Friday, January 17, 2025

Kalat n kalat julale he bandh bhag ३

 Kalat n kalat julale he bandh bhag ३

क्रमशः 

Continue…….

After four days….

Action in past :

Day / Schools road / Morning /Outer

Action :

अन्विकाचा हात पट्टीमध्ये गुंडाळलेला आहे. अन्विकाचे दप्तर वेदांगीच्या हातात आहे. ईशान कॉलेजच्या रस्त्यावर कोपर्यावर   उभा आहे. तो वेळोवेळी तिच्याकडे   तिरकस नजरेने  पहात आहे. आणि तो तिच्या मागे चालत आहे.

थोड्या वेळात, तो एका झाडाखाली येतो आणि जवळ येतो. 

                   Dialog

         ईशान :

माफ करा मला, मला माहित नव्हत, चुकून बॉल लागला. त्याबद्दल सॉरी.

Action : 

( वेदांगी त्याकडे पाहून,)

                      Dialog

                      वेदांगी :

माफी मागितली म्हणजे झाली का? एवढं कळत नाही. कॉलेज रोडवर किती रहदारी असते ते.

           ईशान :

खरंच सॉरी ...प्लिज माफ कर मला.

Action :

संयोगीता त्याच्याकडे पाहते आणि तिच्या तोंडावर बोट ठेवून शांत रहा, म्हणते.  व जाण्याचा इशारा करते.त्या पुढे जातात. तो पहात राहतो.

Cut to 

…. ….. ….. ….

Day / Ishaan home / evening inter

Action :

   ईशान घराच्या खिडकीत अस्वस्थपणे  बसलेला आहे . ईशानची आई आत काहीतरी काम करत आहे  

                Dialog

        ईशानची आई :

 ईशान चल लवकर नाष्टा करून घे.

Action :

ईशानचे लक्ष नाही. त्याचे वडील सोफा सेटवर बसले आहेत. ते त्याला शांत पाहून त्याच्याकडे जातो.

                        Dialog

             बाबा :

काय झालं रे, असा शांत शांत का?खेळायला का गेला नाहीस.

         ईशान :

        काय नाही.

        बाबा :

हे बघ काहीतरी आहे. जे तू लपवतो आहेस. कारण तुला अस शांत बसलेलं मी पाहिलं नाही कधी. व चेहरा कधी खोटं बोलत नाही. सांग काय झालं ते?

       ईशान :

 चार दिवसा पूर्वी खेळताना मी बॉल मारला व तो एका मुलीला लागला.

           वडील :

 काही लागलं तर नाही ना.

         ईशान :

 त्या मुलीचा तोल गेला. व लागलं ही. मला खूप वाईट वाटत. तिच्या हाताला ब्यांडेज गुंडाळलेले बघून. बिचारी खूप रडत होती.

          बाबा :

आता कशी आहे ती. तिच्या घरी जावून विचारपूस करायला हवी.

           ईशान :

     आता कॉलेजला येतेय.

           बाबा :

 म्हणजे घाबरण्यासारख काही नाही.

           ईशान :

 पण तिचं औषध पाणी तरी मी करायला हवं.

         बाबा :

 एवढंच ना, आता अस कर. एक माफीपत्र लिही. व मिठाई व खर्चाचे पैसे दे तिला.

          ईशान :

           बर..

                                           Cut to……

…… ……. ……. …

Day / Ishaan home room / inter

ईशान त्याच्या खोलीत जातो. तो टेबलजवळ बसला आहे आणि त्यावर एक पत्र लिहायला लागतो. 

प्रिय…

                                  Cut to……

…. ….. ……

Next Day /morning. / Inter - outer sanyogita home

Action :

ईशान संयोगिताच्या घराबाहेर दाराजवळ उभा आहे. त्याच्या हातात एक चॉकलेट बॉक्स आणि एक पत्र आणि एक लहान लिफाफा आहे. तो घंटा वाजवतो.

संयोगिता दरवाजा उघडते. ईशानला पाहून.

                     Dialog

         संयोगिता :

 कोण ईशान. ये की रे आत.

          ईशान :

नको राहू दे, फक्त माझं एक काम होत.

          संयोगिता :

 काय रे काय काम होत एवढं.

  ईशान :

 एवढं अन्विकास दे, व सॉरी सांग.

Action :

त्याच्या हातात एक पत्र आहे. आणि त्याखाली चॉकलेटचा एक बॉक्स आहे आणि त्याखाली एक लखोटा आहे. त्यात पैसे आहेत.

                  Dialog

        संयोगिता :

       हे काय आहे?

         ईशान :

        माफीनामा,

        संयोगिता :

     आण इकडे देते मी.

          संयोगिता :

अरे , आत तरी ये. चहा घेऊन जा.

           ईशान :

 नाही नको, मी चहा घेत नाही.

          संयोगिता :

      अरे , दूध तरी घे.

              ईशान :

 नाही, नको झालंय माझं चहा पाणी.

