनदाट अरण्य भाग तिथे काही तस्कर एकत्र बसले आहेत.

किशा व कळम्या जीवा तिथे येत असतात.

थोड्याच वेळात ते निश्चित स्थळी पोहोचतात.

तुकाराम त्यांना पाहून इशारा करतो. मोठ्याने पक्षाचा आवाज काढून इशारा करतो.

Dialog :

सदा:

 (मागे वळून हसतो)

 या या तुमचीच वाट बघत व्हताव.

कळम्या जीवा :

 खूप दिवसांनी आठवण काढली.

सदा :

 काय सांगू. आजकाल सगळ काम ठप्प हाय. हा नवीन ऑफिसर आल्यापासून कुठलच होईना झालंय. त्याचा तेवढा बंदोबस्त करायला हवा.

कळम्या जीवा :

मी आलोय ना बघू. पण रक्कम पण मोठी हवी.

सदा :

 मिळेल पण आमचं काम केल्यावर.

कळम्या जीव :

 बर त्याविषयी काही माहिती.

(सदा इशारा करतो. तुका लगेच फोटो आणून देतो. तो कळम्या जीवाला दाखवतात.)

( कळम्या जीवा फोटो पाहतो.)

तुका :

 होईल ना नीट.

कळम्या जीवा :

 ते तुम्ही सोडा माझ्यावर.

याच्या येण्याजाण्याची माहिती मिळेल काय.

तुका :

 ती सगळी किशा सांगील. व एक मात्र, … काही झालं तरी या कानाच त्या कानाला कळता कामा नये.

कळम्या जीवा :

 हा.

Cut to ….. …..

…… …… ……. …….

Day / Evening/ Outer Radhanagari Forest area

Action :

ईशान आपल्या रेंजर्सना घेऊन अरण्यातील आपल्या रपेटीसाठी निघालेला असतो. त्याची गाडी अरण्यातील दूरच्या भागातून जाताना अचानक गाडीवर एक ओंडका वरून येवून पडतो. व बाजूने चार पाच लोग तोंडाला कालिक लावून आलेले त्यांवर हल्ला करतात. ईशान व रेंजर्स त्यांच्याशी दोन हात करत असतात. पण रेंजर्स जखमी होतात. ईशान बऱ्याच गुंडांशी सामना करतो. कळम्या जीवा व त्याची खूप वेळ मारामारी चालू असते. दोघेही ऐकत नसतात. कळम्याचा चाकू ईशानच्या हाताला लागतो. ईशान तरीदेखील त्यास जखमी करतो. व बुकलून काढतो. शेवटी एकजण इशार्याची खून करतो. कळम्या व सहकारी पळून जातात. एक रेंजर्स गाडी आणतो. ईशान जखमी अवस्थेत आपल्या इतर सहकाऱ्यांना घेऊन निघतो.

Cut to …….

…… …… ….. ….

Evening/ outer / Forest

कळम्या व त्याचे सहकरी एके ठिकाणी धावत येतात. त्यांना धाप लागलेली असते.

Dialog :

कळम्या :

 (आपल्या सहकाऱ्यांना)

गडी पावरीचा हाय. निघायला हवं.

एकजण :

 आपल्या पैशाचं काय..

कळम्या :

 जीव वाचला तर मिळतील नंतर. पळा आता. आपण जंगलवाटेन सटकायच आपल्या भागात.

दुसरा :

चला रे.

(ते निघतात.)

Cut to …..

……………. …….. …….

Evening/ day/ outer - inter Radhanagari Hospital

Action :

रेंजर्स व काही लोक तातडीने ईशानला हॉस्पीटलमध्ये घेऊन येतात.

एक रेंजर्स :

 डॉक्टर डॉक्टर.

नर्स :

 डॉक्टर बाहेर गेलेत. थांबा.त्यांना ऑपरेशन थेटरकडे न्या.

(नर्स डॉक्टरना फोन लावते.)

नर्स :

 डॉक्टर इमर्जेंशी आहे.

डॉक्टर :

 काय झालंय एनी सिरियस.

नर्स :

 आपल्याकडील एक वन ऑफिसर जखमी होऊन आलेत. त्यांच्या हातावर वार झालेला आहे.

डॉक्टर :

 मी निघतोय, थोडा वेळ लागेल. तरी अण्विका व इतर डॉक्टरांना तोपर्यंत हताळाय सांगा

(नर्स लगेच अडमिट करून घेते.व दुसऱ्या नर्सला)

नर्स :

 अण्विका मॅडम ना बोलव.

(ती नर्स जाते.)

Cut to …..

…… ….. ……

Night /Hospital / Inter

Action :

आण्विका चहा घेत असते. इतक्यात एक नर्स तिथे येत.

नर्स :

 मॅडम इमर्जंशी.

(चहाचा ग्लास तिथेच ठेवत ती वेगाने ऑपरेशन रुमकडे जाते.

Cut to …..

….. …… ….

Night / Inter / operation Room

Action :

 ईशानला जखमी अवस्थेत तिथे असतो. त्याच्या हाताला लागलेलं असतं. त्याला पाहून.

आण्विका :

(काळजीने)

 ईशान

 ( आण्विका  आपल्या भावना आवरते. व ईशानला अडमीट करून घेते. तिचे सहकारी डॉक्टर रक्त पाहून गोंधळून जातात. पण अण्विका धिटाई दाखवत त्यावर उपचार करते. वेगाने कार्यवाही करून ती त्यास वाचवते. तो बेशुद्ध असतो. त्याला शुद्ध येईपर्यंत ती रात्रभर जागी असते.

Cut to ……

……. …….. ………. …..


No comments:

Post a Comment

Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६

  Kalat n kalat julale he bandh script bhag २४,२५,२६ कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४ Day/ outer - inter /Myarej holl kolhapur Action : ईशान...