Kalat n kalat julale he bandh script bhag ४
क्रमशः. पुढे चालू........
Market day / evening / ishhan home / 7.०’clock. Inter.
Action :
(ईशान बाथरूममध्ये आपले हात पाय धुवत आहे. ताजातवाना होत आहे. आई जेवणाच्या खोलीत बसली आहे. तिने बाजार सोडला आहे.)
Dialog
आई :
( चिडून)
एवढा कशाला बाजार केलास. काय महिन्याच माळव एकदम आणलास. की सारी मंडई उचलून आणलीस.
ईशान :
का ग, त्यात काय झालं एवढं. बरोबर तर केलाय की.
आई :
घरात तीन चार माणस खाणारी. अन् घेऊन आलाय. पोत भरून आणल्यासारखा. किलो किलो सारखं घेऊन आलास. पैसे काय झाडाला लागतात.
ईशान :
पुढचा बाजार करायचा नाही.
आई :
(रागाने)
तुझ्या आजानं… दोन दोन आठवडे फ्रीजला ठेवून भाजी खालती का कधी?
काय घोड्यासारखा वाढलाय नुसता. काही कळत नाही. की वळत नाही. साधा बाजार करता येत नाही.
वडील :
(बाहेरून आत येत)
का काय झालं.
आई :
बघा तुमच्या लेकाचे प्रताप. सुट्टे रुपये नव्हते. म्हणून याला दोन हजाराची नोट दिली. तर सगळी मंडई धुवून घेवून आलाय. तीन माणस खाणारी घरात. व घेऊन आलाय किलो किलोने भाजी. काय म्हामदं घालायचं हाय. का लगीन हाय कुणाचं.
बाबा :
अग, तू त्याला लिहून द्यायचस काय काय आणायचं ते.
आई :
काय बारका आहे का लिहून द्यायला सगळ. फ्रीजमध्ये बघून जाता येत नाही.
( ईशान गप्प ऐकत उभा असतो.)
ईशान :
(मनात)
एवढं डोकं चाललं नाही. त्या दोघींच्या मागन गेला बाजार करत. सगळे प्रश्न सोडविणारा. कोणताही अडथळा बाजूला करताना डोकं जास्त चालत. इथच कशी पेंड खाल्ली. गाढव झालो शेवटी.
बाबा :
हे बघ चूक तुझी आहे. कधी त्याला बाजाराला लावून दिलं नाहीस. का कधी जबाबदारी दिली नाहीस कोणत्याही घरातील कामाची. कशी जमेल त्याला...
बरं आता केलाय ना बाजार सोड .
बाबा :
( ईशानला)
हे बघ ईशान वरील काकू आज बाजाराला जाऊ शकल्या नाहीत. त्यांना विचारून ये. व आणलेल्या दरात त्यांना हवं ते देवून पैसे घे. काय?
ईशान :
बर बाबा.
आई :
माळव देशीला पण या दुधीच करायचं काय. ते कोण घेणार.
ईशान :
मी खातो. उगाच घर डोक्यावर नको घेऊस.
आई :
खायला आणलीस की व्यायामाला. गदाच आणलीस की जणू.
ईशान :
मग हान माझ्या डोक्यात. अन् हो शांत, गाढव झालो मी बाजाराची कटकट मागे घेऊन.
आई :
आता तर कुठे सुरवात आहे बाळा. अजून लई आयुष्य आहे पुढे.
ईशान :
बर बर बघतो मी.
(ईशान तावातावाने बाहेर जातो.)
Cut to……
…… …… …… …… …
Present:
Flash back
In. Bus /Afternoon. ३.३० / Inter
Action :
( ईशान हसू लागतो.)
Dialog
आण्विका :
काय रे काय झालं हसायला .
ईशान :
अग तो बाजारचा दुधी भोपळा आठवला.
आण्विका :
दुधी…. आ….. मला वाटत दुधी भोपळ्याची खीर मस्त होते ना?
ईशान :
ए .. बाई गप्प त्या घटनेच एवढं नाव घेवू नकोस. त्या दुधीन मला फक्त मार बसायचा तेवढा राहिलाय.
आई सरळ म्हणाली, एवढा मोठा झालाय साधा बाजार करता येत नाही.
आण्विका :
आम्ही काय एवढं वाईट बाजार करतोय का?
ईशान :
तस नव्हत म्हणायचं मला. पण तीन माणसे घरात खाणारी व दहा बारा किलो भाजी घेवून गेल्यावर काय होणार. कोण पण सहज म्हणेल.
ईशान :
तुला पण बोलले का तुझ्या घरातले. त्या दिवशी एक एक किलो भाजी आणली म्हणून.
आण्विका :
छे, मी काही किलो किलो भाजी नव्हती नेली. अरे साधं गणित आहे. किलोभर घेतल. की कमी दरात भेटत. म्हणून आम्ही दोघी ठराविक बाजार एकत्रच घेतो. व नंतर वाटून घेतो.सोप्प आहे.
ईशान :
हुशार आहात, एवढं साधं ध्यानात आल नाही माझ्या.
आण्विका :
अरे, सुरवातीला होतो झोलमाल, नंतर होत अनुभवाने नीट. बरं एक विचारू.
ईशान :
काय?
आण्विका :
आता पण किलो किलोने भाजी नेत नाहीस ना?
ईशान :
एवढा पण वेडा नाही मी. अरे….हो. सांगायचं राहिलं तुला की त्या दिवसानंतर घरातील सर्व व्यवहार आईने मला शिकवण्यास सुरवात केली. व आज तुम्हाला बाजार करायला शिकवीन मी.