          संयोगिता :

 मला माहित आहे. ये गप.

 Action :

ईशान आत येतो.  सोफसेटवर बसतो. व पत्र, बॉक्स व लखोटा तिच्या हातात देत.

                   Dialog

           संयोगिता :

 काय रे, माफी पत्रच आहे ना, की आणखी काही.

       ईशान :

 काय हे,.. तू पण चेष्टा करू लागली का?

        संयोगिता :

तरी पण मला वाटत त्यापेक्षा तूच दे,

          ईशान :

 नाही नको, ती वेदू लई वांड आहे.

        संयोगीता :

चेष्टा केली रे, देते मी.

 Action :

( ईशान चहा घेतो. आणि त्याने कप ठेवतो.ईशान उभा रहातो.)

                 Dialog

       ईशान :

 निघतो मी, तेवढं आठवणीन दे,

       संयोगिता :

       देते रे मी .

(ईशान निघतो. संयोगिता घराचा दरवाजा बंद करते.)

                              Cut to……..

…… ….. ….. …… …… …..

Day /Afternoon /At Anvika’s house / Outer – inter

Action :

संयोगिता अन्विकाच्या घरी जाते. अन्विकाची आई अंगणात कपडे उन्हात घालत आहे.     

(संयोगीता दार उघडते व आत जाते)

संयोगीता :

     काकू अनू आहे.

    आण्विकाची आई,

आहे की वरती गॅलरीत बसलेय.

Cut to...

Action :

( संयोगिता घरात जाते. आणि जिना चढताना वर जात,)

           Dialog

         संयोगिता

      अनु ये अनु

      (हाक देत)

( संयोगिताचा  आवाज ऐकूण,   अन्विका पायऱ्याकडे खाली पहात आहे)

आण्विका :

     कोण संयु, ये ना वरती.

            ( ती वर येते. )

      आण्विका :

             काय ग.

         ,

(हाताकडे पहात असताना, स्ट्यापिंग काढले गेले असल्याचे दिसते.)

संयोगीता :

       स्ट्यापिंग काढलं.

      आण्विका :

 हो ,

        संयोगिता :

        कधी काढलं?

       अण्विका :

    कालच संध्याकाळी काढलं.

            संयोगिता :

आता बर आहे ना, दुखत वगैरे नाही ना.

         आण्विका :

 थोडा थोडा दुखतोय. एक्सर साईज केली की होईल ठीक.

गोळ्या औषधे दिलेत आणखीन.

         संयोगिता :

बर थांब मी तुला कायतरी द्यायला आलेय.

        आण्विका :

        काय ग,

Action :

( संयोगीता चॉकलेट बॉक्स आणि पत्र आणि त्याच्या  खालील पाकीट देत.)

Dialog :

       आण्विका :

     काय ग काय हे.

        संयोगिता :

 बघ तर, मला पण माहीत नाही, उघड तरी बघू.

        आण्विका :

 हे काय तूच आणलस व तुलाच माहीत नाही, कायतरी काय.

         संयोगिता :

 अग बघ तर, मला पण सगळं माहीत नाही.

Action :

(आण्विका पत्र घेते व वाचू लागते.)

      Diylog :

प्रिय अन्वीकास,

               सप्रेम नमस्कार,

मी आपणा समोर दोन तीन वेळा माफी मागण्यास येण्याचा प्रयत्न केला.आपण कोणताही प्रतिसाद दिला नाही. माझ्यामुळे आपणास अपघात झाला. त्या बद्दल सॉरी. चुकून बॉल लागला. त्याबद्दल हे माफी पत्र मी देत आहे. व तुमच्या नुकसानीची भरपाईही देत आहे. खालील पाकिटात ५००० रुपये आहेत. ते आपण स्वीकार करावेत ही नम्र विनंती.

आपला नम्र

ईशान

Action :

( अन्विका, पत्र वाचल्यानंतर खाली पाकीट उघडते. त्यात  पैसे दिसतात. त्यात पैसे आहेत. खाली बॉक्स देखील उघडते. त्यात चॉकलेट आहेत. ती रागावली आहे. पण हसते  आणि संयोगिताकडे पहात.)

       आण्विका :

 तू पोस्टमन केव्हा पासून झालीस.

        संयोगिता :

       मी काय केलं.

      आण्विका :

     हे काय आहे.

        संयोगिता :

अग, त्याला तुझी माफी मागायची होती. एवढंच.

आण्विका :

 ही अशी, पैसे देवून,

 स्वतला काय समजतो हा,

या पैशाने मी सहन केलेल्या वेदना काही कमी होणार नाहीत

       संयोगिता :

 मग काय करायला हवे त्याने. स्वतचा हात मोडून घ्यावा काय? 

      आण्विका :

 मला तर खूप राग आलाय त्याचा.

         संयोगिता :

 मग कॉलर धर व चार लगाव त्याला. मग तर शांत होशील.

