ट्रॉय एक ऐतिहासिक युद्ध
आज आपण ट्रॉय या फिल्मची समरी पाहणार आहोत. फिल्मच्या सुरवातीला एका रणांगणावर ग्रीस राजा एडमेनॉन व दुसरा राजा यांचे सैन्य समोरा समोर सैन्य उभे राहून होते. तो राजा एडमेनॉनला आपल्या राज्यातून सैन्य मागे घेण्यास सांगतो. तर एडमेनॉन त्याला आपला मांडलिक हो व तो युद्धास बोलवेन तेव्हा हजर रहा म्हणतो. तो राजा म्हणतो तू सर्व जग जिंकू शकत नाहीस. एडमेनॉन म्हणतो अनेक राजांनी माझे मांडलिकत्व स्वीकारलं आहे. आपण प्राचीन युद्ध लढूया. तुझ्यातला शूर योद्धा व माझ्यातील शूर योद्धा यात लढाई करु. तूझा योद्धा हरला तर तू माझ्यासोबत प्रत्येक युद्धात साथ द्यायची. व जर माझा योद्धा हरला. तर मी सेना मागे घेईन. तो गॅब्रियल योध्यास बोलावतो. जो धिप्पाड असतो. एडमेनॉन अखिलीसला हाक मारतो.
तो रणांगणावर नसतो. म्हणून चिडतो. एक सरदार त्याला बोलवायला गेलेला असतो. तेव्हा अखिलीस आपल्या तंबूत दोन महिलांसोबत झोपलेला असतो. निरोप मिळताच तो रणांगणावर येतो. तेव्हा एडमेनॉन त्यास टोचून बोलतो. तेव्हा अखिलीस म्हणतो. बरं होईल जर दोन राजांनी स्वतः लढून युद्धाचा निकाल लावला तर. तो चिडून निघालेला होता. तेव्हा दुसरा मांडलिक राजा त्यास तुझ्या एका निर्णयाने हजारो प्राण वाचतील. अखिलीस मागे फिरतो. गॅब्रियलशी लढतो. व त्यास मारतो. हरलेला राजा त्यास आपला राजदंड तुझ्या राजास दे, असे म्हणतो. तेव्हा अखिलीस तो माझा राजा नाही असे म्हणून निघतो. एडमेनॉन अखिलीस योध्याची प्रसिद्धी पाहून जळत असतो.
पुढील सीन मध्ये ट्रॉय व स्पार्टामध्ये वारंवार युद्धे झाली होती. त्यांनी मैत्रीचा तह केला होता. व यासाठी काही दिवस ट्रॉयचे राजकुमार हेक्टर व पेरिस स्पार्टास गेलेले होते. तिथे त्यांचा यथोचित पाहुणचार होतो. पण तिथे पेरिस हा स्पार्टाची राणी हेलनच्या प्रेमात पडतो. ते दोघेही प्रेमात पडतात. परत ट्रॉयला येताना पेरिस हेलनाला लपवून जहाजावर आणतो. व जहाज मध्य समुद्रात गेल्यावर आपल्या भावाला हेक्टरला सांगतो. हेक्टर चिडतो. व तिला परत पाठवण्यास सांगतो. कारण या घटनेमुळे ट्रॉय वर युद्ध येऊ शकते. पेरिस नकार देतो. तिला पाठवले तर तो ही तिच्यासोबत जाईल. असे सांगतो. आपला अल्लड भाऊ हकनाक मरेल. या भीतीने हेक्टर त्या दोघांना ट्रॉयला आणतो. इकडे मेनोलीस आपल्या भावाकडे एडमेनॉन कडे जातो. व त्याची पत्नी पळवून नेली.
ट्रॉय विरुद्ध युद्धात भाग घेण्यासाठी सांगतो. एडमेनॉनला ट्रॉयवर हल्ला करण्यासाठी हेलनचे निमित्त मिळते. युद्धाची तयारी सुरू होते. अखिलीस यामध्ये जाणार नसतो. राजा व सल्लागार चर्चेत इतर राजे हे युद्ध भयंकर असेल. व यासाठी अखिलीस व त्याचे योद्धे हवेत. हा विचार मांडतात. त्याशिवाय हे युद्ध जिंकणे अवघड आहे. ॲडमेनोना म्हणतो. त्याला आवरणे कठीण आहे. तो ट्रॉयशी लढायचे सोडून आपल्याशी लढेल. इतर राजांपैकी एकजण अखिलिसला भेटण्यास जातो.