आण्विका :
बर चालेल की. हे घे आमच्यामुळे तुझी फजिती झाली ना. त्याबद्दल.
(अन्विका चणे देते . ईशान घेतो.)
ईशान :
कुण्या नवशिक्यान ट्युशन लावायला हवी तुमच्याकडे, त्याची सॉलिड वाट लावाल तुम्ही.
आण्विका :
तस काही नाही, सांगून सवरून ट्युशन असेल तर आम्ही ज्ञानाचे भांडार खुले करतो. चोरुन असेल तर …
ईशान :
चोरुन असेल तर काय देता.
आण्विका :
दुधी भोपळ्याची शिक्षा.
( ते दोघेही हसण्यास सुरवात करतात.)
Cut to…..
…… ….. ….. ……. ……. …..
Day / outer – inter in bus / pune - alibaug road
Action :
( बस बोगदा ओलांडते. आणि बायपास रोडमध्ये प्रवेश करते. तिथून, ती अलिबागकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेश करते. धावू लागते.
जेव्हा बस धाब्या जवळून जात असते, तेव्हा एक स्पीकर ऐकू येतो. स्पीकरवर मराठी गाणे वाजत आहे.
लिम्बोनिच लिंबू टच्च देठाणं भरलं….गाणे ऐकून ते दोघेही एकमेकांकडे पाहत हसू लागतात.)
आण्विका :
काय, रे, माझ्या मनात जे आल् ते तुझ्या पण आल काय?
ईशान :
हो, हे गाणं कसं विसरेन.
बारावीत तुमचं स्नेहसंमेलनाचे साँग होते ना.
आण्विका :
हो, या गाण्यावरून आम्हाला चिडवत होतात ना, लिंबू सरबत लेलो भाई… लिंबू सरबत लेलो…
ईशान :
तुम्हाला जस चिडवता येतच नाही. तस बोलतेस. मला पण चिडवत होता ना सासरच धोतर फिटल म्हणून.
आण्विका :
हे बघ, ते मी नव्हते चिडवत, संयोगिता चिडवत होती.
अरे, कसले रे पुरुष तुम्ही, साधं धोतर बांधता येत नाही. अन् म्हणे शिवरायांचे मावळे.
ईशान :
मॅडम धोतर निसटले होते ते मधुकरचे, अन सांगायचं म्हणजे तुझ्या मैत्रिणीमुळे तिनेच धोतराच्या सोग्यावर नाचताना पाय दिला होता.
तुमची ती डान्स क्वीन…. श्याल्मली जुवेकर.
आण्विका :
ती काही आमची लाडकी नव्हती तुम्हीच तिच्यामागे गोंडा घोळत फिरत होता.
ईशान :
इतर मुले फिरत असतील मी नाही ह..
आण्विका :
मुलींची नावे अडनावासकट पाठ अन् म्हणे मी फिरत नव्हतो.
तिचा पाय पडला अन् धोतर निसटल म्हणे. खंडोबाच्या गाण्याची पुरती वाट लावली तुम्ही.
ईशान :
हो का, अन् मला वाटत तुमचं गाणं तरी कुठे नीट होत. पुढील चार जनी सोडल्या तर मागल्या बाकीच्यांना कुठे डान्स नीट येत होता. त्यांचे लिंबूनीच लिंबू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात होते.
अन् काय शेवटी लिंबू फेकून मारलेत, अस मारत का कुणी?
ही काय पद्धत म्हणायची. त्या गाण्यात कुठे लिंबू मारलेले पाहिलेस का कधी….
आण्विका :
शेवटी काहीतरी नवीन करून दाखवायचा उद्देश होता आमचा. बाकी काही नाही.
अन् आमच्या काही स्टेपस चुकत नव्हत्या. ती मागे होती ना तुमची लाडकी हेमांगी तिच्या चुकत होत्या.
कामावर ध्यान कुठ होत तीच. सदा नि कदा त्या नितिशकडे लक्ष. जसा काय वरमालाच घेऊन लागलाय तिच्या मागं. तीच अस वागणं.
शेवटी झालं काय. तो गेला मुंबईला. तिकडच्या मुलीसी लग्न करून झाला मोकळा. अन् हिच्या गळ्यात कोण पडल, तर तो दातक्या किशा. म्हणून म्हणते. बाईन कधी मृगजळामागे लागू नये. नाहीतर सितेसारखं रामायण घडत.
ईशान :
सगळीच मुले तशी नसतात. इथं चांगल्या मुलाना कोण विचारतय. त्यांच्या संगे नुसत भांडणच करतात. तुमच्या सारख्या मुली.
आण्विका :
हो का? ऐकल कोणतरी, वर्गात एक तरी नग सरळ होता का. सगळ्या वह्या बदामान भरलेल्या.
ईशा :
होता ना.
आण्विका :
कोण तो.
ईशान :
कोण म्हणजे, मी होतो. माझं वर्तन किती स्वच्छ होत. आहे का डाग एखादा तरी.
आण्विका :
गॉगल लावून भर वर्गात शायनिंग मारणारा तू.
ईशान :
मॅडम, डोळे आलते म्हणून लावला होता ग्वागल वर्गात कोणी हौसेसाठी गॉगल लावत नाही.
आण्विका :
त्या नखरेल श्याल्मलीला गाडीवरून फिरवत होतास ना.