       आण्विका :

 तुझ्याशी बोलायलाच नको, मीच बघते आता त्याला.

                                      Cut to……

…… …… …… ………

Next day / Morning. /School ground / outer

Action :

 ईशान जमिनीवर फुटबॉलबरोबर खेळत आहे. त्याचा सराव चालू आहे. दरम्यान अन्विका तिथे येते.

ईशान  तिला  पाहून फुटबॉल खेळणे थांबवत .

                 Dialog

        अण्विका :

 काय रे तू स्वतःला काय समजतोस.

          ईशान :

       का काय झालं.

         आण्विका :

हे पैसे पाठवून श्रीमंतीची मिजास दाखवतोस का?

          ईशान :

तस काही नाही. तुझा गैरसमज होतोय. तुझा हात दुखावला. माझ्यामुळे म्हणून त्याची भरपाई.

         अण्विका :

 बरा आलाय भरपाई देणारा. मला झालेला त्रास व त्याची वेदना भरून देणार आहेस का? युजलेस, हे घे तुझे पैसे.

Action :

(ती पैसे त्याच्यावर फेकते. आणि मागे वळून ती निघते.)

                          Cut to…..

…….. ……. ……….

Day / in bus. Kolhapur alibag / Inter.

Action :

( अन्विकास जाग येते. बस टोल बूथ पास करते. बस वेगाने धावत असते. ती ईशानकडे पाहते. तो खूप सुंदर दिसत असते. ती पुन्हा तिच्या आठवणीत हरवते..)

Cut to ..

….. ……. …… …..

Day. / Morning / In college / outer – inter

Happy New year पाटी दिसते.

Action :

(महाविद्यालयात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, सर्व अकराव्या वर्ग नवीन वर्षासाठी शुभेच्छा देत आहेत.

अन्विका प्रत्येकाला शुभेच्छा देते. पण ईशानला शुभेच्छा देत नाही. तो अस्वस्थ उभा असतो.)

                              Cut to…..

……. ……. …… ……..

Day / morning. / Inter / college. In class room

Action :

( मकर संक्रांतीच्या दिवशी, अन्विकाने महाविद्यालयातील तिच्या बर्‍याच मित्रांना गिफ्ट कार्ड देते.)

                    Dialog

         आण्विका :

 ए अलका, हे घे तिळगुळ घे गोड बोल,

         अलका :

      तुला ही शुभेछा,

         अण्विका :

 ए समीर हे घे तिळगुळ , तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

           समीर :

       हे घे माझं पण.

Action :

(बरीच गिफ्ट कार्ड आणि तिळगुळ  हातात आहेत. ईशान उभे असलेल्या गटाजवळ ती आली आहे. ती ते सर्व ईशानच्या मित्रांना देते परंतु ईशानला नाही.

ईशान अस्वस्थ होतो. बाकीचे प्रत्येकजण पहात आणि हसत आहेत.)

                                      Cut to…..

…… ……. ……. ……. ……..

Next day/. Talim /. Morning /inter

Action :

( तालमीत मुले व्यायाम करत आहेत.)

                      Dialog

          श्रीकांत :

         (इतर मुलांना)

काल तुला भेटकार्ड मिळाले का?

            मोहन :

        मिळाले की. तुला,

             श्रीकांत :

मला पण दिले. फक्त एका मुलाला मिळाले नाही बघ,

          मोहन :

        कुणाला रे,

 ( श्रीकांत एका तिरकस नेत्र कटाक्ष ईशानकडे पहात इशारा करतो. )

           मोहन :

 असत एखाद्याच फुटक नशीब. काय करणार. त्याला कोण भाव देतय. मला तर हे लवलेटर सारख वाटतयं.

          श्रीकांत :

 एकेकाच्या नशिबात लवलेटर सोड साधं अंतरदेशी पत्र पण नाही बघ, अशांना फक्त एकाच दिवशी भाव मिळतो.

          मोहन :

      कोणत्या रे,

         श्रीकांत :

रक्षाबंधनाला, राख्या बांधायला.

Action :

(ईशान जो व्यायाम करत आहे. तो रागावून त्याकडे पाहतो.)

                  Dialog

         ईशान :

शिरक्या , मोहन्या जास्त शहाणपणा करायचा नाही, कुणाला चिडवताय हे कळत नाही का मला,.

          मोहन :

तुला काय झालं चिडायला इथं आमचं दोघांचं बोलण चाललय ना.

           ईशान :

 हे बघ अजूनही सांगतोय. गप्प बस.

नाहीतर,

            श्रीकांत :

   नाहीतर काय करशील रे,

          ईशान :

    माती चारीन तालमीतली.

       मोहन :

थोबाड बघ आधी तूच माती खाल्यासारख झालंय.

        ईशान :

             (रागाने)

       मोहन्या

         मोहन :

 ये जा तुला दाखवीन अस्मान,

          ईशान :

बघूच कोण कोणाला दाखवतय ते.