अखिलीसकडे गेल्यावर तो राजा म्हणतो, त्यांनी आपला अपमान केला आहे. तेव्हा अखिलीस तो राजाचा अपमान आहे. माझा नाही. तो राजा म्हणतो. हे भयंकर युद्ध होईल यामध्ये मरणाऱ्या योद्यांची नावे अमर होतील.
अखिलिसलाही आपले नाव युगानुयुगे लोकांच्या आठवणीत रहावे असे वाटत असते. तो निर्णय घेण्याआधी आपल्या आईस भेटायला जातो. ती देवता असते. अखिलीस जन्मला तेव्हा तिने त्याचे पाय धरुन पवित्र नदीत बुडवले होते. त्यामुळे त्याच्या घोट्याखालील भाग सोडून सर्व शरीर अमर असते. ती त्याला म्हणते. तू जर युद्धावर गेला नाहीस व इथेच राहिलास तर तुझे लग्न होईल. मुले होतील. त्यांची मुले होतील. पुढे मरण पावल्यावर तुला नातवंडांच्या पुढे कोणीही आठवणीत ठेवणार नाही. व युद्धावर गेलास तर तू मरशील. पण कायम युगानुयुगे ही पृथ्वी असेल तोपर्यंत लोकांच्या स्मरणात राहशील. तो युद्धावर जाण्याचा निर्णय घेतो. अनेक जहाजे स्पार्टातून युद्धास निघतात.
इकडे ट्रॉयमध्ये हेक्टर आपल्या वडील प्रिन्स यांना हेलनला परत पाठवा असे सांगतो. पण पेरिस मध्ये हेलनमुळे बदल झालाय असे राजा बोलतो. हेक्टर म्हणतो की या घटनेमुळे भयंकर युद्ध ट्रॉयवर येईल. मेनोलिस राजा एडमेनॉनकडे गेला असेल. एडमेनॉन तर ट्रॉयवर हल्ला करण्यासाठी कारणच शोधतोय. व या घटनेने त्याला ते मिळालं आहे. व युनानच्या संयुक्त फौजांशी सामना करणे कठीण आहे. आपण जिंकू शकणार नाही. राजा प्रिन्स म्हणतो. ट्रॉयच्या भिंती भेदन कठीण आहे. व ते सत्य असतं. हेक्टर म्हणतो यामुळे ट्रॉय जळेल. हेक्टरला प्रजेची व राज्याची काळजी असते.
जहाजे दिसताच इशारा घंटा वाजू लागते. अनेक जहाजे येत असतात. अखिलीसचे जहाज पुढे असते. राजाला वाटते. हा शहाणपणा करायला जाऊन फुकट मरेल. पण अखिलीस व त्याचे सैन्य किनारा काबीज करुन अपोलो मंदिर लुटतात. मूर्ती फोडून पुजाऱ्यांना मारतात. व देवदाशीस कैद करतात. हेक्टर एक तुकडी घेऊन बचावास येतो. त्यावेळी अखिलीसशी त्याचा सामना होतो. संध्याकाळ होते युद्ध थांबते. हेक्टरला अखिलीस परत जा उद्या लढाईत भेटू असे बोलतो. व ते तळावर येतात. अखिलीस आपल्या तंबूत येतो. तिथे त्यासाठी सैन्याने एक देवदासी जी राजाचीच सुंदर मुलगी असते तिला बांधून ठेवलेले असते.
ती म्हणते, तू पवित्र अपोलो देवाचे मंदिर लुटलेस. व पुजाऱ्यास मारलेस अपोलो देवता याचा बदला घेईल. तो म्हणतो, मी कुठल्याही पुजाऱ्यास मारले नाही. व तुझा देव कोठे आहे, त्याचं मंदिर लुटलं गेलं. पुजारी मारला गेला. व त्याची दासी कैद आहे. तो कशाची वाट पाहतोय. तेव्हा ती वेळ आल्यावर शिक्षा करेल असे म्हणते. तो तिचे हात सोडतो. व तू येथे सुरक्षित आहेस असे सांगतो.रात्री विजयाचा उत्सव करण्यासाठी बोलावल्यावर राजा अखिलीसला टोचून बोलून म्हणतो की शिपाई कितीही लढला तरी लोक राजास आठवणीत ठेवतात. व लुटीचा माल कुठे आहे असे बोलतो. आखिलीस तू सर्व लूट घेऊ शकतोस असे म्हणतो. राजा म्हणतो. ती आम्ही घेतलीय. व त्या देवदासीस सैनिक ओढून आणतत तेव्हा अखिलिस चिडतो. व मी कफन घेण्यापूर्वी तुला ठार मारून मग मरेन म्हणतो. व तलवारीने एका सैन्यास मारतो. तेव्हा ती म्हणते आज खूप रक्त सांडले आहे. माझ्यासाठी आणखी रक्त सांडायला नको. अखिलीस चिडून निघून जातो.