ईशान :
ए बाई, चुकीचा अर्थ काढू नकोस.
तिचे बाबा व माझे बाबा एके ठिकाणी कामाला आहेत. त्यांनी पेपरला वेळ होतोय. व त्यांना वेळ नाही म्हणून मला न्यायला सांगितल होत तिला. एवढंच.
आण्विका :
तिचा भाऊ नव्हता का. की कुठे गेला होता. तू सोडायला तिला.
ईशान :
तिचा भाऊ पाहिलास का तू. तो किती लहान आहे. व मी तिला नेत होतो. तेव्हा तिच्या वडिलांनी पेट्रोल चार्ज दिला होता. उगाच कायपण बोलू नको.
आण्विका :
म्हणून जोड्याने गेला होता वाटत. पाया पडायला ज्योतिबाला.
ईशान :
तू अती बोलतेस हा. मला तिला फिरवायला आवडत नव्हत.
आण्विका :
का रंगानं काळी आहे म्हणून, तू कुठे गोरा आहेस. सावळा तर दिसतोस.
ईशान :
( नाराजिन)
बर… बर.. असुदेत. मी काळा सावळा.
Action :
तो अस्वस्थ झाला आहे. आणि शांत राहतो.
अन्विका शांत आहे. आजूबाजूचे लोक पाहणे सुरू करतात. दोघांनाही लक्षात येते. ते दोघे शांतपणे बसतात. ते दोघे आता शांत होतात.
Dialog
आण्विका :
(मनात)
मी काही जास्तच बोलले त्याला. अरे कळतच नाही मला. समजून घ्यायचं सोडून उगाच वाद घालतेय. त्याला प्रत्यक्ष दुखावले मी. किती दिवसांनी भेटलो होतो. आता काय करू. बाहेर पाहू का? नाही नको तो खिडकीकडेला आहे. उगाच त्याचा मूड हाफ नको व्हायला. आ…. काय करू. हा… पेपर वाचत बसते.
Action :
( अन्विका पेपर बाहेर काढते आणि वाचत बसते.)
ईशान :
(मनाशी आपल्या)
अजूनही राग आहे. तिच्या मनात माझ्याविषयी. शांत बसलेलं बरं. नाहीतर खूप दिवसांनी भेटलीय थोड्या वेळेचा प्रवास आहे. उगाच पुन्ह राग धरून जायला नको.
आपण जरा बाहेर पाहूया. निसर्गाचा आस्वाद घेऊ.
Action :
( अन्विका पेपर बाहेर काढून वाचत आहे.)
Dialog
ईशान :
(अस्वस्थ आहे, मनात )
थोड्याच वेळात अलिबाग येणार अस दिसतय. ही आपल्यापासून वेगळी होणार. पून: भेट होते की नाही देवालाच ठाव.
( दरम्यान, ईशानचे लक्ष तिच्या हातात असलेल्या मोबाइलकडे जाते. )
ईशान :
( आपल्या मनाशी)
नंबर कसा घ्यायचा. रागावली तर आहे. पण घ्यायलाच हवा. आ… काय करू.
( तो विचार करून )
आयडिया
Action :
(ईशान हळू हळू आपला सेल फोन कोणी पाहण्यापूर्वी खाली सरकतो. आणि थोड्या वेळात. )
Dialog
ईशान :
अरे, माझा मोबाईल कुठे आहे. बापरे, पडला की काय कुठे! अरे. काय करायचं आता… माझे महत्वाचे प्रोजेक्ट त्यात आहेत.
( तो बॅग पॉकेट्स तपासण्यास सुरवात करतो.)
(ते पाहून)
आण्विका :
असेल इथेच कुठेतरी. थांब मी कॉल करते.
आण्विका :
नंबर सांग.
(ईशान नंबर सांगतो. अन्विका फोन डायल करते. रिंग वाजू लागते. इकडे आणि तिकडे पहात आहात)
Dialog
आण्विका :
शिट खालून आवाज येतोय घे.
(फोन वाजू लागतो. ईशान खाली वाकतो आणि फोन घेतो .)
ईशान :
हा सापडला. थॅन्क्स ह.
आण्विका :
त्यात काय थ्यांक्स म्हणण्यासारखं आहे.
ईशान :
तरी पण मदत केल्यावर थ्यांकस म्हणण्यात कंजुषी कशाला करायची.
आण्विका :
खूप चांगला विचार आहे.
Action :
(ईशान तिचा फोन नंबर तिच्या नकळत आनंदाने सेव्ह करतो. बस अलीबागवर पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात. सर्व प्रवासी उतरू लागतात.
अणु तिचे साहित्य घेत आहे.)
Dialog
ईशान :
थांब मी बॅग घ्यायला मदत करतो.
आण्विका :
थ्यांक्स.
ईशान :
( प्रेमाने पहात )
थ्यांक्स काय त्यात मानायचे. चल… बस रिकामी झाली.
आण्विका :
( मनात, दयाळू नजरेने )
खरंच किती निरागस आहे हा. मी थोड्यावेळा पूर्वी नको ते बोलले याला. अन् हा तरीही माझ्याशी नम्रतेने वागतोय. मी याच्या रंगावरून याला बोलले. किती देखणा आहे हा. याच्या मनात आल तर तो कित्येक मुलींशी फलर्ट करू शकतो. या संपूर्ण प्रवासात याने माझा जराही गैर फायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. अन् मी….काय काय बोलले.