Action :

( ईशान त्या दोघांशी हाणामारी करतो. आणि त्या दोघांनाही बदडून काढतो. मातीत लोळवतो. )

                   मोहन :

      ( श्रीकांतला पहात)

 कुठं तुझ्या नादी लागून त्याला बोललो व तालमीतील माती खायची पाळी आली. चल तिकडं.

                                     Cut. To…

…,… …….. ……..

Next day.

 Day / afternoon. / On road kolhapur Market place

         Action :

( किराणा दुकानातून काही साहित्य खरेदी करण्याच्या मार्गावर संयोगीतास थांबवत.)

           Dialog

       ईशान :

     ये…. संयोगीता,

      संयोगीता :

 हा बोल ईशान, काय रे..

       ईशान :

 एक सांगायचं होत.

     संयोगीता :

    बोल की,

         ईशान :

 नाही तुझ्या मैत्रिणीकडे पैसे जास्त झालेत का?

       संयोगीता :

 कुणाकडे काय झालं, समजेल असं काहीतरी बोल,

        ईशान :

आणखी कोण, ती अण्विका,

       संयोगीता :

 तिन आता काय केलं आणखीन.

         ईशान :

 नाही हल्ली ती जास्त भेटकार्ड वाटतेय.

         संयोगीता :

 त्यात काय एवढं, नवीन वर्ष अन् मकर संक्रातील तर सगळेच वाटतात.

           ईशान :

पण मैत्रीणीना वाटायचे सोडून मुलांना कशाला वाटायची.

         संयोगीता :

अरे ,अस काय नसतं त्यात, ग्रीटिंग कार्ड, तर सारेच वाटतात.

          ईशान :

 पण सगळीच पोर ईशान सारखी नसतात, साधा सरळ अर्थ काढणारी.

फक्त सावध कर.

         संयोगिता :

 बर सांगते. अरे हो तुला भेटकार्ड द्यायचेच राहिले.

          ईशान :

       नको मला.

         संयोगीता :

 नको कसं, येवढे चांगले विचार असणाऱ्या नवयुवकास भेटकार्ड मिळायलाच हवे. ते फक्त डायरेक्ट नाही भेटत, इंडायरेक्ट भेटल एवढच.

Action :

  ( संयोगीता त्याला तिच्या पर्समधून एक गिफ्ट कार्ड आणि तिळगुळ देते.)

        ईशान :

         थॅन्क्स यु

(तो निघतो.)

                  Dialog

          संयोगीता :

 (मनात) 

खरंच अनुसाठी असाच चांगला जोडीदार मिळाला तर बर होईल, पण हा काय आता होऊ शकत नाही.

                                 Cut to…

….. …… ……

Morning. १० o ‘clock /outer/ in bus. /कराड शहर.

Action: in present.

( बस कराड शहरामध्ये प्रवेश करते आणि दुकानावरील नंबर प्लेट मागे सरकण्यास सुरवात होते. बस बस स्टॉपवर पोहोचते. बसचे चढ -उतार चालू आहेत. बाजूला बस स्टॉपवर बस येत आहेत आणि जात आहेत. अन्विका उठते. तिच्या समोर डोळे मिटून इशान झोपताना दिसतो. त्याला पाहून, अन्विका हसते. इशान जागृत होत आहे हे तिला समजताच ती डोळे बंद करते. आणि झोपायचे नाटक सुरू करते.

त्या क्षणी, ईशान उठतो.

तो खिडकी बाहेर पाहतो. कराड बस स्थानक असा बोर्ड  त्याला दिसतो. त्याचे लक्ष अन्विकाकडे जाते. तो तिच्याकडे टक लावून पाहू लागतो.)

             Dialog

       ईशान :

(मनात)

 खरंच खूपच सुंदर आहे ही. चाफेकळी नाकाची, गहुवरणी रंगाची, खरंच हिला पाहताच मला एक वेगळी ओढ जाणवते. पण काय करू.

Action :

( दरम्यान कंडक्टर आणि ड्रायव्हर येतात. बस सातारच्या दिशेने निघते. कंडक्टर घंटा वाजवतो. बस निघते.)

Cut to 

        Action : in past.

(दरम्यान, त्याला फुटबॉल तिला मारण्याची घटना आठवते. , तिला पडून लागले आहे, तो माफी मागितो, ती इतरांना अभिवादन कार्ड देत आहे तेव्हा  तो तिला डोकावून पाहत आहे.)

Cut to 

Action :

Day / inter - outer/ in college

( अन्विका शाळेमध्ये गिफ्ट कार्ड वितरित करीत आहे)

                 Dialog

      आण्विका :

       सुशांत

       सुशांत :

      काय अनु,

        अण्विका :

 हे घे, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

                Action:

(ग्रीटिंग्ज  घेऊन सुशांत दंगा करत आहे )

              सुशांत

             या…..

Action :

 (तो रागावला आहे की सर्वांना शुभेच्छा दिल्या गेल्या परंतु ईशानला नाही. तो रागाने लाल आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावर तो भाव दिसत आहे. तो स्वप्नातून बाहेर येतो.)