दुसऱ्यादिवशी तो युद्धात न जाण्यास आपल्या सैन्यांना सांगतो. ट्रॉयची सेना व एडमेनॉनचे सैन्य समोरासमोर येते. हेक्टर, पेरिस व मेनोलिस, एडमेनॉनचे व योद्धा समोरासमोर उभे असतात. पेरिस हेलनसाठी द्वंद्व करूया व युद्धाचा निकाल लाऊ असे म्हणतो. व ते दोघे लढताना तो खाली पडतो. हेक्टर मेनोलिसला ठार मारतो. युद्ध पुकारले जाते. ट्रॉयच्या तिरंदाजांचा मारा. व युद्धतंत्राने एडमेनॉनच्या मोठी हानी होते. अनेक सैन्य व योद्धे मारले जातात. . तो सैन्य मागे घेतो. रात्री राजांची बैठक होते. राजे म्हणतात, हेलन साठी आलो. तिचा नवरा मेला आता युद्धाचं कारण संपल. व जर हे युद्ध जिंकायचं असेल तर अखिलीस हवा.
राजा एडमेनॉन म्हणतो, आता मी विनंती केली तरी तो येणार नाही. राजे म्हणतात त्या मुलीच काय केलं. एडमेनॉन म्हणतो. आम्ही ती सैन्यान दिली. इकडे बाहेर सैनिक त्या देवदासीला. त्रास देत असताना अखिलीस येऊन तिला त्यांच्या तावडीतून सोडवून आपल्या तंबूत आणतो. रात्री ती म्हणते तू चांगला माणूस आहेस. योद्धा का झालास? तो म्हणतो, मी जन्मलो. व आज योद्धा आहे.तू देवदासी का झालीस. तो बोलतो. तुझी एडिसी देवता कशी आहे. जो स्वतः मारलेल्या मनुष्याचे कातडे पांघरतो. ती म्हणते सर्व देवतांचा आपण आदर करावा?
तो म्हणतो, मी तुला रहस्य सांगतो. देवतांना मृत्यू नसतो. आपल्याला असतो. आपल्याला सर्व वस्तू सुंदर वाटतात. कारण आपण मरणार आहोत. तू आता जितकी सुंदर दिसतेस. तशी पुढे नसशील. ती म्हणते मी तुला रानटी समजत होते. त्या रात्री झोपल्यावर ती त्याच्या गळ्यावर सुरा ठेवते. तो ठार मार म्हणतो. तिला जमत नाही. तो तिला आपल्या मिठीत ओढतो. ते प्रेमात पडून संभोग करतात. अखिलीस परत जायचं ठरवतो. त्याचा भाऊ चिडतो. की आपले लोक मरत असताना आपण का परत जायचं. अखिलस म्हणतो. एखाद्या मूर्ख राजासाठी आपण आपले प्राण कशाला द्यायचे.
त्या रात्री ट्रॉयचे सैन्य अग्निवर्षाव करुन तंबू पेटवतात. व दुसऱ्या दिवशी पहाटे हल्ला करतात. तेव्हा अखिलीसचा भाऊ आखिलीसची कपडे घालून लढाईला जातो. सैन्य ही त्याला अखिलीस समजून युद्धास जातात. व हेक्टरशी लढताना तो मारला जातो.
हेक्टर जेव्हा त्यांचे शिरस्त्राण काढतो. तेव्हा एक शिपाई त्यास हा अखिलीसचा चुलत भाऊ आहे हे सांगतो. हेक्टर ओळखतो. की याचा परिणाम वाईट होणार. त्याच रात्री तो आपल्या पत्नीस ट्रॉयच्या किल्ल्यातून संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग दाखवतो. अखिलीसला जेव्हा हे समजते. तो दुसऱ्या दिवशी ट्रॉयच्या दरवाजा बाहेर उभा राहून हेक्टरला बोलावतो. हेक्टर युद्धासाठी येतो.