Action :
( अन्विका आणि ईशान बस मधून खाली उतरतात. अन्विकास त्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता जाणवू लागते. तो तिच्या चेहऱ्याकडे निरागस नजरेने प्रेमपुर्ण नजरेने पाहू लागतो. अन्विका तिची बॅग बाजूला ठेवते.)
Dialog
आण्विका :
मला जरा रिक्षा स्टॉप पर्यंत सोबत करतोस का?
ईशान :
का नाही. चल…
Action :
( ईशानने तिची बॅग उचलतो आणि तिला रिक्षा स्टॉपवर सोडतो. ती रिक्षामध्ये साहित्य ठेवते.)
Dialog :
आण्विका :
तू कुठे जाणार आहेस?
ईशान :
इथून थोड्याच अंतरावर आमचा ट्रेनिंग कॅम्प आहे. तिथे.
आण्विका :
जर का फ्रेश व्हायचं असेल तर चल आमच्या मावशीकडे. तिथून जा. हवं तर.
ईशान :
( थोडे थांबून, विचार करून)
नाही नको. इथेच तर जवळ आहे. व बसमध्ये एकसारखं बसून कंटाळा आला आहे. व थोडा आराम केल्यावर बरं वाटेल. बर मग भेटू पुन्हा..
आण्विका :
बर ठीक आहे. येते मी.
आण्विका :
( रिक्षा चालकाला)
बर , काका चला मग.
रिक्षावाला :
मॅडम कुठे जायचे?
Action :
(आण्विका पत्ता देते. रिक्षा निघते.)
Dialog
आण्विका :
( ईशानकडे प्रेमाने पहात)
बाय
Action :
(रिक्षात बसल्यावर अन्विका मावशीला फोन करते.)
आण्विका :
हॅलो मावशी, मी आलेय अलिबागमध्ये. रिक्षा धरलिय.
सुधा मावशी :
अग , फोन नाही का आधी करायचा. त्यांना लावून दिलं असतं की.तुझी वाट बघून त्यांना फोन आला ऑफिसचा, ते तिकडे गेले ग. थांब मीच आले.
आण्विका :
अग त्याची काही गरज नाही.
हे बघ तू पत्ता फक्त नीट सांग रिक्षेवाल्याला.
( आण्विका फोन देते. रिक्षेवाल्यास मावशी पत्ता सांगते आहे. )
मावशी :
नीट लक्षात आलं ना.
रिक्षेवाला :
हो आल.
मावशी :
उगाच इकडे तिकडे फिरू नकोस. मी पैसे देणार आहे. मला माहिती आहेत. बस स्टँड ते इथपर्यंत किती चार्ज होतो तो.
रिक्षावाला :
हा मॅडम.
Cut to…..
…. ….. …… …….
Outer /evening / Alibag bus stop
Action :
( जेव्हा रिक्षा निघून जाते तेव्हा इशान ताबडतोब तेथे कंडक्टरला पत्ता विचारतो. )
Dialog
ईशान :
हा जरा पत्ता सांगता का?
कंडक्टर :
हा होय. इंथ जवळच तर आहे.
ईशान :
कसं जायचं सांगाल का? की रिक्षा करावी लागेल.
कंडक्टर :
नको रिक्षा, जवळच आहे. इथून फाटकातून पुढे सरळ जायचं पुढे दोन चौक ओलांडल्यावर एक गणेश मंदिर लागते. तेथून जवळच आहे.
ईशान :
थ्यांक्स.
( ईशान निघतो. )
Cut to…..
…… …… …. …
Evening. / 6,o’clock / Apartment Alibag / Outer - Inter
Action :
( रिक्षा अपार्टमेंटमध्ये येते.आण्विका साहित्य खाली उतरू लागते. काकू रिक्षाचा आवाज ऐकून बाहेर येते.)
मावशी :
( त्या रिक्षावाल्याला )
काय रे किती झाले?
रिक्षावाला :
पंच्याहत्तर रुपये मॅडम.
मावशी :
हे घे.
आण्विका :
थांब ग मावशी मी देते.
मावशी :
गप्प बस. घे रे.
रिक्षावाला
फक्त पासष्ट रुपये.
मावशी :
हो एवढेच होतात. मी काय आजकाल इथे रहात नाहीये. तुमचे नखरे मला माहित आहेत.
रिक्षावाला :
अहो आणखी पाच रुपये तरी द्या.
चहापानाला ,
मावशी :
ये जा गप,
रिक्षावाला :
उगाचच लांबच भाड सोडून बसलो.
मावशी :
ये जातो की नाही. उगाच ट्याव ट्यव लावलाय.
Action:
( रिक्षावाला निघून जातो.)
Dialog
मावशी :
काय ग,.. कसा प्रवास झाला?
आण्विका :
मस्त झाला, पण काय हे पाच रुपयांसाठी हुजत घालत होतीस, अन् काका कुठे आहेत?
मावशी :
अग काका येणारच होते. पण अचानक ड्युटी वरून कॉल आला. व त्यांना जावं लागलं.
आण्विका :
( मावशीच्या अपार्टमेंट मध्ये तिच्या घरात प्रवेशल्यावर)
मावशी रेवा व स्वप्नील कुठे दिसत नाहीत.
मावशी :
अग ते दोघे क्लासला गेलेत. नाहीतर स्वप्नीलला लावून देणार होते.
शेवटी मी स्वतः निघणार होते. इतक्यात तुझा फोन आला बघ.
आण्विका :
अग जाऊ दे ग. मावशी मला सवय झालीय प्रवासाची. त्यात काय.