Cut to 

                Dialog

         ईशान :

(मनात तिच्याकडे पहात)

पण आपल्यामुळे तिला त्रास झाला. महिनाभर तिचा हात दुखत होता.

Action : in past:

( तो वर्गात बसलेला आहे. तास चालू आहे. शिक्षक शिकवत आहेत. तो अनुला पाहात आहे.)

Cut to ....

Action in present :

( त्याला वाईट वाटते.

 पण आता तिला बसमध्ये जवळ बसलेले पाहून, तो आनंद अनुभवायला लागतो.)

                 Dialog

       ईशान  :

 ( मनात )

 खरोखर अत्यंत सुंदर व सद्गुणी आहे ही. माझ्या मुळेच दुखावली गेली ही.

Action in present :

In bus / inter/ day. Afternoon

( दरम्यान, अन्विका उठते, ती तिचे लक्ष नाही असे दर्शविते व ती आजूबाजूला पहाते.)

                Dialog

        ईशान :

    काय झोप झाली का?

        आण्विका :

 बसमध्ये कुठली लागते झोप. कराड गेले का?

         ईशान :

हो ते तर आहेच.आता येईल सातारा, थोड्या वेळात.

       आण्विका :

 किती लांब असेल तरी.

       ईशान :

अ….. असेल वीस किलोमीटर

         आण्विका :

 सातारला बस थांबेल ना थोडावेळ.

         ईशान :

      थांबेल की. का?

       आण्विका :

 काही नाही फ्रेश होता येईल.

          ईशान  :

            हो.

                              Cut. To…..

….. …… …….. …….

Day / Morning / satara bas stand /. Outer

Action :

(एस टी सातारा बस स्थानकात येते.)

                   Dialog

           कंडक्टर :

 बस पंधरा मिनिटे साताऱ्याला थांबणार आहे. कुणाला काही खायला प्यायला घ्यायचे असेल तर घेऊ शकता.

          आण्विका :

 माझ्या ब्यागकडे लक्ष देतोस. मी जरा फ्रेश होऊन येते.

           ईशान :

      हो (मान हलवत)

            Action:

( अण्विका खाली येते आणि रीफ्रेश झाल्यावर. पॉपकॉर्न आणि भडंग आणि खाण्यासाठी काहीतरी आणते. बसमध्ये आल्यावर,)

            Dialog

       ईशान :

    मी पण आलोच. थोडया वेळात.

Action:

( ईशान ताजातवाना होऊन आणि काही वडे पाव आणतो. जेव्हा ते बसमध्ये येतात तेव्हा ते एकमेकांना  सर्व्ह करतात.)

             Dialog

      आण्विका :

        हे घे.

( ईशान आण्विकाने सर्व्ह केलेले पॉपकॉर्न घेत.)

       ईशान :

अरे थांब, मी पण आणलाय, हे घे गरमागरम वडे.

       Action:

(ते दोघेही एकमेकांनी आणलेले पदार्थ सर्व्ह एकमेकांना करतात. कंडक्टर येतो बेल वाजवतो.)

     कंडक्टर :

   आले का रे सगळे.

         सर्व

          हो

             Action:

(ड्रायव्हर बस चालू करतो. बस पुण्याच्या दिशेने निघते.)

Cut to 

….. …… ……. …..

In bus/ inter / afternoon /

Present

Action:

( बस सातारा पुणे रोड धावत आहे.)

                Dialog

        ईशान :

 तुला माझा खूप राग येतो ना?

      आण्विका :

      नाही का?

       ईशान :

त्या फुटबॉल प्रकरणानंतर .

       आण्विका :

 ते होय, तस सांगायच तर तेव्हा होता. आता कशाला तो विचार. झालं,.. गेलं ते पास्टमध्ये.

          ईशान :

ते काय मी जाणून बुजून केलं नव्हत. चुकून बॉल लागला होता.

       आण्विका :

 हो, ते अचानक घडल होत.

          ईशान :

मग तेव्हा का एवढ्या रागावला होता.

. आण्विका :

 हो ते खर आहे. की अचानक घडले होते. पण त्यावेळी तू मला मदत करायची सोडून तेथून पळून गेलास. व जवळजवळ सहा महिने तो हात मला तेव्हापासून दमवत होता.

         ईशान :

त्यावेळी मी काय करणार , त्या वेदांगीने ताडकन माझ्या कानशिलात लगावली. मला काही सूचेनाच. व पब्लिक पण जाम जमली. व तुला माहिताय कोल्हापूरकर म्हणजे रट्टे द्यायला कसे पुढे असतात. व मदतीला ही. म्हणून मी पळालो.

नाहीतर माझं काही खर नव्हतं.

       आण्विका :

 कारणे सांगायला मस्त जमतात तुला.

         ईशान :

       नाही खरंच.

       आण्विका :

      लबाडच आहेस.