तो म्हणतो जो योद्धा मरेल त्यास सन्मान मिळाला पाहिजे. तेव्हा आखिलीस म्हणतो की वाघ व माणसात कधी करार होत नाही. त्यांमध्ये द्वंद्व होते. आखिलीस हेक्टरला मारतो. व आपल्या रथाच्या मागे बांधून फरफटत नेतो. त्या रात्री ट्रॉयच राजा प्रिन्स अखिलीसकडे येतो. व मुलाचे शव मागतो. अखिलीस त्यास मी तुम्हाला ठार मारू शकतो असे बोलतो. राजा म्हणतो की ज्याचा तरुण मुलगा मरण पावला. तो मृत्यूस कसा घाबरेल. अखिलीस प्रेत देतो. व म्हणतो की आमच्याकडे बारा दिवस शोक करतात. प्रिन्स राजा म्हणतो आमच्याकडेही बारा दिवस असतो. अखिलीस राजाला बारा दिवस कोणीही ट्रॉयवर हल्ला करणार नाही असे सांगतो. व प्रेत घेऊन जाण्यास सांगतो. तेव्हा त्यांच्यासोबत देवदासी राजकन्येलाही नेण्याची अनुमती देतो. ते जातात.
एडमेनॉन राजा चिडतो. व कोणाच्या परवानगीने बारा दिवसांची मुदत दिली. हीच वेळ होती हल्ला करण्याची असे म्हणतो. दुसरे राजा आपण त्यांच्या भिंती भेदू शकत नाही असे सांगतात.
तेव्हा खूप विचार करुन त्यातील एक राजा युक्ती करतो. ते समुद्र किनारी एक मोठा लाकडाचा घोडा बनवतात. व संपूर्ण समुद्र किनारा खाली करतात. बारा दिवसांनी ट्रॉयच लोक पाहतात की समुद्र किनारी लाकडी घोडा आहे. एकही जहाज नाही. व अनेक प्लेगने मरून पडलेली प्रेते दिसतात. ते म्हणतात अपोलो देवाने त्यांना शिक्षा दिली.
राजकुमार पेरिस व सेनापती म्हणतो. की हा घोडा पेटवून द्या. तर पुजारी म्हणतो. हा पोसायडन देवाचे प्रतीक आहे. त्याला नगरात नेऊया. व ते त्यास किल्याच्या आत घेऊन येतात. व विजयोत्सव करतात. कारण सलग दहा वर्षे चाललेले हे युद्ध ते जिंकले होते. रात्र होते. त्या घोड्यात लपून बसलेले अखिलीस व त्याचे योद्धे बाहेर पडतात. व किल्ल्याचा दरवाजा उघडतात. व तटावर जाऊन मशाली दाखवून इशारा करतात. व दूरवर जहाजे लपवलेले एडमेनॉनचे सैन्य किल्यात प्रवेश करुन ट्रॉय जाळू लागतात. व लोकांना मारू लागतात. एडमेनॉन प्रिन्स राजाला ठार मारतो.
त्याला देवदासी राजकन्या दिसते. ती देवाजवळ प्रार्थना करत असते. एडमेनॉन मागून जातो व तिला पकडून म्हणतो. अखिलीसने जो माल खाल्ला तो मी पण चाखेन, ती त्याच्या मानेवर खंजीर मारते. राजा एडमेनॉन मरतो. त्याचे अंगरक्षक तिला मारायला येतात. अखिलीस त्यांना मारतो. व तिच्याशी बोलत असताना राजपुत्र पेरिस लांबून अखिलीसच्या पायात बाण मारतो. तो आरपार जातो. ती मारू नको म्हणते. तो मारतो. अखिलिस तलवार घेऊन मारायला धावतो. पेरिस चार बाण मारतो.
अखिलिस कोसळतो. तो तिला शहर सोडून जाण्यास सांगतो. ट्रॉय नष्ट होणार असते.
पेरिस, राजकन्या व हेक्टरची पत्नी व कुटुंब व काही लोक गुप्त वाटेने किल्याबाहेर जातात. दुसऱ्या दिवशी अखिलिस व अनेक ग्रीक योद्ध्यांना प्राचीन वैदिक परंपरेनुसार अग्निसंस्कार करतात. त्यांची चिता जळत असते. दूर डोंगरावरून अखिलीसची प्रयेशी व ट्रॉयचे गुप्त मार्गाने गेलेले लोक पाहत असतात. धन्यवाद.