मावशी :
तरीपण काळजी वाटते न बाई.
अग बोलत काय उभारलोय. चल.
(त्या साहित्य घेऊन आतमध्ये जाऊ लागतात.)
चालत चालत …
मावशी :
बर अक्का व दाजी कसे आहेत?
आण्विका :
आहेत बरे.
मावशी :
बर तुझी डॉक्टरकीची एक्साम कशी झाली?
आण्विका :
छान झाली.
मावशी :
म्हणजे एकदाची डॉक्टर झालीस म्हणायची तू. आता घरातच डॉक्टर म्हंटल्यावर बाहेर जायलाच नको.
आण्विका :
स्वप्नीलच काय चाललय? अन् रेवती कधी येणार?
मावशी :
अग येईलच थोड्या वेळात.
बर, दमून आलीस . जरा फ्रेश हो जा.
(आण्विका फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये जाते.)
Cut. To……..
….. …… ……. …..
Evening /Outer / Alibag city on road
Action :
( ईशान थोडा पुढे चालत जातो. पुढे एक चौककडे पहात आहे.)
Dialog
ईशान :
(मनाशी)
अरे, हे तर एकसारखं दिसत आहेत. कोणता चौक समजायचा. कुणाला विचारू. आ…. आईड्या.
Action :
( ईशान गुगल मॅप उघडतो. त्यात त्याला दिलेल्या स्थळाचा शोध घेतो. आणि तेथे नकाशाच्या मदतीने तेथे जाते..)
Cut to .....
..... ...... .....
Day / Evening / Inter - Outer / Forest Office Alibaug
(ईशान कार्यालयाच्या आवारात पोहोचतो. ऑफिस मध्ये जातो. एक अधिकारी कर्तव्यावर आहे. तो त्या दिशेने जातो.)
Dialog
ईशान :
हॅलो, मी ईशान… ईशान पाटील फॉरेस्ट डिपार्टमेंट कोल्हापूर..
शिपाई :
हा बोला
ईशान :
मी उद्यापासून सुरू होणाऱ्या वन परिषद ट्रेनिंग साठी आलोय.
शिपाई :
हा आल ध्यानात.
ईशान :
बर इथ राहायची सोय कुठे आहे.
शिपाई :
तुमच्या साठी राहण्याची व जेवणाची सोय दुसरीकडे केली आहे.
ईशान :
कुणीकडे केलीय?
शिपाई :
हे बघा आदी इथं आतील बाजूस रजिस्टर आहे त्या ठिकाणी सही करा. मग तुम्हाला तिथे पत्ता देतील त्यावर जाऊ शकता.
थांबा दाखवतो तुम्हाला.
Action :
(ईशान आणि तो शिपाई ज्या ठिकाणी रजिस्टर आहे त्या ठिकाणी जातात. ईशान आपली नोंद करतो..
तेथील दुसरा आतील अधिकारी त्याला पत्ता देतो. आणि कसे जायचे ते सांगतो.)
Dialog :
ईशान :
थ्यांक्स.
शिपाई :
इटस ओके. सर
Cut to…..
…. ….. ….. …….
Eveving/ 7,o’clock /. Alibag city nivasi bhavan / inter
Action:
( अलिबागमधील निवासी इमारतीत. ईशान काउंटरच्या जवळ येतो. )
Dialog :
ईशान :
हॅलो, मी ईशान, वन परिषद ट्रेनिंग साठी आलोय. आवक जावक रजिस्टर कुठे आहे?
तो रिसेप्सनिस्ट :
सर आपल लेटर दाखवा. व आधारकार्ड पण द्या.
( Action : रिसेप्शनिस्ट रेकॉर्ड नोंद करतो.. आणि मागील बाजूस असलेल्या बोर्डच्या वरील किल्ली काढतो.)
ईशान :
कसं जायचं.
रिसेप्सनिस्ट :
हे बघा सर, येथून बाहेर गेल्यावर आपल्याला एक पुढे क्यांटिंग लागेल. तेथून खालिल बाजूस एक मोठी बिल्डिंग आहे. तिथे आहे शिपाई तो दाखवेल तुमची रूम.
( Action : ईशान तिथे जातो.
शिपाई खोली दाखवतो. ईशान खोली उघडतो. आणि त्याची बॅग आत ठेवतो. आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो. ताजेतवाने झाल्यानंतर तो रहिवासी कॅन्टीनला जातो. न्याहारी केल्यावर तो त्याच्या खोलीत येतो. तो पलंगावर पहुडतो. तो त्या दिवसाच्या गप्पा आठवण्यास सुरवात करतो.
अन्विकाचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर येवू लागतो.
जरी तो आपले डोळे बंद करतो, तरीही तो तिलाच पाहतो. तो उठतो. )
Dialog :
ईशान :
हे काय होतंय मला. सारखी ती का दिसते.
एखादे पुस्तक तरी वाचूया.
Action :
( ईशानने आपली बॅग उघडतो. त्यातील एक पुस्तक काढून घेतो. व वाचू लागतो.. पण त्यांचे लक्ष लागत नाही . तो वाचताच त्याच्या समोर आण्विका दिसू लागते. तो वाचने थांबवतो व जेवण्यासाठी जातो.)
Cut to......
…. …… ……. …….