         ईशान :

 तू पण काही कमी नाहीस. तोर्यातच पैशाचं पाकीट माझ्या तोंडावर फेकलस.

       आण्विका :

फेकू नाहीतर काय करू. माझी अवस्था काय झाली. मला पेपर सुद्धा परीक्षेचा धड लिहिता नाही आला. वर तू पैशाची मिजास दाखवत होतास.

          ईशान :

 अग पैसे द्यायला मला बाबांनी सांगितले होते. नुकसान भरपाई होती ती. कारण माझ्यामुळे तुझ्या बाबांना आर्थिक भुर्दंड पडला होता.

        आण्विका :

हो, ते तर आहेच. पण तुला माझ्या दुखण्यापेक्षा आर्थिक भुर्दंडाचीच चिंता

        ईशान :

 तू पण काही कमी नाहीस. सर्वांना संक्रातीची ग्रीटिंग वाटलीस पण मला साधं तिळगुळ सुद्धा दिले नाहीस.

        आण्विका :

      मी दिलं होत.

       ईशान :

      छे नाही दिलं.

       आण्विका :

 संयोगिता ने दिलं होत की.

          ईशान :

 हो संयोगितान दिलं, पणं तू का नाही दिलस.

          आण्विका :

 ये त्यावरील अक्षर तरी बघितलस का, कुणाच ते.

          ईशान :

 मला कस समजणार तू दिलं की संयोगितान . व तुला द्यायला काय झालं होत.

           आण्विका :

हुशारच आहेस, मला तुझ्यामुळे एवढा त्रास झाला. ते सर्व विसरून मी तुला शुभेच्छा द्यायच्या. हे तर हास्यास्पद आहे.

         आण्विका :

व येवढं बोलतोयस तुझ्या वाढदिवसाला आणलेल्या लेमनच्या गोळ्या सगळ्या वर्गाला दिल्यास मला दिल्यास का?

ती मधुरा मला दाखवून चगळत होती. व चिडवत होती. माझ्या खूप आवडीच्या होत्या.

        ईशान :

 नाही ग, मी नाही वाटल्या, त्या सुरेशने घेतल्या होत्या वाटायला. वर्गात सर्वांना वाटतो म्हणून, पण तुलाच काय आठ दहा मुलांना चुकवला व अर्धी पिशवी स्वतः घेऊन गेला घरला आपल्या. खादाड बोका. व मी पुन्हा चॉकलेट्स वाटल्या. त्या नंतर.

आण्विका :

 त्यापण माझ्यापर्यंत पोहोचल्या  नाहीत.

          ईशान :

 संयोगिताकडे दिल्या होत्या की.

      आण्विका :

     त्या पारले.किस्मी

        ईशान :

 हो तिने दिल्या नाहीत.

        आण्विका :

     हो दिली की एक.

          ईशान :

 एक का मी चांगल्या दहा, बारा दिल्या होत्या. तिन सांगितल नाही तुला.

       आण्विका :

 कशी सांगणार म्हणा, शेवटी तुझाच कड घेणारी. रक्षाबंधनचा भाऊ ना तू तिचा.

         ईशान :

 मग बहिण आहे ती माझी, व तुझ्या बाजूने लढणारी कमी आहेत का, ती वेदांगी.

          आण्विका :

 ती काय करणार, शांत स्वभावाची, ती काय करते.गरीब बिचारी गाय.

. ईशान :

 ती गरीब, ठोसा भारी लगावते की, तिचा तो ठोसा अजूनही आठवतो की मला, दाडवान हलवल माझं.

Action :

(ती त्याच्याकडे पाहून  हसू लागली.)

Cut to .....

….. ….. ….. …… …..

Action :

( बस कात्रजचा बोगदा पार करते. ईशान खिडकीतून बाहेर पाहू लागतो.)

                      Dialog

          ईशान :

 कात्रज येणार लवकरच.

Action :

  शेजारीच्या बाकावरची आजी पाहत असते की दोघे एकत्र बोलत आहेत . तीशंका पुर्ण नजरेने पहाते.

Dialog :

          आजी :

 तुम्ही दोघ नवरा बायको आहात काय?

          आण्विका :

नाही हो, अजून आमचं लग्न नाही झाल अजून.

             आजी :

(हळू आवाजात स्वतःशी)

 लग्ना अगोदर एकत्र कसे काय फिरू देतात घरचे, देव जाणे, कलियुग बाई ग घोर कलियुग आलंया.

(अन्विका  आजीला हळू  बोलताना ऐकते  .)

                  Dialog

      आण्विका :

अहो आजी, आम्ही मित्र आहोत. खूप दिवसांनी भेटलोय म्हणून गप्पा मारतोय एवढंच. दुसर भलत सलत काही नाही.

           आजी :

 तुमचं आपलं तरण्या पोरांचं बर हाय बाई. अगोदर घरच्यांना मित्र म्हणून ओळख करून द्यायची. अन् नंतर घरच्यांच्या डोळ्यावर पांघरून घालून पळून जायचं. अन् लग्न करायचं.