Alibag /. Night / kanting / Inter
. Action :
( ईशान कॅन्टीन मध्ये प्रवेश करतो. एका टेबलजवळ खुर्चीत बसतो. ट्रेनिंग ल येणारे इतर वन अधिकारी देखिल तिथे जवळ जेवत आहेत. बरेच वन अधिकारी देखील त्याच्या शेजारच्या जेवणासाठी आहेत. त्यापैकी एक ईशान जवळ येऊन बसत)
Dialog
रवींद्र :
हॅलो, ट्रेनिंगला आलाय का?
ईशान :
हो. आपण .
रवींद्र :
हो, मी पण , बर माझं नाव रवी.. रवींद्र देशमुख. आपण.
ईशान :
मी ईशान… ईशान पाटील.
रवींद्र :
बर कोठून आहात आपण?
ईशान :
मी कोल्हापूर दाजीपूर विभाग राधानगरी.
रवींद्र :
हा आलं ध्यानात.
तुम्हीच ना ज्यांनी तस्कर पकडले होते.
ईशान :
हो.
रवींद्र :
आपणास भेटून आनंद झाला . एक सरप्राइज आहे.
ईशान :
बर आपण कोठून.?
रवींद्र :
मी नाशिक विभागातील आहे. तेथील नाशिक औरंगाबादमधील सीमेवरील गौताळा अभयारण्य, तिथे मी असतो. या कधीतरी सुट्टीला आपण, तिकडील पितळखोरा लेणी. व किल्ले पाहायला जाऊ.
ईशान :
चालेल की. पहिल्यांदा तुम्ही या आमच्या राधानगरीला मस्त धमाल करू
रवींद्र :
हो नक्की.
( इतक्यात वेटर जेवण घेऊन येतो.)
वेटर :
साहेब जेवण..
रवींद्र :
हा ठेव..
वेटर :
साहेब तुम्हाला काय आणू?
Action :
ईशान, पुढ्यातील मेनू कार्ड बघतो. व एक व्हेज थाळी मागवतो.
रवींद्र :
काय राव कोल्हापूरकर तुम्ही अन् नॉनव्हेज मागायच सोडून हे काय.
. ईशान :
तस काही नाहीय माझं, गेली दोन चार दिवस झालंय जास्त नॉनव्हेज म्हणून जरा व्हेज मागवलं.
रवींद्र :
हा..
(Action: जेवण येते. ते दोघे खातात. तेथे आलेल्या इतर विभागातील लोकांची ओळख करुन घेतात. आणि विश्रांती घेण्यासाठी आपल्या खोलीत जातात.)
Cut to….
…… ….., ……. …… ….
Night / 9.30 o clock. /Inter
Action :
( ईशान खोलीत येतो. आणि आपल्या पलंगावर झोपतो. त्याला पुन्हा अणु आठवते. तो झोपेचा प्रयत्न करतो. पण झोप नाही.)
Dialog
ईशान :
काय करू. काही सुचत नाही. आ…. आयडिया
Action :
( ईशान आपला मोबाईल घेतो. तो त्यावर व्हॉट्सअॅप उघडतो. तो नंबरच्या मदतीने अन्विकाचे खाते निवडून एक छान हाय, शुभ रात्रीचा संदेश पाठवितो.
आणि पलंगावर झोपतो. तो तिचा डीपी वाढवितो आणि तिचा स्क्रीनशॉट घेतो.
आणि तिचा फोटो पहात झोपतो.)
Cut to....
…… …… …… …… …… ……. ….
Night. ८.०० clock. / Dinar time / Inter
Action :
(अन्विका मावशीच्या घरी आहे. काका जेवणासाठी जेवणाच्या खोलीत डायनिंग टेबलवर बसले आहेत. रेवा वॉशरूममध्ये आहे. आणि स्वॅप्निल टीव्ही पहात आहे. पुढे, डिनरसाठी डिशेस ठेवल्या जातात. त्यामध्ये नाचनी भाकरी, मसाले भात, घाटी स्टाईल, सोलकाडी, मालवनी शैलीने बनवलेली सुरमई डिश आहे. असे अन्न ठेवले आहे.)
मावशी प्रत्येकास पाने वाढत आहे. रेवती अजूनही वॉशरूममध्ये आहे.
Dialog :
मावशी :
अग रेवा , आवरल की नाही . येथे जेवणं वाढल आहे.
स्वप्निल, प्रथम टीव्ही बंद कर. आणि या आणि पटकन जेवा.
(अनू जेवण वाढण्यात मदत करीत आहे. दरम्यान, रेवा आणि स्वॅप्निल तिथे येतात. जेवण्यासाठी बसत)
Dialog
रेवती :
काय आज खास बेत आहे वाटत.
मावशी :
( रेवाची आई)
खास बेत आहे. इथ पाहुणी लागलीय काम करायला. व तुम्ही नुसत या हादडायला. काय वाटत की नाही.
रेवती :
ते तरी काम काही सोप आहे का?
मावशी :
हो का?
स्वप्नील :
वास तर छान सुटलाय. काय आहे खास.
मावशी :
सुरमई बनवलीय.अनुसाठी
स्वप्नील :
खास पाहुनी आलेय म्हणून खास बेत होय ,
मावशी :
नाही तर काय रोज तुम्हाला उपाशीच ठेवतेय.
रेवती :
तस नाही ग. पण अशा रेसिपी रोज झाल्या तर बर होईल अस नाही का वाटत तुला.
मावशी :
अनु तू बस जेवायला. मी वाढते.
रेवती :
ए बस ग, ती वाढते ना. तुला कळतच नाही. पाहुनी आलोय म्हंटल्यावर आराम करायचा, मस्त फिरायच. उगाच हे जेवण वगैरे कशाला करायचं.
मावशी :
ती पाहुणी आहे. पण तुला काम करता येत की नाही.
रेवती :
हे बघ मी मदत करते ह कामात. उगाच बोलू नकोस. सकाळी वॉशिंग मशिनची कपडे कोणी उनात घातलीत.
मावशी :
हो बाई खूप काम करतेस. बर जेव आता.
अहो , करा सुरू. अनु तू पण कर.
( जेवत काका अनुला,)
काका :
काय आनु मेडिकलच शिक्षण पूर्ण झालं ना.
आण्विका :
हो झालं. फक्त आता इंट्रानशिप बाकी आहे.
काका :
पेपर छान गेलेत ना?
आण्विका :
हो.
काका :
बर, आता पुढे काय करणार आहेस. लग्नाचा विचार काही. म्हणजे काय ठरवलस?
मावशी :
( मध्येच बोलत )
तुमचं आपल काहीतरी, आता कुठे रिकामी झालीय लगेच विषय नको लग्नाचा. जरा फ्री होऊ दे.
( अनुकडे पहात)
तू जेव बाळ.
आण्विका :
अजुन काही तस ठरल नाहीये पण..
काका :
स्थळ बघायला चालू आहेत असच ना.
आण्विका :
नाही अजुन
मावशी :
बघाय येईल डॉक्टर नाहीतर इंजिनियर. पुढें,…. अजुन पुष्कळ वय आहे.
उगाच घाई कशाला. तुम्ही गप बसा हो.
अण्विका :
मावशी काका काय चुकीचे बोलत नाहीत. त्यात काय लग्न तर केव्हा पण करावेच लागणार. आज नाहीतर उद्या. डॉक्टर आहे म्हणून थोडेच जास्त वेळ थांबणार, बाबा पण विचारत होते.
मावशी :
साडवांच बोलण झालं वाटत.
काका :
नाही हं, आमचं काही या विषयावर बोलन झाल नाही. मला वाटल म्हणून विचारलं. एखाद स्थळ चांगल बघायला बर.
मावशी :
जेवण थंड होतय. जेवा आता.
( ते जेवू लागतात.)
Cut to…..
…. …. ……. ……
Night /10 o, clock. / Outer/ Alibag
( जेवणानंतर, रेवती बाहेर बसलेल्या अनुकडे येते.)
रेवती :
अनु दीदी चल जरा बाहेर थोड फिरून येवू.
आण्विका :
चल बर..
Action :
( त्या दोघी फिरायला बाहेर पडतात. फिरत आहेत )
Dialog
रेवती :
काही म्हण दिवसा जरी कोकणात उकडत असले. तरी रात्रीचा गारवा विलक्षण मोहून टाकतो. नाई का?
आण्विका :
हो तर. मस्त वाटतंय. खरंच
रेवती :
त्या चांदण्या बघ किती मस्त वाटता त.
आण्विका :
हो, आम्ही लहानपणी मामाकडे गेल्यावर अशाच चांदण्या मोजत होतो. आठवलं काय.
रेवती :
हो, तर मस्त वाटायचं. यावेळी जाऊया का ग मामाकडे.
आण्विका :
मी तयार आहे. तू ठरव. गेली चारपाच वर्षे चकवते आहेस.
रेवती :
यावेळी नक्की.
Action :
(अन्विकास अचानक शांत पाहून )
Dialog :
रेवती :
काय ग बाबांचं बोलण जास्त मनावर घेतलेलं दिसतय.
आण्विका :
तस काही नाही ग. त्यांचं काय चुकीचं आहे.
रेवती :
हे बघ मी तुला सांगते. आता सुट्टीला आलीस. बाकी कशाचा विचार करू नकोस. लग्नाच बघू पुढे. आता एन्जॉय कर सुट्टी काय?
आण्विका :
बर.
Action :
(त्या परत घरी निघतात.)
Cut to :
….. …….. …….. ……. …
Night/ Inter/ Anu mavshi home / in room
Action :
( रेवती पाण्याची बाटली आणते. बाजुला टेबलावर ठेवते, बेडवर अंथरूण टाकते.. )
Cut to .......
(बाहेरुन आल्यानंतर, अन्विका तिचे हात पाय धुते.)
Cut to ..... ....
(रेवाच्या खोलीत जाताना.)
Dialog
आण्विका:
काका गुड नाईट, मावशी गुड नाईट.
काका, मावशी एकत्रित :
गुड नाईट. बाळ
Action :
( रेवतीच्या खोलीत गेल्यानंतर ती आपली पर्स उघडते आणि पलंगावर बसते. आपला मोबाइल काढून पाहात. दरम्यान, रेवती जवळ येते. मोबाईल नेट चालू करते. संदेश येऊ लागतात.)
Dialog
रेवती :
काय ताई काय करतेस?
आण्विका :
अग, आल्यापासून पहिलच नाही बघ. घरी फोन सुध्दा केला नाही. थांब करते. लक्षातच नाही राहिलं माझ्या.
Action :
(आण्विका फोन लावते. तिकडून आई फोन घेते.)
आण्विका :
हॅलो, आई,
आई :
बोला लवकर आठवण झाली. फोन करायला.
आण्विका :
अग गडबडीत राहूनच गेलं.
आई :
कल्याण आहे. मी जर सुधाला फोन केला नसता तर कळलच नसत. व तुझा मोबाईल का ग नेटवर्कच्या बाहेर आहे असे सांगत होता.