      Action :

( हे ऐकून, अन्विका काहीतरी बोलणार आहे, ईशान तिला शांत राहण्यास सांगतो.)

             Dialog

        ईशान :

शांत हो.. जाऊ दे तो विषय.

      आण्विका :

अरे बघ ना ती काय पण बोलतेय.

          ईशान :

     जाऊ दे ग सगळ.

     Action :

 आजीचे बोलणे मनास लागून ती शांत बसते. आजी आपल्या शेजरील नातवाला केळ चारु लागते . व पुढे तिचा स्टॉप येतो.  आजी व तिचा नातू उतरतात. 

             Dialog

          ईशान :

 आजीच्या बोलण्याचा राग आला का?

         आण्विका :

 राग नाही, पण जरा वेगळच वाटल. आपण जास्ती क्लोज बोलतोय का? असं वाटू लागलंय.

           ईशान :

 ये वेडाबाई लई विचार करू नकोस त्याचा.

आजीच्या प्रवासा बरोबर तो विचार पण विरून जाईल वार्यावर.

         ईशान :

       ते सोड, हे घे.

 ( शेंगदाणे आणि फुटाणे असलेले पाकीट ईशान सादर करतो. अन्विका त्यातून काही शेंगदाने घेते. आणि विचार करु लागते.)

          आण्विका :

                  (मनात)

खरंच मी जास्त बोलते का? मी याच्याशी अत्यंत क्लोज झालेय का.

                                       Cut to……

….. …… …………..

Afternoon. / That day../inter. / In bus

Action :

( बस स्वारगेट बस स्थानकात येते. फेरीवाले बसमध्ये चढून आपला माल विकू लागतात.)

         आण्विका :

       ओ भाऊ,इकडे या.

       फेरीवाला :

   बोला मॅडम काय देवू.

      आण्विका :

     काय आहे. विकायला.

          फेरीवाला :

 चने आहेत, फुटाणे आहेत, पॉपकॉर्न, शेंगदाणे, भडंग केळीचीप्स , फरसाण व आलेपाकवडी आहे

 मॅडम काय घेणार.

                  आण्विका :

 दोन पॉपकॉर्न, व काही चने द्या. व आलेपाक वडी सुद्धा.

     फेरीवाला : ( साहित्य देत)

मॅडम आलेपाक वड्या किती देवू.

         आण्विका :

         दे चार पाच.

  Action :

( फेरीवाला पॉपकॉर्न, आलेपाक वड्या चने पुडी देतो. अन्विका मनी पर्स उघडते आणि ती पैसै देणार इतक्यात, ईशान पैसे देतो.)

                 Dialog

        आण्विका :

 हे काय देते की मी थांब.

. ईशान :

गप ग. सारख थोडच भेटतोय आपण.

Action :

( बस लवकरच निघते. पुणे मुंबई रोडवर धावू लागते.

पुढील बोगदा ओलांडते. अन्विका अचानक हसू लागते.)

                 Dialog

           ईशान :

 काय झालं एवढं हसायला?

         आण्विका :

 काही नाही मला एक प्रसंग आठवला.

          ईशान :

          कोणता ?

          आण्विका :

 काही नाही रे, बाजारातला.

          ईशान :

      सांग की कोणता तो.

        आण्विका :

     तू घेतलेला दुधी भोपळा.

(Action : ईशान हसू लागतो. )

                 Dialog

         ईशान,

 खरंच तुम्ही मुली एक कोडच आहात. एखाद्या नवशिक्याची वाट लावालं.

फ्लॅश बॅक…. In past

Outer /Kolhapur Ravivar peth bajar / afternoon

       Action :

( वेदांगी रस्त्याच्या कडेला अन्विकाची वाट पाहत आहे. दरम्यान, अन्विका तिच्या स्कूटरमधून तेथे येते.)

            वेदांगी :

 काय ग ! किती वाट बघायची. इतका वेळ,.. बाजार उठायची वेळ झाली.

        आण्विका :

गप्प ग, चल जाऊ. बाजार काय पळून जातोय थोडा.

           वेदांगी :

 तो जावो न जावो मला घरी खूप काम आहे. चल लवकर आटप.

        आण्विका :

     आज सुट्टी तर आहे.

           वेदांगी :

तस नाही ग, आई बारशाला जाणार आहे. घरातील सर्व कामे मलाच करावी लागणार आहेत.

      आण्विका :

बर चल ,..लवकर आटपू.

Action :

(त्या पुढे जातात आणि त्या बाजारात भाज्यांची किंमत विचारतात.

काही बाजारपेठेत माळव देखील खरेदी करतात.

त्याच वेळी. … ..

ईशान बाजारात आला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बाजार करण्यास सांगितले आहे. बाजारात त्याची पहिली वेळ आहे. त्याला काय खरेदी करावे किंवा नाही हे माहित नव्हते.)