आण्विका :
अग, आई तू पण ना, गाडी घाटात असताना लागत नाही एकेकदा.
आई :
मी केला होता मावशीला फोन. तीनच सांगितलं पोहोचली म्हणून.
काळजी वाटते बेटा.
आण्विका :
बर सॉरी ह.
आई :
ठीक आहे. काळजी घे.
सर्व साहित्य सुधाला दिलस की नाही.
आण्विका :
हो ग, दिलं. बर ठेवू का.
आई :
ठेव ह.
( रेवती अंथरूण लावत.)
रेवती :
काय म्हणत होत्या आई साहेब.
आण्विका :
काय म्हणतील पोहोचलीस का , कशी आहेस वगैरे……
रेवती :
बर मी जरा आलेच.
अण्विका :
बर.
Action :
रेवा बाहेर जाते.
(अणु तिच्या पलंगावर बसून संदेश तपासण्यास सुरवात करते. संदेश वाचताना अनोळखी क्रमांक पाहून त्यावरील शुभ रात्रीचे संदेश वाचते.)
Dialog
आण्विका :
(मनाशी)
हा कुणाचा नंबर आहे? असेल ओळखीचा कुणाचा तरी. आपण पण गुड नाईट देवू या.
Action :
ती एक संदेश पाठवते.
जेव्हा संदेशाचे उत्तर येते. तेव्हा ईशान अन्विकाला पुन्हा डीपी पाहतो. एक नवीन वैचारिक मैत्री लेख पाठवतो. )
Action :
आण्विका लगेच पाहून ती तो लेख वाचते. कोण आहे. हे जाणून घेण्यासाठी.
आण्विका :
नाईस व आपली ओळख
( आण्विका संदेश पाठवते.)
ईशान :
(रिप्लाय)
आपला मित्र.
आण्विका :
( रिप्लाय )
आपला मित्र बरोबर आहे. पण नामकरण विधी झालाय की नाही.
ईशान :
ईशान पाटील.
आण्विका :
तू आहेस होय.
ईशान :
जेवण झालं का?
आण्विक :
हो, आताच. झोपायची तयारी चाललेय. बर, तुझं झालं.
ईशान :
आताच आलोय. बर गुड नाईट.
आण्विका :
गुड नाईट
( मेसेज पाठवते.)
Action : first night
( अन्विका डीपी पाहते. त्याचा छान फोटो. ती पाहते
त्याला पाहून ती फोन बाजूला ठेवते. दरम्यान रेवा येते.)
Dialog
रेवती :
गुड नाईट अनु दी.
आण्विका :
गुड नाईट.
Action :
( लाईट बंद करतात.)
Cut to…….
…… ……. …….. ……..
Night / Alibag rest house room / inter
Action : first night seen
( अन्विका एक चांगला रात्री संदेश पाठवते आणि ईशान देखील पाठवतो.)
. Dialog
ईशान,
( स्वतच्या मनाशी)
अरे. यार हिने गुड नाईट टाकला. मला खूप बोलायचं होत.
काय करू. जरा संयमाने घेऊ. नाहीतर मॅडम चिडतील.
बर आता काय करू. ह पुस्तक वाचतो.
( Action : पण ईशान मूडमध्ये नाही. शेवटी, तो ब्लँकेट घेतो आणि झोपतो. )
Cut to….
….. ….. ….. …..
Morning,./ ६.०० o’ clock. Inter /outer./
Action:
(पक्षी किलबिल करत आहेत आणि उजेड पडत आहे . ईशान जागा झाला आहे आणि आपल्या कसरत तयारी करत आहे. तो थोड्या काळासाठी रनिंगला जातो आणि नंतर ध्यान करतो आंघोळ करतो.)
Cut to ....
…… ……… ……..
Canting / Forest office attend rest house / 8.०० o’ clock. Morning/ Inter.
Action:
(चहा पिताना)
Dialog:
रवींद्र :
काही म्हणा राव…..बॉडी मस्त राखलीय तुम्ही.
ईशान :
( चहा घेत)
आपल्या खात्यात अपडेट रहावच लागत.
रवींद्र :
ते खरंच आहे म्हणा. आपली ड्युटी आहेच तशी. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी मुळात आळशीच होतो. पण खात्यात आल्यापासून जराही चरबी वाढली नाही. सारखं डोंगर व जंगल चालून इतका व्यायाम होतो. की दुसऱ्या व्यायामाची गरजच नाही. पण तुमच्यासारखी व्यायाम वगैरे नाही जमत आपल्याला.
ईशान :
मला सवयच आहे. लहानपणापासून अपडेट राहायची.
रवींद्र :
लग्न वगैरे झालंय की नाही.
ईशान :
नाही अजुन, आता सेटल झालोय आता बघायचं.
रवींद्र :
मग मुलगी एखादी पाहिलीय का? की काही प्रेमप्रकरण वगैरे.
ईशान :
घरचे बघताहेत. चालू आहे.
रवींद्र :
घरच्यांनी बघण्यापेक्षा तूच बघशील की नाहीस. का काढू एखाद स्थळ आमच्या भागातील.
ईशान :
( हसत)
माझी पसंती असल्याशिवाय ते काही बोलणारच नाहीत.
(सर्वजण हसतात.)
रवींद्र :
चला लवकर जायला हवं नऊ वाजेपर्यंत रिपोर्टींग आहे.
( ते सर्व निघतात. )
Cut to…..
…… …. ….. ….. …..
क्रमशः… पुढे
….