                Dialog :

ईशान :

 (मनात )

घरच्यांनी बाजार करायला सांगितलेय. काय घ्यायचं कस घ्यायचं काहीच सांगितलं नाही. आता काय करू…

( त्याचवेळी तो आण्विका व वेदांगीला पाहतो.)

(त्यांना पाहून )

        ईशान :

 ( मनात)

 या बाजार कसा करतात तसच करूया. म्हणजे झालं.

             Action :

( ईशान हा  वेदांगी आणि अन्विका ज्या  भाज्या खरेदी  करतात . त्या भाज्या खरेदी करण्यास तो सुरू करतो. त्या भाज्या घेत आहेत आणि चौकशी करीत आहेत.

टोमॅटो विक्रेता पाहून)

           वेदांगी :

ओ, भाऊ, टोमॅटो कसे दिले.

    टोमॅटोवाला :

 पन्नास रुपये किलो,

         वेदांगी :

 पलीकडे तर चाळीसला आहेत.

         टोमॅटोवाला :

 क्वालिटी तरी बघा त्याच्या मालाची व माझ्या व मग ठरवा काय ते मॅडम.

         वेदांगी :

      दे की चाळीसन,

      टोमॅटोवाला :

       बर, घ्या.

             Action :

( त्या  एक किलो टोमॅटो खरेदी करतात. आणि पुढे जातात. ईशान टोमॅटो घेतो.

तो त्यांच्या पाठोपाठ खरेदी करण्यास सुरवात करतो.

वेदांगी  ईशान आपल्या पाठोपाठ खरेदी करताना पाहून.)

             Dialog

          आण्विका :

काय झालं ग. इकडे का ओढून आणलेस.

         वेदांगी :

अग, तो ईशान पाहिलास काय? आम्ही जिथे बाजार घेतो तिथंच येतो.

         आण्विका :

मग त्यात काय एवढं? बाजाराला आलाय म्हणजे बाजारच करणार ना.

         वेदांगी :

पण आम्ही घेतो तीच भाजी का विकत घेतो.

         आण्विका :

 मग त्यात काय एवढं घेतली असेल. आपल्याला काय करायचय.

          वेदांगी :

काय करायचं म्हणजे. त्याची गंमतच करायची.

       आण्विका :

 काय करणार आहेस तू.

        वेदांगी :

 तू गप चल. दाखवते तुला, त्याची गंमतच करायची.

Action :

(ती पुढील माळवेवाल्याजवळ पोहोचल्यावर. )

         वेदांगी :

अहो दुधी कशी दिली. माळवेवाला, वीस रुपये एक नग.

        वेदांगी :

अनु दुधी भोपळ्याची खीर कधी खाल्लीस का तू.

        आण्विका :

      हो खालीय की,

           वेदांगी :

 किती मस्त होते सांगू. उद्या घरी खीर करतात ना. त्यासाठी दुधीच चांगली.

        आण्विका :

 मग बघतेस काय,, घे की एक मस्त.

         वेदांगी :

         हो घेते.

                 Action :

(त्या दुधी भोपळा खरेदी करतात. व पुढे जातात.

ईशान सुध्दा दुधी भोपळा खरेदी करतो. व  पैसे  भागवून पुढे येतो. वेदांगी परत मागे जाऊन दुधी भोपळा परत करते. व पैसे घेते.)

               Dialog

        वेदांगी :

ओ, काका, घरी फोन केला होता. दुधी आहे शिल्लक नको मला.

                 Action:

( वेदांगी दूधी ठेवते. आणि त्या बदल्यात मेथी घेवून  परत येते. ते पाहून, ईशान दूधी परत करायला जातो. पण माळवेवाला ऐकत नाही.)

ईशान :

ओ भाऊ, मला पण दुधी नको.

        माळवेवाला :

 ए गप्प जा एकदा विकलेला माल मी परत घेत नाही.

       ईशान :

        पण..

      माळवेवाला,

   पण बिन काही नाही.

         ईशान :

    त्या बदल्यात मेथी द्या.

       माळवेवाला :

      ए नाही जा.

             Action :

( शेवटी, अनिच्छेने, तो दूधी घेऊन पुढे येतो. मग तो त्या दोघींना एका ठिकाणी माळव वाटून   घेताना पाहतो. तो त्याच्या हातातील पिशव्या उचलताना त्यांना  पाहू लागतो. त्याला समजते की त्याने त्याच्यापेक्षा जास्त माळव घेतलं आहे.)

Cut to .....

…… ……. …… …….

क्रमशः पुढे......


No comments:

Post a Comment

ट्रॉय एक ऐतिहासिक युद्ध

  ट्रॉय एक ऐतिहासिक युद्ध  आज आपण ट्रॉय या फिल्मची समरी पाहणार आहोत. फिल्मच्या सुरवातीला एका रणांगणावर  ग्रीस राजा एडमेनॉन व दुसरा राजा यां...